प्रवेशिका - २५ ( palli - बुजलेल्या वाटांचा...)

Submitted by kaaryashaaLaa on 8 October, 2008 - 00:01

बुजलेल्या वाटांचा काही गाव शोधणे नाही
दूर निळ्या मेघांची आता वाट पाहणे नाही

आसुसलेली हुरहुरणारी रात जागणे नाही
अता व्यथा माझी मजपाशी मौन तोडणे नाही

कसे पटावे जनरितीला नाते तुझे नी माझे
परिट घडीचे अभ्रे येथे स्वप्न पाहणे नाही

स्पर्शाचा ना विटाळ वा दुःखाचे सावट नाही
किती शुचिर्भुत नाते याला ठाउक चुकणे नाही

मनामनाचे द्वंद्व तरीही प्रीती बदलत नाही
बाह्य वळण या संसाराला, वाट गवसणे नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्यथा, परीटघडीचे अभ्रे आणि शुचिर्भूत नाते हे शेर आवडले.

कल्पना खूप स्पष्टपणे उतरल्या नाहीत असे वाटले.
काही व्याकरणाच्या सुटी देखील घेतल्या आहेत.
माझ्याकडून ४ गुण.

आफताबशी सहमत. कल्पना स्पष्ट होत नाहीत असंच मलाही वाटलं.

माझ्या मते ४ गुण.
-सतीश

थोडी माहिती:

या गझलमधे तुमच्या लक्षात येईल की दोन मतले आहेत. म्हणजे मतल्याचे नियम पाळणारे दोन शेर आहेत.
अश्या गझलला 'हुस्न-ए-मतला' गझल असं म्हणतात. आणि दुसर्‍या मतल्याला 'मतला-ए-सानी' असं म्हणतात.

==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

'मतला-ए-सानी' चा दुसरा मतला कोणता ह्यातला? मग पहिल्या (कोणत्या?) मतल्याला काय म्हणतात? एक बाळबोध शंका....
माझे ५ गुण

छान आहे
५ गुण

'मतला-ए-सानी'
वा ही नविन माहीती मिळाली
कार्यशाळा, धंन्यवाद

शेर १ आणी २ आवडले...

६ गुण...

पहिले दोन शेर आवडले
४ गुण
'हुस्न-ए-मतला'! वाह! नावच काय सुरेख आहे Happy
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!

परिट घडीचे अभ्रे येथे स्वप्न पाहणे नाही>>> मिसरा मस्तच एकदम झकास

पल्ली,
दुसरा शेर म्हणजेच सानी मतला...
माझे गुण ४
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

छान छान.
व्रुत्तात बसवताना थोडीशी दमछाक झाल्यासारखी वाटतेय. पण प्रयत्न स्तुत्य आहे.

गुणः ६

बरेच मिळाले की Happy