मायक्रोवेव्हमधला केक

Submitted by प्राची on 23 November, 2009 - 05:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पिठीसाखर १/२ कप,
मैदा १/२ कप,
बेकिंग पावडर १ टी स्पून,
अंडी २,
तेल १/२ कप,
दूध १/४ कप,
व्हॅनिला इसेन्स १ टीस्पून.

क्रमवार पाककृती: 

१. मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र २ वेळा चाळून घ्यावे.
२. साखर आणि अंडी एकत्र फेटावे.
३. हळू हळू तेल घालत मिश्रण फेटावे. सगळे तेल घालून झाले की दूध घालून परत फेटावे.
४. मैदा+बेपा परत एकदा एकत्र चाळून घ्यावे.
५. एकावेळेस थोडेथोडे मैदा+बेपा वरील फेटलेल्या मिश्रणात घालून मिसळावे. फेटू नये. 8च्या आकारात फोल्ड करत मिसळावे.
६. सगळा मैदा+बेपा संपला की हे मिश्रण तयार केलेल्या मावेप्रुफ भांड्यात्(तयार केलेले भांडे-म्हणजे भांड्यास थोडे तेल्/बटर लावून मग त्यावरून मैदा भुरभुरवावा.) घालावे.
७. मायक्रोवेव्ह मोडवर हायपॉवरवर न झाकता ४ मिनिटे लावावे.
८. केक ओलसर दिसतो म्हणून अजून बेक करू नये. तसाच ४-५ मिनिटे मावेतच ठेवावा.
९. मग बाहेर काढून ५-१० मिनिटे थंड करावा. मगच प्लेटमध्ये काढावा.
१०. मग माझी आठवण काढत काढत खाऊन टाकावा. Happy

वाढणी/प्रमाण: 
छो कु असेल तर एकाच बैठकीत संपेल.
अधिक टिपा: 

आवडत असल्यास थोडा पिवळा रंग टाकावा.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राची, काल उचकी लागली की नाही? Happy

सुंदर झाला केक. मी एकही बदल न करता केला. जमला बाई एकदाचा, हुश्श! तीन केक बिघडले आत्तापर्यंत मावेत केलेले. हाही बिघडला असता, तर कानाला खडा होता! अनेकानेक धन्यवाद!

पण, जमला. सेम कयानीसारखा झाला(- हे मत आनंदातिशयात केलेलं असू शकतं :फिदी:)

प्राची, केक मध्ये अंडे आहे म्हणून मांसाहारी मध्ये घातला असाल असे समजतो.
त्या ऐवजी 'अंड्याचे प्रकार' मध्ये टाकू शकाल, कारण रुढार्थाने यात मांस नाही.

प्राची, पूनम,
कुठ्ल्या brand च कुठलं तेल वापरलं?

कोणी rocket चं शेंगदाणा तेल वापरून करा आणि सांगा बरं चालेल का?(हो ! उगाच माझा केक बिघडायला निमित्त नको)

मीराधिका शेंगदाणा तेल चालायला हरकत नाही बहुदा पण मी माझ्याकडच्या केकच्या पाककृतीच्या पुस्तकात सूर्यफुल किंवा कनोला तेल वापरा असे वाचलेले आठवतय.

अल्टिमेट केक झाला! धन्स प्राची. पूनमसारखंच , काहीही बदल न करता तुझी पाकृ वापरली. एकदम हलका, पर्फेक्ट गोड ... फारच छान! पुढच्या वेळेस केला की फोटो टाकेन इथे. जरा सजावट वगैरे करुन. Happy

प्राची काल अन आज उचक्या लागल्या की नाही? मी नेहेमी मावे मध्ये कन्व्हेंशन मोडमध्येच केक केलाय. उगिच बिघडला तर काय ह्या भितीने मावेमध्ये कधीच केक केला नाही.
काल संध्याकाळी लेकाने अचानक केक खाना म्हणून सांगितल्यावर तुझ्या रेसेपीने केक केला. केक करताना अगदी शेवटी लक्षात आलं, व्हनिला इसेंसेची बाटली दिसत नाहीये (बहुतेक मी गावाला गेलेली असताना नवरा / दीर / भाच्चा / ड्रायव्हर यापैकी कुणीतरी बाटली फेकून दिली स्वैपाकघर आवरुन ठेवताना :(). मग ऐनवेळी त्यात घरात असलेली थोडीशी कोको पावडर घातली, ३ टेबलस्पून. ४ ऐवजी ४.३० मिनिटे बेक करावा लागला. पण सही स्पाँजी झाला होता केक. आज परत एकदा करेन.

प्राची,
आपल्या पाककृतीप्रमाणे (तंतोतंत) केक केला. खूपच छान झाला. फक्त मी शेंगदाणे तेल वापरल्यामुळे थोडा तेलाचा वास आला. थोडी कोको पावडर घातली किंवा इसेन्स जास्त घातला तर तो येणार नाही असं वाटतंय.

पाककृती बद्द्ल धन्यवाद.

~साक्षी.

सही आहे - तसाही भारतात कन्व्हेंशनल ओव्हन नाहिये माझ्याकडे!
परत आल्यावर उपयोगी पडेल ही कृती!

मी ही केला ! ओव्हन असताना सुद्धा. Happy फटाफट होतो अगदी! खरंच अथ पासून इती पर्यंत झाला अर्ध्या तासात.. पण इथली साखर किंचित अगोड असल्याने कमी गोड झाला. पण रेसिपी हिट्ट आहे अगदी ! परत करणार!

प्राची, खूप धन्यवाद!

घरात लेकाच्या मित्रांची बरीच फौज जमली आणि जेवणानंतर खायला गोड हवं होतं. आधी काय करावं सुचलं नाही, पण ही पाककृती आठवली. अक्ष्ररशः १५ व्या मिनिटाला केक पोटात गेला. Happy छान स्पाँजी झाला. मुलांनी आवडून खाल्ला.

छान जाळी सुटली.

microwavecake-maayboli-1.JPG

वरून चॉकलेट सॉस आणि मिश्रणात जरासे बदाम तुकडे घातले. भांड्याला कुठेही न चिकटता अख्खा निघाला.

microwavecake-maayboli-2.JPG

हाणायला तयार!

microwavecake-maayboli-3.JPG

धन्यवाद स्नेहा. क्रेडिट पाकृला. खरपूस होत नसला तरी खरंच मस्त होतो. प्राचीने दिलेली कृती तंतोतंत पाळायची.

वरचे फोटो बघून करायचा मोह आवरला नाही.घरि मैदा नव्हता, सरळ कणिक घातली.तरीही छान हलका आणि चवदार झाला.मैद्याची सर नाही, तरी छान झाला.लेकीनी खाल्ला....

मी केला, खाल्ला, भयंकर आवडला.

मैदा नव्हता, कणिक वापरली.

अंडी फेटली आणि लाईट गेले. मग ते प्रकरण फ्रिजात ठेवलं. सकाळी उठल्या उठल्या बाहेर काढून ठेवलं. रूम टेम्पला आल्यावर केक केला.

अवनप्रूफ बेकिंग डिश नव्हती म्हणून काचेच्या तीन ग्लासात मिश्रण बेक करायला ठेवलं. केक एकदम अल्टीमेट झालाय. केकला जाळी अशी पडलीये की वाटावं त्यातून आता बुंदीच पाडाव्यात Proud

jhatpat cake.JPG

आज खूप दिवसांनी , खरं तर वर्षांनी केक केला परत. आधी रविवारी केलेला एक बिघडला. मग हा हमखास जमणारा म्हणून आज केला. मस्त जमला. गेलेला आत्मविश्वास परत आलाय. आता प्रयोग करायला हरकत नाही. Wink

DSC09871.JPG

कोका पावडर घातली होती. Happy

प्राचीतै, हे तुमच्यासाठी पुपुवर टाकलेले. व्हाऊन जाईल म्हणून हिते.
_____________________________________
प्राची, हाईस काय? आज तुझ्या रेस्पीने मावेमध्ये केक केला. गोष्टी फेटायला घेताना आपल्याला जी बाटली फ्रिजात व्हॅनिला इसेन्साची म्हणून वाटतेय, ती रोझ इसेन्साची आहे हा साक्षात्कार झाल्यावर मिश्रणाला 'वे तेनू रब दे हवाले कीता' म्हणत झाकून ठेवून खालच्या दुकानात धाव घेतली. तिथे व्हॅनिला पावडर नावाचा प्रकार होता आणि व्हॅनिला (द्रव) इसेन्स सोडून केळे, सफरचंद, पान्दान असे बरेच इसेन्स होते. मग शेवटी पावडर (टाल्कम न्हवे, व्हॅनिलाच! सपष्ट केलेले बरे!) घेतली. आठाच्या आकारात नंतर कालवायचे ते इंग्रजी आठ की मराठी आठ ते ऐनवेळी आठवेना. मग असले पीजे विचार निग्रहाने दूर सारून गांभीर्याने मिश्रण मिसळले. मिश्रणात बदामाचे काप, कोको पावडर, असे मनास येईल ते घातल्यावर चार मिन्टे मावेत लावायचे ते लावले. थ्रिलर सिनेम्याचा क्लायमॅक्स पाहत असल्यासारखी चार मिन्टे मावेवरून नजर काढली नाही. मिश्रण फुगायला लागले तेव्हा हे उतू गेले तर काय करायचे असा एक विचार येऊन गेला. पण वाचले! मिश्रण, मी आणि मावे... चार मिन्टांनंतर एकदाचा मावे बंद झाला. नंतर मावे 'रिमूव्ह फूड' म्हणून शिट्ट्या घालत होता तरी त्याकडे दुर्लक्ष करून पाच-सात मिन्टे केकाला मावेत राहू दिले. आता बाहेर काढून थंड करत ठेवला आहे. ___________________________________
हे दोन फोटो.
cake1.JPGcake2.JPG

वॉव!!!! सही झालाय केक... Happy
माते, आपण आमच्या पाककृतीवर आपली कृपादृष्टी केलीत याबद्दल धन्यवाद. आपल्या आशीर्वादाने आम्ही अजून अश्याच छान छान पाककृती इकडे टाकत राहू. Proud

मस्त दिसताहेत सगळ्यांचे केक. करून पाहाण्यात येइल. अशाच प्रकारे रव्याचा अंडी न घालता केक मावेत करता येइल का? (उगचच पाकॄ ला फाटे फोडलेच पाहिजेत का?)

शुम्पी, फाटे नाहीत ग, इम्प्रोव्हायझेशन्स म्हणायचं Proud
मी कधी अंडी न घालता केला नाहीये हा केक. कदाचित दही घालून जमेल रव्याचा.
तुझ्या प्रश्नाचे उत्तर जाणकार देतीलच. सगळ्यांनाच नवी पाकृ मिळेल. Happy

Pages