मायक्रोवेव्हमधला केक

Submitted by प्राची on 23 November, 2009 - 05:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पिठीसाखर १/२ कप,
मैदा १/२ कप,
बेकिंग पावडर १ टी स्पून,
अंडी २,
तेल १/२ कप,
दूध १/४ कप,
व्हॅनिला इसेन्स १ टीस्पून.

क्रमवार पाककृती: 

१. मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र २ वेळा चाळून घ्यावे.
२. साखर आणि अंडी एकत्र फेटावे.
३. हळू हळू तेल घालत मिश्रण फेटावे. सगळे तेल घालून झाले की दूध घालून परत फेटावे.
४. मैदा+बेपा परत एकदा एकत्र चाळून घ्यावे.
५. एकावेळेस थोडेथोडे मैदा+बेपा वरील फेटलेल्या मिश्रणात घालून मिसळावे. फेटू नये. 8च्या आकारात फोल्ड करत मिसळावे.
६. सगळा मैदा+बेपा संपला की हे मिश्रण तयार केलेल्या मावेप्रुफ भांड्यात्(तयार केलेले भांडे-म्हणजे भांड्यास थोडे तेल्/बटर लावून मग त्यावरून मैदा भुरभुरवावा.) घालावे.
७. मायक्रोवेव्ह मोडवर हायपॉवरवर न झाकता ४ मिनिटे लावावे.
८. केक ओलसर दिसतो म्हणून अजून बेक करू नये. तसाच ४-५ मिनिटे मावेतच ठेवावा.
९. मग बाहेर काढून ५-१० मिनिटे थंड करावा. मगच प्लेटमध्ये काढावा.
१०. मग माझी आठवण काढत काढत खाऊन टाकावा. Happy

वाढणी/प्रमाण: 
छो कु असेल तर एकाच बैठकीत संपेल.
अधिक टिपा: 

आवडत असल्यास थोडा पिवळा रंग टाकावा.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राची, या रेसिपीने केक केला होता काल मावे सेफ मग्ज वापरून....... अगदी मस्त झाला होता........
या मस्त रेसिपीबद्दल धन्यवाद!!!!!! Happy
हे फोटो...

cake2.jpgcake1.jpg

cutepraju,

अंड्याएवेजी दुध किंवा ताक वापरून केक करता येतो, २ अंडी असतील तर साधारण १/२ ते पाऊण कप दुध किंवा ताक घेऊ शकता.

आज पर्यंत माझा केक कधीच नीट झाला नाही आहे त्यामुळे हल्ली प्रयत्नच सोडले होते.इथले प्रतिसाद वाचुन परत एकदा हुरुप आला आहे नक्की करुन पाहीन.
(एक छोटीशी शंका आहे व्हॅनिला इसेन्स १टेबलस्पुन की १ टीस्पुन ? शंकानिरसन झाल्या शिवाय बनवणार नाही नाहितर इतका सोप्पा केक बिघडवणारी मी पहिली नतद्रष्ट ठरायचे Proud

Pages