प्रवेशिका - ३६ ( manisha sadhu - मिठीत येते रंग उधळते... )

Submitted by kaaryashaaLaa on 12 October, 2008 - 23:50

मिठीत येते रंग उधळते म्हणते 'नाही'
हात लावता डोळे मिटते,म्हणते 'नाही'

'विरह कधी जर नशिबी आला..' म्हणाय जाता
अधरावरती बोट ठेवते म्हणते 'नाही'!

कैक ऋतूंची तहान घेउन कुशीत शिरतो
मायेने ती घागर भरते, म्हणते 'नाही'!

नकोच म्हणते शब्द तुझे रे तू असताना
गीत चोरते, वर गुणगुणते, म्हणते 'नाही'!

तिला म्हणावे थांब जरा तर 'उशीर झाला'
उगा फुकाची ऐट दावते! म्हणते 'नाही'!

निरोप घेतो,तिजला म्हणतो 'रडू नको गे'
हसून रडते, डोळे पुसते, म्हणते 'नाही'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे.. वेगळा प्रयत्न.. Happy
७ गुण..

गझल जबरी रोमॅंटीक झालीये: Happy पण ते रंग उधळते जरा खटकतय बर्का Happy
काय रंग उधळले कार्टीनं असं वाटतय ते proud.gifज........रा बदलावसं वाटलं, उगाचच :), >>>
मिठीत घेता, बावरते अन म्हणते नाही
हळुच बिलगते, डोळे मिटते, म्हणते नाही

भल्तीच "ही"... आहे ही 'नाही' ? Happy
माझे ७
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

वाह....
सुंदर.... सुंदर.... सुं....द....र....
माझे गुण ८
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

उत्कट प्रेमाची गझल..!
तरीही सहज वाटते.
माझे ८ गुण

व्वा. मस्तच.. माझे ८ गुण

मस्त! ७ गुण
--------------------------------
आली दिवाळी! Happy

चांगली आहे. 'रंग उधळणे' या संकल्पनेबद्दल श्यामलीशी सहमत. त्यांनी सुचवलेला बदलही छान आहे.

माझ्या मते ६ गुण.
-सतीश

शेवटचा शेर खुपच छान...

८ गुण...

श्यामलीशी मी पण सहमत !! आणि सुचवलेला बदल तर एकदम खास !!
ग़झल एकदम आवडेश Happy

आय हाय, मस्तच! ८ गुण.

मस्त गझल!
घागर शेरात "म्हणते नाही" नीट कळले नाही.
रंग उधळण्याबद्दल श्यामलीशी सहमत:)
"म्हणाय जाता" फार मस्त वाटलं...
शेवटचा शेर तर फार फार मस्त आलाय! अभिनंदन...
माझे - ८.

'रंग उधळणे' या संकल्पनेबद्दल श्यामलीशी सहमत. सुचवलेला बदलही छान आहे.
माझे ९ गुण.

छान आहे गझ्ल..कल्पना एकदम निराळी आणी मस्त...७ गुण

छान जमलीये.
माझ्या मते ७ गुण.

छान गझल
माझे ७

Back to top