एस डी एल सी (1.00_संपुर्ण)

Submitted by ऋयाम on 25 July, 2010 - 11:42

*** Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 ***
* वरील दिवे लागतील तसे घेणे.

...............................................................................................................................................
नवीन अपडेटसाठी वाचण्यासाठी, कृपया " (ver " म्हणुन सर्च करा!!! सर्वात शेवटी मिळणारा भाग सर्वात ताजा Happy
...............................................................................................................................................

"एसडीएलसी" अर्थात "सॉफ्टवेअर डेवलपमेंट लाईफ-सायकल"!
म्हणजे काय? तर कोणतीही संगणकीय यंत्रणा तयार करताना एका ठराविक साचेबद्ध बांधणीमधे तयार केली गेली, म्हणजे ती यशस्वीरित्या तयार होण्याची हमी दिली जाऊ शकते.

आपलाही मुळ मुद्दा तोच आहे, "ठराविक साचा"! पण इथे "संगणकीय यंत्रणेच्या" ऐवजी, ती "यंत्रणा बनवणार्‍या "अभियंत्यांच्या" "लाईफ-सायकल" बद्दल थोडी माहिती घ्यायची आहे... भारतीय संगणक संस्थांचं एकुणच तंत्र बाय डीफॉल्ट "अजाईल" स्वरुपाचं असल्यानं, नेहमी "एक्स्ट्रीम प्रॉग्रॅमिंगच" चालु असतं... "एक्स्ट्रिम प्रोग्रॅमिंग" म्हटलं, की "डिलिव्हरीच्या" अनुषंगानं "फेजेस" पुढेमागे होतातच.
तेही इथं पाळलं जाणार आहे. तर मग, करुया "किक-ऑफ"???

"Guys! This is a very important delivery for our project! Rather 'the most important one'! We need to push ourselves to our limits this time! It's now or never! What say? Chak De XXPL !!!", नवा पी एम बोलत होता..
"yes sir! Let's do it!" फ्रेशर्स आणि एक वर्ष work ex झालेले एका सुरात ओरडले!
"That's the spirit!", पी एम 'experienced guys' कडे न बघताच बोलत होता, "ok. let's get back to work now. This is going to be a really difficult time. But we are going to work on it and WIN this! Yess!!!"
फ्रेशर्स, एक वर्षर्स आपापल्या जागेवर गेले. आता मिटींग रुममधे फक्त 'experienced guys' आणि पी एम अशा दोनच "टीम्स" होत्या....

"guys..", आवंढा गिळत आणि तो लपवायचा अपयशी प्रयत्न करत, "सॅटर्डे सन्डे वर्किंग guys" पीएम.
'guys' च्या तोंडावरची माशीदेखिल हलली नाही. पाच-पाच, सहा-सहा वर्ष आयटीमधे काढल्यावर एकुणच ते "माशी बसायच्याही पलिकडे" गेले होते म्हणा...
पण पी एम ने चिकाटीने जोर चालुच ठेवला... "आपण comp-off देऊया..."
"शोले"मधल्या गब्बरसारखं "आ--क थु!!!" करायची इच्छा मंदारनं मनातच ठेवली. "'जय' नं 'विरु'कडं बघत त्याचं मत आजमावं तसं मंदार, पंकजकडं बघत 'हे सगळं कधीपर्यंत चालणारे??' " म्हटला. पंकजनं नुसताच एक उसासा सोडला.
"अरे, guys the thing is.." पीएमला तोडत, त्याच्याकडं न बघताच, "कधी सुधारणार आपण?" पंकज.
"oh. excuse me... i have a call... " मोबाईलकडे बघत पीएम बाहेर निघुन गेला...
"साला क्ष्ड्ङॅरऊञीऊ।ङ्।ब्फ्ङ्ब" मंदार...

ही XXPL म्हणजे अशीच एक मिड साईज कंपनी. "X. X. Private Limited!"
पैसा म्हणा,फॉरेनची क्रेझ म्हणा, खरीखरी टेक्निकल हौस म्हणा, आयटी इंजिनीअर्सचं पीक आलं खरं....
लोक्स पोत्यानं आयटीमधे जाऊ लागले. दहा एक वर्षांपुर्वी एखादा बंटी वर्षाचा वगैरे होऊन बोलायला लागला, की "बंटी कोन होनाल??" वगैरेला "दात्त--ल.." सारखं उत्तर यायचं, ते आता "आयती! "
त्या बोबड्याला नोकरीबद्दल म्हणायचं ते कळलं. पण ते नक्की "आयटी"का "आयती?" काय माहित?

आता पोत्यानं लोक्स म्हणजे तितकीच स्पर्धा वाढली, प्रोजेक्ट्स मिळवण्यची. "मार्जिन" तर रहायला हवं!? कसाही करुन त्यातुन मार्ग काढायचाच! मॅनेज करायला हवं! "जय पी.एम.!"
...........तर अशा ह्या परिस्थितीमधे XXPLला एक नवीन प्रोजेक्ट मिळाला होता. पी एम 'कीक ऑफ' करायचा 'प्रयत्न' करत होता...

आता पी एम ही व्यक्ती इतकी काही गईगुजरी नव्हती 'experienced guys' नी अगदी हाडहुड करायला. "त्याला कोडमधलं काही कळत नाही!" अशा अफवेचा तो बळी पडला होता. टेकनिकलचा टच न राहिल्यानं मधे मधे अडखळायचा, पण तितकाही वाईट नव्हता. पण एकुण काय, तर "कुछ काम का नही!" असं मात्र इंप्रेशन होऊन बसलं होतं साहेबांचं 'experienced guys' मधे...

==== त्या आठवड्याच्या शनिवारी संध्याकाळी ====

वेळ : ६:०० पी.एम.

"मंद्या, एक काम कर ना.. ", पंकज.
"काय?"
"सगळ्यांना बोलव रुममधे. "
"काय?"
"बोलव तर खरं... ", पंकज, "आणि १० मिनिटांनी. लगेच नाही..."
मंदारनं सगळ्यांना मेसेज टाकला आणि पंकजच्या पीसीकडं जावं म्हणुन वळुन बघतो, तर पंकजच त्याच्याकडे आला होता..
"चल." पंकज.
"कुठे? "
"चल रे. खाली... "
दोघे गाडीवर बसुन बाहेर निघुन गेले.

"चलो भाईलोग! आज अपने भाई संदीप का बड्डे है! " पंकज बोलत होता. "तो, इस खुशीमे हम सब को शरिक होना है! ", संदिपकडे बघत पंकज म्हटला. "आ भाई, ऐसे बीच मे आ..."
नुकताच जॉईन झालेला संदिप "खुशीसे फुले नहीं समा रहा " वगैरे काय ते झाला होता. एवढा यु. पी. मधुन आलेला. आणि इथं एवढं दुर त्याला इतकी चांगली वागणुक मिळत होती. "काय बोलावं आता?" असा विचार करत संदिप मधे आला. तेवढ्यात!
लाईट्स बंद झाले. आता संध्याकाळचे सहा म्हणजे तसा प्रकाश असतो, पण पडदे लावलेले असल्यानं बर्‍यापैकी अंधार झाला. कोणीतरी संदिपचा पाय पकडला. तो ओरडायच्या आत कोणीतरी एक हात. दुसरा हात... दुसरा पायही... काही कळायच्या आत संदिप हवेत होता!
तेवढ्यात मेणबत्ती पेटली! संदिपनं वळुन बघितलं, "केक" दिसला! "ब्लॅक फॉरेस्ट!" संदिपच्या चेहर्‍यावर नकळत हसु पसरलं. आणि नेमकं तेव्हाच!
"फाट्-फाट्" "अरे क्या करते हो?"
"फाट्-फाट्"
"फाट्-फाट्"
"अरे मार क्युं रहे हो भाई...."
"फाट्-फाट्"
"फाट्-फाट्"
...............
...............

पुन्हा लाईट्स लावले गेले तेव्हा "आह...", "मार डाला रे.." करत कण्हत कण्हत संदिप उभा रहात होता. "हॅप्पी ब'ड्डे भाई", पंकज हात मिळवत म्हटला. "भगवान करे.." संदिप बोलला.
"क्या??"
"भगवान करे, मेरी उमर तुम्हे लग जाए! और अगले साल मेरे बड्डे बम्पस तु खाए..." संदिप.
"अरे नही नही. जो तुम्हारा है वो तो तुम्हे मिलेगा. चल, केक काट अभी, लाईट बुझाव रे फिरसे!" पंकज.
"नही!!! लाईट्स रहने दो चालु" घाबरत संदिप ओरडला!
"क्या यार डरता है?" पंकज. "और अगर मारना ही है, तो हम तुझे ऐसेभी मार सकते है. क्या guys?"
आणि मग लाईट्स चालु असतानाच अजुन एकदा "पाऊस" पडला...

"थँक्स यार... " केक कापुन झाल्यावर त्यातला एक तुकडा पंकजला देत संदिप म्हटला.
"बस क्या भाई.. " पंकज संदिपला.. "अभी जा घर तु. नही तो, ऐसा करते हैं. क्या बोलता मंद्या?"
"सगळेच जाऊदेत घरी. कल सुबह सुबह आके, बाकी काम करते हैं. अभी बस हुआ आज इतना.."
"ओके. चालेल." मंदार म्हटला आणि सगळे पांगले...
................
"तु कहां चला बे??" आवराआवर करणार्‍या मंदारकडे बघत पंकज म्हटला.
"जायचंय ना घरी??" मंदार.
"ते ज्युनिअर लोग. तु थांब. साल्या ती डिलिव्हरी काय तुझा क्ष्क्ष देणार? "पंकज हसत म्हटला.
"द्यायची का आज?"
"देऊया रे.. लेट होईल. थोडं काम करुया. माझ्याच घरी थांब.. सकाळी येऊया परत. काय?"
"बर. घरी तेवढा फोन करुन येतो" म्हणुन मंदार बाहेर गेला....

खाली गेल्यावर त्याला विरेन दिसला. गाडी काढत होता. एकटाच हसत होता..
"क्या रे? अकेला क्युं हस रहा है?" मंदार.
"अरे, कुछ नही. वो ..."
"क्या?"
"वो. अपने संदिप भाई का बड्डे हुआ ना.. इसलिये... "
"अच्छा Happy तुम्हारा भी है अगले महिने मे... Happy "
"हां लेकिन तबतक.. "
"क्या??"
"नही... तबतक थोडा प्रॅक्टीस कर लेगा रे मै.. "
"मार खानेकी??? " मंदार हसत हसत म्हटला, आणि तेवढ्यात विरेन सटकला..

फोन संपवुन मंदार परत रुममधे आला. "तो येडा विरेन, खाली एकटाच हसत होता. ", पंकजला म्हटला.
"तो तर हसणारच रे आता..." पंकज.
"का?"
"हे बघ...."
"बघु...."
...........
"आयला लेटर?! "
"मग? हसणारच ना साला आता.", पंकज.
"पण आत्ता एवढ्या क्रिटीकल वेळी? असं कसं लेटर टाकतो यार हा?"
"हे बघ... असले लोक जितके लवकर जातील तितके चांगलेच. "..... "साला... बोला था उसको! "
"तुला माहिती होतं? "
"अरे, इंटरव्ह्यु देताना ऐकलं होतं...."
"मग?"
"मी म्हटलं, एवढा प्रोजेक्ट कर कम्प्लीट आणि मग जा. आत्ता तु क्रिटीकल रिसोर्स आहेस..."
"साला... " मंदार.... " पण मग त्याचं काम?"
"सिम्पल!! आपल्या अजुन काही संध्याकाळी गेल्या.... " पंकज हसत म्हटला आणि मंदारनं घाण घाण शिव्या देऊन रुम पावन केली..........

.............................
(ver 0.02) सुरु... २७जुलै २०१०
.............................

तेवढ्यात पंकजला फोन आला. आपला नोकिया ३३१० घेऊन तो बाहेर गेला. पंधरा मिनिटांनी परत जागेवर येऊन बसला आणि त्यानं "फ्रेशर" पोरांनी केलेला "कोड", "रिव्ह्यु~" करायला सुरु केला.
१. हार्डकोडिंग
२. टेम्प वेरिएबल्स.
३. रिडण्डण्ट कोड.
४. नल चेक नाहीत...
साला... सगळीकडे TODO टाकुन तो पुढे जात होता...
परत फोन वाजला, त्यानं कट केला. काम चालु ठेवलं.

दोनेक तास झाले असतील, त्याच्या मोबाईलवर नवा मेसेज आला. त्यानं तो वाचला आणि "चल!" स्क्रीन ऑफ करुन पंकज म्हणाला.
"चंद्या.... चलो भाउ....", पंकज.
"तुझ्यायला......" म्हणत त्यानं मागं बघितलं, तर कॉम्प्युटर चालुच ठेवुन मंद्या डोकं टेकवुन झोपला होता. समोर स्क्रीनवर "ऑर्कुट" चालु होतं. कुठल्यातरी पोरीची प्रोफाईल उघडली होती आणि तसाच झोपला होता वाटतं.. "साला, सुधरेगा नही..." पंकज, "उठ बे... उठ...." त्याच्या डोक्यावर टप्पल मारत पंकज बोलला.
"अं.. आं?? " मंदार बर्‍याच वर्षांनी उठल्यासारखा जड डोळे उघडायचा प्रयत्न करु लागला. डोळे तर उघडले, पण "यंत्र" दिसेना.
"काय?" पंकज.
"अरे ते..."
"भिंग?"
"चष्मा."
"तेच ते... ? हे किती सांग? " त्याच्या छातीजवळ तीन बोटं धरुन पंकज म्हटला.
"किती बघायला!" मंदार खाली वाकला आणि .. "पश्चाताप.... "
"शाळेतली ट्रिक रे मंद्या... शाळेतली ट्रिक... " 'फाट' कन मंद्याच्या नाकावर बोटांनी फटका मारुन पंकज हसत होता.. "तु शाळेत फक्त अभ्यास केलास ना बे?"
पण "यंत्र" नाकावर चढल्यावर मंद्याच्या अंगात जोर आला आणि त्यानं हातात आलेली बुक पंक्याच्या दिशेनं फेकुन मारली...
"अबे! १२ बजे! चल! " पंकज घड्याळाकडे बघत म्हटला. "एवढं झालं की जेऊ.." म्हणुन दोघं निघाले, ते अजुन जेवलेच नव्हते.
"भुक तो लगी है बॉस! " मंद्या म्हटला.
"मुझे प्यास! " पंक्या म्हटला आणि जोरजोरात हसु लागला...
"बर गाडी मी चालवतो.." मंद्या.
"हो, जाताना तु चालव, येताना मी... " म्हणत पंक्या अजुनच जोरात हसु लागला आणि दोघं बाहेर आले...

पार्किंगमधुन पंकजनं आपली नवी पल्सर काढली. १५०सीसी. ब्लॅक. "बटन स्टार्ट".
पल्सर एकदम "मक्खन"सारखी चालु झाली. "फॉगलाईट" चालु झाला.
गाडीवर बसत, "हळु घे रे.." मंदार असं म्हणतोय तोवर पंकजनं अ‍ॅक्सिलिरेटर आर्ध्याच्या वर नेऊन क्लच सोडला. एक उसळी मारुन गाडी उडाली. पंकजला पकडलं होतं, म्हणुनच केवळ मंदार गाडीवर राहिला आणि दुसर्‍या मिनटाला गाडी चौथ्या गिअरमधे पोचली होती....
"हायवेवर तरी हळु घे..." मंदार म्हटला आणि लगेच चुक लक्षात येउन "सॉरी"ही म्हटला.
त्यानं चष्मा काढला. जोरदार गार वार्‍यामुळं डोळ्यात पाणी आलं होतं. मागच्या खिशातुन रुमाल काढतानाही त्याला "तोल जातो का काय?" अशी भिती वाटत होती. घाबरत घाबरतच त्यानं रुमाल बाहेर काढला आणि डोळे पुसले. पण काय उपयोग होणार होता? अजुन पाच मिनीटं तरी लागणार होती ढाबा यायला. आणि पंकज ड्रायव्हर होता...

......ढाब्यावरच्या सगळ्या खाटा भरल्या होत्या.. "रात्री बारालादेखिल लोकं जेवायला म्हणुन बाहेर कशी फिरत असतात?" वगैरे प्रश्न पडायच्या वयाच्या दोघेई पुढे गेले होते. पण तरी कुतुहल वाटलंच. कोणी कोणाला बोलुन दाखवलं नाही इतकंच. "जगह नही साहेब." गुरखा म्हटला आणि "थांबतो की मग.." मंदार.
"का??" गुरखा.
"का म्हणजे, भुक लागलीये. जेवायचंय."
"का कहे??" गुरखा.
"तुझा बा कहे. " मंद्या हसत हसत म्हटला. "खाना खाना है.. " त्यानं पंकजकडं बघितलं, पण तो तेवढ्यात पानपट्टीवर गेला होता...
जेवण आटपुन कोणीतरी उठलं, बिल द्यायला लागलेलं मंद्यानं लांबुनच पाहिलं आणि पंकजला फोन केला... "ये रे... कॉर्नर टेबल, राईटला"
"कॉर्नर ना ? बेस्ट! " पंकज म्हटला. "आलोच..."
"भुर्जी ना? "
"हां..." पंकज.

...........
...........

मोजुन 'पाचव्या मिनिटाला' भुर्जी आली, पण पंकज काही पानपट्टीवरुन टेबलवर यायचं नाव घेत नव्हता.
आणि मंदारचा फोनदेखिल उचलत नव्हता. चालत तिथपर्यंत जायचा मंदारला कंटाळा आला होता.
ती 'पानपट्टी', मंदार बसला होता, त्या खाटेच्या पाठीमागच्या बाजुला होती, त्यामुळे तो आधी वळुन बघत होता, पण मग कंटाळुन बघणं बंद केलं. पंकज येईपर्यंत खाणंही चालु करता येईना.
"ए कोक दे रे.." म्हणुन पोर्‍याला हाक मारली.
"और एक क्वार्टर व्हिस्की!" , पंकज होता.
त्याचे डोळे लाल झाले होते. हातातली सिगारेट जरी नुकतीच पेटलेली दिसत असली, तरी ही "किमान दुसरी किंवा तिसरी असावी " हे आयुष्यात कधीही सिगारेट न ओढलेल्या मंदारलाही कळलं होतं. पंकजच्या एका वाक्याबरोबर सिगारेटचा उग्र वास, तो भपका त्याला जाणवला होता.

"पंक्या! बस." मंदार.
पंकज काहीच बोलत नव्हता...
"काय झालं? आज सिगारेट का ? २ वर्ष झालेली सोडुन. नीट चालु होतं... काय झालं सांग! " मंदार.
"हे बघ." त्याला मोबाईलमधला मेसेज दाखवत पंकज म्हटला.
एवढं बोलुन समोरची व्हिस्कीची बाटली त्यानं उघडली. कोला मिसळला.
मंदारनं मोबाईल हातात घेतला. "प्रिती"चा मेसेज होता: -
"I think we are not meant for each other. I love someone else!
I didn't know back then. Please forget me. Forgive me.
Your 'FRIEND' -Priti. "
"Cheers!" ग्लास उंचावत पंकज म्हटला.
"अरे पण तुमचं लग्न अ‍ॅरेंज्ड होतं ना?" मंदार म्हणणार होता. पण त्याला समजलं होतं,आज उत्तर मिळणार नव्हतं. .. "पंक्या, You Don't deserve this yar..." मंदार मनापासुन बोलत होता. पण आत्ता तो पंकजला काहीही दिलासा देऊ शकत नव्हता.

एकीकडे पंकजच्या हातातला ग्लास रिकामा होत होता... तिकडे हातातली सिगारेट जळत होती. आग पेटली होती. सगळ्या सगळ्याची राख राख होत होती.
रातकिड्यांचा किर्र आवाजात त्या अंधार्‍या रात्री, पंकज एकटा होता....
तेवढ्यात त्याचा फोन वाजला. " 'प्रितीच' असेल" म्हणुन त्यानं बघितलं तर "ID WithHeld" नंबर होता.
त्यानं उचलला. "Hey Pankaj... Didn't get the delivery yaar.... What say? कब देगा?? It's morning here. Client wants the build in an hour..."

हातातला मोबाईल लांब्-लांब भिरकवायला पंकजनं हात ताणला.....
पण शेवटी "yes.. working on it. Max one hour. The build will be ready."
पोर्‍याला म्हटला, "ये पॅक करुन दे रे..."
मंदारकडं वळुन बघत पंकज म्हटला, "चल मंद्या, चल... "
"काय?"
"चल, ती scheduled Delivery करुया..."

.............................
(ver 0.031_update) सुरु... ३१ जुलै २०१०
.............................

"दे मी चालवतो." मंदार म्हटला.
पंकजनं नुसतं त्याच्याकडं बघितलं.
"पंक्या. तु..."
"दो पेगसे मुझे क्या होगा बे? " मंदारला मधेच अडवत पंकज बोलला, "तुला यायचं असेल, तर मागं बस. नाहीतर चालत ये."
मंदार नुसताच पंकजकडे बघत राहिला, "अजुन माझं लग्न पण झालेलं नाहीये रे.".. मंदार असं म्हटला नुसतं आणि बाआआस! पंकज जोरजोरात हसु लागला. जोरात किक मारुन पल्सर चालु केली आणि मंदारला "बस.." म्हणुन खुण केली.
मागच्या खिशातुन रुमाल काढुन शर्टाच्या खिशात ठेवत चष्मा सांभाळत मंदार बसला. "पंकज, सिरीअसली सावकाश. पोलिसांनी पकडलं नाही म्हणजे मिळवलं..."
पंकजने 'ढाब्या'च्या प्रवेशाजवळच्या मोठ्ठ्या चढावरुन गाडी वर घातली. पुढे आर्धा मिनीट गेलं की डावीकडे हायवे! ते हायवेला लागणार एवढ्यात एक ट्रक शेजारुन जोरात निघुन गेला. पल्सरसारखी दैत्य गाडी हलली. 'पंकज!' मंदार ओरडला. "वो भी पिया था रे साला. दोघं पण पिऊन असतील तर कसं चालेल??" पंकजच्या ह्या डायलॉगवर हसावं का रडावं मंदारला कळलं नाही, पण परत एकदा ' पंकज, स्लो घे ' , मंदार म्हटला...

.....................
.....................

पंकजकडुन "yes.. working on it. Max one hour. The build will be ready." ऐकल्यावर थोडा खुष होऊन "ओके." म्हणत मनोजनं कॉल बंद केला. "दो घंटेमे आया 'बिल्ड' तोभी ओके आहे..." मनात म्हटला, "आज का पुरा दिन टेस्टिंग करुंगा. कल सुबह सुबह लेके जाऊंगा".
तेवढ्यात outlook चा pop-up आला उजवीकडे कोपर्‍यात.
-------------------
"new mail"
from: Ranajeet
subject: status?
text: blank
-------------------
"status उधर के उधर पुछ ले ना साले! इधर ऑनसाईट को क्युं पुछ रिया है?", वैतागुन मनात म्हटला आणि alt-tab करुन IE उघडला...
" 'नीरज' wants to be your friend on Orkut." त्यानं लगेच ती 'friend request' 'Accept' केली...
नीरज! इतने साल बाद!!! साला... Happy इसीकी वजहसे मैं...... Happy मनात विचार चालु झाले आणि काही क्षणातच त्याचं मन 'B Com' च्या Final Year मधे जाऊन पोचलं होतं....

B Com Final Year..
परिक्षेनंतरचा 'इंतजार' कालावधी चालु होता. 'इंतजार' अर्थातच रिझल्टचा!
"और क्या. अबके बाद क्या करना है??" मनोज म्हटला होता.
"मतलब? रिझल्ट के बाद ना?" नीरज.
"हां. और क्या?"
"कुछ कंप्यूटर कोर्स करुंगा शायद. तु?"
"पता नही यार. डॅड बोलते हैं उन्हिकी तरह बैंक मे चिपक जाऊं किसी तरह. पर ये आजकल इतने आसानीसे possible थोडीही है... 'भैय्या.. ये शर्माजीका बेटा बीकाम पास हो गया, उसे ले लेते है बैंकमे...' ..... पचास बैंक हैं. सभिके exams है. उसमे quota है. कैसे होगा यार? "
"तु तो होशियार है यार. बैंक छोड, सीए बन जा. " नीरज.
"देखते हैं.... कुछ ना कुछ हो ही जाएगा. सबका होता है, हमारा भी होग. क्या बोलता है? Happy चल, कल सुबह मिलते हैं....", मनोज म्हटला होता.

M Com चं First Year झालं तसं एकंदर परिस्थिती मनोजच्या लक्षात आली. हे बँक वगैरे आपल्याला काही मिळणार नाहीये. सीए आहेच, पण... त्यापेक्षा 'सोपा' असा काही मार्ग असेल तर तो म्हणजे IT! पेपरमधे सतत येणार्‍या '2,00,000 engineers required in the US this year' सारख्या जाहिराती बघुन त्याचं मत बदललं होतं...
"पर पता नही यार क्या होता है. तुने क्या सिखा है?" त्यानं नीरजला विचारलं.."मैं भी वही करता हुं."
नीरज क्षणभर थांबला. "ये साला 'अपने पैर पे कुल्हाडी' जैसा हो रहा है... " मनात विचार आला...
... मनोज आणि नीरज बरीच वर्ष एकत्र जरी असले, तरी नीरजच्या मनातली आत्मविश्वासाची कमी म्हणा, भिती म्हणा, मनोजबद्दल मनात काही अढी होती. मनोजला कॉम्प्युटर कोर्सबद्दल सांगताना त्यानं बरेच दिवस त्याला सांगितलंच नव्हतं. करिअरबद्दल बोलताना 'तु तो होशियार' आणि 'सीए' असं सारखं चालु ठेवलं होतं. पण शेवटी त्याला रडतखडत का होईना, "NIIT" ची माहिती दिली.
"और फीज कितनी होंगी?" मनोज.
फीजचा आकडा ऐकल्यावर मनोज परत 'सीए' लाच जाईल अशी नीरजची खात्री होती. आणि तसंच झालं.. "नहीं यार.. बाप पे इतना बोझ नही डाल सकता" म्हणुन मनोज तिथुन निघाला होता..

"हां यार. आ ही गया..." NIIT च्या सेंटरमधे नीरजला भेटल्यावर मनोज म्हटला.
"लेकिन तु क्या कह रहा था वो? डॅड पे बोझ और वो सब?" नीरज.
"वो तो यार, लोन मिल गया. और ऐसा नहीं है के पैसा नही है. मुझे अपने दम पे सिखना है रे.. तुझे तो पता ही है...." मनोज म्हटला आणि त्याचा 'IT' मधला प्रवास चालु झाला होता...

बाकी, ... मनोज कॉमर्समधे असला, तरी मुळचाच हुशार असल्यानं ह्या नव्या क्षेत्रात त्याला विशेष प्रॉब्लेम आले नाहीत. "What are the parts of a Computer" पासुन सुरुवात नसली, तरी बर्‍याच बेसिक पासुन सुरुवात करुन हळुहळु Flow Charts VB 6.0, C, C++, ASP आणि आता Java , JSP, Struts असं शिकत आला होता. Course संपल्या संपल्या लगेच छोटीच पण एक नोकरी लागली आणि तिथं काही वर्ष काढ्ली होती. एक वर्षापुर्वी 'ह्या' कंपनीत जॉईन झाला होता. एक वर्ष काम केल्यावर काहीच महिन्यांपुर्वी त्याला ऑनसाईटला पाठवण्यात आलं होतं, आणि तो आपलं काम व्यवस्थित पार पाडत होता..

नीरजची 'Friend Request' Accept केल्या केल्या नीरज online दिसु लागला.
'I make sure, your s/w TASTEs Good...' , नीरजनं आपल्या 'about my work' मधे लिहीलं होतं...
"अरे!" मनोज मनात म्हटला, "तो Testing मे है भाईसाहब? ".
"Are you there Neeraj?" त्यानं scrap टाकला.
.............
"hi. Manoj here. So nice to meet you after such a long time...." अजुन एक scrap टाकला.
.............
नीरजकडुन काही उत्तर आलं नाही.
"offline गया होगा" म्हणुन त्यानं नाद सोडला.

तेवढ्यात outlook चा pop-up आला उजवीकडे कोपर्‍यात.
-------------------
"new mail"
from: Ranajeet
subject: Todays Delivery is not possible! Will let you know details ASAP. Let client know.
text: blank
-------------------

"Oh My God!!!" मनोज म्हटला. "पंकजको call लगाता हुं."
.........
"उठा यार... उठा......" पंकज फोन उचलत नसल्याने वैतागत मनोज म्हटला.
त्यानं 'Call back' केला. ring होत होती, पंकज call घेत नव्हता.
मनोज फोन ठेवणार एवढ्यात तिकडुन आवाज आला, "हॅलो... "
"हॅलो. पंकज. मैं हु यार. तुमने...."
"ओ.. देखो. ये फोन मुझे यहां गाडी के पास मिला. ये दो लडके यहां गिरे हैं. पोलिस को फोन किया है. वो आके देखेंगे..." फोन कट झाला...
......................................................
"Bloody XXXX" मनोज बोलला. "बचा लेना भगवान!" म्हणत त्यानं परत फोन केला. जागा विचारुन घेतली. आणि इंडियामधे रणजितला फोन लावला....

दुसर्‍या दिवशी पेपरमधे बातमी होती: -
"काल मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत पल्सर चालवत असताना दोन आयटी इंजिनीअर्सना अपघात. तपास चालु... "

.............................
(ver 0.05_update) सुरु... ५ ऑगस्ट २०१०
.............................

"Hi John. Good morning.."
"Yes Manoj. Very good morning to you. "
"Sorry to disturb you at such an early hour, but.."
"Oh, That's no problem. But what's the matter? "
"Well, it's about today's delivery. There are some problems in ...."
"Wel Manoj. I can understand this. But! At the same time, you need to understand, it's business. We have decided these delivery dates after long discussions, rechecking reworking and scope reduction meetings. I hope you realize this is not small. "
"Yes John I understand."
"I am glad that you are open to me on issues. But this is different, if it is concerned with Delivery. So here is what i want you to do. "
"yes John, please tell me."
"do this delivery at any cost! As simple as that."
"yes John but..."
"There are no ifs and buts in delivery Manoj. If you promise, you have to deliver. That's all I have to say. And you still have a full day. This is not such a dificult release in my opinion. And you were doing good till yesterday from what you have reported to me..."
"Yes John, but still a major one."
"Well, You must have some pride for your company and yourself too then. And dont get me wrong here. You know, 'Only those, who stick to their Commitment survive...' right?"
"Yes John. I totally second you. Thanks. I will look into it and.."
"Glad that you understand Manoj. And don't just look into it. Sort it out. All the best! "
"Yes, thanks John. Have a nice day."
"Yep. Have a nice day. Thanks Manoj."
"ok.", म्हणत मनोजनं फोन ठेवला.

"बंदा सही बोल रहा है. प्राईड तो होनी चाहिये यार दिलमे.... लेकिन.... अभी कोई नहीं हैं वहां.. क्या करुं?
यहीं पर कर देता हुं कोड चेंज. बादमे अपलोड कर दुंगा... " मनोजनं विचार केला.
"वहां का कोड लेना है. चलाके देखना है. क्या क्या इम्प्लिमेण्ट किया है? कहां फट रहा है?" "साला..."
येतो बडा मगजमारी का काम हो गया. दिमाग को शॉट साला. ब्रेक! What I need is a break! Desperately!
तेवढ्यात मनोजचा फोन वाजला. "हां बोलो भाई. "
"क्या कर रहा है बांगडु?" संजय बोलला.
"कुछ नही यार लफडा हो गया... " मनोज.
"काय, म्हणजे.. हुआ क्या? " संजय.
"अरे.. वो साला delivery है!
"मै कुछ हेल्प कर सकता तो करता था यार. पर क्या करे, अलग अलग कंपनी है Happy " संजय हसत म्हटला, पण मनोजला हसु आलं नाही. "अरे... और वहां दो टिममेट बिमार गिर गए रे..."
"साला. क्या बात करता है?" संजय.
"हां रे. "
"कुछ हेल्प चाहिये क्या??" संजय.
"नही रे...कर लुंगा मैं..." मनोज...
"अच्छा...कुछ हो तो कहना.... " संजय म्हटला आणि तो फोन बंद करुन लगेच अमितला फोन लावला... "मनोज नाही येणार रे बहुतेक... काहीतरी लागलीये कंपनीत... बुक नको करुस त्याचं तिकीट... "

मनोज उठला. जाऊन तोंड धुवुन आला. थोडं फ्रेश वाटु लागलं. "चहा करावा का? " असं मनात आलं असावं, जाऊन चहा टाकला. चहा घेऊन टेबलजवळ आला... तिथं आयपॉड ठेवलेला होता. त्यानं गाणं चालु केलं..... किशोर कुमारचं गाणं चालु झालं..."जिंदगी....... कैसी है पहेली.......? " त्या क्षणाला तेच गाणं का लागावं? त्यानं वैतागुन लगेच आयपॉड बंद केला. उठला. क्षणभर विचार केला. चहा तसाच ठेवुन परत एकदा हातपाय धुवायला गेला. देवासमोर उभा राहुन मिनीटभर नमस्कार केला. "रक्षा करना भगवान, मेरे दोस्तोंकी रक्षा करना.." देवापुढे उदबत्ती लावली. त्याच्या सुवासामुळे मन प्रसन्न झालं. लॅपटॉप टेबलवर घेऊन आला. उदबत्तीचा सुवास हवाहवासा वाटत होता... समोर काम दिसत होतं, पण मित्रही दिसत होते...
कॉलिंग कार्ड काढलं.. +९१९८९००..... फोन उचलला गेला... "हॅलो. मी, पंकजचा दोस्त. कैसा है पंकज??"
"पंकज ठिक आहे." तिकडुन आवाज आला... "अच्छा हुआ" मनोजला धीर आला.. "और मंदार?? वो तो ठिक है ना??" "मंदार सिरीयस है. Pankaj was driving, so he could save himself but Mandar couldn't see the danger...... " हे शब्द ऐकले आणि मनोजला मंदारइतकीच पंकजचीही काळजी वाटु लागली...
"पंक्या सब दिल पे लेता है यार... कैसे होगा...." मनोज पंकजला चांगलाच ओळखायचा... पण...
त्याला प्रितीबद्दल कुठे माहिती होतं ?? ....
"ठिक आहे चाचाजी. मी.. मै रखता हुं फोन. फिरसे करुंगा. ठिक आहे..." मनोजनं फोन ठेवला..
चहा गार झाला होता. परत मायक्रोव्हेवमधे ठेवुन तो कामाला बसला. "इस्के माकी..... साला......."

परत outlook चा pop-up... .
-------------------
"new mail"
from: Ranajeet
subject: Did you let client know? Btw, guys are all right.
text: blank
-------------------

मनोजच्या कपाळावर आठी उमटली... त्यानं फोन उचलला... "यार,..... "
"ओके. आता हुं.... " संजय म्हटला आणि संजयनं अमितला फोन लावला... "अमित... माझंपण कॅनसल रे.. सॉरी! " "काहीच महिन्यांपुर्वी संजयही त्याच कंपनीत होता.. कंपनी बदलली पण मित्र तर होता.. आणि वेळही! "
.......................
......................
" 'थँक्स' भी नही बोल सकता यार... इतना हेल्प किया है तुने.... " काम होत आल्यावर मनोज म्हटला.
"बास का...." संजय म्हटला.... "एक चाय पिला ना साले.... रात हो रही है...... "
"रात्रीचे अकरा वाजले होते! " काम करता करता दोघांचं लक्षच राहिलं नव्हतं...
चहा टोस्ट खाल्ल्यावर मनोज म्हटला, "देख यार.. बाकी मै कर लुंगा... ठिक है??? तु भी सो जा..."
एकंदर परिस्थिती नियंत्रणाखाली आलेली पाहुन संजयनंही आग्रह केला नाही आणि तो घरी निघुन गेला.

संजय घरी आला. काम करुन डोळे चुरचुरत होते...
टेबलवरचा लॅपटॉप घेतला. उघडला... न्युजपेपर साईट चालु केली.....
" मद्यधुंद अवस्थेत पल्सर चालवताना झालेल्या अपघातातला चालक शुद्धीवर, दुसरा अत्यवस्थ... चालकाची मानसिक स्थिती नाजुक... "
बातमी खाली वाचकांचे प्रतिसाद होते: -
१. नेमका बेवडाच वाचला होय??
२. उडवा गाड्या... करा चैन... आणि बसा...
३. हे आयटीवाले म्हणजे .........

खाली असलेले प्रतिसाद वाचता वाचता चिडलेल्या संजयनं लॅपटॉप बंद केला....
"'आयटीवाले???' यात 'आयटीवाले'चा काय संबंध??? "

.............................
(ver 0.06_update) सुरु... १२ ऑगस्ट २०१०
.............................

"नाही.. असं कसं?? " लॅपटॉप परत उघडत संजय स्वत:लाच म्हटला.. तो 'तिसरा' प्रतिसाद बघुन तो बेक्कार चिडला होता...
"अरे 'एक इण्डियन' यात 'आयटीवाल्यांचा' काय संबंध रे?? आणि एवढं 'इण्डियन' आहेस तर नाव लिही की स्वतःचं.... 'इण्डियन' असा नावामागे का लपतोस??? " , त्याच बातमीखाली पोस्ट करुन टाकलं.

'Thank you for your comment. Your comment will appear after approval from our moderators. We will inform you on the registered address, when the comment goes live. Thanks. '

प्रतिसाद लगेच पोस्ट होत नाही माहित होतं, पण तरीही त्या क्षणाला, "आयला, म्हणजे यांचे मॉडरेटर ह्या असल्या प्रतिसादांना काहीच करत नाहीत? धन्य आहेत..." म्हणुन लॅपटॉप तिथेच ठेवुन तिथुन निघुन गेला...

..................................
..................................

"चला, निघावं का?" म्हणता म्हणता मगाशी टाईप केलेला प्रतिसाद, जाता जाता परत एकदा बघायची इच्छा झाली आणि नरेशनं ती बातमी उघडली. आपला प्रतिसाद बघितला: -
"३. हे आयटीवाले म्हणजे ........." , एक इण्डियन.

"आयला ह्याच्या! कोण? 'संजय' म्हणे!!!" त्यानं पक्याला फोन लावला. "आलोच रे २ मिंटात..."
"९८२२१२३४५६ हा माझा फोन नंबर. वाट पाहु रायलोय. आनि एक! बापाला नाव विचारु नै.", इण्डियन.

आपल्या बॉक्सरची कीक मारुन वेगाने निघत तो रस्त्यावरच्या गर्दीमधे नाहीसा झाला....

"काय रे?" नरेश आलेला बघुन पक्या बोलला. "कुठे गेलेलास??"
"काय नाई रे... जरा नेटला गेलेलो.." , नरेश.
"नेटला होय? काय काय आणि??? " पक्या.
"असंच गेलेलो रे कामाला म्हणुन.. जरा प्रिंटाउटा काडायच्या होत्या. " नरेश.
"आयला... बराय की रे.. आनि, काम काय तास्भर? का इतरपन कामं करुन आलास नेटवर्नं??
काय्काय बगुन आलास म्हणाय्चं?? एक्ट्यानं खाल्लेलं आणि एक्ट्यानं बगितलेलं पचत?? 'नाही'! काय?"
"नाई रे.. ऐक की सांगतो." नरेश बोलायला लागला...

" ...तर मी नुस्तं म्हणलो रे, 'हे आयटीवाले म्हंजे...'. असा राग आलाय सांगु साल्यला. खरं बोल्लं की टोच्नारच ना रे?? आणी मंग मलाच म्हणे नाव सांग. तु सांग म्हणलं....
बसला असंल कुठंतरी पॉश एसीमधे कंपनीत. आम्हाला नाव विचारायलाय... "

"ही सगळी एकसारखीच अस्तायत काय रे??" पक्याचं ज्ञान यात कमी असल्यानं त्यानं प्रश्नच विचारणं पसंत केलं आणि नरेश परत बोलायला, "आता आपला सच्या बघितलास. " "दोन वर्षापर्यंत एकत्र फिरायला यायचा रोज. एकदा का त्या आयटीत गेला आणि असा काय बदललाय काय सांगु तुला? नुसता पोरींच्या मागं बघ... माग्ची २० वर्षं कधी पोरांशी बोल्लाच नाही जणु. आता आयटीत नुस्त्या पोरी बघ.
ह्याला पण त्यांच्या बरोबर मग चांग्ले चांग्ले कपडे घालुन नुस्तं हॉटेलात जाय्ला पाय्जे. आणि आम्ही कधी म्हण्लं की 'काय रे? येतोस का जरा? रानात जाऊ. मस्त लहान्पणी जायचो तसं, तर नाई म्हंतो लेकाचा. याच्यायला याच्या... ' गेलास खड्ड्यात म्हणाव... "
"तुमी... अरे होय की. तुमी एकाच वर्गात होतात नव्हे? तेव्हा पण असंच होतं काय ते??" पक्या बोलला आणि नरेशचं मन परत गेलं ते थेट कॉलेजात...

........... दोघंपण बीएससीला होते, एकाच वर्गात. तो एफ वायचा पहिला पेपर आठवला आणि नरेशचं डोकं तापायला लागलं...
"ए... ए नर्‍या.... तेवडं दाखव की लेका.. " सच्या डिवचुन डिवचुन नर्‍याला पेपर लिहु देत नव्हता.
"लेका! एकटंच पास व्हायलाय्स होय? मलापण दाखव की.. "म्हणुन सच्या त्याच्या मागं लागत होता.
सुपरवायजर बघत नाही करत नर्‍यानंही सच्याला पेपर दाखवला होता. एक नव्हे सात! सातच्या सात पेपर ह्याला दाखवले. "लेकाचा नीट पास होऊदे रे.." देवालादेखिल म्हटला होता...

रिझल्ट लागल्यावर नर्‍या सच्याकडं नुसता आ वासुन बघत राहिला होता... ' फर्स्ट क्लास! ' "ह्या सच्याला फर्स्ट क्लास?? माझ्या पेपरातुन कॉप्या करुन पास झाला साला. आणि ह्याला फर्स्ट क्लास?? "
पण नर्‍याच्या ह्या बोलण्याकडं कोण लक्ष देणार होतं? स्वत: जेमतेम सेकंड क्लास मिळवलेला माणुस, "एखाद्या फर्स्ट क्लासवाल्यानं माझी कॉपी केली " म्हटलं तर त्याच्यावर कोण किती विश्वास ठेवेल तितकाच विश्वास सर्वांनी ठेवला.
"अरे! माझं बाकीचं झालेलं रे.. सगळं पाठ होतं. मला ते एक येत नव्हतं, तु लिहीतेला दिसलास आणी तुला विचारलं बघ.... " सच्या हसत हसत म्हटला पण आता नरेशला हसु येत नव्हतं...

....."वर्षाचा कुटला तरी अ‍ॅप्टेक कोर्स केला रे आणि लागला पण आयटीत.. पण तिकडं सगळे असलेच असणार बघ... मी सांगतो... नुसते घोकंपट्टीवीर. आपलं गुपचुप करुन घ्यायचं, दुसर्याचं काही नाही. काय बोलतोस?" नरेश पक्याकडं बघुन म्हटला.. "आणि काय एकेक छापतात बघितलास... पल्सर आहे लेकाकडं. आपण बोंबलतोय सेकंड हँड गाड्यांवर... " नरेश बोलत होता.
"आणि पार्ट्या काय विचार्तोस?? पर्वाच आलेले रे गडावर एक टोळकं.. गण्या म्हटला, 'एकेकानं दोन्दोन तंगड्या खाल्ल्या. पोटं सुटलेली चायला.... खा खा खाताय्त नुस्ती. मजा आली म्हणत होता. ' सच्यापन बघ की. आप्ल्या एवढाच होता. आता बघ. ३६ची प्यांट घालत असंल... "

"तेच म्हंतोय रे... " नरेश म्हटला, "इथं देशात लोकांना खायला नाही आणि हे बाहेर बसुन मजा मारतायत. अणि वर आम्हाला म्हणे, 'इण्डियन' कोण? खरंच... हे आयटीवाले म्हणजे.... "

.............................
(ver 1.00) सुरु... १४ ऑगस्ट २०१०
.............................

"पण असतंय कुठं रे सच्या आजकाल??" गण्यानं विचारलं, तसा "आलंय परवाच.. सुट्टी आहे म्हणे..." नरेश म्ह्टला.. काल दिसलेला.
"तो बघ... यायलाय..." पक्या म्हटला. सच्या येत असलेलं त्यानं लांबुनच पाहिलं होतं. नरेशचं तोंड वाकडं झालं होतं, पण तोंडदेखलं हसणं भाग होतं...
"काय साहेब? काय काय आणि??" नरेश सच्याला म्हटला.
"काही नाही बघ. निवांत... " गॉगल काढुन खिशात ठेवत सच्या म्हटला, "आणि साहेब कुठला.. अजुन एस. ई. च आहे साला. "
" 'एसी' म्हंजे ? " गण्यानं अगदीच लो लेवल प्रश्न विचारला, तसा 'कॉम्प्युटर इंजीनीअर' असं, त्याच्याकडं 'हे कंप्युटर इल्लिटरेट पीपल'वाला हिणकस कटाक्ष टाकुन सच्या बोलला.
"अरे, पण 'कॉम्प्युटर इंजीनीअर' असलं, तर 'सी ई' पायजे... काहीतर झोल आहे... " नरेश.
"होहो. 'सॉफ्टवेअर इंजीनीअर', पण ह्यांना कळणार नाही म्हणुन म्हटलं. " सच्या.
"बाकी?? " पक्या?
"एक नवीन पोरगी जॉईन झालीये रे..... " सच्यानं चालु केलं आणि नरेशनं पक्याकडं बघितलं.
............................
" फार नसतं रे काम. सगळ्या 'लीड' लोकांशी नीट रहायचं, की झालं. मग काम नाही येत आपल्याकडं. आता, माझा टीम लीड आणि मी एकत्रच जातो रे सिग्रेट ओढायला.. दोघं एक सिग्रेट ओढतो, आता बोल...."
............................
" म्हणुन म्हणतो, आयटी शिवाय काही मजा नाही बघ.."
............................
" ऑनसाईट रे... एकदा एक शिक्का मिळाला ना ऑनसाईटचा, की बास. मग नुसती चांदी..."
............................
".. नाही नाही. इथला पगार चालुच असतो रे.. आणि तिकडं वेगळे. म्हणजे बघ, तिथला सगळा पगार उडवलास, तरी पण इथला सगळा पगार?? सेविंग. त्याच्यावर व्याज. आता बोल?! अजुन चान्स नाही येत रे... म्हणुन वैतागलोय. एकदा का चान्स आला, की दाखवतो.. "
............................
" ते होईल रे.. पण आता पगार साला वाढायला पायजे रे... काहीतरी झोल करायला पायजे.... " सच्या नुसता मी, माझं असं बोलत सुटला होता.. लहानपणीचे मित्र, इतक्या दिवसांनी भेटलेले. त्यांच्या आयुष्यातही काही गोष्टी घडल्या असतीलच, पण आयटीपुढे त्या सगळ्या फिक्या पाडुन स्वतःच्या कर्मकहाणीचा डेली-सोप सच्यानं फुकटात उघडला होता....
"गॉगल कुठला रे?" नरेशनं मधेच बोलणं तोडत सच्याला विचारलं, " फास्ट्रॅक? "
" देसी मधे मजा नाही, का स्टाईल नाही. अप्पुनको तो फॉरेनका माल मंगता... क्या??" सच्या परत चालु झाला, " आता ही पँट. वॅन ह्युसेन.. इम्पोर्टेड आहे. ह्याचं फिटींग बघ. अशी पँट लोळायला पायजे थोडीशी बुटावर.. आता तुमचं इंडियनचं फिटींग बघ... शर्ट अ‍ॅलन सोली. बॉडी नसली तरी बॉडी दिसली पायजे... बोल? बरोबर का नाही?"
"बरोबर..." नरेश विषय थांबवायला म्हटला.
"फार उकडतंय नई??" शर्टचं वरचं बटण काढत सच्य बोलला.
"एसी बसवुन घेऊया काय? ", पक्या...
"साला, खेचतो का माझी?? " सच्या हसत हसत बोलला. " एनीवे, फार गरमी आहे, कोल्ड्रिंक पाजतो "
" नको ... " नरेश बोलणार इतक्यात त्याला ओढत ओढत " नवीन आलंय का रे काय? " म्हणत पक्या बोलला. पक्या नावाप्रमाणेच एकदम पक्का खिलाडी होता बोलणाच्या बाबतीत. अस्सल मराठीत 'बेरकी'!
"चार ..." असं सच्या बोलणार इतक्यात पक्या "अरे.. मला जरा मँगो स्सीच सांग. तुमाला काय हवं तुमी सांगा रे..." आता पक्यानं सुरुवात केल्यावर गण्या आणि नरेशही पेटले. "मला दुध-कोल्ड्रिंग" गण्या. बर मी पण 'दुध कोल्ड्रिंग.' नरेश बोलल्यावर सच्या वैतागला. "आयला... तुम्हाला ते नवं ड्रिंक पाजायला आणलं आणि तुमी म्हणजे..."
"अरे, ते सोडा वालं ड्रिंक म्हणे संडासात घालतात. माझा अजुन एक मित्र आहेरे आयटीमदला.. तो म्हणला.. आणि ता आपलं तोंड म्हणजे... " आचरटपणे पक्या बोलल्यावर "एक लस्सी, ३ दुध कोल्ड्रिंक" अशी ऑर्डर दिली तशी " सच्या, जेवलय्स काय?" पक्यानं परत तोंड उघडलं.
"नाही रे.. सकाळी दुध पिलेलं. " सच्या बोलुन गेला आणि जिभ चावली. नशीब, कोणाचं लक्ष नाही गेलं.
"अरे.. इतक्या दिवसांनी आलाय्स. मिसळ नाई खाणार??" पक्या.
"आयला हो रे.. तिकडं नाही मिळत अशी... खावीच... तुमी??" सच्या.
'चार मिसळ. डबल पाव.' सच्या 'पहाड के नीचे' आलेला बघुन पक्या बोलला. 'विचाराय्चं नस्तं...'
सगळे हसले.. खाऊन-पिऊन झालं आणि "चला मग, सी यु लेटर.." म्हणुन सच्या 'एकदाचा' गेला...
"ही 'असली' असतात. "पक्या बोलला आणि त्याच्या बिरबलगिरीला दाद देत सगळे पांगले...

................................................................

>"९८२२१२३४५६ हा माझा फोन नंबर. वाट पाहु रायलोय. आनि एक! बापाला नाव विचारु नै.", इण्डियन.

"'फोन नं?? ' 'बापाचं नाव? ' येडा आहे का?? " अमितला तो मेसेज दाखवत संजय म्हटला.
"कोण हा?? " अमितला काहीच माहित नव्हतं.
"अरे, आमच्या जुन्या कंपनीतल्या त्या दोघांबद्दल म्हटलो नव्हतो का? अ‍ॅक्सिडँट झाला होता..." संजय सांगु लागला, "त्याबद्दलची बातमी आहे रे ही. आणि इथं ह्या इण्डियननं लिहीलंय हे... बघ.."
"काय माहित असं का म्हटला? पण तु तरी पर्सनली का घेतोस?" अमित म्हटला.
"तुपण आयटीत आहेस. तुला माहीतीये तु कसा आहेस, मी कसा आहे.. स्वत:बद्दल बोलु नये, पण विषय निघालाच आहे, आणि उदाहरण आहे म्हणुन सांगतो. मी कंपनी बदलली तरी जुन्या मित्रासाठी अनऑफिशिअली जाऊन मदत केलीच नाई का? आणि आमच्या कंपनीमधला तो.. नाव जाऊदे. आहे एक. तो, दुसर्‍या प्रोजेक्टवर गेला म्हणुन पहिल्या प्रोजेक्टमधलं काम करायला नाही म्हणतो. "
"ह्म्म्म..." अमित.
" परत आणि सगळे चांगलेच, सगळे वाईट असं तरी कुठे असतं रे? आमच्या जुन्या कंपनीतला तो मॅनेजर. त्याला मनोज सारखा शिव्या घालत असतो ना? तो किती रडतो सारखा पैशावरुन?? एवढा पगार आहे त्याला तरी..."
"ते खरं आहे... " मॅनेजरवर गाडी आलेली बघुन अमितनं आनंदात 'हो'त हो मिसळलं.
"एक सांगतो बघ..." संजय पुढे बोलु लागला... "आपलं नशीब चांगलं. कामाचे पैसे मिळतात चांगले... मान्य आहे, की बरेच प्रॉब्लेम्स येतात, पण माझ्या बाबतीत सांगायचं तर मी कम्पॅरीझन करतो ते थेट मिल्ट्रीच्या लोकांशी. डॉक्टर लोकांशी, पोलिसांशी आणि शेतकर्‍यांशी... "
आपण मिल्ट्रीसारखं जीवावर उदार होउन काम करण्याची गरज नसते. डॉक्टर लोकांसारखं लोकांच्या जीवाशी खेळ नसतो. पोलिसांचंही मिल्ट्रीसारखंच. आणि शेतकरी अर्थात कष्टकरी लोकांइतके काबाडकष्टही नसतात. मुद्दा असा, की इतकं काही वाईट नाहीये सगळं. समाधानानं राहिलं तर चांगलंच आहे सगळं. फार फार चांगलं आहे.
....... बाकी राहिलं 'आयटी सोडुन इतर' कामं करणार्‍या लोकांच्या मताबद्दल. त्यांना जितकी माहिती आहे, तितक्यावरुन ते बोलतात. वैयक्तिक अनुभवावरुन बोलतात. त्यांचंही असं जनरल स्टेटमेंट देणं चुकच आहे, पण कोणाकोणाला सांगणार? आयटीच्या माध्यमातुन भारतात किती पैसा येतो हे त्यांना दिसत नसेल तर ते अज्ञान आहे, हे दुर झालं तर चांगलंच आहे.
... आणि शेवटी प्रत्येकजण आपल्याला समजलेला अर्थ बरोबर आहे असं समजुन चालतो. आणि चाललंच पाहिजे. जसं जसं नवीन कळत जाईल तसं तसं अर्थ कळत जातात, बदलत जातात. बर्‍याच चुका होत होत आपण शिकत जातो, आणि मग कुठे समजतं थोडं थोडं...."
"ह्म्म.. खरं आहे तुझं..." अमित 'हो' त 'हो' मिसळत बोलला.
" आपल्याला हे सगळंपण शिकवायला हवं ना कॉलेजात? " हसत संजय बोलुन गेला..
"काय?" अमित.
" आपलं सगळ्यांचं लाईफ थोड्याफार फरकानं असंच आहे ना रे?? त्यामुळं विचार आला.
हे आयटीवाल्यांच्या आयुष्याचं लाईफ सायकल... 'आपलं एसडीएलसी!!!' "

(समाप्त.)

गुलमोहर: 

ऋयाम, काय आयटी वाल्यांची बिंग फोडतोयस अशी? Light 1
लोकांना आयटी म्हणजे दणकून पैसा, गाडी, ड्रायवर, फ्लॅट, मॉल्स, पि़झ्झे नि पार्ट्या एवढच माहितेय Wink

अतिशय सुरेख शब्दात मांडले आहेस. पुढे येऊदे.

मस्त लिहिलय्स Happy

<<लोकांना आयटी म्हणजे दणकून पैसा, गाडी, ड्रायवर, फ्लॅट, मॉल्स, पि़झ्झे नि पार्ट्या एवढच माहितेय >> येस अगदि.
वैताग आलाय सगळ्याचा ! आपण क्रिटिकल क्रिटिकल करुन मरत काम केल तर केव्हातरि वरच्या लोकान्चि डोकि फिरतात आणि प्रोजेक्ट बन्द !
आम्हाला मागच्या एका कम्पनीत सॉलिड शंका होति कि मोठ्या ग्रुपचि हि कंपनि केवळ तोटा दाखवुन टॅक्स वाचवायला आहे! जे जे प्रोजेक्ट सुरु व्हायच ते हाय प्रोफाइल , महागड आणि वर्षा दिड वर्षाने कचर्‍याच्या ड्ब्यात. बिचार्‍या पीएम च्या कीन्वा अशाच कोणाच्या खाती जायच.

ऋयाम... काय लिहीतोयस... अगदी अगदी सेम्म... <<लोकांना आयटी म्हणजे दणकून पैसा, गाडी, ड्रायवर, फ्लॅट, मॉल्स, पि़झ्झे नि पार्ट्या एवढच माहितेय >> Sad खरंय!

लिही पटापट... असं वाटतेय... अनुभवलेलं वाचतेय... हा ते बड्डे बम्प्स सोडून बर्का Lol

बड्डे बम्प्स वरून आठवलं... इंजि. ला असताना माझ्या रूमपार्टनरच्या BF ने तीला सांगितलेला (आणि तीने इमानदारीत आमच्यापर्यंत ढकललेला :फिदी:) बॉईज हॉस्टेलवरचा अनुभव...

तो ज्युनिअर असताना, त्याच्या खास मित्राने प्रेमाचा सल्ला दिलेला... परवा जितके शर्ट्स, पँट्स मिळतील तेवढे घालून झोप... कारण विचारू नकोस...

"परवा"चा दिवस उजाडला... हा शहाणा तो "मोलाचा सल्ला" विसरला.. रात्री हे धबाधब धबाधब! ओरडणार्‍याचा आवाज वेगळा वाटला म्हणून शंका येऊन एकाने ती दहीहंडी बाजूला करून खालच्या थरावर उताण्या पडलेल्या (आणि मार खाणार्‍या) पोराला ओढून बाहेर काढायला आणि ज्यांचा हॅप्पी बड्डे होता ते महाशय डोळे चोळत रूममध्ये यायला एक गाठ... लाईट लावत त्याने विचारलं लाईट काढून कसल्या मार्‍यामार्‍या करता रे... ओरडणारा अन बड्डे बम्प्स खाणारा पोरगा त्याच्यासारखाच दिसणारा त्याचा डुप्लीकेट निघाला... मग काय परत हे धबाधब धबाधब... आता लाईट चालूच होती आणी तो डुप्लीकेटही आपल्या माराचा बदला दात्-ओठ खाऊन घेत होता...

सॉरी ऋयाम विषयांतर केलं पण एवढं प्रत्यही वर्णन केलंयंस ना की राहावलंच नाही...

आभार सर्वांचे प्रोत्साहनाबद्दल !
अजुन थोडा भाग लिहीला आहे, वेळ मिळेल तसं लिहीत जाईन. Happy

आपला,
@ऋयाम Happy

अरेरे.... योगायोग आहे... ही कथा वाचताना रात्रीचा एक वाजला आहे.. मी अजुन ऑफिसमध्ये आहे... आणि आजुबाजुला असे बरेच पंकज आणि मंदार बसुन भारताच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावत आहेत... Happy

ऋयाम जमलिये.... अजुन येउ दे पटापट!!!! Happy

हा भाग हि मस्त.
तु नविन भाग टाकलास कि मधे एक मार्कर (भाग २ वगैरे) टाकशील का? म्हणजे नविन भाग कुठुन सुरु झाला ते कळेल.

धमाल Happy

पंकज म्हणाला.
"चंद्या.... चलो भाउ....", पंकज.
"तुझ्यायला......" म्हणत त्यानं मागं बघितलं>>.

इथं मंद्या पाहिजे ना??

रच्याकने एकूण स्पीड जोरात आहे.. असाच चालू दे..

@ आभार्स! Happy

हिम्सकुल, तो मुद्दाम चंद्या म्हणतो. Happy
पण आभार्स इतकं लक्ष देऊन वाचल्याबद्दल Happy

अवघड असत राव डेवलपरच काम... आम्हाला मजा येते त्यांच्या चुका काढायला... वरुन जितक्या जास्त आणी सिरियस काढु तेवढा परफॉर्मन्स चांगला.... शिव्या देत असतील आम्हाला तर .... मस्तच रु..... किप कमींग

आम्हाला मजा येते त्यांच्या चुका काढायला... वरुन जितक्या जास्त आणी सिरियस काढु तेवढा परफॉर्मन्स चांगला.... शिव्या देत असतील आम्हाला तर >>
अनुमोदन!! Happy

नवीन भाग लिहिला की दरवेळी ते ver पुढचा आकडा दाखवणारे ना ऋयामा? म्हणजे लगेच वाचता येईल. हे जेवढं लिहिलंय, ते मस्त!

बाकीची कथा वाचायची आहे.. पण हे बर्थ डे बम्स मुळे कंपनीतल्या एका मुलाची एक बाजू पॅरलाईज झाल्याच कळलं काही वर्षांपूर्वी Sad
एच आर ची मेलही आलेली नंतर की असले आचरट प्रकार करू नका..
जस्ट इमॅजिन - त्या मुलाचं आख्खं आयुष्य वाया गेलं.. केवळ एका 'मजे' मुळे! Sad

आम्ही असल्या मजे पासुन चार हात लांबच अस्तो....
आम्ही जरा वेगळे प्रकार करतो त्यापेक्षा....

वेज लोकांच्या डोक्यावर टमाटे आणी न.वेज लोकांच्या डो़क्यावर अंडी फोडण्याचा....

>नवीन भाग लिहिला की दरवेळी ते ver पुढचा आकडा दाखवणारे ना ऋयामा? म्हणजे लगेच वाचता येईल.
>हे जेवढं लिहिलंय, ते मस्त!
हो. आभार्स !!

नानबा,
Sad
कुठल्या गोष्टीमुळे काय होईल सांगता येत नाही Sad
खरं आहे तुझं...

ऋयामा .... तु developer आहेस !! ? Proud

बाकी जेंव्हा developers चे धिंडवडे निघते तेंव्हाच आम्ही परफॉर्म केले असं समजतात ... !
तसे सिस्टीम अड्मीन, डीबीए, Application owner etc. पण आमच्या कचाट्यातून सुटत नाहीत Happy

पण तुला खरे सांगतो ... मला सपोर्टवाले + developers अशा लोकांची चक्क कीव येते ...
त्यांच्या कडून वेड्या सारखे काम करून घेतात आणि वरून अव्वा च्या सव्वा अपेक्षाही ठेवतात !! Sad

Pages