प्रवेशिका - ३३ ( sarang23 - तुमच्या स्पर्धेमध्ये माझा टिकाव नाही... )

Submitted by kaaryashaaLaa on 9 October, 2008 - 23:50


तुमच्या स्पर्धेमध्ये माझा टिकाव नाही
लांगुलचालन करणे माझा स्वभाव नाही

स्वतःच घाला हार, तुरे घ्या, अन पैसेही
या सगळ्याचा मला जराही सराव नाही...

हवे तसे ठोकून द्या पुन्हा भाषण फक्कड
फसेन मीही असा आपला ठराव नाही !

शुभ्र पांढरी खादी, सोबत गांधी टोपी
हे तर फसवे, जरी तसा पेहराव नाही !

खुलेआम या, लढायला मी तयार आहे
(कुणासही साधेल असा तो बनाव नाही !)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा छानच. जरा विनोदी छटा आहे पण ती उपरोधिक अर्थी आहे म्हणून गजल फार आवडली.

माझे ९ गुण

हवे तसे ठोकून द्या पुन्हा भाषण फक्कड
फसेन मीही असा आपला ठराव नाही !

सह्ही!!

"स्वतःच घाला हार, तुरे घ्या, अन पैसेही
या सगळ्याचा मला जराही सराव नाही..."
छान !!!

८ गुण...

आवडली. ७ गुण
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!

'फसेन मीही असा आपला ठराव नाही' - मस्त शेर आहे.

सर्व शेरांमधून एकाच कल्पनेचा विस्तार वाटला.
माझ्या मते ५ गुण.
-सतीश

छान...
माझे गुण ५...

*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

कल्पना चांगली आहे... ४ गुण..

बनाव आणि सराव हे शेर आवडले!
माझे - ५.

मस्त! वास्तविकदर्शक.

आशय मस्तच आहे.
हवे तसे ठोकून द्या पुन्हा भाषण फक्कड
लगा लगा गागाल गा गागा गागा गागा
हे बरोबर आहे? की "पुन्हा" - "लगा" मोजायला हवय मी?
(कुणी म्हणेल हिला एक 'लगा'वा आता Happy ).
माझे ६
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया