मी सुरवातीला परमाणू अभियंता म्हणून बिघडलेले संगणक दुरुस्त करायचे काम करायचो. ते काम की २ वर्ष केले. मग संगणक अभियंता म्हणून काम केले. आता दोन प्रोजेक्टवर काम करतो आहे. एकाचे project leadership करतो आहे तर दुसर्यामधे senior s/w develoeper म्हणून काम करतो आहे. हे मी इथे एक उदाहरण म्हणून सांगतो आहे म्हणून लिहिले जेणेकरुन मला माझा विषय नीट मांडता येईल. तर ना.. आत्ता माझ्या वेळेसचे सगळे .. बहुतेक सगळे मित्र कुठले ना कुठले मॅनेजर होत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मी software development life cycle च्या सगळ्या फेजेसमधून गेलो आहे. माझा आता SDLC वर काम करण्याचा कल कमी होतो आहे. पण नाईलाज!!!! दुसरी गोष्ट म्हणजे मॅनेजर व्हावे असे मला कधी वाटते कधी नाही. कदाचित हे असे वाटणे माझ्या मित्रांमुळे होत असावे. सध्या मी नोकरी हा विषय डोक्यात आणला की खूपच बैचेन होतो, हरवून जातो, चलबिचल होतो, गंजल्या सारखे वाटते. कधी माझ्या डोक्यात Career Shift चा विचारही येतो पण भिती वाटते. तुम्ही जर अशा स्थितीमधून गेला असाल तर मला तुमचे अनुभव.. तुम्ही अशा स्थितीत घेतलेले निर्णय .. वाचायला आवडेल. कदाचित मी त्याचे अनुकरणही करेन. धन्यवाद.
Career shift -- नोकरीच्या एका टप्प्यावर
Submitted by हर्ट on 15 June, 2010 - 06:31
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बी.. विषय लईच सेंसीटीव
बी.. विषय लईच सेंसीटीव आहे....
फक्त खालील काही प्रश्नांची ऊत्तरे देता येईल का ते बघा..
१ मी नौकरी कशासाठी व कुणासाठी करतोय ?
२ खरेच आणी खरेच मला मॅनेजर व्ह्यायचे आहे का?
३ मॅनेजर समजा मर मर करुण झालातच तर ऊद्या आपल्या बॅच पैकी लोक आजुन वर्च्या पोस्ट वरती जातील आणी ही धावपळ अगदी मरे पर्यंत चालु राहील.. मग आपण जे ते करत आहेत तेच करत बसायचे का?
ह्य गोष्टीबद्द्ल आपल्याला अमेरिकेतिल लोकांचा attitude आवडतो..
कित्येक वर्ष एकच काम करणार पण जे करणार ते एकदम चोख.. (Master of one and jack of none)
आपल्या कडे ह्यच्या ऊलट आहे (Master of none and jack of all)
आणी शेवटी एकच टीप..
जर तुमची अशी समजुत असेल की मॅनेजर झालो की मी खुप पैसे कमवीन (सध्यापेक्षा) तर तो एकदम चुकीचा समज आहे..
ह्या जगात नौकरी करुन कुणीही श्रीमंत होऊ शकत नाही ..
आणी पैशे कमवायला.. ईंन्जीनीयर किंवा मॅनेजमेंट कोर्स केलाच पाहिजे हे चुकीचे आहे
(हे माझे स्पष्ट मत)..
ह्या जगात नौकरी करुन कुणीही
ह्या जगात नौकरी करुन कुणीही श्रीमंत होऊ शकत नाही ..>>>>> हे एकदम पटेश.
ह्याला मिड लाईफ क्रायसिस
ह्याला मिड लाईफ क्रायसिस म्हणतात का?
___
अनेक क्षेत्रात रस असताना केवळ एकाच क्षेत्रात काम करावे लागले तर असा गोंधळ होतो. तुमचा निर्णय पक्का करा...अन वाटचाल करा!
___
ह्या जगात नौकरी करुन कुणीही श्रीमंत होऊ शकत नाही ..>>>>> हे एकदम पटेश.
ह्या जगात नौकरी करुन कुणीही
ह्या जगात नौकरी करुन कुणीही श्रीमंत होऊ शकत नाही ..
आणी पैशे कमवायला.. ईंन्जीनीयर किंवा मॅनेजमेंट कोर्स केलाच पाहिजे हे चुकीचे आहे
(हे माझे स्पष्ट मत)..
हेहेहे एक्झाक्टली
पटले म्हणण्या ऐवजी आजकाल पटेश
पटले म्हणण्या ऐवजी आजकाल पटेश म्हणतात का? माहित नव्हते.
<अनेक क्षेत्रात रस असताना> सुदैवाने आज भारतात अनेक क्षेत्रात काम करायची संधी उपलब्ध आहे. त्याचा फायदा मिळेल. पण प्रत्यक्ष अनुभव असल्याशिवाय नवीन क्षेत्रात संधि मिळेल का? कन्सल्टिंग कंपन्यात अशी संधि जास्त.
मी त्या बाबतीत भाग्यवान. आमच्या कंपनीत नेहेमीच कुणालाहि कुठेहि काम करायला परवानगी देत. फक्त गिर्हाईकाची तक्रार येता कामा नये हीच अट. मग त्यासाठी तुम्ही जास्त तास काम करा, काहीहि करून शिकून घ्या!
उदा. जावा येत नसेल तरी जावा प्रोग्रॅमिंगच्या ग्रूपमधे जाऊ देत. पुढे तुमचे तुम्ही काहीहि करून आपले काम निभवा!
अर्थात् गेले ते दिन गेले!
पटले म्हणण्या ऐवजी आजकाल पटेश
पटले म्हणण्या ऐवजी आजकाल पटेश म्हणतात का? >>> हे माबोवरच म्हणतात बहुधा. मी तरी इथेच बघितलेय.
बी,
तुम्हाला मॅनेजर व्हायचेय म्हणजे नक्की काय व्हायचेय? सॉ. प्रोजेक्ट मॅनेजर? की हे क्षेत्र बदलून मॅनेजर? की काही करून क्षेत्र बदलायचेय, मॅनेजर झालेच पाहिजे असे नाही? की पैसा जास्त मिळाल्याशी मतलब?
आम्हीतरी कॉलेजपासुन वापरतो
आम्हीतरी कॉलेजपासुन वापरतो हा(असे कळेश्,पळेश) शब्द!
बी, तुम्ही लिहिले आहे की सगळे
बी,
तुम्ही लिहिले आहे की सगळे मित्र मॅनेजर होत आहेत म्हणुन तुम्हालाही तसे वाटतेय हे जरा बरोबर वाटले नाही. मॅनेजर होणे किंवा न होणे हे मुख्यतः तुमचा त्या क्षेत्रातील अनुभव यावर अवलंबुन असते. बर्याच वेळा एखादी अॅडवांस्ड पदवी (एम बी ए), पी एम पी सारखे प्रोफेशनल सर्टिफिकेशनही मदत करु शकते.
दुसरी गोष्ट मॅनेजर होणे हे थोडेसे काटेरी मुकुट घातल्यासारखे असते. तुम्हाला एका वेळेस मल्टीपल प्रोजेक्ट्स हाताळावे लागतात. त्यातुन डेवलपर्स चे टँट्रम्स, कस्टमरच्या कटकटी, अपर मॅनेजमेंटच्या अवास्तव अपेक्षा हे सगळे करावे लागते. आणी सगळ्यात महत्वाचे म्हणजे मॅनेजर झाल्यावर ९-५:३० येउन आपले काम नीट पुर्ण करुन जाणे हे विसरुन जायला लागेल. तुम्ही पुर्ण वेळ ऑन कॉल असता. तुमचा पेजर, ब्लॅकबेरी , मोबाईल हे तुमचे सखे सोबती होतात.
वरील सगळ्याची तयारी असेल आणि लागणारा अनुभव असेल तर तुम्हाला मॅनेजर व्हायला नक्की जमेल.
धन्यवाद.
टीपः वर लिहिलेल्याप्रमाणे करावे न लागता जे मॅनेजर चा जॉब एंजॉय करत आहेत त्या सन्माननीय अपवादानी स्वतःला वगळावे.
मनोज, अरे त्याला कधी कधी तसे
मनोज, अरे त्याला कधी कधी तसे वाटते..
>>थोडेसे काटेरी मुकुट
खरय, फक्त "चांगला" मॅनेजर असे अॅड करेन मी...
>>हे माबोवरच म्हणतात बहुधा. मी तरी इथेच बघितलेय
मी पण...
प्रोजेक्टपेक्षाही प्रोजेक्टमधल्या लोकाना मॅनेज्/हँडल करणे जास्त अवघड असते... literally काहीही प्रॉब्लेम घेऊन येऊ शकतात लोक... बर्याचवेळा ते त्यांचा प्रॉब्लेम सांगून जातात आणि तुम्ही त्यावर विचार करत बसता नी डोक्याला ताप होतो...
हे पहा बी, काम बिम गेलं
हे पहा बी,
काम बिम गेलं ह्याच्यात.. तुमचे पगाराचे उद्दिष्ट ठरवुन घ्या, तो पगार मिळायला म्यानेजर्/ड्यामेजर जे काय बनायला लागतं ते बिन्धास्त बना.. बरेच वर्ष नोकरी केल्यावर निबरपणा येतो तो वापरा... शेवटी सगळ्या बायका आणि सगळ्या नोकर्या सारख्याच (इती भिकाजी एवं पोष्ट्या जोशी - असा मी असामी ).... नेहेमी शेजारच्याचीच बरी वाटते आपल्याला... असो..
तर जे पैसे मिळतील ते बायकोच्या नावावर एखाद्या छोट्या व्यवसायात गुंतवा.. चांगले इन्व्हेस्टर व्हा.. मग काही वर्षानी नोकरीत तुमचा शब्द शेवटचा असेल.. आणि तुम्हाला हवे ते तुम्ही करु शकाल.. अगदी नोकरीसुद्धा...
सध्या तुम्ही तुमची नोकरी करायची २ मुख्य कारणं ठरवुन घेतलीत की तुमची चलबिचल कमी होइल..
अर्धु जाम आवड्लं. माझे दोन
अर्धु जाम आवड्लं.
माझे दोन पैसे: एक आठवडा अतिशय शांतपणे विचार करावा. आपल्याला शॉर्ट टर्म / लॉन्ग टर्म काय हवे आहे करीअर मधून. आपली इनर पॅशन काय आहे. काय केल्यास आत्मा खर्या अर्थाने सुखी होतो असे फीलिन्ग येते. व मग निर्णय घ्यावा. लेखन, कला, स्वयंपाक, नाट्क यातही उत्तम करिअर होते पण आपल्या गोल मध्ये क्लॅरिटी हवी.
मॅनेजर होणे या बाबतीत मनस्मींना अनुमोदन.
आर्थिक सुस्थिती व आत्म्याची त्रुप्ती कामाद्वारे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक गोष्ट भरपूर बँक बॅलन्स साठी करत राहून मग त्यातून स्वतःच्या पॅशनचे काम करता येते. उदा: माझे स्वप्न समुद्रकिनारी छोटेसे दुकान कम हाटेल चालविणे/ लेखन करणे व कुत्रे पालन करणे असे आहे पण भौतिक जबाबदार्या पूर्ण केल्याशिवाय मी ती स्टेप आत्ता घेऊ शकत नाही. बेस्ट लक
धन्यवाद मामी.. काये.. माझा
धन्यवाद मामी..
काये.. माझा पण असाच प्रॉब्लेम व्हायचा मी नोकरी करायचो तेव्हा.. म्हणजे नोकरीच करतो आता.. पण काम नाही करत.. आपण खुप चिंता करतो आपल्या कंपनीची.. मी सारखा माझ्या मालकवर्गाला नवनवीन कल्पना देत रहायचो, पण कुणी हिंग लाउन विचारायचं नाही.. नंतर विचार केला..तो मालक आहे.. त्याची परिस्थीती आपल्याला कळत नाहिये, त्याच्या अडचणी आपल्याला माहित नाहियेत,, आपण त्याचे पार्ट्नर नाहिये.. मग त्याच्या धंद्यात कशाला वेळ इन्व्हेस्ट करायचा.. आपल्या नोकरीत दिलेल्या जबाबदार्या (प्रामाणिकपणे )पार पाडल्या की झालं...आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे सगळ्या कंपन्यांच्याबाबत खरं आहे.. अगदी किराणामालाच्या दुकाना पासुन IBM पर्यंत..
आता सल्ला देतो पण त्या सल्ल्याच मार्केटिंग नाही करत.. झक मारत ऐकतात वर पैसे पण देतात.. (सल्लागार ह्याचा अर्थ सल्ला देउन गार करणारा असेल का हो )
असो.. आत्ता जे काही काम करतोय ते एवढ्यासाठीच की अजुन काही वर्षांनी बुलेट आणि बायको घेउन मन मानेल तिकडे जगात भटकता यावं..
आणखी एक - आत्म्याची तृप्ती आणि पैसे मिळवण्याचा मार्ग ह्या दोन वेगळ्या ग्रहावरच्या गोष्टी आहेत.. अर्थात आपला विवेक तेवढा जागृत असेल तरच.. नाहीतर सगळेच बाबा आमटे, अभय बंग नसते का झाले.. आपलं कर्तव्य एवढच.. जोडोनीया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे खर्च करी...
अर्धु.. तु तो पुर्णु सत्य
अर्धु.. तु तो पुर्णु सत्य बोलतोस रे १०००% अनुमोदन! वर्चा शुन्य सह!
तुम्ही बुलेट्वरून या अन
तुम्ही बुलेट्वरून या अन माझ्या छोटयाश्या बीच साइड रेस्तराँ मध्ये फिशकरी राइस खा. काही वर्शांनी रे अर्धू.
सल्ला गार पण आवड्ले.
>तुम्ही बुलेट्वरून या अन
>तुम्ही बुलेट्वरून या अन माझ्या छोटयाश्या बीच साइड रेस्तराँ मध्ये फिशकरी राइस खा. काही वर्शांनी रे अर्धू.
याला म्हणतात (हाडाचे) मार्केटींग, किंव्वा सेल्समनशिप. अजून माल तयार नाही पण विकण्याची क्षमता .
मामी, हलकेच घ्या हो... चांगल्या अर्थाने म्हणतोय.
बी,
प्रत्त्येकाची परिस्थिती अन अनुभव वेगळा. माझ्या अनुभवानुसार फक्त पुढील पाच वर्षाची गोल्स नक्की करा अन त्यानुसार पुढचे पाऊल ऊचला, मग गोंधळ होणार नाही. प्रत्त्येक वयात प्रायोरिटीज बदलतात त्यानुसार निर्णय घेतले तर मनाची चलबिचल होत नाही कारण निर्णय का घेतला याला ठोस ऊत्तर असते. आणि ऊमेदीच्या वयात पैसा कमवावाच, साठवून ठेवावा, कारण त्याचे सोंग आणता येत नाही. अन त्यासाठी जे जे करणे क्रमप्राप्त आहे ते ते करावे. एरवी स्वतः साखरेच्या ढीगावर बसून तुम्हाला sugar control (पैशात काय आहे वगैरे?) चे डोस पाजणारे अनेक भेटतील, दुर्लक्ष करा. फक्त पैसा हे कायम स्वरूपीचे प्राप्य/ध्येय नको एव्हडेच लक्षात ठेवले की झाले.
everyone has his/her own definition of job satisfaction. तुमची व्याख्ख्या तुम्ही स्वतः बनवा, ईतरांशी तुलना करणे अतीशय धोक्याचे ठरते.
मॅनेजर होवून सर्व प्रश्ण सुटतात असे मुळीच नाही. भारतात ते जास्ती वाढतात अशा माझ्या मित्रांचे म्हणणे आहे. चांगले काम करायला हुद्दा/पोस्ट लागत नाही ते कधिही करता येते.
career shift हे वरकरणी सोपे वाटले तरी एका अडचणीतून दुसर्या अडचणीत जाता असे म्हणावे लागेल.
बाकी अर्धवट म्हणतायत ते खरे...
पुढील प्रवासाला शुभेच्छा!
योग फिकर नॉट माझे आड्नाव खा
योग फिकर नॉट माझे आड्नाव खा - डील कर आहे हा माबोकर मानसचा ज्योक आहे .( क्रेडिट दिले)
बी एका लहान मुलाचा उच्च शिक्षणापरेन्त चा खर्च २० लाख कमित कमी आहे. उत्तम पैसा मिळविल्यास तुला रिटायरमेंट्ची चांगली सोय करता येइल. व चांगले घर घेता येइल.
२० लाख..
२० लाख.. आग्ग्ग्ग्ग्ग्ग्गाअग्ग्ग्ग्ग्गा..
बी, मलाही असेच काहीसे वाटत
बी,
मलाही असेच काहीसे वाटत आहे.
मी एका Software Company मध्ये Training Department मध्ये कामाला आहे. पण मुळातच मला आकाशवाणी आणि दुरर्दशन ह्या माध्यमात काम करायची खूप ओढ आहे. लहानपणापासून ह्या क्षेत्रात काम करायचे ठरवलो होतो...पण घरच्यांमुळे क्षेत्र बदलावे लागले. आता पून्हा मनाचा आवाज आवडीच्या क्षेत्रात जाण्यास सांगत आहे. आणि मी जायचे ठरवलो आहे.
बघू या कितपत जमते ते!!
मला तर वाटते की तुम्हाला आवडणार्या क्षेत्रातच तुम्ही काम करावे.
मी थोडा वेगळा प्रयत्न
मी थोडा वेगळा प्रयत्न करतोय.
मी माझी आवड आणि नोकरी वेगळी ठेवली आहे.
मला research करायला आवाडतो म्हणुन मी weekends ला करतो
एरवी job.
बी, चांगला प्रश्न उपस्थित
बी, चांगला प्रश्न उपस्थित केला आहेस. बाकीच्यांचे प्रतिसादही उत्तम. ह्यालाच मिड लाईफ क्रायसिस असे म्हणतात. नेट वर ह्याबद्दल माहिती मिळेल पण उत्तर मिळेलच असे नाही.
मामी, अर्धवट, योग तुमच्य पोष्टी छान आहेत. मामी तुमच्या पोष्टी वाचून प्रत्येक वेळी एक नवीन पैलू समजतो. तुम्ही अफलातून आहात इतकी विचारांची सुस्पष्टता असल्यावर निम्मे प्रोब्लेम्सच हतबल होतात
तर सांगत काय होतो की जनरली हा प्रोब्लेम करीअरला सुरुवात होउन ८-२० वर्षे झाल्यावर दिसू लागतो. मी स्वतः देखील ह्या परिस्थितीत सापडलेलो आहे, मात्र केवळ चॉईस करता न आल्याने 'तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे' किंवा 'ठेविले अनंते तैसेची रहावे' ही सोपी पळवाट चालू आहे.
झक्कींनी म्हटल्याप्रमाणे भले तुमची आवड भलत्याच विषयात असेल पण इतकी वर्षे एका (न आवडत्या) फील्ड मध्ये कामाचा अनुभव असल्यावर नोकरी बदलली तरी त्याच फील्ड मध्ये मिळणार ना? कारण दुसरे फील्ड आवडीचे असले तरी त्यात अनुभव नसल्यामुळे जॉब मिळणे कठिणच. आणि व्यवसाय करायची धमक नसेल तर मारलेली उडी कपाळ्मोक्ष करणारी देखील ठरु शकते.
कोणीतरी वर म्हटले आहे की नोकरी करुन श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत म्हणजे किती श्रीमंत? जगण्यासाठी किती पैसा आवश्यक आहे? तुमच्या राहाणीमानाचा दर्जा खालावून तुम्ही सुखी राहू शकाल का? तुमच्या जगण्याच्या साधनात किती प्रमाणात अनावश्यक गरजा आहेत?
हे सर्व प्रश्न ज्याचे त्यानी सोडवायचे आहेत, मात्र एक उत्तर निश्चित की इतर अमुक एका पदावर पोचल्यामुळे (किंवा इतर कोणत्याही कारणामुळे) आपल्यामधे न्यूनगंड निर्माण होउ देऊ नये. तुमच्या कडे किमान एक, तर कमाल अगणित बाबी अशा असतात की ज्याबाबतीत तुम्ही इतरांपेक्षा सर्वश्रेष्ट असता अशी धारणा अंगी बाणवली पाहिजे. फक्त ती बाब कोणती ते शोधण्याचे अवघड काम तुम्हाला करायचे असते.
गवत दुसर्याच्या यार्डातले
गवत दुसर्याच्या यार्डातले असेल तर ते मो करायला सोपे असेच वाटते. कोणतेही काम २०% नवनिर्मीतीचा आनंद देणारे व ८०% मजुरी असते. अवदत्या क्षेत्रातले काम असेल तर त्या २०% करता ८०% काम ओझे वाटत नाही. तुम्हला जे मनापासुन करावेसे वाटते ते करणे खुप महत्वाचे आहे. असो तुमच्या पुढच्या वाटचालीस शुभेछा!
चान्गली चर्चा. मी
चान्गली चर्चा.
मी इंजिनीरिण्गला अॅड्मिशन घेताना ठरवल होत की आता "कला" आवड म्हणुन जोपासायचि पण पुढे खुप मोठ झाल कि केव्हातरि कला या विषयात काहितरि करायच (काय ते अजुनहि माहित नाहि!).
त्यानन्तर साधारण दहा वर्षापुर्वि ठरवल होत कि आयटि चा जॉब आणखि दहा ते पन्धरा वर्षे करायचा आणि मग गाडि पुर्विच ठरवलेल्या मार्गावर न्यायची.
इथपर्यंत सगळ ठिक होत. मधे एकदा एमबिए करायच खुळ डोक्यात आल ते मुष्किलिने परतवुन लावल.
आता माझ्या प्रॉमिस ला दहा वर्ष झालित. आणि डिसिजन घ्यायचा वेळ आलाय का असा विचार करतेय.
अनेक प्रश्न:
वर लिहिल्याप्रमाणे <<मारलेली उडी कपाळ्मोक्ष करणारी >> असेल का?
नविन व्यवसाय केला तर तो सांभाळतानाच ८०% काम कंटाळ्वाण होणार का?
इतके वर्ष नियमित पगार मिळण्याचि सवय झाल्यावर पगार मिळाला नाहि तर कस वाटेल?
घरात येणार्या पैशाचा स्त्रोत कमी झाल्यावर कस वाटेल?
घरात राहिल्यावर खरेच मीड लाइफ क्रायसिस चे प्रश्न उभे रहातील का?
एकदम नविन क्षेत्रात उडि घेण कस जमणार?
(नविन एका आवडिच्या क्षेत्रातल पार्टटाइम शिक्षणहि घेतेय. ते शिक्षण व्यवसाय म्हणुन वापरता येईल कि नाहि हे ठरवल नाहिए, पण आवडतय म्हणून शिकतेय.)
ह्या जगात नौकरी करुन कुणीही
ह्या जगात नौकरी करुन कुणीही श्रीमंत होऊ शकत नाही ..
आणी पैशे कमवायला.. ईंन्जीनीयर किंवा मॅनेजमेंट कोर्स केलाच पाहिजे हे चुकीचे आहे
बी,
लाखमोलाच वाक्य !
अगदी साध्या साधी कामे करत धनाढ्या झालेली लोक आहेतच ना..
साध्या शेतीपासुन सुरुवात करुन आता एखाद्या आयटी नोकरीवाल्यापेक्षा कमवणारे काही मित्र मी पहातो आहेच
मर्मभेदक विषय रे बी. बर्याच
मर्मभेदक विषय रे बी. बर्याच जणान्ना या निर्णयप्रक्रियेतुन अनेकानेक कारणान्मुळे जावे लागते.
मात्र "प्राप्त परिस्थिती, शिल्लक पाठबळ, शिरावरील जबाबदार्या" यान्च्या साकल्याने विचार करुन निर्णय घ्यावा लागत असल्याने एक असे सुत्र नाही सान्गता येत.
मी पूर्वीही या फेज मधुन गेलो आहे, आत्ताही जातो आहे. मात्र वीस/पन्चवीस वर्षान्पूर्वीचे घेतलेले निर्णय, आजच्या परिस्थितीस जसेच्या तसे लागू पडत नाहीत.
१९८७ मधे पुढचे असे काही एक न ठरविता, हातात कोणताही जॉब नसताना, असलेला "आर्टिस्ट" म्हणूनचा जॉब मी वरील मनःस्थितीमुळेच सोडुन दिला होता. नन्तरही कधी करियरच्या नावाने तर कधी पैशाच्या नावाने जॉब बदलले, पण हे कुठवर? लग्न करुन पोरेबाळे होत नाहीत तोवर! एकदा सन्साराच्या जबाबदार्यान्चे ओझे शिरावर घेतले की मग मात्र (अर्धवट शिक्षणाच्या पार्श्वभूमिवर वा अन्य कारणान्नी) जॉब बदलणे सहजासहजी शक्य होत नाही हा स्वानुभव आहे. यावर बरेच लिहीता येईल, पण सगळेच स्वानुभव सान्गावेत असे थोडीच्चे? त्यातुनही येत्या महिन्याभरात काही "विशेष" घडवू पहातोय, जमले तर इथे मान्डीनच.
बी असेच काही प्रश्न मला पण
बी
असेच काही प्रश्न मला पण पडतात आणि किरण प्रमाणे मी पण त्यातून 'ठेविले अनंते तैसेची रहावे' ही पळवाट धरतो. पण चैन पडत नाही. अशाच धडपडीत एक ब्लोग वाचण्यात आला. व्यवसाय हा पण एक पर्याय असेल तर आपण कोणता व्यवसाय करावा ह्या प्रश्नाच्या उत्तरा साठी हा अनाल्य्सीस उपयोगी ठरेल.
http://lazyway.blogs.com/lazy_way/2005/09/finding_your_ca.html
फॅशन डिझायनिंग शिकायचे
फॅशन डिझायनिंग शिकायचे असल्यास कुठे शिकावे / एलिजिबिलिटी टेस्ट घेतात का?