अटळ..(भाग २)

Submitted by स्मिता द on 20 July, 2010 - 03:34

भाग एकः http://www.maayboli.com/node/17954

अटळ..(भाग २)

काय चांगला अन काय वाईट याचेच बेसिक चुकतायेत का?चुकीला चुक म्हणताना ही बुध्दीने चुक वाटणारी गोष्ट मनाला का परत परत चा्टुन जावी..अघळपघळ वागण्याचा हा परिणाम म्हणाव तर विनी मॅडम इतक कोणीच स्ट्रिक्ट नाही हा माझा आजवरचा लौकीक..फ़ारशी कोणात न मिसळणारी..कायम दोन हात लांब असणारी अशी मी..आणि माझ्याच वाट्याला या घटना का?...इथे मी चुकतेय कि समोरचा.. कुठलही परिपुर्ण सुख माझ्या वाट्याला का नसाव....वैचारिक स्वातंत्र म्हणाव तर हे अस स्वातंत्र संस्कारी मनाला स्वैराचार का वाटावं मग? हे खरच वैचारिक स्वातंत्र्य आहे का..वैचारिक स्वातंत्र्य अस स्वैराचार वाटते....

"विनी मॅडम लक्ष कुठे आहे..Are you not feeling well..?

’ अं.." रिजनल मॆनेजरच्या या प्रश्नाने मी भानावर आले..

"Yes what happen? Im talking with you.."

"sorry ...Im fine .."

मिटिंग मध्ये लक्ष लागायला डोक्यात दुसरेच विचार फ़ेर धरुन होते....वेळ मारुन नेली पण खरच खुप डिस्टर्ब आहे मी...खुप.. शांत तळ्यात एखादा खडा पडावा अन असंख्य तरंग उठावेत तसे विचारांचे मोहोळ उठलेय...माझ लक्ष चारुच्या चेह-याकडे गेलं ..ओह शीट... तो ही अस्वस्थ दिसत होता....

मिटिंग कधी संपली माहित नाही...डोक्यात तेच विचार होते..माझा पाया डळमळीत केला त्या विचारांनी..माझा संसार..माझ घर , माझा नवरा...मुलं..यात गुरफ़टलेल्या माझ्या शांत आयुष्यात देवेन आला..पण त्याच येण खुप शांत होत जराही पडझड जाणवु न देणार..Its on spiritual level..but what is this??

**********************************************************************

"विनी.."

चारुच्या हाकेने परत जाग आली मला

"हं..चारु..अरे काय हे कितीदा सांगीतल..."

"विनी सॉरी..तेच म्हणायला आलोय मी..मी रात्रभर विचार केला..You are right....तु म्हणतेय ते पटतय मला..आणि तुला असा त्रास होण बघवत ही नाही मला..सॉरी .........म्हणालो ते विसरुन जा प्लिज..प्लिज विनी..पण आनंदात रहा हसत.. its worth me lot "

चारु असं म्हणुन झटकन आला तसा निघुन गेला...

हुश्य केल मनात चला गुंता न होता हा प्रश्न सुटला.... पण जाता जाता चारु स्वतःला सोडब्वुन मला त्या विचार्रांच्या भोवर्‍यात उडकवउन गेला होता... प्रतिक्षिप्त क्रियेनुसार ते विचार तितक्याच फोर्सने परत परत माझ्यावर आदळत होते

******************************************************************************

हल्ली पंधरा दिवस झाले बघतेय..मी तर फ़ारशी कोणाशी बोलतच नव्हते..पण बडबड्या चारु एकदम शांत असतो....कोणाशीच फ़ारस बोलत नाही..मी समोर आले की टाळतोच मला..निघुन जातो..ठिके म्हणा...good one.. हे घडणारच

पण ह्या विचारांचा ह्या ओढताणीचा ताण असह्य झाला मला..खुपखुप विचारांच्या आवर्तात ढवळुन निघातेय मी ,, त्या आवर्तात जस माझ आणि माझ्या नवर्‍याच नात आहे..मुलांचे बंध आहे तसेच देवेनच ही नात आहे आणि हे वावटळी सारख चारुच येण देखील आहे..........

सतत हे विचार आणि मनात रुजलेले संस्कार यातली पडझड...मनाच अस्तर अस विरविरीत होत चाललेल की बस .....या प्रसंगाने ढवळुन गेलेय मी अंतरबाह्य ..कशात लक्ष लागेना

"विनी काय होतय ..हल्ली इतकी का शांत असतेस गं..बरं का नाहीये..?"

नव-याच्या या प्रश्नवर भडभडुन येतय अन देवेनच फोन आला की

"विनी काय होतय नक्की..काहीतरी होतय हे मात्र नक्की..जाणवतय मला" या देवेनच्या प्रश्नाला काय उत्तर देऊ मी...

माझ्या कडे उत्तरच नाहिये...चारुच समोर ते असं वागणं दिसतय..उजाड भकास...छान मित्र होता हा पण माझा.. का हे अस व्हाव...माझ्या वागण्यात काय असं असाव नाही उत्तर मिळते..आणि हे कोणाशी शेअर ही करु शकत नाही मी नाही करु शकत...

व्यभिचार.... किती दचकले मन या शब्दाने ...
हा भले शारीर पातळीवरचा नाहीये पण मानसिक पातळीवरचा हा व्यभिचारच ना..दुस-या व्यक्तीचा विचार मनात येण हाही व्यभिचारच....ही नैसर्गिक वृत्ती की अखेर पाय मातीचेच हा प्रकार..संस्कार संस्कार म्हणुन नकळत्या वयापासुन बिंबवलेले विचार का असे तकलादु ठरावे..मी दोषी आहे..दोषी..पण खरच दोषी??????

उच्छृंखल.उथळ अशी कधीही मी नव्हतेच ....नाहीये..हळवेपण आहे पण इतक वाहवत नेईल अस आहे ते?????????..घट्ट पाय रोवलेले असे का डगमगले..म्हणजे हा माझ्या हृदयाने केलेल्या अन डोक्याने केलेल्या विचांरा मधला संघर्ष आहे का?......मानसिक पातळीवर कोणी अस जवळच वाटु शकत नाही का?आणि शकल तर तो दोष ठरावा का ? स्वैराचार म्हणतात ना याला..मग तो कृतीतला स्वैराचार असो वा विचारातला..स्वैराचारच ना शेवटी...

मी नाही न्याय देऊ शकत..नाही..... बायको म्हणुन अपयशी ठरले आई म्हणुनही...मुलांच्या बाबतीत ही आदर्श अशी आई नाही ना मी..आईच्या कल्पनात न बसणारी कल्पना आहे माझी...मी आई म्हणुन त्यांच्या विषयीच्या कर्तव्यात, प्रेमात, मायेत कमी पडले नाही तरी आई म्हणुन मी ज्या मानसिकतेतुन जातेय ते निश्चितच चुकीचे आहे...मी विरेशला म्हणजे नवर्‍याची देखील परिपुर्ण बायको नाही होऊ शकले...नाही होऊ शकले ....दुसरा आला माझ्या मनात, माझ्या विचारात... म्हणजे मी ते डागाळेच..ओह..चारुच्या निमित्त्याने हे सगळेच विचार जणु मंथन केल्या सारखे वर आले तरंगुन....... स्वतंत्र विचारसरणी म्हनुन मिरवणारी मी स्वतंत्र कुठे राहिले..स्वतंत्र वेगळ अन ..स्वैरविचारी वेगळ..

रात्रंदिवस केवळ हेच विचार ..सतत नवर्‍याचे, मुलांचे ,आई बाबांचे, देवेन चारुचे, चेहरेसमोर येतात....अगदी अखंड फ़ेर धरलाय या चलतचित्रांनी माझ्या भोवती....भोवंडुन गेलेय मी....संपुर्ण उध्वस्त. मी व्यभिचारी ठरलेय..मानसिक व्यभिचार....कंलकित अगदी जगण्यास नालायक..रसरसल्या जीवन रसाचा आंकठ रसपान करणारी मी अशी असावी..हे पातक का घडावे माझ्याकडुन..पातक...????????? हो पातकच....दृष्यस्वरुपात न दिसणाया या पातकाला प्रायश्चित काय...प्रायश्चित घेतल्या शिवाय हा दोष जाणार नाही.......याला प्रायश्चित????????????????????????????? अटळ आहे हेच
........................................................................
............................................................................................................
.....................................................

***************************************************************************************************

आजच्या वर्तमा्नपत्रात ठळक बातमी झळकत होती....

विवाहितेची आत्महत्या..

उच्चशिक्षीत व उच्चाधिकारी असलेल्या मध्यमवयीन महिलेने काल रहात्या घरी झोपेच्या गोळ्यांचा अतिरिक्त डोस घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण अजुन समजले नसुन घरच्यांना व कार्यालयातील लोकांशी चर्चा करुनही या घटनेवर प्रकाश पडु शकला नाही.

गुलमोहर: 

बासुरी..खुप वेळ झाला मला कथा वाचायला आणि प्रतिसादायला...सगळ्यांनी सगळं म्हटलंच आहे..माझंही मत कथा थोडी धुक्यातुन दिसली.
कवे---झकास पोस्ट...चिंगी,मयुरी,ड्रीमगर्ल आणि पल्लीला पुर्ण अनुमोदन!!

आभार सर्वांचे..:)

पल्ले, अगं घटनेतल्या व्यक्ती त्यांच्या त्यांच्या स्वभाव धर्मा नुसार रिअ‍ॅक्ट होत असतात. रिअ‍ॅक्शन बर्‍याचदा चुकीच्या असतात कित्येक आत्महत्यांमधे असेच वाटते की खरच गरज होती का काहि मार्ग निश्चित मिळाला असता ..इथेही तीने इतके टोकाचे पाऊलनको होते उचलायला..पण काही हळव्या लोकाम्पुढे कसलीच मात्रा चालत नाही हे ही खरेच ना..असो

अर्थात ती आत्न्महत्ये पर्यंत पोचण्या मधला जो तिच्या मनाचा प्रवास आहे, घालमेल आहे,कल्लोळ आहे तो खुप त्रोटक झाला मला मान्य आहे..पण खर सांगु फ॑क्त कथेचा विषय नाहिये हा..मला यावर कादंबरी लिहायचीये..आणि ही त्याची एक छोटिशी झलक्...मला कथावस्तु कशी वाटते ते अजमावायचे होते...कादंबरी आता लिहायला घेतेच..:)

अरे हो माझे नाव मी पुर्ण विचारांती घेतलय त्यामुले अश्या कोणाच्या सांगण्यावरुन नक्कीच बदलणार नाही मी..:)

हॅल्लो बासुरी.
असे प्रतिसाद तुम्हाला का आलेत याची थोडी कारण मिमांसा.
खरे तर कथेत लेखकाला काहीपण विचार मांड्ण्याचे स्वातन्त्र्य असते, पण वाचक जेंव्हा कथा
वाचतात तेव्हा ते कथेचा अर्थ लावु पाहतात. हा अर्थ लावण्यासाठी त्यांना कथेचे वर्गिकरण करणे
आवश्यक होते.
१) कथा ही काल्पनिक आहे. (science fiction, गुढ्कथा, ऐतिहासिक)
२) कथा वास्तवातिल व्यक्तिंचे वर्णन करत आहे. (भावनिक, प्रेमकथा)
तुमच्या या कथेचा प्रॉब्लेम असा आहे की ती बर्याच जणांना (मी included) कोणत्या group मध्ये टाकावी
हेच कळत नाही कारण
अ) भुषण काही म्हणाले तरी असे वर्तन आपल्याला सर्वसामान्यपणे दिसत नाही. Office मध्ये अफेअर्स होत
नाहीत असे नाही पण ज्या प्रकारे अफेअरचे वर्णन केले आहे ते confusing आहे, जर ही बाई २ मुलान्ची आई असुन देवेन बरोबर एवढ्या सहज अफेअर करत असेल आणि मग चारु बरोबर अफेअर चालु करताना देवेनला काय वाटेल याचा तिला प्रश्न पडत असेल (असे होउ शकते पण माझ्या मते एखादी शंभरात) तर त्याबद्दल कोणाला सहानभुती वाटु शकत नाही
यावर उपाय तुम्हाला ही गोष्ट जास्त उलगडुन सांगितली पाहिजे नायिकेच्या या अवस्थेबद्द्ल आपुलकी निर्माण करायला पाहिजे.
ब) दुसरी बाजु अशी असु शकेल की ही स्त्री आपल्या कुटुंबापासुन दुरावली आहे. अशी स्त्री नक्कीच स्वतःसाठी दुसरा जोडीदार शोधेल पण तो शोधताना देवेन का चारु हा प्रश्ण तिला पड्ला असेल तर
तिच्या मनातील या दोघांची comparison वा घाल्मेल तुम्हाला थोडी विषद करावी लागेल. आप्ल्या संसाराच्या अपयशाबद्द्ल खंत असेल तरी नक्की खंत काय आहे? नवरा , मुले दुरावली आहेत? पसंत नाहीत? काहीतरी logical argument लागेल. (Please याचा स्त्री वा पुरुष असा वाद करु नका, तिच्या जागी एक पुरुष असता व त्याला दुस्रे अफेअर करताना पहिलिला काय वाटेल असा आत्म्हत्या कर्ण्या एवढा प्रश्ण पड्ला असता तरी हीच प्रतिक्रिया असती).
क) आना कॅरोनिना वाचली आहे पण ते उदाहरण अत्यंत अयोग्य आहे. एकतर पहिली कादंबरी आहे, आणि ही कथा आहे. टोल्स्तोयनी त्यात सर्व घालमेल मानसिक कंगोरे इत्क्या सुरेख वर्णन केले आहीत की सहजच आप्ल्याला सर्व पात्रांबाब्त आत्मियता निर्माण होते (म्हणजे काही प्रमाणात का होइना वाग्ण्याचा अर्थ लावता येतो).

हे सर्व लिहुनही बरेच जणांनी ही कथा आहे हे विसरुन पात्रांवर हल्ला चढ्वला तो थोडा अतिरेक होता पण याला कारण कथा अर्धवट वाट्ली. बाकी तुमची
अ) भाषा उत्तम आहे.
ब) चाकोरी बाहेर विचार करण्याची क्षमता जाणवते. (इथे तुम्ही छान वेगळा विषय निवडला फक्त पात्र थोडी जास्त explain करा. त्यांची ओळख वाढ्वा.)
क) तुम्ही बरोबर म्हणालात ही कथा, कादंबरी वा दीर्घकथा छान वाटेल.

आणि हो..
"...दोन मुल पदरात असलेली मध्यमवर्गीय संसारी बाई मी..पण नव-याचा विचार करता करता..देवेनचापण कसा विचार करायला लागले कळाले नाही..."
असे शोर्टकट साम्भाळा. देवेन आकर्षक वाट्ला का? स्वभाव आवड्ला का?
काहीच कळले नाही तर कथानक अपुर्ण वाटते.

नमस्कार निलीमा....आपले विवेचन छान आहे...

Office मध्ये अफेअर्स होत
नाहीत असे नाही पण ज्या प्रकारे अफेअरचे वर्णन केले आहे ते confusing आहे, जर ही बाई २ मुलान्ची आई असुन देवेन बरोबर एवढ्या सहज अफेअर करत असेल आणि मग चारु बरोबर अफेअर चालु करताना देवेनला काय वाटेल याचा तिला प्रश्न पडत असेल (असे होउ शकते पण माझ्या मते एखादी शंभरात) तर त्याबद्दल कोणाला सहानभुती वाटु शकत नाही
>>>>> प्रथमतः अफेअर हा शब्दप्रयोग आपण काढुन टाकुयात...ती देवेन बद्दल लिहिताना म्हणते कि हे वेगळ्या पातळीवरचे आहे..म्हणजेच देहिक पातळीवरचा जो भाग असतो..त्याला आपण आत्मिक पातळी म्हणुयात..आणि काय आहे वेव्हलेंथ कुठेही जुळु शकते त्याला अफेअर अस लेबल देण मला तरी चीप वाटते... असो.. अर्थात काय शब्द वापरायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न......

दुसरी बाजु अशी असु शकेल की ही स्त्री आपल्या कुटुंबापासुन दुरावली आहे. अशी स्त्री नक्कीच स्वतःसाठी दुसरा जोडीदार शोधेल पण तो शोधताना देवेन का चारु हा प्रश्ण तिला पड्ला असेल तर>>>> देवेन की चारु हा प्रश्न नाहीचे तिला.....तिला तिघ ही प्रिय आहेत तिचा नवरा, देवेन अन चारु..अजुन एक हा मनोव्यापार आहे..इथे देवेन किंवा चारु यांच्याशी कुठल्याही प्रकारचे देहिक व्यवहार नाहीत्..पण ती अडखळतेय कारण जे संस्कार आहेत आपले पती हाच परमेश्वर..अन एकावरच प्रेम होऊ शकते आयुष्यात्..त्या संस्काराला इथे तडा गेला आहे..त्यामुळे तिच मनोविश्व ढासाळेय..मग ती विचार करतेय हे माझ्या बाबतीतच का घडले.हा व्यभिचार आहे का? असेल तर मी तो केला आहे का? कारण मनातुन एखाद्यात गुंतणे हा सुध्दा व्यभिचारच वाटतो तिला..जो मला वाटते बर्‍याच लोकांच्या बाबतीत घडत असेलही

अर्थात हा माझा आटापिटा आहे तो अश्या उदाहरणातली स्त्री काय विचार करु शकत असेल हे शोधण्याचा प्रयत्न..कथा मी वर नमुद केल्या प्रमाने अतिशय त्रोटक नक्कीच झाली आहे कारण तीचा आवाका फार मोठा आहे..
रहाता राहिला प्रश्न
>>>>>अ‍ॅना कॅरोनिना वाचली आहे पण ते उदाहरण अत्यंत अयोग्य आहे

खर आहे आणि ज्यांनी दिले उदाहरण त्यांनी ही म्हटलय की थोडिफार आठवण येते त्यामुळे तुम्हीही ते फार मनाला लावुन घेउ नका.

"...दोन मुल पदरात असलेली मध्यमवर्गीय संसारी बाई मी..पण नव-याचा विचार करता करता..देवेनचापण कसा विचार करायला लागले कळाले नाही..."
असे शोर्टकट साम्भाळा. देवेन आकर्षक वाट्ला का? स्वभाव आवड्ला का?
>>>>>> नाही हे तिच्या मनात उठणारे तरंग आहे तेव्हा त्याला शॉर्टकट म्हणणे अयोग्य ठरेल

बा़की इतकी विस्तृत टिपण्णी केल्या बद्दल धन्यवाद..:)

धन्यवाद मंदार..:)

Happy बासुरी...कथा मनापासून आवडली. शेवटासकट!
चारचौघी नावाचं नाटक फार वर्षापूर्वी आलं होतं...माझी स्मरणशक्ती योग्य साथ देत असेल तर त्यातही एक पात्र होतं ..जिला एकाच वेळी दोन व्यक्तींशी लग्न करावंसं वाटतं....मला वाटतं कॉर्पोरेट जगतातच कशाला, कुठेही असे भावबंध जुळू शकतात. त्याना योग्य पद्धतीने हाताळणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. खूप छान मांडली आहे कथा आपण!

मनापासुन धन्यवाद कदंब...:)

हो ,हो ..मलाही आठवल ते नाटक आता तु म्हणाल्यावर त्यातील एकीला दोघांशी लग्न करायचे असते ....

शेवट नाही पटला. विनीसोबत जे होत होतं हे खूप नैसर्गिक आहे. आणि तिने ते नवरा, देवेन किंवा चारु ह्यापलिकडे कोणाशी तरी बोलायला हवं, एखादा विश्वासू मित्र, एखादी मैत्रिण अगदी कोणी नाही तर कौन्सिलर तरी. कलिग्ज्बद्दल आकर्षण वाटणं साहजिक आहे ना, आपण आपल्या कलिग्जसोबत ८ तास असतो, जागेपणी, त्यांच्यासोबत गप्पा मारतो, जेवतो, कधी फिरायलाही जातो. आपल्या नवर्‍यासोबत मुलांसोबत, आईवडिलांसोबत फक्त ४ तास असतो जागेपणाचे, त्यातले किती वेळ गप्पा मारतो? आत्महत्या हा पर्याय नाही ग अशा गोष्टीसाठी तरी.

Pages