मायबोली स्वयंसेवक व्यवस्थापक

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मायबोलीवर विविध उपक्रम गेली अनेक वर्षे सातत्याने चालु आहेत. हे सर्व मायबोलीकरांनी आपला वेळ देउन केल्यामुळेच शक्य आहे. बर्‍याच स्वयंसेवकानी ह्या समित्यात काम केलं आहे. अनेक जणांना यांत भाग घेण्याची इच्छा आहे. ह्या सर्वांचं व्यवस्थापन करणं हेच एक मोठं काम आहे.

मला सांगायला आनंद होत आहे की रुपाली महाजन (रुनी पॉटर) यांनी या जबाबदारीचा स्विकार केला आहे. आजपासून सर्व उपक्रमांच्या स्वयंसेवक व्यवस्थापनाचं काम त्या बघतील. त्यांनी याआधी गणेशोत्सवाच्या मुख्य संयोजकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच मदत समितीतही त्या सहभागी आहेत.

त्यांना या नवीन जबाबदारीसाठी अनेक शुभेच्छा!!

विषय: 
प्रकार: 

Pages

Back to top