Submitted by सत्यजित on 12 June, 2010 - 18:26
थंड थंड बर्फाला किस किस किसला
किस किस किसताना खस खस हसला
पाण्यासारखा बर्फ झाला गोरा गोरा पान
गोळेवाला आता त्याचा मेकअप करणार छान
सुर्र सुर्र भुरका मारत मस्त गोळा खाऊ
रंगलेली जिभ मग आरशात पाहू
-सत्यजित.
गुलमोहर:
शेअर करा
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स पाणी
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स पाणी सुटलं तोंडाला... माझ्या आजोळी प्यायला बोअरचं पाणी, जड आणि मचूळ्...माझं डोकं दुखायचं त्यानं... मग दुपारी रणरणत्या उन्हात तहान लागली की काय... गोळा... एक मुसलमान माणूस गोळे घेऊन यायचा... म्हातारबाबा होता. माझी आई नी मावश्या लहान अस्तापासून तो गोळे विकायचा... कदाचित त्याही आधीपासून...
गोल गोल चेंडू सारखे वळलेले गोळे, त्यावर आंबट गोड लालकेशरी सरबत... आम्ही पातेली घेऊनच जायचो... काड्या वगैरे नाही लावायचा तो... काय चव असायची त्या गोळ्यांची! त्यानंतर मी तस्सा गोळा कुठठेच खाल्ला नाही.
तारे जमीनपर चं मेरा जहाँ गाण्यातील गोळा आठवला...
छानै बालगीत!
निव्वळ अप्रतिम...!!
निव्वळ अप्रतिम...!!
मस्त.
मस्त.
मस्त!!
मस्त!!
मस्त.
मस्त.
मस्स्स्स्स्स्स्स्त्त्त्त्त्त्
मस्स्स्स्स्स्स्स्त्त्त्त्त्त्त्त्त्त्! गोळा!
मस्त गोळा खावासा वाटला !
मस्त गोळा खावासा वाटला !
छान कविता... बालपणाची आठवणी
छान कविता...
बालपणाची आठवणी जाग्या केल्या....धन्स.
माझी हि बालकविता कशी वाटते पहा.... http://www.maayboli.com/node/16125
मस्त सानिका खुष होईल ही
मस्त सानिका खुष होईल ही कविता ऐकून
हे हे हे. सत्या. श्रावणीला आज
हे हे हे. सत्या. श्रावणीला आज ही कविता देते पाठ करायला
भन्नाट! आता गोळा खायची इच्छा
भन्नाट! आता गोळा खायची इच्छा होतेय! [आधी दंतवैद्याला शोधावं लागेल!]
(No subject)
मस्त आहे!
मस्त आहे!
छान आहे , मन बर्फ बर्फ झाल.
छान आहे , मन बर्फ बर्फ झाल.
जितका बर्फाचा गोळा चवदार,
जितका बर्फाचा गोळा चवदार, तितकीच छान कविता...
मस्त मस्त
मस्त मस्त ,रंगीत,गोड,गार्गार्,चविष्ट बालगीत ..
मस्त
मस्त
कविता वाचत असताना लहानपणी
कविता वाचत असताना लहानपणी खाल्लेल्या लाल्,पिवळा,हिरवा,केशरी सगळ्या रंगाच्या गोळ्यांची चव
जीभेवर आली. मस्त कविता.
आयला सत्या, गेले दोन दिवस
आयला सत्या, गेले दोन दिवस खोकतोय रे नुसता. परवा खुप दिवसानी वाशीमध्ये एक गोळेवाला दिसला. आम्ही दोघांनीही कचकुन ताव मारला. तिने पचवला मी खोकतोय दोन दिवस !
पण उद्या परत चाललोय वाशीला........!
आवडली हे सांगायलाच हवे का?
खूप खूप छान.
खूप खूप छान.
बालपणीचा काळ सुखाचा... गोळा
बालपणीचा काळ सुखाचा... गोळा आपलं बालपण परत देतो, तो संपे पर्यंत तरी
बोरिवली आणि डोंबीवलीला मलई गोळा मिळतो, तो तुम्ही खाल्ला आहे का? मस्त असतो.
आता गेलो की खाईन, कोण येतय सांगा?
ए मी खाल्लाय मलई गोळा,
ए मी खाल्लाय मलई गोळा, सोलापुरला
ए मला खुप आवडतो बर्फाचा
ए मला खुप आवडतो बर्फाचा गोळा.....
छान्..आज घरी जातना...खाणार्.....वाव...
सावरी