गोळा गोळा ..सुर्र सुर्र

Submitted by सत्यजित on 12 June, 2010 - 18:26

थंड थंड बर्फाला किस किस किसला
किस किस किसताना खस खस हसला

पाण्यासारखा बर्फ झाला गोरा गोरा पान
गोळेवाला आता त्याचा मेकअप करणार छान

सुर्र सुर्र भुरका मारत मस्त गोळा खाऊ
रंगलेली जिभ मग आरशात पाहू

-सत्यजित.

गुलमोहर: 

स्स्स्स्स्स्स्स्स्स्स पाणी सुटलं तोंडाला... माझ्या आजोळी प्यायला बोअरचं पाणी, जड आणि मचूळ्...माझं डोकं दुखायचं त्यानं... मग दुपारी रणरणत्या उन्हात तहान लागली की काय... गोळा... एक मुसलमान माणूस गोळे घेऊन यायचा... म्हातारबाबा होता. माझी आई नी मावश्या लहान अस्तापासून तो गोळे विकायचा... कदाचित त्याही आधीपासून...

गोल गोल चेंडू सारखे वळलेले गोळे, त्यावर आंबट गोड लालकेशरी सरबत... आम्ही पातेली घेऊनच जायचो... काड्या वगैरे नाही लावायचा तो... काय चव असायची त्या गोळ्यांची! त्यानंतर मी तस्सा गोळा कुठठेच खाल्ला नाही.

तारे जमीनपर चं मेरा जहाँ गाण्यातील गोळा आठवला...

छानै बालगीत!

मस्त. Happy

मस्त मस्त ,रंगीत,गोड,गार्गार्,चविष्ट बालगीत .. Happy

कविता वाचत असताना लहानपणी खाल्लेल्या लाल्,पिवळा,हिरवा,केशरी सगळ्या रंगाच्या गोळ्यांची चव
जीभेवर आली. मस्त कविता.

आयला सत्या, गेले दोन दिवस खोकतोय रे नुसता. परवा खुप दिवसानी वाशीमध्ये एक गोळेवाला दिसला. आम्ही दोघांनीही कचकुन ताव मारला. तिने पचवला मी खोकतोय दोन दिवस !
पण उद्या परत चाललोय वाशीला........! Wink
आवडली हे सांगायलाच हवे का?

बालपणीचा काळ सुखाचा... गोळा आपलं बालपण परत देतो, तो संपे पर्यंत तरी Happy

बोरिवली आणि डोंबीवलीला मलई गोळा मिळतो, तो तुम्ही खाल्ला आहे का? मस्त असतो.

आता गेलो की खाईन, कोण येतय सांगा?