काय झाल रे ? असा डोक्याला हात लाऊन का बसला आहेस ? प्रशांतला शांत बसलेला पाहुन त्याच्याच विभागात काम करणार्या, सेल्स बॅक अॅफिस संभाळणार्या अविनाशला जरा वेगळच वाटल. दोघांच अनेक वर्षाच ट्युनींग असल्यामुळे व्यावसायीक सुख वा दु:खाची विचारपुस नेहमीच व्हायची. दोघही मनमोकळ करीत सुख वाटत आणि दु:खावर उपाय शोधत पुढे जायचे. ही व्यावसायीक मैत्री अनेक अडचणींवर मात करीत दोघांच्याही मनात एकमेकांबद्दलचा आदर वाढवत फुलत होती.
प्रशांत आणि आविनाश यांच्या स्वभावात साम्य काहीच नव्हते. प्रशांतच्या नावात जरी शांत हा शब्द होता तरी प्रशांत कमालीचा आक्रमक, धडपड्या आणि कल्पक होता. डिलाईट नावाच्या बिस्कीटचा ब्रॅड असलेल्या युनायडेड फुड प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीचा रिजनल मॅनेजर होता. अविनाश कागदोपत्री प्रशांतला रिपोर्टीग करणारा डिस्ट्रीब्युशन आणि बॅक ऑफिस संभाळणारा असी. मॅनेजर पदावर काम करणारा शांत स्वभावाचा, कमालीचा पेशन्स असणारा, कामात कोणताही धोका न पत्करणारा होता. यांची व्यावसायीक मैत्री कशी होऊ शकते ह्याचे आश्चर्य ऑफिसमधे प्रत्येकाला वाटे.
युनायडेड फुड प्रायव्हेट लिमीटेड मधे अविनाश पंधरा वर्ष काम करत होता. दिल्ली येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीत असीस्टंट म्हणुन लागलेल्या अविनाशची आत्तापर्यत अशी प्रगती होत भारतातल्या सर्वात मोठ्या म्हणजे महाराष्ट्रातल्या रिजनल ऑफिसमधे तो गेले पंधरा वर्ष राहुन अनेक सेल्स मॅनेजर यांच्या बरोबर काम करत होता. मागल्या दहा वर्षात पाच सेल्स मॅनेजर आले आणि गेले पण प्रशांत मात्र पाच वर्षे राहिला होता. प्रगती करत होता. प्रशांतच्या सेल्स नेटवर्क मधे जिल्हा विक्री प्रतिनीधी होते. जिथे काम कमी तिथे दोन जिल्हे, तीन जिल्हे एक प्रतिनीधी संभाळत होता. असा पंधरा ते सोळा प्रतिनीधी आणि बॅक अॅफिसला काम करणारे अविनाश सोबत चार असा विस जणांचा चमु हे दोघे संभाळत होते.
जरा बिझनेस कमी झाला की प्रशांत त्या जिल्ह्याच्या जबाबदार विक्री प्रतिनीधीवर तापत असे. त्याला रिजनल ऑफिसला बोलावुन त्याची चंपी करत असे. प्रत्येक वेळेला विक्री प्रतिनीधी गलथान पणा करायचा अस नाही. प्रतिस्पर्ध्यांची काही युक्ती असायची. प्रतिस्पर्धी कंपनीने काही योजना जाहीर केली की त्या महिन्यात डिलाईट्चा सेल कमी व्हायचा. मग अविनाश शांत पणे घडलेल्या प्रकाराची शहानिशा करायचा. एकदा का विक्री प्रतिनीधीची चुक नाही असे लक्षात येताच तो प्रशांतच्या ही गोष्ट लक्षात आणुन द्यायचा. प्रशांतही एकदा अविनाश म्हणतो ते बरोबरच या विश्वासने मान्य करुन त्या विक्री प्रतिनीधीला जेवायला घेऊन जाऊन गोड बोलुन पर्यायी प्लॅन समजाऊन सांगुन हे पुन्हा घडणार नाही असे पहायचा.
डिलाईट बिस्कीटांची विक्री दोन प्रकारांनी व्हायची. जिल्हा स्टॉकिस्ट व त्या खाली असलेल्या डिलर्स तालुकावार जाळ्यामधुन बिस्कीटे दुकानांपर्यत पोचायची. जिल्हा प्रतिनीधी तालुक्याला जाऊन डिलर्स कडुन ऑर्डर्स जमा करायचे आणि या डिलर्सना त्याच जिल्ह्यातला मोठा डिलर व स्टॉकिस्ट माल पोचवुन पैसे गोळा करायचा. डिलर्स कडुन दुकानांना मात्र डिलर्सच्या स्वताच्या सेल्समनच्या मार्फत माल पोचायचा.
दुसर्या प्रकारात युनायडेड फुड प्रायव्हेट लिमीटेड तर्फे विक्री मोठ्या ग्राहकांना परस्पर व्हायची जिथे स्टॉकिस्ट, डिलर सहसा सहभागी नसायचे.
प्रशांतने पहिल्या प्रकारच्या विक्रीत म्हणजे स्टॉकिस्ट, डिलर्स मार्फत विक्रीत संपुर्ण महाराष्ट्रात सुसुत्रता आणुन ही विक्री व्यवस्था प्रभावी बनवत अवघ्या दिड वर्षात विक्री दिडपट वाढवली होती. त्याचा या कार्यपध्दतीवर खुष होऊन सेल्स डायरेक्टरने त्याला असी. सेल्स मॅनेजर पदावरुन मॅनेजर सेल्स अशी पदोन्नती देत विश्वास व्यक्त केला.
काही मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार्या कंपन्या आपल्या कॅन्टीन्मध्ये लोकांना चहा आणि बिस्कीटे देतात असे प्रशांतच्या लक्षात येताच आणखी सहा महिन्याने कारखान्यांना घाऊक प्रमाणात विक्रीचे तंत्र उघडले. जवळ जवळ दहा मोठे कारखाने हस्तंगत केले जिथे रोज काही हजार बिस्कीटांचे पुडे विकले जाऊ लागले. यामुळे प्रशांत सर्व रिजनल मॅनेजर्स मध्ये रोल मॉडेल ठरला. पुढील दोन वर्षात रिजनल मॅनेजर होऊन विमानाने मुंबई ते दिल्ली मुख्यालय असा फिरु लागला.
एकदा विमानप्रवासात त्याची गाठ सुखदा या भारतभर मॉलची साखळी असलेल्या उद्योगाच्या महाराष्ट्रातल्या रिजनल मॅनेजरशी पडली. दोघांनी मिळुन विक्रीचा प्लॅन तयार केला. डिलाईटला त्यांच्या पॅकींगमधे बदल करुन एका बिस्कीटांच्या पॅक मध्ये दहा ऐनजी विस बिस्कीटे भरुन किरकोळ विक्रीच्या किंमतीपेक्षा कमी किंमतीत विकण्याचा प्लॅन होता. संपुर्ण मॉलमध्ये फिरुन आल्यावर ग्राहकांना बिलींगच्या आधी ह्या आकर्षक किंमतीची जाहीरात दिसणार होती. मुळ किंमत काही रुपये व या मॉल मध्ये खरेदी केल्यास बिस्कीटांची किंमत जवळ जवळ पन्नास ट्क्क्याहुन कमी ठेवायची ठरली. कायद्याच्या तांत्रीक अडचणी दुर करण्याकरता हे पॅकींग वेगळे व फक्त मॉलमध्ये विक्रीकरीता असा रिमार्क देऊन विकणे गरजेचे झाले होते.
प्रशांतने सारा प्लॅन सेल्स डायरेक्टरला समजाऊन सांगीतला. सेल्स डायरेक्टर ने आठ दिवसात तुला मॅनेजिंग डायरेक्टरशी बोलुन निर्णय देतो असे सांगीतले. आठ दिवसांनी जेव्हा सेल्स डायरेक्टर फोनवर भेटेना म्हणुन त्याने चौकशी केल्यावर कळले कि सेल्स डायरेक्टर परदेश प्रवासाला निघाले असुन त्याचे प्रपोजल डायरेक्टरच्या ड्रावरमध्ये पडुन आहे. मॅनेजिंग डायरेक्टरच्या सेक्रेटरीने सुध्दा हे प्रपोजल तिकडे आले नसल्याचे सांगीतले.
प्रशांत अस्वस्थ झाला. आता सेल्स डायरेक्टरचा पंधरा दिवसांचा परदेश दौरा म्हणजे संपलेच त्या दरम्यान मुलचंदानी म्हणजे सुखदा मॉल्सचा रिजनल मॅनेजर गप्प बसणारा नव्हता. मुलचंदानीने त्याला प्रपोजल देतानाच सांगीतले होते की फारतर पंधरा दिवस वाट पाहीन. तुमच्याकडुन तुमचा निर्णय वेळेत मिळाला नाहीतर मी दुसर्या कंपनीला शोधेन.
"अस झालय तर", शांतपणे अविनाश झाल्या गोष्टीवर प्रतिक्रिया देता झाला. तुला काय जातय अविनाश अशी प्रतिक्रीया द्यायला ? माझा जीव जळतोय. माझ्या करीयरमधे प्रथमच असा निर्णय घेण्याची संधी मला मिळाली होती. या सेल्स डायरेक्टर ने वाट लावली माझी. तो पंजाबचा कर्तारसिंग सेल्स कॉन्फरन्सच्या वेळेला मला म्हणाला उडण्याची जिद्द कायम ठेव पंख कापले गेले तरी. आत्ता मला आयुष्यात प्रथमच समजतय की पंख कापले जाणे म्हणजे काय. आणि सरदारजीने मलाच हे का सांगीतल.
अविनाश म्हणाला सरदारजीच बरोबर आहे. खरतर तो सर्वात जुना माणुस आहे सेल्स डायरेक्टर आगरवाल पेक्षाही जुना. एक जमाना असायचा की दिल्लीत कर्तारसिंगचा सेल सर्वात जास्त असायचा. पण आय आय एम अहमदाबाद्च्या एम. बी. ए झालेल्या आगरवालने त्याची बदली करुन त्याला मोडीत काढला. पंजाबमधे टाकुन त्याचा दिल्लीचा चार्ज स्वतः कडे घेतला. एक गोष्ट नक्की की प्रशांत तुझ्या सारखे हुशार मॅनेजर्स भारतभर शोधुन त्याने कंपनी मोठी केली. आज तु भारतात एकुण सेल पैकी चाळिस ट्क्के महाराष्ट्रात सेल करुन एक प्रकारे त्याला आव्हान दिले आहेस. मग तो अस वागणारच. मानवी स्वभावाला साजेस आहे.
" मग काय उघड्या डोळ्याने पहात राहु अविनाश ? प्रशांत म्हणाला.
"नुसत पाहु नकोस, योग्य वेळी कृतीकर तो पर्यत वाट पहा" अविनाश म्हणाला.
योग्य वेळ म्हणजे काय ? ती कधी येईल ? प्रशांतने अधिर होऊन विचारले. मला हे वाट पहाण्याचा धीर निघत नाही. मला वाटतय राजीनामा टाकावा आणि मो़कळ व्हाव.
"हो टाक की राजीनामा, याने झाला तर फायदा आगरवालचाच होईल." अविनाश शांतपणे म्हणाला.
प्रशांतचा चेहेरा प्रश्नार्थक झाला.
"तुझ्या स्वभावातला हा धसमुसळेपणा आता कमी व्हायला हवा प्रशांत. हे असले निर्णय घाई घाईने घ्यायचे नसतात. शांतपणे विचारपुर्वक आणि नियंत्रण आपल्या हातात ठेवत घ्यायचे असतात."
मग कस कराव सांग मला प्रशांत म्हणाला.
चल बाहेर जाऊ एक बिअर टाकु आणि बोलु. इथे आपण काय बोलतोय हे ऐकणारे असतील आणि सरजी सरजी फोन करुन रात्री आगरवालला सांगतील . मग घरबसल्या आगरवालला सगळे समजेल.
हे तुझे सगळे असिस्टंट नाकासमोर चालणारे आहेत. प्रशांत म्हणाला.
अरे हो, पण उद्या बदलले तर ते काय पाटी लावणारेत छातीवर ? आपणच काळजी घ्यायची सवय ठेवावी लागते. कामा निमित्त्त त्यांना दिल्लीला फोन करावे लागतात. तिथला माणुस और क्या और क्या म्हणत बातम्या देण्याची सवय लावेल इथल्या पोरांना. चार रुपये अपेक्षेपेक्षा कमी इन्क्रीमेंट मिळाले की कोण बदलेल हे नाही सांगता येत.
बर चल म्हणत दोघेही लिफ्टने खाली आले. बांद्रा कुर्ला कॉप्लेक्स मधल्या पार्किंग लॉट मधुन प्रशांत ने त्याची लोगन बाहेर काढली आणि दोघेही आता बांद्र्यातल्या स्पाईस ट्री रेस्टॉरंटकडे जायच्या रस्त्याला लागले. जाताना संध्याकाळच्या वेळेमुळे असलेले ट्रॅफिक असल्यामुळे प्रशांत लक्षपुर्वक गाडी चालवत होता. काहीवेळातच दोघे स्पाईस ट्री रेस्टॉरंट्मधे पोहोचले.
स्पाईस ट्री रेस्टॉरंट्मधे तिथल्या सिक्युरीटीने सलाम मारुन दोघांच्या येण्याची नोंद घेतली. लोगन पार्किंग करायला किल्या सिक्युरीटीच्या हातात देत दोघांनी एक टेबल शोधले.
" काय घ्यायच अविनाश ? प्रशांतने विचारल ?
मला बिअरच आणि तीही बडवाईझर अविनाश ने सांगीतले
कारे एखाद्या वेळेस विस्की पिलास तर काय फरक पडेल ?
"तुच ही बिअर पिऊन पहा विस्की पिण विसरशील "अविनाशन त्याच मत सांगीतल.
चालेल आज बिअरच पिऊया. तु काय बोलणार आहेस ते लक्षपुर्वक ऐकायच आहे.
प्रशांतने दोन बिअर आणि काही स्नॅक्स ऑर्डर केल आणि म्हणाला काय म्हणत होतास मगाशी ?
" मला माहिती मिळाली आहे की आपले एम्.डी. आणि चेअरमन रुंगठा आता एका म्हणजे मॅनेजींग डायरेक्टरच्या जबाबदारीतुन मुक्त होऊ इच्छितात. ही जबाबदारी उचलण्यासाठी तिन जण इच्छुक आहेत. आपले सेल्स डायरेक्टर आगरवाल, फायनान्स डायरेक्टर रवि सक्सेना, डायरेक्टर ऑपरेशन्स शशी गुप्ता. यात रवि सक्सेना यांचे पारडे थोडे जड आहे कारण रवि सक्सेनाचे मामा डायरेक्टर बोर्डावर आहेत आणि त्याचे जवळपास सतरा ट्क्के शेअर्स आहेत. महत्वाच म्हणजे रुंगठासरांचे आणि रवि सक्सेनाच्या मामांचे फार चांगले संबंध आहेत. रुंगठांना मुलगा नाही आणि जावई इकडे येऊ इच्छित नाही. अश्या वेळी आगरवालने ह्या जागेवर डोळा ठेवलाय. त्याचा दावाही गैर नाही. त्याने आल्यानंतर कंपनीची असलेली लोकल ब्रॅड ही इमेज बद्लुन नेशन वाईड ब्रॅड हा बदल गेल्या सात आठ वर्षात घडवुन आणला. गेल्या सात आठ वर्षात कंपनीची उलाढाल तीनपट वाढला आहे.
अच्छा, अस आहे तर म्हणजे आगरवाल साहेब यात व्यस्त आहेत तर.
नुसते व्यस्त आहेत अस नाही, अस्वस्थ सुध्दा आहेत. त्यांना परदेशात पाठवुन या स्पर्धेतुन तात्पुरते बाजुला केले जात आहे असा त्यांचा अंदाज आहे. यामुळे त्यांचे नियंत्रण काही काळ संपेल. आगरवालना हे सगळ उशीरा समजल असाव त्यामुळे डायरेक्टर बोर्डवर त्यांची मॅनेजींग डायरेक्टर म्हणुन नियुक्ती व्हावी असे म्हणणारे डायरेक्टर्स अद्याप तयार व्हायचे आहेत. जेव्हा आगरवाल साहेबांनी असा प्रयत्न सुरु केल्याचे लक्षात येताच रवि सक्सेनाने त्यांना परदेशात काहीतरी काम काढुन पाठवले आहे जेणे करुन रवि सक्सेनांच्या मामाला आपल्या भाच्यासाठी फिल्डींग लावता यावी.
अविनाश तु तर फारच दर्दी आहेस यार. माझ्या स्वभावामुळे मला ही माहिती मिळणे अशक्य वाटते.
अविनाश अजिबात फुलला नाही. म्हणाला एक काम कर आत्ता आगरवाल साहेबांना फोन कर. त्यांना म्हणाव तुम्ही परदेशात उद्या जाताय हे कळल. तुमच्या अनुपस्थितीत काही महत्वाच काम तुमच्या वतीने करायच असेल तर मला सांगा मी ते करीन.
यामुळे काय घडेल ? प्रशांत म्हणाला
दोन गोष्टी घडतील. यासगळ्या घडामोडीत तु त्यांचा समर्थक आहेस असे त्यांना वाटेल. यदाकदाचित ते मॅनेजिंग डायरेक्टर झालेच तर सेल्स डायरेक्टर हे पद रिकाम होईल. याचा अर्थ तुझी या पदासाठी ते वर्णी लावतील अस नाही पण नॅशनल मॅनेजर होशील. सगळे रिजनल मॅनेजर तुला रिपोर्ट करतील. काही नाही तर भारताचे चार झोन पाडले जातील आणि तु वेस्ट्चा झोनल मॅनेजर होशील. गोवा, गुजराथ आणि राजस्थान तु पहाशिल.
अस नाही घडल आणि ते मॅनेजींग डायरेक्टर नाहीच झाले तरी तु त्यांना भारी पडशील अस वाटु नये याची दक्षता घ्यायला हवी. कारण रवि सक्सेना जर मॅनेजिंग डायरेक्टर झाला आणि आगरवाल साहेबांशी फार झगडुन झाला तर तो आधी आगरवाल साहेबांचा पत्ता कापेल आणि तुला वर उचलेल. अस घडु नये म्हणुन आगरवाल तुझा पत्ता कापुन आपली जागा पक्की ठेवतील.
हे सगळे अंदाज आहेत. कदाचित यातल काहीच घडणार नाही आणि रुंगठा साहेब मॅनेजींग डायरेक्टरपद इतक्या लवकर सोडणार नाहीत आणि आहे ते सुरू राहील.
अविनाश याचा अर्थ एकच माझ्या महत्वाकांक्षी योजनेला सुरंग लागणार. पॅकींग बदलीकरुन मॉलवर योजनेतुन डिलाईट विकायला सध्यातरी परवानगी मिळणार नाही.
हो अस घडणार अस वाटतय. पण तु शांत रहा. आपली पकड आणखी घट्ट कर या साठमारीत जॉब घालवायचा नाही आणि धंद्यावरच नियंत्रण पण घालवायच नाही.
राहीलेला ग्लास संपवत प्रशांत म्हणाला छे हे म्हणजे भलतच. आजपर्यत मी असल्या लो प्रोफाईलवर कधीच राहीलो नाही. कायम धंदा वाढवायचाच विचार केला. मला काय मिळणार याचा मी विचार केला नाही. फक्त धंदा कसा वाढेल याचा विचार केला.
प्रशांत कोणतही सत्तांतर सहसा सुखद नसत. कोणीतरी लायक डावलला जातो. मग तो कंपनीच्या भल्याचा विचार न करता निष्क्रीय बनतो किंवा कंपनीच्या विरोधात जातो. प्रतिस्पर्ध्याला जाऊन मिळतो. यातुन कंपनीचा वाईट काळ येतो. नवीन अधिकारी या सर्वाला पुरुन उरला म्हणजे मग सगळ स्थिर होत. तोवर आपल्या सारख्यांनी झाडासारख न रहाता लव्हाळा सारख राहण म्हणजे तुझ्या भाषेत लो प्रोफाईल हेच उत्तम.
रिपीट करुया की बास ? प्रशांतने अविनाशला विचारले.
एक काम कर एकच बिअर सांग. तु घे मी कंपनी देतो. माझा कोटा संपला आहे.
प्रशांतने आणखी एका बिअरची ऑर्डर दिली आणि चर्चा पुढे चालु राहीली.
काही म्हण अविनाश या सत्तेच्या साठमारीत मला इंट्रेस नाही. मला नॅशनल मॅनेजर होऊन दिल्लीला जाऊन रहाण्यात ही काही रस नाही. आपल काम वाढवण हाच माझा आवडीचा विषय.
"खुळा आहेस" आपल्या खास सांगलीच्या ढंगात अविनाश म्हणाला.
आपण या उत्तरेच्या लोकांना कधी आव्हान देणार आहोत का नाही ? काय कमी आहे तुझ्यात ? कल्पक आहेस, धाडसी आहेस. तुझ्या हुशारीचा वापर इतरांना करु देणार की तुच त्याचा वापर करुन मोठा होणार ?
अविनाश जे घडेल ते घडेल पण कंपनी काही काळ मागे जाणार हे खर.
प्रशांत, जे घडतय त्याला तु थोडीच जबाबदार आहेस ? तु काय मी काय आज तरी प्यादी आहोत. मोठे लोक चेक मेट वाचवायला आपला बळी देणार. मग अक्कल हुशारीन आपला जीव वाचवुन आठ घर चालुन आपणच अगदी राजा किंवा वजीर नाही पण उंट, घोडा किवा हत्ती व्हायची मनीषा धरली तर चुक काय ?
व्यावसायीक आयुष्यात हे असच होत कारे अविनाश ? तुझा आयुष्य जगण्याचा आणि नोकरी करण्याचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे म्हणुन विचारतो.
हो रे, नाईलाजाने म्हणावे लागते की हे असच आहे. माणसांशिवाय कंपन्या चालण शक्य नाही. अद्यापतरी भारतात काय अन्य कुठेही उत्पादन प्रक्रिया सुध्दा संपुर्णपणे मानवीय नियंत्रणाच्या बाहेर आणि रोबोज च्या सहायाने किंवा अॅटोंमॅटीक मशीनच्या सहायाने होत नाही. काही विभागांचे मोठे यांत्रिकीकरण होते पण मानवाचे या प्रक्रियांवरचे नियंत्रण आवश्यक असते. फायनान्स, सेल्स आणि सर्व्हीस याला तर जगभरात माणसांच्या शिवाय पर्याय नाही. अजुन तरी रिजनल मॅनेजर चे निर्णय घेणारा कॉम्प्युटर आलेला नाही.
मनुष्य आला की ईर्षा, असुया, कुरघोडी, द्वेष हे येणारच आणि तुझ्यासारखा माणुस अस्वस्थ होणार. माझ म्हणण इतकच आहे की ज्याला पर्यायच नाही ते शिकुन आपणही आपल्या बुध्दीने दोन डाव खेळावेत. त्यात गुंतुन जाऊ नये आणि माझच म्हणण बरोबर म्हणुन इतरांचा विचारच न करता त्यांना देशोधडीला लावण्याचा नीचपणाही करू नये पण कुणाला नीचपणा करुही देऊ नये.
प्रशांतने शांतपणे बिअर संपवली आणि विचारात पडला. हे जमायला आपल्याला अनेक आघाड्यांवर लढायच तंत्र विकसीत करायला लागणार. शिकावच लागणार.
अविनाश इथेच जेवायच की आपल्या आपल्या घरी जायच जेवायला ?
नको यार, घरीच जाऊ. तुझ्या घरी मिळेल ना जेवायला ? नाहीतर माझ्या घरी चल.
प्रशांतने वेटरला बिल देण्याची खुण केली. आलेले बिल अविनाश्ने काटेकोर पणे तपासुन पाहीले. प्रशांतने आपल क्रेडिट कार्ड देऊन बील भागवले.
अविनाश या खेळाची भिती वाटत नाही पण आपण दुसर्याच्या भावनांशी खेळतो अस नाही तुला वाटत का ?
अविनाश हसत म्हणाला दुर्दैवाने हो रे आपण खेळतो पण हा खेळ आपण सुरु करायचा नाही आणि आपल्या गुणांवर पुढे जायचे उद्देश ठेवायचा. मग फारसा त्रास होत नाही. कुणी आपल्याला विनाकारण मातीत घालायला येतोय अस वाटल तर त्याला त्याची जागा दाखवायची इतकच.
ह... चला हे ही करून पाहुयात. तुझ्या सारखा गुरु भेटल्यावर मग काय अडचण आहे.
एकदम झकास... पुढे काय
एकदम झकास... पुढे काय झालं?
ते वाचयला आवडेल .............
सो येऊन द्या पुढचा भाग ..........
संपली पण??मस्त वर्णन केलय....
संपली पण??मस्त वर्णन केलय.... अजून वाचायला आवडली अस्ती.
मला काय मिळणार याचा मी विचार केला नाही. फक्त धंदा कसा वाढेल याचा विचार केला. >> ह्म्म
कंपनी पॉलीटिक्स!
तु काय मी काय आज तरी प्यादी आहोत. मोठे लोक चेक मेट वाचवायला आपला बळी देणार. मग अक्कल हुशारीन आपला जीव वाचवुन आठ घर चालुन आपणच अगदी राजा किंवा वजीर नाही पण उंट, घोडा किवा हत्ती व्हायची मनीषा धरली तर चुक काय ? >>>> अगदी !
ड्रिमगर्लला अनुमोदन .
ड्रिमगर्लला अनुमोदन . प्रायव्हेट कंपन्यांमध्येहि जबरदस्त राजकारण असत.त्याचि हि झलक .मस्त रंगवलिय.
सेल्स म्हंटले की हे सगळे
सेल्स म्हंटले की हे सगळे चालायचेच....
हे वाचुन माझे दोन सेल्सवाले मित्र आठवले
आवडली!
आवडली!
प्रसन्न अ, ड्रिम गर्ल, सुनील,
प्रसन्न अ, ड्रिम गर्ल, सुनील, स्वरुप आणि चिंगी धन्यवाद. इतक्या चांगल्या प्रतिक्रिया मिळतील अशी अपेक्षा नव्हती. सुनीलला मी एकदा म्हणलही की आजकाल लिहाव अशी उर्मी नसते. त्यामुळे लिखाण वाचकांना आवडेल की नाही याची शंका असते.
खूप छान.. आवडली कथा.. अविनाश
खूप छान.. आवडली कथा.. अविनाश च पात्र मस्त झालय..
छान आहे कथा. पुढे वाचायला खरच
छान आहे कथा.
पुढे वाचायला खरच आवडेल
नितीन, खुप आवडली कथा. अगदी
नितीन, खुप आवडली कथा. अगदी वास्तव मांडलयस.
आणि अजुन लिहीत रहा. तुझ्या कथा वेगळ्या विषयांवर असतात. वाचायला आवडतात.
आवडली कथा.
आवडली कथा.
खुपच रंगवून लिहील आहे. आणखी
खुपच रंगवून लिहील आहे. आणखी वाचायला आवडेल.
छान कथा, खूप आवडली
छान कथा, खूप आवडली
मस्त .सारासार विचारांची सांगड
मस्त .सारासार विचारांची सांगड छान जमली आहे .कथा आवडली .
नितीन झकास! छान जमलीय भट्टी !
नितीन झकास! छान जमलीय भट्टी ! मला वाटते याची लेखमालिका होउ शकेल. अगदी कॉर्पोरेट अनुभव आहेत सगळे.
आण़खी एक आयडीया. यापुढील् भाग वाचकांनी पुरा करायचा किंवा सुचवायचा.आणि तुम्ही तो संस्करण करून लेखन करायचे. बघा विचार करा. अन्यथा लेखमालिका कराच ही आग्रहाची विनंती.
नितिन खुपच छान लिहिलय किती
नितिन खुपच छान लिहिलय
किती ते राजकरण सगळं.. पुढचा भाग लवकरच लिहि..
आवडलं लेखन, पण हे एवढच आहे की
आवडलं लेखन, पण हे एवढच आहे की पुढचा भाग पण आहे?
कथा छान आहे नितीनजी..कॉर्परेट
कथा छान आहे नितीनजी..कॉर्परेट पॉलिटिक्स अगदी उत्तम रित्या उतरवलंय..मी तुम्हाला नेहमी सांगते तेच पुन्हा सांगेन, विरामचिन्हांकडे जरा नीट लक्ष द्या लिहीताना, त्यांच्या अभावी कथेला फ्लो मिळत नाही.
बाकी कथा छानच
छान कथा, आवडली
छान कथा, आवडली
मस्तच दादानु, खरे सांगायचे तर
मस्तच दादानु, खरे सांगायचे तर बहुतांशी मीही याच मताचा असतो. Business is like war, if you want to win, you need to kill somebody else. No other way. No emotions in war and business. एथिक्स वगैरे गोष्टी कितीही आदर्श, छान वगैरे वाटत असल्या तरी प्रत्यक्षात त्या पाळणे, फॉलो करणे घातक ठरू शकतो. एका सर्टन लिमीटपर्यंत ते ठिक आहे, पण व्यवसाय म्हणलं की साठमारी ही आलीच. कोणीतरी हारल्याशिवाय कोणीतरी जिंकू शकत नाही. तुम्ही कुठल्या बाजुला असणार हे तूम्ही ठरवायचे. शेवटी सत्य, नितीमत्ता, आदर्शवाद या गोष्टींना तेव्हा महत्व येते जेव्हा तुमच्या हातात सत्ता असते. सामर्थ्याविना पांडित्य कवडीमोलाचे ठरते. अर्थात हे माझे मत आहे.
असो, कथा छानच. मस्त जमली आहे-)
धन्यवाद विशाल, तुझी
धन्यवाद विशाल, तुझी प्रतिक्रीया माझ्यासाठी मोलाची आहे. मला आठवते त्या प्रमाणे तु सेल्स्/मार्केटिंगमधे असल्याने या कथेचे तांत्रीक मुल्यमापन ही झाले असे मी मानायला हरकत नसावी. अर्थातच झालेले नसल्यास अजुनही काही तांत्रीक चुका असतील तर त्या जरुर कळवाव्यात.
छान कथा, आवडली........
छान कथा, आवडली........
चांगली आहे कथा, आवडली
चांगली आहे कथा, आवडली
खरंच >>>>आपल्या सारख्यांनी
खरंच >>>>आपल्या सारख्यांनी झाडासारख न रहाता लव्हाळा सारख राहण म्हणजे तुझ्या भाषेत लो प्रोफाईल हेच उत्तम. >>> हे अगदी मनातलं लिहलंय..छान..
अर्धवट वाटली. कारण याच्या
अर्धवट वाटली. कारण याच्या पुढे काय झाले हे वाचायला उत्सुक आहे.
लिहाल का प्लीज?