आम्ही इथे न्युयोर्क ला रहातो, अगोदर न्युजर्सी ला अपार्टमेन्ट मध्ये झुरळे होती, तिथे खालच्या अपार्टमेन्टला रहाणार्या देसी लोकान्कडून वर यायला सुरुवात झाली, मग घर काही दिवस बन्द होते, त्यामुळे ती खूप वाढली. तिथून न्युयोर्क ला अपार्टमेन्टला आलो तिथे तर खूपच झालि , प्रोफेशनल terminex ची मदत घेवून ही कमी झाली नाही. सगळेजण सान्गत होते की अपार्टमेन्ट मध्ये झुरळे होतात , म्हणजे शेजारच्या अपार्टमेन्टमधून येतात. म्हणून घर घेतले, बहुतेक जुने सामान फेकून दिले , झुरळान्च्या भीतिने , मूव्हर्स न बोलवता, प्रत्येक वस्तू झटकून घेतली , प्लास्टिकच्या पिशव्यान्म्ध्ये बान्धून घेतली, तरी नविन जागेत आत्ता पुन्हा झुरळे दिसायला लागली आहेत, १५ दिवसातच छोटी , मोठी झुरळे , स्वयन्पाक खोलित, बाथरूम मध्ये, बेसमेन्ट मध्ये दिसत आहेत, मला ती बघून २ दिवस झोप आलि नाहि, खरेच किळस येतो. घरात ६ वरशाच मुलगा आहे , त्यामुळे पेस्टिसाइड्सची भिती वाट्ते. कोणी मला मदत करा, जालिम उपाय सुचवा. कोणाला अनुभव आहेत का ह्या बाबतीत?
झुरळाचा त्रास : कोणी उपाय सुचवेल का?
Submitted by दीप on 16 July, 2010 - 07:27
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बोरिक पावडर कणकेत मिसळून
बोरिक पावडर कणकेत मिसळून त्याचे बारीक बारीक गोळे करुन जिथे झुरळे सापडतात तिथे टाकून द्या. ८ दिवसांनी पुन्हा करा. नक्की कमी होतील. आणि लहान मुलाला ही माहिती देऊन ठेवा की हे गोळे खाऊ नकोस.
बोरिक पावडर कणकेत मिसळून >>>
बोरिक पावडर कणकेत मिसळून >>> कॅरमसाठी मिळते ती बोरिक पावडरच असते का?
हो. तीच बोरिक पावडर.
हो. तीच बोरिक पावडर.
बेट स्टेशन्स ठेवून पाहिलंत
बेट स्टेशन्स ठेवून पाहिलंत का?
माउस ट्रॅप (उंदिर चिट्कुन
माउस ट्रॅप (उंदिर चिट्कुन बसण्यासाठी बाजारात मिळतो, एक लहाण पुठ्ठ्यावर चिकट पदार्थ लावलेला असतो) त्याने लहान-मोठे सर्व झुरळ चिट्कुन मरुन जातील. दररोज रात्री किचन मधे बेगॉन फवारा.
कुठेतरी अन्न उघडे राहात असेल.
कुठेतरी अन्न उघडे राहात असेल. किंवा ड्स्ट्बीन वर घट्ट झाकण नसेल. Review your Kitchen habits and modify them.
मी ही बोरिक पावडर कणकेत मिळून
मी ही बोरिक पावडर कणकेत मिळून कच्या दुधाने ती मळते व फटींमध्ये वगैरे लावते. झुरळ मरुन पडलेली दिसतान त्याने.
कुणाला उंदरांवरचा उपाय माहीत आहे का ? आमच्याकडे उंदीर रोज फळे खाउन जातो. रॅट किल टाकले तरी खात नाही. पिंजर्यातही अडकत नाही. खुप हुशार झालेत हल्लीचे उंदीर.
किती बोरिक पावडर आणि किती
किती बोरिक पावडर आणि किती कणीक आणि साधारण केव्हढे गोळे हवेत?
जागु जी, मांजर पाळा, उंदीर १५
जागु जी,
मांजर पाळा, उंदीर १५ दिवसात गायब होतील.
खुप हुशार झालेत हल्लीचे
खुप हुशार झालेत हल्लीचे उंदीर. >>> ट्युशन चा परिणाम असेल...
.
दीपजी, झुरळांचा त्रास
दीपजी,
झुरळांचा त्रास न्युयॉर्कमध्ये ही आहे. हे वाचून आश्चर्य वाटले. असो. बाजारात ‘हिट’ नावाचा झुरळ मारण्यासाठीचा स्प्रे मिळतो. कपाट, स्वयंपाक घरातील कपाटे रिकामी करून त्यामध्ये हीटचा स्प्रे करा. याचा प्रभाव आठवडाभर तरी राहतो. त्यामुळे त्या ठिकाणी येणारी झरळे मारून पडतात. स्प्रे मारल्यावर अन्न पदार्थ उघडे ठेऊ नका. लहान मुलांच्या हातात येईल असेही स्प्रे ठेऊ नका.
दुसरा उपाय आपल्या घरातील ड्रेनेज लाईन शेवटपर्यंत क्लिन करून औषध फवारणी करून घ्या. हा उपाय दर महिन्याला करत राहा. झुरळं नक्की कमी होतील.
२ भाग बोरीक पावडर + १ भाग
२ भाग बोरीक पावडर + १ भाग साखर + १ भाग मैदा भिजवण्यापुरते दूध या मिश्रणाच्या गोळ्या करुन व त्याने फटी भरून फायदा होतो. साधारण ३/४ महिन्याने परत परत करायचे.
माझ्याकडेही झुरळं होती पण
माझ्याकडेही झुरळं होती पण एकदा पेस्ट कंट्रोल केलं. त्याने असच कणकेचं मिश्रण असलेली पेस्ट लावली होती. त्या दिवसापासून मेलेली झुरळंही दिसली नाहीत ३,४ वर्ष. मग परत केलं पेस्ट कंट्रोल.
तिथे खालच्या अपार्टमेन्टला
तिथे खालच्या अपार्टमेन्टला रहाणार्या देसी लोकान्कडून>>>>
म्हणजे तुम्हाला पाकिस्तानी किंवा बांगलादेशी असे म्हणायचे आहे का...?
२ भाग बोरीक पावडर + १ भाग
२ भाग बोरीक पावडर + १ भाग साखर + १ भाग मैदा भिजवण्यापुरते दूध या मिश्रणाच्या गोळ्या करुन व त्याने फटी भरून फायदा होतो. साधारण ३/४ महिन्याने परत परत करायचे.>>>>>>
धन्यवाद दिनेश, हे आधीही तुम्ही कुथेतरी लिहिलं होतं पण सापडच नाही. आज करतोच बंदोबस्त झुरळांचा....
किल देम ऑल ...बोथ ..देसीज
किल देम ऑल ...बोथ ..देसीज अॅन्ड झुरळाज
मला पण या टिपांचा उपयोग होईल.
मला पण या टिपांचा उपयोग होईल.
किल देम ऑल ..>>>
किल देम ऑल ..>>> संभाळुन...
एमआयबी मधला एलीयन झुरळ आजुबाजुला नाहिये हे बघुन...
राहू द्या हो त्यांना तिथेच.
राहू द्या हो त्यांना तिथेच. निदान घरामध्ये कोणीतरी आहे ज्याला बायको घाबरते.
