सांस्कृतिक समितीतर्फे आयोजित केले जाणारे विविध कार्यक्रम हे दरवर्षीच्या वर्षाविहाराचं एक प्रमुख आकर्षण असतं. वविच्या ठिकाणी पावसात, पाण्यात हुंदडून आणि नंतर भरपेट जेवून मंडळी थोडी सुस्तावलेली असतात. अशा वेळेला सर्वांना निवांत, हलकंफुलकं मनोरंजन मिळावं आणि त्याचबरोबर एक ‘मायबोली-स्पिरीट’ निर्माण व्हावं हाच त्यामागचा मुख्य उद्देश.
यंदाही त्यासाठी सांस्कृतिक समितीनं जोरदार तयारी केलेली आहे. मात्र त्यादिवशी आयोजित केले जाणारे कार्यक्रम आणि त्यांची माहिती हे सर्व सध्यातरी आम्ही गुलदस्त्यातच ठेवू इच्छितो. उत्सुकतेतून खुमारी वाढवण्याचा हा एक सोपा उपाय, नाही का?
फक्त एकच गोष्ट आधी नमूद करायची आहे -
समस्त वविकरांच्या ‘ओळख-परेड’चा कार्यक्रम यंदा थोडा अभिनव पध्दतीनं होणार आहे.
प्रत्येकानं आपली ओळख ही उखाण्यातून करून द्यायची आहे. खुसखुशीत, मजेदार, विनोदी दोनोळ्या किंवा चारोळ्यांच्या रुपातले उखाणे. त्या उखाण्यांद्वारेच सर्वजण आपलं नाव, मायबोली आय-डी आणि इतर माहिती (उदा. : राहण्याचं ठिकाण, माबोवरचा वावर, कुठल्या बाफवर जास्त उपस्थिती असते, एखाद्या माबोकराचा नातेवाईक म्हणून आलेले असल्यास त्या नात्याचा उल्लेख इ.) इतरांना सांगतील.
हे वाचल्या वाचल्या कदाचित निम्मेजण ही कल्पना झिडकारून टाकतील, उखाणा तयार करण्याच्या विचाराने उरलेल्यांच्या पोटात कदाचित गोळा येईल. पण ही झाली ‘फर्स्ट रिऍक्शन’! त्यानंतर जर याबद्दल थोऽडा विचार केलात तर त्याद्वारे येणार्या धमालमस्तीची तुम्हालाही कल्पना येईल आणि पटकन एखादा खल्लास उखाणा तुम्हाला सुचूनही जाईल.
अर्थात, उखाण्याची कुणावरही सक्ती केली जाणार नाही. असं जरी असलं तरी सर्वजण खिलाडूवृत्ती दाखवतील आणि या अभिनव ओळख-परेडीला यशस्वी करतील अशी आशा सांस्कृतिक समिती बाळगून आहे.
--------------------------------------------------------------------
चला तर, आमच्यातर्फे एक उखाणा...
घेऊन टाका उखाणा, मीटरमधे बसो वा न बसो
ववि_संयोजकांना तुमचे पूर्ण सहकार्य असो
अश्वे, इथे मंजु कुठे दिसली
अश्वे, इथे मंजु कुठे दिसली तुला सिक्वेन्स सांगताना![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
अजून कुणाला हवा असल्यास
अजून कुणाला हवा असल्यास सांगा... >>>> कसे दिले ??? मला ४ हवेत![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अरे तुला काय कमी आहे कल्पकतेची. लढव डोक >>> अरे आता मी पांढरा झेंडा उभारला आहे, उरलेल आयुष्य शांततेत घालवेन म्हणतो. लढा बिढा काही नको...
(No subject)
(No subject)
नुसतं नावातच याच्या विनय अन
नुसतं नावातच याच्या विनय अन भिडे....
लढायच्या आधीच उभारतो पाढंरे झेंडे.
है शाब्बास विनय.... कसे
है शाब्बास विनय....
कसे दिले? मला ४ हवेत>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अरे मधुरा एकच होती ना?
अश्वे, मी कसला सिक्वेन्स सांगितला गं तुला?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
अग नहि. मझ वेन्धलेपन.
अग नहि. मझ वेन्धलेपन. मधुकर्ने सिक्वेन्स चुकल म्हत होत. मि तुच समजले घैघैत.
वरील शब्दांचा अर्थ आहे की
वरील शब्दांचा अर्थ आहे की अश्वि जेवते आहे.
चांगले चांगले मजेशीर उखाणे
चांगले चांगले मजेशीर उखाणे पोस्ट करा हां नंतर, वविच्या वृत्तांतांमधून.
वविला न येणार्यांनी इथेच
वविला न येणार्यांनी इथेच उखाणे घेऊन टाकावेत. हुकूमावरुन....
ए ललिता, मला पाठव ग उखाणे
ए ललिता, मला पाठव ग उखाणे डझनभर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे मधुकरा, र ला ट जोडताना सिक्वेन्स बघु लागलो तर कविता कशा बनतील?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ज्या गद्याला सिक्वेन्स नाही (आणि सेन्सही नाही) त्यालाच पद्य म्हणतात हे तुला कोणी सान्गितलेल दिसत नाही!
LT किती उखाणे जमा करुन
LT किती उखाणे जमा करुन ठेवताय? एकाने एकच उखाणा घ्यायचाय ना?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कविता, मी ८० पानी वही तयार
कविता, मी ८० पानी वही तयार करतोय
![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
लिंबू, तुलापण संपर्कातून एक
लिंबू,![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तुलापण संपर्कातून एक उखाणा पाठवलाय
ज्या गद्याला सिक्वेन्स नाही
ज्या गद्याला सिक्वेन्स नाही त्यालाच पद्य म्हणतात >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मलाही हवाय
मलाही हवाय
एक
एक
हा माझा उखाणा: बहिणाबायनं
हा माझा उखाणा:![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बहिणाबायनं आणलय हितं, नाव हाये शिंडरेला
राजकुमार कवाच गावला, बुट मेला हरिवला
सिंडे
सिंडे :d
सिंडे बुटाचं काम राजकुमाराशी
सिंडे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बुटाचं काम राजकुमाराशी गाठ बांधणं, नंतर तो (म्हणजे बुट ;)) राहिला काय हरवला काय काय फर्क पडतो
माझा गेल्या वर्षीच उखाणा (सांस मधे उखाण्यांचा कार्यक्रम झालाच नाही आणि शेवटी बशीत घ्यावे लागले उखाणे सगळ्यांना)![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ऑफिस मधे आल्या आल्या, उघडते मी माबोचा कट्टा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
त्यावरुन विश्वेश करतो थट्टा
त्यावरुन विश्वेश करतो थट्टा
मग सुरु होतो कविताच्या तोंडाचा पट्टा
सिंडरेला ए लले, तू नाही हा
सिंडरेला![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ए लले, तू नाही हा द्यायचे सगळ्यांना संपर्कातून उखाणे धाडून... चालवू दे की त्यांना जरा त्यांचं त्यांचं...
कवे, बुटाचं काम राजकुमाराशी गाठ बांधणं... का... राजकुमाराचं काम बुटाची गाठ बांधणं...:हाहा:
मलाबी द्या की एखाद दोन उखाणे
मलाबी द्या की एखाद दोन उखाणे पाठवुन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कवे लले
मी ८० पानी वही तयार करतोय
मी ८० पानी वही तयार करतोय >>>एकेरी लाईनची की दुहेरी लाईनची ???:फिदी:
मी ८० पानी वही तयार करतोय >>>
मी ८० पानी वही तयार करतोय >>> लिंबु, सांस ने वविसाठी तुझी 'उखाणा पुरवठा मंत्री' म्हणून नेमणूक केली आहे का?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बुटाचं काम राजकुमाराशी गाठ
बुटाचं काम राजकुमाराशी गाठ बांधणं... का... राजकुमाराचं काम बुटाची गाठ बांधणं.. >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ए लले, तू नाही हा द्यायचे सगळ्यांना संपर्कातून उखाणे धाडून... चालवू दे की त्यांना जरा त्यांचं त्यांचं.. >>> जे हा च्यालेंज स्विकारणार नाहीत आणि माघार घेऊन मजा घालवतील असं वाटतंय त्यांनाच 'पा पण ना' म्हणून मी उखाणे पाठवणारे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
मल्ली, लिंबू
सिंडे
या घडीला तुझा उखाणा सर्वात भारी आहे.
लिंबू ला दिव्याची काय गरज,
लिंबू ला दिव्याची काय गरज, त्याची ८० पानी वही भरत आलीये असं ऐकलं![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अरे मला पण मदत करा ....
अरे मला पण मदत करा ....
दिक्षित आणि अशिक्षित
दिक्षित आणि अशिक्षित जुळताहेत्...:फिदी:
मंजे
मंजे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>>> दिक्षित आणि अशिक्षित
>>>> दिक्षित आणि अशिक्षित जुळताहेत्... <<<<![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आपण त्याबरोबर "विक्षिप्त" किन्वा "बुभुक्षित" देखिल जुळवू शकू..... कस?
ते बाकी काही म्हणा (काय फरक पडतो?), पण मला रेडीमेड उखाणा मिळालाय हे निर्विवाद सत्य आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages