Submitted by admin on 9 July, 2008 - 21:50
घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.
माझ्या कोथिंबीरीला कोंब आलेत
माझ्या कोथिंबीरीला कोंब आलेत (वीकेंडला).. थँक्स टू शोनू आणि रैना!
नानबा अग्दी आनंदाच्या डोहात
नानबा अग्दी आनंदाच्या डोहात पोहतेयस गं
तू exactly काय केलंस ते रुजायला?
अश्विनी अग बाजारात पांढर्या
अश्विनी अग बाजारात पांढर्या अळुच्या अळकुड्या विकायला येतात. काळ्या अळूच्या कुणाकडे असतील त्यांच्याकडून एखादी मुळी घ्यायची. मग पसरतात त्या. माझ्याकडे ये मी देते तुला.
शोनू आणि रैनानं माहिती पुरवली
शोनू आणि रैनानं माहिती पुरवली की धने ठेचायचे अर्धे आणि मग लावायचे.. तसंच केलं.. आणि घरातल्या राहिलेल्या भाज्यांचं/फळांचं वगैरे खत करून घालत राहले, वाट पहात
हो ना.. सगळीकडे एकदम जाहिरात झाली ना
मस्त वाटतय खरच!
जागु तुझ्या फोटोत अळुवडीचे
जागु तुझ्या फोटोत अळुवडीचे अळु पाहिले होते, बाजारातल्या अळकुंडीत ते मिळेल का??
माझ्याकडे सेम तसेच होते. मी १० वर्षे कुंडीत जपले होते, अळुवड्या करुन खात होते. चार महिन्यापुर्वी घराखालच्या जागेत माती टाकुन भाजी रुजवण्याची (दुर)बुद्धी झाली. अळु जमिनीत जास्त चांगले वाढेल म्हणुन सगळ्या मुंडल्या तिथे नेऊन लावल्या. भाजी नीट झाली नाही ती नाहीच (कारण भरपुर उन नाहीये तिथे) वर अळूच्या सगळ्या मुंडल्या उंदरांनी खाऊन टाकल्या...
आता अळूच नाहीये माझ्याकडे. कॉलनीत कोणाकडे आहे का शोधत जोगवा मागत फिरायला पाहिजे आता...
अळु मात्र छान होत होते तिथे. अळूला उन अजिबात आवडत नाही आणि जमिन कायम ओलसर असली की ते जाम खुशीत वाढते. कुंडी चुकुन उन्हात राहिली की पाने वाढायचीच नाहीत, मग उचलुन सावलीत ठेवली की पाने अशी मस्त पसरायची. चारपाच पानात मस्त अळुवडी व्हायची...
माझ्या परसबागेत सध्या भोपळा,
माझ्या परसबागेत सध्या भोपळा, तोंडले, गावरान अळू, विद्यापिठची अळू, चवळी, पपई, मिरचीच रोप, वांग्याचं रोप, रताळू, लाल भोपळा, चिक्की, काकडी, कारले, दोडका, बीट, आंबटचूका, मेथी, कोथींबीर, पालक, मुळा, गवार हे आहे. ह्यातलं बरच काही अजून बाल्यावस्थेतच आहे.
ह्या शिवाय लाजाळू तर फुलांनी आणि शेंगांनी अगदी लगडलाय. तूळस तर ४ फूटाच्या वर वाढलीय आणि कवळीत मावणार नाही येवढी रूंद पसरलिय. एका मिरचीच्या झाडाला भरपूर मिरच्या लागल्यात. निशिगंध, मोगरा, जूई, अबोली पण आहेत. कालच झेंडू आणि त्याच वर्गातल्या आणखी एका प्रकारच्या फुलाची लागवड केलिय. दिवाळी दसर्याला घरची फुल असावीत म्हणून.
तोंडल्याच्या वेलाला भरपूर तोंडले लागतायेत पण दुसर्याच दिवशी गळून पडतायेत. परवाच त्याच्यावर १ ग्राम Para Chloro Phenoxy Acetic Acid ५ लिटर पाण्यात मिसळून फवारलय. ५-६ तोंडली जरा मोठी झाली आहेत. आता नव्याने लागणारे तोडले गळून पडतायेत की वाढतायेत ते पहायला हवय. तुम्हाला काही उपाय माहित असेल तर नक्की सांगा.
तर अशी ही माझी छोटीशी परसबाग.
मस्तच ग नलिनी! आंबटचुका, मुळा
मस्तच ग नलिनी! आंबटचुका, मुळा यांचं बी कुठून मिळालं गं ?
फोटो पण टाक ना !
मुळ्याचं बी मला बियाणांच्या
मुळ्याचं बी मला बियाणांच्या दुकानात मिळालं. आंबटचुका, चंदनबटव्याचं बी ईथल्या गावच्या बाजारात एका शेतकर्याला मागितलय, ते मिळणार आहे पुढच्या मंगळवारी पण मी काय केलय की जेवढा आंबटचुका मुळासकट होता त्याचे फक्त पानं खुडून घेऊन मूळं लावलीत. २-३ दिवसात मस्त रुजतील ती मूळं.
मस्तच नलिनी. यावेळी मी पण
मस्तच नलिनी. यावेळी मी पण असाच प्रयोग करुन पाहिला.
करुन बघा इतरांनी पण.
अंबाडीची भाजी आणलेली. त्यातले थोडे जाड असलेले देठ रोवले. मस्त पान फुटली आहेत अगदी. बिया नसताना आता घरची अंबाडी खायला मिळेल. (अशी आशा आहे. सशाने खाल्ली नाही तर. :राग:)
तसाच प्रयोग अळुचा केला. अरवी इंडियन स्टोअर्स मधुन आणली आणि रोवली. मस्त ३/४ पान फुटली आहेत.
अंबाडीचे देठ आजच मी
अंबाडीचे देठ आजच मी कचर्याच्या खड्यात टाकलेत. उद्या सकाळीच काढून लावते ते. पण मुळं नसताना रुजतात का ते देठ?
नलिनी करडई लाव, छान फूले
नलिनी करडई लाव, छान फूले येतात, (पण भरपूर काटे हि असतात.)
सुरणाचा कोंब पण जगतो. त्याची पाने छान छत्रीसारखी होतात. क्वचित फूल लागते, मोठे असते पण त्याला दुर्गंधी येते. कोनफळ, कणंग यांचे वेल छान होतात. पॅशनफ्रूट कोणाकडे मिळाले तर बघ, मस्त फूले आणि फळे येतात. तो वेल भिंतीवर चढवता येतो.
दिनेशदादा, करडईचे बी पण
दिनेशदादा, करडईचे बी पण मागवलेय मी. सुरण, कोनफळ, कणंग ईथे नाही मिळणार. कोनफळ आणि कणंग माझ्यासाठी अगदी नविनच आहे. मी पाहिलच नाही अजून.
जुना पालक होता तो काढून आता नविन लावलाय.
कृष्णकमळाचा वेल लावला होता मी पण शेजारच्या बांधकामात त्यावर सिमेंट वैगेरे पडून खराब झालेला. मग काढून टाकला मी. परत एकदा लावते.
सॉरी. हो येतात. म्हणजे
सॉरी.:) हो येतात. म्हणजे माझ्याकडे तरी आलेत. जरा जाड होते देठ खर.
हे बघ माझ्या परसातले कोनफळ.
हे बघ माझ्या परसातले कोनफळ. सहा महिन्यापूर्वी भारतातून बटाट्याएवढे कोनफळ (गराडू) नेले होते. नायजेरीयातल्या माझ्या घराला केवळ फूटभर रूंदीची कॅरी होती. त्यात लावले होते. सहा महिन्यात ५ किलो कोनफळ तयार झाले. याची चव आणि रंग दोन्ही छान असतो (पैठणीतल्या एका छटेला कोनफळी असे म्हणतात.) तसेच हा कंद पौष्टीक पण असतो. कणंग रताळ्यासारखेच असते पण दोन्ही बाजूने गोलसर असते, तेही पौष्टीक असते.
दिनेशदा, तुम्ही इथे आधी
दिनेशदा, तुम्ही इथे आधी कुठेतरी लिहिले होते की मिनरल वॉटरच्या बाटलीमधे मुळा लावला होता म्हणून्.त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का?
मिनरल वॉटरचा वरचा भाग
मिनरल वॉटरचा वरचा भाग कापायचा. तळाला पाणी जाण्यासाठी भोक पाडायचे. तळाशी थोडे वाळलेले गवत टाकायचे, मग माती टाकायची. मग मूळ्याची बी मधोमध पेरायची.
अश्या रितीने बाकिच्या भाज्या पण लावता येतील.
मूळ्याची बी मोहरीसारखी दिसते आणि ती हमखास रुजते.
अर्थात मोहरी पण अशी पेरता येईल. लालू च्या फोटोतल्या प्रमाणे उलटे टोमॅटोचे झाड पण पेरता येईल.
आम्हाला शाळेत कार्यानुभवसाठी मातीविनाशेती असा विषय होता. त्यासाठी समप्रमाणात तांदळाची तुसं, जाड रेती आणि शेणखत वापरायचो. या मिश्रणात झाडे मस्त वाढायची.
धन्यवाद्..मुळ्याची बी असते
धन्यवाद्..मुळ्याची बी असते हेच मला आज कळलं..आपण घरी गाजराच्या किंवा मुळ्याच्या चकत्या पाण्यामधे ठेवून त्यांना कोंब आणतो.त्याचे पुढे काही करता येते का?
ते जमिनीत लावायचे. पुढे
ते जमिनीत लावायचे. पुढे त्यालच बी येईन.
मी धणे अर्धवट ठेचूनच लावले,
मी धणे अर्धवट ठेचूनच लावले, पण १५ दिवस झाले अजून कोंब पण नाही आला
मिरच्यांच्या बिया पेरल्यात रविवारी
पुदिना कसा लावायचा?
पुदिन्याची जाडसर काडी
पुदिन्याची जाडसर काडी खोचायची, ती तग धरते. जर बाजारातून आणलेला पुदिना ताजा नसेल तर एखादा दिवस ती काडी पाण्यात उभी करुन ठेवायची. म्हणजे पाने ताजी होतात.
आणखी एक दोन दिवस ठेवली, तर तिला मूळे फूटतात. मग खोचायची.
नमस्कार, आज मी घरी लावलेला
नमस्कार,
आज मी घरी लावलेला दवणा केसात घालून आले.
माझ्याकडे पण यावर्षी, कांदे,
माझ्याकडे पण यावर्षी, कांदे, बटाटे, चिक्कार टोंमॅटो, भुईमुग, मिरच्या, खरबुज,अननस असे बरेच काही आले.
महत्वाचे असे की यातले काहीच मी कुठुनच विकत आणुन लावले नाही. सगळे कचर्यातुन उगवले आणि छान मस्त मोठे ही झाले.
आरती, तुमच्या बागेचे फोटो
आरती,
तुमच्या बागेचे फोटो टाका एकदा
धन्यवाद दिनेश धणे पेरताना
धन्यवाद दिनेश
धणे पेरताना काय चुकल असेल?
आरती किती मस्त
फोटो टाक
आज मी घरी लावलेला दवणा केसात
आज मी घरी लावलेला दवणा केसात घालून आले.>>> अमा बॉयकटवर दवणा लावलायस?
नाही केस लांब झालेत थोडे.
नाही केस लांब झालेत थोडे. अश्वे.
अरे वा ! कधी भेटतेस आता
अरे वा ! कधी भेटतेस आता ठाण्यात पँटलून जवळ? (डोक्यावर दवणा लावून?
)
नमस्कार! मी पण घरच्या घरी
नमस्कार!
मी पण घरच्या घरी काही झाडं लावलीयेत. पण अजून काहीच आले नाही. कोथिम्बिर तेवडी आली.
दवण्याच्या बिया कुठे मिळाल्या
दवण्याच्या बिया कुठे मिळाल्या मामी? मला पण हव्यात ? हैदराबादेतच मिळाल्या का ? पत्ता सांगितला तर तिथल्या नातेवाईकांना पिटाळता येईल
आरती- ऊस, ज्वारी, बाजरी, तूर,
आरती- ऊस, ज्वारी, बाजरी, तूर, मोहरी, जवस नाही आले का ?
Pages