सांस्कृतिक समितीतर्फे आयोजित केले जाणारे विविध कार्यक्रम हे दरवर्षीच्या वर्षाविहाराचं एक प्रमुख आकर्षण असतं. वविच्या ठिकाणी पावसात, पाण्यात हुंदडून आणि नंतर भरपेट जेवून मंडळी थोडी सुस्तावलेली असतात. अशा वेळेला सर्वांना निवांत, हलकंफुलकं मनोरंजन मिळावं आणि त्याचबरोबर एक ‘मायबोली-स्पिरीट’ निर्माण व्हावं हाच त्यामागचा मुख्य उद्देश.
यंदाही त्यासाठी सांस्कृतिक समितीनं जोरदार तयारी केलेली आहे. मात्र त्यादिवशी आयोजित केले जाणारे कार्यक्रम आणि त्यांची माहिती हे सर्व सध्यातरी आम्ही गुलदस्त्यातच ठेवू इच्छितो. उत्सुकतेतून खुमारी वाढवण्याचा हा एक सोपा उपाय, नाही का?
फक्त एकच गोष्ट आधी नमूद करायची आहे -
समस्त वविकरांच्या ‘ओळख-परेड’चा कार्यक्रम यंदा थोडा अभिनव पध्दतीनं होणार आहे.
प्रत्येकानं आपली ओळख ही उखाण्यातून करून द्यायची आहे. खुसखुशीत, मजेदार, विनोदी दोनोळ्या किंवा चारोळ्यांच्या रुपातले उखाणे. त्या उखाण्यांद्वारेच सर्वजण आपलं नाव, मायबोली आय-डी आणि इतर माहिती (उदा. : राहण्याचं ठिकाण, माबोवरचा वावर, कुठल्या बाफवर जास्त उपस्थिती असते, एखाद्या माबोकराचा नातेवाईक म्हणून आलेले असल्यास त्या नात्याचा उल्लेख इ.) इतरांना सांगतील.
हे वाचल्या वाचल्या कदाचित निम्मेजण ही कल्पना झिडकारून टाकतील, उखाणा तयार करण्याच्या विचाराने उरलेल्यांच्या पोटात कदाचित गोळा येईल. पण ही झाली ‘फर्स्ट रिऍक्शन’! त्यानंतर जर याबद्दल थोऽडा विचार केलात तर त्याद्वारे येणार्या धमालमस्तीची तुम्हालाही कल्पना येईल आणि पटकन एखादा खल्लास उखाणा तुम्हाला सुचूनही जाईल.
अर्थात, उखाण्याची कुणावरही सक्ती केली जाणार नाही. असं जरी असलं तरी सर्वजण खिलाडूवृत्ती दाखवतील आणि या अभिनव ओळख-परेडीला यशस्वी करतील अशी आशा सांस्कृतिक समिती बाळगून आहे.
--------------------------------------------------------------------
चला तर, आमच्यातर्फे एक उखाणा...
घेऊन टाका उखाणा, मीटरमधे बसो वा न बसो
ववि_संयोजकांना तुमचे पूर्ण सहकार्य असो
अरे वा! उखाण्यातून ओळख परेड.
अरे वा! उखाण्यातून ओळख परेड. छानच कल्पना आहे.
लले, (का ते कळलंच असेल)
लले, (का ते कळलंच असेल)
अश्वे गप ग चला तयारीला लागा
अश्वे गप ग
चला तयारीला लागा लोळू नका इथे फार
चला तयारीला लागा लोळू नका इथे
चला तयारीला लागा लोळू नका इथे फार >>>> हो ना ! एव्हेंटसाठी एव्हिनिंग गाऊन्स शिवायला टाकायचेत ना आपल्याला? (हे शेवटचं लोळतेय हं मी इथे).
पण खरंच, 'उखाणा' या गोश्टीचा
पण खरंच, 'उखाणा' या गोश्टीचा बाऊ न करता सर्वांनी स्पोर्टींगली धमाल शीघ्रकविता, चारोळ्या केल्या पाहिजेत.
आणि लोकहो, तशा करा.
(माझा उखाणा तय्यार पण झाला. :))
तू काय बै हुश्शार ! चल आता
तू काय बै हुश्शार ! चल आता मला पण तयार करुन दे एक उखाणा.
(No subject)
अश्वे
अश्वे
ओ सांस्कृतिक समिती
ओ सांस्कृतिक समिती (वाले/वाल्या)
हे काय नविन खूळ? आता आमचे काय वय हे का उखाणे घ्यायचे?
त्यातुन इथे माबोवर "एक्स्पर्ट लोकं" भारम्भार कविता पाडतात तेवढे पुरे नाही का झाले? अजुन वविमधे पाचपन्नास कवितान्चा रतिब काहून?
बर तर बर, दोन चार उदाहरणे तरी द्यायचीत जरा आयडीया यायला, ते पण नाही! अस कस चालेल?
(आयला, इथे दोनचार लोकान्समोर उभारुन गद्यात दोन वाक्ये धड बोलता येत नाहीत, त त प प होती, [त्यातुन ऐनवेळेस लिम्बी आठवली तर एक शब्द फुटणार नाही तोन्डातून ] कविता/चारोळ्ञा उखाणे कुणाला जमणारेत?
अन एखादी "स्वगतात्मक" चारोळी जरा जास्तच हातभर लाम्ब झाली तर आवरणार कशी? )
हे काय नाय, जरा नीटपणे विस्कटून मार्गदर्शन करा! दोनचार आयड्या घ्या, चारोळ्या पाडून दाखवा, मग करु म्हणाल ते!
उदाहरणादाखल एक उखाणा घ्यावा
उदाहरणादाखल एक उखाणा घ्यावा संयोजकांनी
शुभेच्छा देतेय मंजूडी, धम्माल करा सर्वांनी
वा वा अनेकानेक शुभेच्छा.
वा वा अनेकानेक शुभेच्छा.
छान!
छान!
ए मला पण एक उखाणा द्या बनवुन
ए मला पण एक उखाणा द्या बनवुन कुणीतरी...
अरे मला पण कोणी मदत कराल का ?
अरे मला पण कोणी मदत कराल का ? उखाना घ्यायचं ऐकुन पोटात गोळाच आला.
पुनः एकदा: आजकाल साहित्य
पुनः एकदा:
आजकाल साहित्य संमेलन, नाट्यसंमेलन असे सांस्कृतिक कार्यक्रम अमेरिकेत करण्याची पद्धत आहे. तेंव्हा हाहि कार्यक्रम अमेरिकेतच करा, असे आग्रहाचे आमंत्रण! येताना अमेरिकेतील गरीब मराठी लोकांसाठी २५ लाख रुपये घेऊन यायचे विसरू नका! धन्यवाद.
सां.स. घ्या आता हे आमन्त्रण
सां.स. घ्या आता हे आमन्त्रण पण!
काय झक्कीबोवा, यावेळेस तुमची शीतनिद्रा बरीच लाम्बली म्हणायची!
शीता वरून गिताची परिक्षा करू
शीता वरून गिताची परिक्षा करू नये
लिंब्या वरून झक्कीवर कोणी घसरू नये...
या वर्षीच्या संयोजकानी वापरली
या वर्षीच्या संयोजकानी वापरली जशीच्या तशी आयडिया
मागच्या वर्षी उखाण्याची आयाडिया दिली होती कुणी???
योगमहे.... या आहे वर्षाविहार,
योगमहे....
या आहे वर्षाविहार, सुटलाय जोराचा वारा
योगमहे जाईल उडुन, तिला कोणितरी धरा...
नंदिनी गेल्यावर्षी होऊ शकली
नंदिनी गेल्यावर्षी होऊ शकली नाही हि फेरी म्हणून तर वाईट वाटल होत त्याची भरपाई होतेय ह्यावर्षी
आयला, भलतचं आहे हे. ..
आयला, भलतचं आहे हे. .. बघुयात लग्नाआधी असं काहीतरी करायला मिळतं आहे
इन्द्रा, धन्यवाद (चला,
इन्द्रा, धन्यवाद
(चला, डायरीमधे एक जमा झाला, अजुन येऊद्यात प्लिज)
अनुल्लेखाच्या अस्त्राला मी
अनुल्लेखाच्या अस्त्राला मी स्वगतांनी मारतो
वयाने असलो मोठा तरी लिंबूटिंबू नाव लिहितो
-----
हे घ्या लिंबु तुमच्या साठी पेशल उखाणा
ज्जे ब्बात कविता, तुच माझी
ज्जे ब्बात कविता, तुच माझी सख्खी मैत्रिण
फक्त दुसरे वाक्य असे घेऊ का?
"देगा देवा लहानपण म्हणत,
लिंबूटिंबू बनुन वावरतो"
अर्थात आधीचेही छानच!
मला वाट्ट सन्योजक
मला वाट्ट सन्योजक की,
स्वतःबद्दल उखाणा बनविण्यापेक्षा..... नाही, ते घ्याच हो बनवुन
पण एक विभाग, दुसर्या आयडीन्वर बनवलेल्या उखाण्यान्चा घेतला तर? जश्ट लाईक फिशपॉण्ड्स?
लई प्रतिसाद मिळेल!
फिश्पॉण्ड टाकायचा अन आयडी ओळखायची!
देगा देवा लहानपण
देगा देवा लहानपण म्हणत,
लिंबूटिंबू बनुन वावरतो">>>>हे मस्त आहे
बर कविता, तिथे माईक असणारेत
बर कविता, तिथे माईक असणारेत का? नॉर्मलि असू शकते सोय
(असेल तर मी माझा कॉर्डलेस माईक पण घेऊन येतो......... काळजी नसावी, देईन सन्योजकान्कडेच, पण घेऊन येतो, असुद्यात अॅडीशनल म्हणून! )
माईक असेलच हो. पण आणलात तरी
माईक असेलच हो. पण आणलात तरी हरकत नाही फक्त जाताना आठवणीने मागून घ्या
इंद्रा वर्षाविहार २०१०, जमली
इंद्रा
वर्षाविहार २०१०, जमली शंभर-एक डोकी
चालवा डोकं, बनवा उखाणे
तेवढीच जरा धमाल करू या की
ववि_संयोजकांनी पण छान उखाणा
ववि_संयोजकांनी पण छान उखाणा घेतलाय नै?
Pages