बाहेरच्या आवरणासाठी
२ कच्ची केळी (plantains) उकडून आणि खिसून
२ मोठे बटाटे उकडून आणि खिसून
१ मोठी वाटी हरभरा डाळ (चण्याची डाळ) शिजवून - फार मऊ नको - सर्व पाणी काढून
१ मोठा कांदा बारिक चिरून
१ टे. स्पून आलं लसूण पेस्ट
३-४ हि. मिरच्या बारिक चिरून
मूठभर कोथिंबीर बारिक चिरून
मूठभर पुदिना बारिक चिरून
१ टि. स्पून शहाजीरे
१/२ टि. स्पून हळ्द
१ टि. स्पून तिखट
१ टि. स्पून धने पावडर
१ टि. स्पून जीरे पावडर
१ टि. स्पून गरम मसाला
१ टि. स्पून चाट मसाला
१ चिमूटभर आमचूर
२ टे. स्पून फोडणीसाठी तेल
२ मोठे चमचे डाळीचं पीठ किंवा ब्रेडक्रम्स
कबाबमध्ये भरायच्या सारणासाठी
दीड कप (किंवा १.५ मोठी वाटी भरून किंवा साधारण १२ औंस) पनीर खिसून
१ मध्यम कांदा बारिक चिरून
२ टे. स्पून कोथंबीर बारिक चिरून
१/२ टि. स्पून चाट मसाला
१/२ कप डाळिंबाचे दाणे (किंवा मनुका, क्रॅनबेरी यापैकी काहीही)
चवी पुरतं मीठ
कोथिंबीर पुदीना चटणी
१ कोथिंबीरीची लहान जुडी
मूठभर पुदीना
५-६ हि. मिरच्या
१ टि. स्पून जीरे
मीठ
१ कप दही
कबाब तळायला किंवा कडेने सोडून भाजायला तेल
कबाबमधे भरायचे सारणः
सर्व जिन्नस एकत्र करून हलक्या हाताने मळून घ्या. मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्या. बाजूला ठेवा.
चटणीसाठी दही सोडून बाकी सर्व जिन्नस एकत्र बारिक करून घ्या. दही घालून हवी तेवढी पातळ करा.
बाहेरचे आवरणः
पसरट पातेल्यात तेल तापवायला ठेवा. तेल तापल्यावर शहाजीरे टाकून कांदा घालून परतून घ्या. कांदा मऊ झाल्यावर आलं लसूण पेस्ट घाला. हि. मिरची, थोडी कोथंबीर, पुदिना घालून परतून घ्या. हळद, तिखट, धने-जीरे पूड, गरम मसाला, चाटमसाला घालून परतून घ्या. शिजलेली चणा डाळ घालून चांगले हलवून घ्या.
फूड प्रोसेसर मधे खिसलेला बटाटा, केळी, परतलेली चणा डाळ घालून सगळं एकत्र करून घ्या. फार चिकट वाटल्यास थोडं डाळीच पीठ / ब्रेडक्रम्स घाला.
हाताला थोडे तेल लावून केळ-बटाटा- चणाडाळ मिश्रणाची पारी करा. त्यात सारणाचा गोळा भरून हलक्या हाताने बंद करून, गोल करून हलकेच दाबून चपटे कबाब करा. पॅन मध्ये तेल घेऊन तळून घ्या किंवा 'शॅलो फ्राय' करा.
Enjoy
- plantains ऐवजी सुरण वापरून पण कबाब करता येतात.
- काही लोक बाहेरच्या आवरणासाठी सोया 'ग्रॅन्युअल्स' पण वापरतात.
- बाहेरच्या आवरणात आवडत असतील तर काजू घालू शकता.
- सारणासाठी पनीरऐवजी खवा, चीज किंवा तिन्हीचं मिश्रण वापरता येईल.
हे कबाब फार मसालेदार किंवा तिखट नसतात. पनीर, डाळिंबामुळे चव छान लागते.
.
.
ह्म्म्म्म्म ! तोंपासु क्रुती
ह्म्म्म्म्म ! तोंपासु क्रुती आणी फोटो.
यम्मी!
यम्मी!
भारी आहेत. तोंपासु
भारी आहेत. तोंपासु
सुपरहिट आहेत एकदम .
सुपरहिट आहेत एकदम :).
मस्त दिसत आहेत कबाब ! तुला
मस्त दिसत आहेत कबाब !
तुला 'कबाब क्विन' असा किताब द्यायला हरकत नाही ( की ह्या आधीच दिला आहे ? )
मस्तच वाटतेय. आता कच्ची केळी
मस्तच वाटतेय. आता कच्ची केळी आणली की अवियल च्या ऐवजी हाच प्रकार करणार
सह्हीच आहेत की हे कबाब नक्की
सह्हीच आहेत की हे कबाब नक्की ट्राय करणार.
कच्च्या केळ्या ऐवजी काय घालता येइल? फक्त बटाटा वापरला तर?
लाजो, 'अधिक टिपा' मध्ये दिलय
लाजो, 'अधिक टिपा' मध्ये दिलय बघ: सुरण किंवा सोया ग्रॅन्युअल्स. नुसता बटाटा घेतलास तरी चालेल पण मग कबाब ऐवजी बटाट्याच्या कटलेटस सारखी चव येईल, तुला आवडत असल्यास बाकिच्या भाज्यापण घालून बघ.
एक नंबर! करून बघणार !
एक नंबर! करून बघणार !
धन्स अंजली अग नवर्याला,
धन्स अंजली अग नवर्याला, केळ, सुरण, सोया चंक्स असल काही आवडत नाही. इतर भाज्या जसे गाजर कॉलिफ्लॉवर वगैरे घालुन बघेन
अजंली मस्त. आता लवकरच करुन
अजंली मस्त. आता लवकरच करुन बघेन
अंजली _/\_ (हिम्मत) करुन
अंजली _/\_
(हिम्मत) करुन पाहते.
अंजली मस्तच आहेत कबाब. करुन
अंजली मस्तच आहेत कबाब. करुन पाहणारच.
मस्त. फोटोत फार यम्मी दिसत
मस्त. फोटोत फार यम्मी दिसत आहेत.
डिश भारी आहे, मोठ्ठ्ठ्ठ्ठ्या पापलेटाएवढी
यम्म्म्मी फोटो आणि पाकृ
यम्म्म्मी फोटो आणि पाकृ
करून पाहायलाच हवी
करून पाहायलाच हवी