Submitted by kaaryashaaLaa on 5 October, 2008 - 23:53
कुठून आला ठराव की दर्वळलोसुध्दा नाही?
अरे इथे तर अजून मी सळसळलोसुध्दा नाही!
उगा भिडवली नजर जगाच्या अथांग डोळ्यांशी मी
असा हरवलो पुन्हा मला आढळलोसुध्दा नाही
मला तरी शांत वाटले फुंकरीत एका विझलो
तुलाच हळहळ उरेल की तळमळलोसुध्दा नाही
किती ठिकाणी तरी सुखाचे वळण लागले होते
निघून गेलो पुढे सरळ, अडखळलोसुध्दा नाही
हजार घावांतुनी तुझा घाव ओळखीचा दिसला
वठून गेलो उभ्या उभ्या , कोसळलोसुध्दा नाही
भलेबुरे अर्थ केवढे सांगतेस सार्यांपाशी
तरी बरे मी तुला पुरेसा कळलोसुध्दा नाही
कधीतरी समजले मला हा प्रवाह माझा नाही
निमूट वाहून लोपलो , खळखळलोसुध्दा नाही
तुला कशा एवढ्यात दिसल्या हजार पापी प्रतिमा
अजून अश्रू बनून मी ओघळलोसुध्दा नाही
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा!!! मला
व्वा!!!
मला तरी शांत वाटले फुंकरीत एका विझलो
तुलाच हळहळ उरेल की तळमळलोसुध्दा नाही
किती ठिकाणी तरी सुखाचे वळण लागले होते
निघून गेलो पुढे सरळ, अडखळलोसुध्दा नाही
हजार घावांतुनी तुझा घाव ओळखीचा दिसला
वठून गेलो उभ्या उभ्या , कोसळलोसुध्दा नाही>>>> उच्च!!!!!!!!!!!!!
दर्वळलोसु
दर्वळलोसुध्दा >>दरवळलोसुद्धा -- असे हवे होते ना!
चांगली आहे गजल. वेदना व्यक्त करण्याची ढब निराळी आहे आणि म्हणूनच भावली.
९ गुण
क्या बात
क्या बात है!!.... विशेष म्हणजे- आढळलो, सळसळलो असे शब्द वापरूनही गझल अगदी सहजपणे बांधल्यासारखी आहे..
ये कोई "पुराना आशिक" है!!
शेवटचा शेर तर अगदी थेट भिडणारा..
अलग अलग... ५
अलग अलग... ५ गुण.
छान झाली
छान झाली आहे. माझ्याकडून ८ गुण.
छान आहे ५
छान आहे
५ गुण
वा!!!
वा!!! संपूर्ण गझल आवडली.
माझे गुणः ८
व्वाह!
व्वाह! खासच!
तुलाच हळहळ उरेल की तळमळलोसुध्दा नाही... आह! थेट आर पार अगदी!
गजल खासच अगदी. पूर्णपणे वेगळी.
मस्त
मस्त गझल
माझे ८ गुण
खल्लास.... पु
खल्लास....
पुरते खल्लास....
माझे गुण ९
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||
खासच !!!
खासच !!! जियो !!
केवढा मोठा
केवढा मोठा रदीफ! जबरदस्त शब्द आहेत.. सगळे शेर आवडले, शेवटचे चार जास्त आवडले..
९ गुण
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!
मला तरी
मला तरी शांत वाटले फुंकरीत एका विझलो
तुलाच हळहळ उरेल की तळमळलोसुध्दा नाही
किती ठिकाणी तरी सुखाचे वळण लागले होते
निघून गेलो पुढे सरळ, अडखळलोसुध्दा नाही
हजार घावांतुनी तुझा घाव ओळखीचा दिसला
वठून गेलो उभ्या उभ्या , कोसळलोसुध्दा नाही
हे शेर मस्त आले आहेत.
माझ्या मते ६ गुण.
-सतीश
छान आहे
छान आहे गझल. ८ गुण.
>>उगा भिडवली नजर जगाच्या अथांग डोळ्यांशी मी
असा हरवलो पुन्हा मला आढळलोसुध्दा नाही
मस्तच!
>>मला तरी शांत वाटले फुंकरीत एका विझलो
तुलाच हळहळ उरेल की तळमळलोसुध्दा नाही
उला मिसर्यात 'वाटले' ऐवजी 'वाटेल' हवे होते वाट्टं.
वा! मस्त
वा! मस्त गझल!
अश्रू आणि सुख हे शेर विशेष आवडले. माझे गुण - ७.
घायाळ
घायाळ करणारे शेर....
१० पैकी १० गुण...
अजून अश्रू
अजून अश्रू बनून मी ओघळलोसुध्दा नाही...
सुंदर कल्पना. पूर्ण गझलच छान. सर्व गुण बहाल!
प्रत्येक
प्रत्येक शेरातला punch तितकाच आतपर्यंत घुसणारा! पुन्हा पुन्हा वाचली! खूप आवडली! अर्थ आणि आशयासाठी माझे १० गुण. ही गझल ह्याहून सुंदर अजून कशी असू शकेल?
छान आहे
छान आहे गझल. शब्द उत्तम..
७ गुण..
मस्त!! एकसे
मस्त!! एकसे एक शेर आहेत!
आय
आय हाय!
प्रत्येक शेर वेध घेणारा आहे.... अगदी कुर्बान व्हाव असा!!
माझे १० (दहापैकी बारा देता येतील काय. काशा? )!!
-----------------------------------------------------
वह सुबह का अहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ खुर्शीद सर्-ए-बाम तो आया
मलाही खूप
मलाही खूप आवडली.. सगळे शब्द सुंदर !
माझे १० पैकी १० मार्क्स !!
जबरदस्त
जबरदस्त गझल!!!!!!!!व्वा!!!!मजा आली वाचुन
९ गुण
मला तरी
मला तरी शांत वाटले फुंकरीत एका विझलो
तुलाच हळहळ उरेल की तळमळलोसुध्दा नाही
हजार घावांतुनी तुझा घाव ओळखीचा दिसला
वठून गेलो उभ्या उभ्या , कोसळलोसुध्दा नाही
भलेबुरे अर्थ केवढे सांगतेस सार्यांपाशी
तरी बरे मी तुला पुरेसा कळलोसुध्दा नाही
ह्या तीन शेरांमधे र्हीदम अडखळतो बाकी सगळे मस्त तालात ठेक्यात अलगद पदन्यास करतात.
७गुण
ग्रेट....खरं
ग्रेट....खरंच ग्रेट... माझे अगदी १० गुण.
पहीले २
पहीले २ सोडले तर बाकीची छान आहे
६ गुण
अगदी
अगदी कातील्...माझे १० गुण..
सुरेख.. ९
सुरेख.. ९ गुण
- अनिलभाई
मस्तच गझल
मस्तच गझल आहे.. पुन्हा वाचली!
मतल्याचा अर्थ मात्र मला नीट लागत नाहिये
वाह! अजुन
वाह! अजुन एक छान गझल कार्यशाळेतली.
मस्तच...आवडली !!
--------------
2b || !(2b)
Pages