Submitted by kaaryashaaLaa on 5 October, 2008 - 23:52
गूढ तव डोळ्यात केंव्हा, चांदणे हसलेच नाही
तू तमाला झेलले, नाही कधी म्हटलेच नाही
केवढी तलखी उन्हाची, सावली झालीस माझी
पोळ्ले तव पाय तरिही, मागुती वळलेच नाही
संधिकाली शांतवेळी, दाटले डोळ्यात पाणी
धुंद मी तव संगती अन्, कधि मला दिसलेच नाही
आठवांच्या सोबतीने, रात्र सारी जागताना
बेफिकीरित मस्त मी, मज दु:ख तव कळलेच नाही
साठले हृदयातळी जे, दाटले काठावरी, पण
दु:ख सांगाया मनातिल, ओठ तव हललेच नाही
आज मी येथे रिता अन्, दूर तूही पोचलेली
किति भराव्या ओंजळी परि ऋण तुझे फिटलेच नाही
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केवळ
केवळ सुंदर!!! शब्दांमुळे गजलीच्या सौंदर्यात भर पडली. फक्त शेवटच्या शेरात 'तव' तेवढा साधायला हवा होता.
७ गुण
गूढ तव
गूढ तव डोळ्यात केंव्हा, चांदणे हसलेच नाही>>
गाललल गागाल गागा, गालगा ललगाल गागा
तू तमाला झेलले, नाही कधी म्हटलेच नाही>>
गालगागा गालगा गागा लगा ललगाल गागा
मी फक्त पहिल्या शेराचे लघु गुरु करून पाहिले पण दोन्ही ओळीतील पहिल्या ४ अक्षरांमधेच मला ते सारखे नाहीत असे दिसले.
पहा:
गूढ तव>> गाललल
तू तमाला>> गालगागा
काहीतरी चुक वाटते आहे वृत्तात.
दूर दूर
दूर दूर तू... ४ गुण.
छान आहे ५
छान आहे
५ गुण
आवडली गझल..
आवडली गझल.. मस्त लयीत आहे ..
बू
बू बुवहिइही गझल 'गालगागा गालगागा गालगागा गालगागा' अशी आहे.
गूढ तव डो\ळ्यात केंव्हा,\ चांदणे हस\लेच नाही
गा ल गा गा=गू ढ तव डो
तू तमाला\ झेलले, ना\ही कधी म्हट\लेच नाही
पण मक्त्याच्या सानी मिसर्यात गडबड वाटतेय वृत्तची!
_________________________
-A hand that erases past can create a new begining.
बरी आहे
बरी आहे गझल. प्रयत्न चांगला आहे.
माझे गुणः ३
र्हस्व-दी
र्हस्व-दीर्घाच्या बाबतीत माझी विकेट जाते बरेचदा, त्यामुळे प्रश्न चूक असेल तर आधीच माफी मागते.
कधि? तरिही, बेफिकीरित, किति?
माझे ३
-----------------------------------------------------
वह सुबह का अहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ खुर्शीद सर्-ए-बाम तो आया
गिरिराज, "ग
गिरिराज,
"गा ल गा गा=गू ढ तव डो'
हे कसे काय ? तव = गा, हे कसे?
बू बुवहिइही >> आणि हे काय? (शिवी का मला :))
प्रयत्न
प्रयत्न छान आहे...
माझे गुण ३
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||
दाद, तुमचं
दाद,
तुमचं निरीक्षण बरोबर आहे. या सगळ्या वृत्तपूर्तीसाठी झालेल्या तडजोडी आहेत.
त्या शक्यतो टाळाव्यातच. आणि ते सरावानेच जमतं.
==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही
kaaryashaalaa08@maayboli.com
बी,तुला
बी,तुला काय शिव्या द्यायच्या बुवा!! आम्ही तुझ्या नावानेच तुला बोलावणार!
गु=गा
ढ= ल
त=ल
व=ल
तव=लल=गा
दोन लागोपाठ लघू आल्याने तो गुरू होतो! पण यात एक गोम आहे की ' गूढ तव डोळ्यांत' मध्ये गा ल ल ल गा गा ल असे आहे तर मग दोन लघूंचा गुरू या नियमाने गा गा ल गा असे का करू नते? कारण साधे आहे की सगळी गझल गालगागा मध्ये आहे त्यामुळे आपला विवेक की काय किंवा मेंदू वापरून या गोष्टी ठरवता येते.
चुपके चुपके चित्रपटात म्हटल्याप्रमाणे TO =टू आहे तर GO=गू का नाही.वगैरे वाद घालून उपयोग नाही!
_________________________
-A hand that erases past can create a new begining.
छान आहे
छान आहे गझल!
वृत्तात गडबड आहे.
माझे ५ गुण
पहिला
पहिला तिसरा आणि चवथा शेर हे एकाच कल्पनेची पुनरावृत्ती वाटले.
दादचं म्हणणंही योग्यच आहे. र्हस्व दीर्घाची सवलत बर्याचदा घेतलेली दिसते.
माझ्या मते ४ गुण.
-सतीश
गिरी शब्द
गिरी
शब्द मस्त आहेत गजलेचे, पण ह्रस्व- दीर्घची सूट एखाद्या वेळी घेतली तर ठीक वाटते, इथे बर्याच वेळा घेतल्याने ती खटकत राहते.
४ गुण
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!
गिरिराज,
गिरिराज, धन्यवाद.
कार्यशाळा, तुम्ही हा नियम आम्हाला सांगितला नाही की लागोपाठ २ लघु आलेत की त्याचा एक गुरु होतो? जर सांगितले असेल तर क्षमस्व. पण मी मन लावून वृत्ताचे नियम वाचले आहेत.
वरील
वरील नियमानुसार, एका गुरु चे दोन लघु करता येतात का? हा नियम मला माहिती असता तर खूप काही घडले असते
४ गुण.
४ गुण.
"साठले
"साठले हृदयातळी जे, दाटले काठावरी, पण
दु:ख सांगाया मनातिल, ओठ तव हललेच नाही"
जीवघेणी ओळ!!!
७ गुण...
शब्द छान!
शब्द छान! कवीची तरलवृत्ती ओळी-ओळीतून जाणवते. पण बर्याच तडजोडी कराव्या लागल्या आहेत, त्यामुळे सहजता जाते.
माझे गुण - ५.
आठवांच्या
आठवांच्या सोबतीने, रात्र सारी जागताना
बेफिकीरित मस्त मी, मज दु:ख तव कळलेच नाही
येथे "तव" ऍवजी "तुझे " चालले असते.
साठले हृदयातळी जे, दाटले काठावरी, पण
दु:ख सांगाया मनातिल, ओठ तव हललेच नाही
येथे ..
साठले हृदयातळी जे, दाटले काठावरी तुझ्या
दु़:ख ते जाणाया डोळ्यातील, चित्त माझे धावलेच नाही
असे जास्त समर्पक होईल असे वाटते का?
गझल छान आहे, म्हणूनच ही देवघेव.
लय मस्त
लय मस्त आहे गझलेतली !!!
शब्द अजूक बसवून वृत्त जमवलं असत तर अजून छान झाली आसती... ६ गुण..
शेवटचा शेर
शेवटचा शेर आवडला खूप.
व्वा सगळेच
व्वा सगळेच शेर छान--७ गुण
मस्त. ८ गुण
मस्त. ८ गुण
छान आहे ६
छान आहे
६ गुण
सहसा
सहसा दुसर्याला दोष दिला जातो, इथे स्वतःच्या चुकीची प्रांजळ कबुली दिलेली आहे. टोटल मस्त. ९ गुण
र्ह्स्व-द
र्ह्स्व-दीर्घाची सवलत जवळ-जवळ प्रत्येक शेर मध्ये घेतल्याने, तात्रिक दृष्ट्या पटत नाहीये... काही काही शब्दही त्या ठिकाणी अनाठायी वाटतात.. ३ गुण..
साठले
साठले हृदयातळी जे, दाटले काठावरी, पण
दु:ख सांगाया मनातिल, ओठ तव हललेच नाही
आज मी येथे रिता अन्, दूर तूही पोचलेली
किति भराव्या ओंजळी परि ऋण तुझे फिटलेच नाही
दोन्ही शेर छान....
छान. ६ गुण.
छान. ६ गुण.
Pages