Submitted by kaaryashaaLaa on 29 September, 2008 - 01:23
मित्रहो,
ठरल्याप्रमाणे कार्यशाळेत निर्दोष ठरलेल्या प्रवेशिका तुमच्यासमोर सादर करत आहे.
तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहेच, पण आणखी एक जबाबदारीही आहे तुमच्यावर.
प्रत्येक गझलला तुम्ही १० पैकी गुण द्यायचे आहेत.
हे गुणांकन तुमच्या अभिप्रायातच नोंदवायला हरकत नाही.
तर सादर आहे आजची प्रवेशिका....
असे भोगले, राहिली आस नाही
सुखे सोसले, मानला त्रास नाही
मनी कोंडला, सूर बेभान वेडा
असो बेसुरा! कोरडा खास नाही
जरी दु:ख दाटे, उरी भंगल्याचे
कुणा हाक देईन, हा ध्यास नाही
किती लोभ माझ्यावरी वेदनेचा
मिळाली सदा साथ, आभास नाही
असा होतसे प्राण श्वासांत गोळा
तरी साहिले, सोडला श्वास नाही
कधी जीत झाली, कधी हार झाली
तराजूमधे, तोलली रास नाही
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच आहे.
मस्तच आहे. छान वाटली.
मनी कोंडला, सूर बेभान वेडा
असो बेसुरा! कोरडा खास नाही
गुण : ८
किती लोभ
किती लोभ माझ्यावरी वेदनेचा
मिळाली सदा साथ, आभास नाही
आवडला..!
मनी कोंडला, सूर बेभान वेडा
असो बेसुरा! कोरडा खास नाही
हे पण छान..!
गुण : ६
================
मी वैशाखातला दर्द, तू श्रावण हिरवागर्द..!
वृत्त
वृत्त नियमात बसली तरी तिला सहज प्रवाह नाही वाटला आणि प्रत्येक शेर आणि संपूर्ण गजल "होमोजिनियस' नाही वाटली. ४ मार्क्स
अज्ञात, गझल
अज्ञात,
गझल ही 'होमोजिनियस' असावी अशी आवश्यकता नसते.
गझल मधले पाच शेर पाच वेगवेगळ्या विषयांवरचे आणि मूडचे असू शकतात - आणि पारंपारिक गझल मधे ते तसे असतातही.
त्यात फक्त 'जमीन' सारखी असते, बाकी काही बंधन नाही.
म्हणजे त्या अर्थी गझल हा सारखी 'जमीन' असणार्या ५ किंवा अधिक कवितांचा समूह असतो असंही म्हणता येईल.
ज्या गझलमधे 'प्रवाह' असतो, तिला मुसलसल गझल किंवा रवानी गझल असं म्हणतात. आणि मी वर्णन केलेल्या पारंपारिक गझलला 'गैर-मुसलसल गझल' असं म्हणतात.
==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही
kaaryashaalaa08@maayboli.com
>>मनी
>>मनी कोंडला, सूर बेभान वेडा
असो बेसुरा! कोरडा खास नाही
कधी जीत झाली, कधी हार झाली
तराजूमधे, तोलली रास नाही<<
हे विशेष आवडलं. एकुणातच मोजक्या शब्दांच्यात बरंच काही आलंय. बाकी नियम मला समजत नाहीत त्यामुळे मी काय बोलणार.
गुण - ६.५
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
अज्जुका, कृ
अज्जुका,
कृपया अपूर्णांकात गुण देऊ नयेत.
==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही
kaaryashaalaa08@maayboli.com
मग ते गुण ७
मग ते गुण ७ आहेत असे समजा! अपूर्णांक पुढच्या संख्येला पूर्ण करतात ना.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
कार्यशाळा,
कार्यशाळा,
आपण दिलेल्या आर्थपूर्ण आणि समर्पक शब्दांनी माझ्या समजुतीस नक्कीच भरीव योगदान दिलं आहे. मनःपूर्वक आभार.
वा छान! ४
वा छान! ४ गुण
सहज, सुंदर
सहज, सुंदर जमली आहे. सूर, वेदनेची साथ, रास तोलणे कल्पना आवडल्या.
Zaad, ते 'सुखे' हे सुख चे अनेकवचन नाही, 'सुखाने' अश्या अर्थाने आहे त्यामुळे 'सोसले' बरोबर आहे. CBDG
७ गुण.
Good one! छान
Good one! छान जमली आहे.
परागकण
कधी जीत
कधी जीत झाली, कधी हार झाली
तराजूमधे, तोलली रास नाही
वा! मक्ता जाम आवडला.
फक्त त्यासाठीच माझे :
६ गुण.
माझ्याकडू
माझ्याकडून ४/१०
शेवटचा शेर आवडला.
~~~~~~~~~

~~~~~~~~~
सारे शेर
सारे शेर एकाच अंगाचे. पण छान आहेत. गुण ४
चांगला
चांगला प्रयत्न
५ गुण
सुरेख गझल!
सुरेख गझल!
७ गुण...
साधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगायचं!
www.sadha-sopa.com
छान माझे ६
छान
माझे ६
नाव जाहिर
नाव जाहिर करायल सुरुवात झाली का??
आयटे.. अशी विमनस्क गझल का लिहिलियेस???
LOL अडम!! जशी
LOL अडम!! जशी सुचली तशी लिहिली!

तुझ्यापर्यंत - वाचकापर्यंत भाव पोहोचला ना, खूप झालं की!!
Pages