नाकानं कांदे सोलतोस किती? : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 3 July, 2010 - 10:14

नाकानं कांदे सोलतोस किती? : नागपुरी तडका

तुझा अभ्यास किती, तू बोलतोस किती
नाकानं कांदे सोलतोस किती?

तुझी नशा किती, तू डोलतोस किती
नाकानं डांगरं तोलतोस किती?

तुझा व्यायाम किती, तू पेलतोस किती
नाकावर भेद्रं झेलतोस किती?

तुझी मेहनत किती, तू राखतोस किती
नाकानं टेंभरं चाखतोस किती?

तुझे योगदान किती, तू लाटतोस किती
नाकानं गांजरं वाटतोस किती?

तुझी सत्ता किती, तू येलतोस किती
नाकानं आलू छिलतोस किती?

तुझी भूक किती, तू गिळतोस किती
अभयानं जनता पिळतोस किती?

गंगाधर मुटे
............................................
ढोबळमानाने शब्दार्थ-
डांगरं = खरबुज.
भेद्रं = टमाटर,टोमॅटो.
टेंभरं = टेंभुर्णीचे फ़ळ.
राखणे = रखवाली करणे या अर्थाने.
येलणे = वेल्हाळणे.
...........................................

गुलमोहर: 

प्रसाद गोडबोलेजी,

मी कविता लिहितांना नागपुरी भाषेचा लहजा आणि काही विशेष नागपुरी शब्द कवितेत वापरण्यासाठी तद्वतच काही चुकिच्या पायंड्यावर थोडेसे घाव घालण्यासाठी नागपुरी-तडका या नावाने कविता लिहीतो आहे.
पण या प्रकारात मी अंशतः नागपुरी भाषेचा लहजा आणि काही खास वैशिष्ठ्य असलेले शब्द वापरतो.
निर्भेळ नागपुरी भाषेचा वापर करीत नाही.

या कवितांना " नागपुरी तडका " असे नांव दिले आहे. Happy
.................................................

या प्रकारात मी आतापर्यंत खालील रचना केल्या आहेत.

१) नाकानं कांदे सोलतोस किती? : नागपुरी तडका
२) खाया उठली महागाई : नागपुरी तडका
३) कुठे बुडाला चरखा? : नागपुरी तडका
४) विदर्भाचा उन्हाळा : नागपुरी चटका
५) धकव रं श्यामराव - नागपुरी फ़टका
६) चापलूस चमचा : नागपुरी तडका
७) लकस-फ़कस : नागपुरी तडका
८) बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका
९) नागपुरी तडका : खरुज
......................................................

Pages