Submitted by admin on 9 July, 2008 - 21:50
घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.
नमस्कार कमल, हो पिकलेल्या
नमस्कार कमल,
हो पिकलेल्या टोमॅटोच्या बिया नक्किच रुजतील. रस्त्याचा कडेने असी रोपे अनेकदा उगवलेली दिसतात. पण जर बाजारातल्या प्रक्रिया केलेल्या बिया लावल्या तर रोपे जोमदार असतात.
पावसाळ्यात, जर वेल चढवण्यासाठी जागा असेल, तर काकडी, कारले वगैरे लावता येतील. मी वेलवांगे बद्दल माहिती दिली आहे, ते पण रुजेल.
पण प्रयोग करायचा असेल, तर आणलेल्या पालेभाजीच्या मूळासकट असलेल्या काड्या (माठ, अंबाडी वगैरे ) खोचल्या तर सहज रुजतात. मिरची, कोथिंबीर, कडीपत्ता, पुदिना लावता येईल. आले, हळद, लसूण पण पेरता येईल. या सगळ्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत थांबायची गरज नसते, हवे तसे खुडता येते.
मुंबईला, भायखळ्याला (पुर्वेला) स्टेशनसमोर दोन तीन दुकाने आहेत, त्यांच्याकडे उत्तम बियाणे मिळते.
आणि हो, टाईप करताना काही चूकले नाही, नियमित लिहित रहा, आम्ही सगळे इथे आहोतच.
धन्यवाद दिनेशदा ! मी नक्कीच
धन्यवाद दिनेशदा !
मी नक्कीच प्रयोग करणार आहे.
मला वर घरात लावता येणार्या
मला वर घरात लावता येणार्या झाडांची माहिती दिलेल्या सगळ्यांचे आभार.. आता पुण्यात जरा सेटल झाल्यानं बाग करण्याचा विचारनं पुन्हा उचल खाल्ली आहे.. माझ्याकडच्या एका कुंडीत मी भाज्या, फळांचे आपण खात नाही ते भाग मातीत कालवून (खताकरता) त्यात मी धने टाकले.. माझी अपेक्षा अर्थातच कोथिंबीर येईल अशी होती..
आता ५ दिवस झाले, पण धने अंकुरायची काही लक्षणं नाहीत. मी फार लवकर येण्याची अपेक्षा करतेय का माझं काही चुकलय?
धणे लावताना ते ओल्या टावेल
धणे लावताना ते ओल्या टावेल मधे गुंडाळून भरडून मग लावावेत- एका धण्याची दोन शकलं व्हायला हवीत. मेथीचे दाणे, मोहरीचे दाणे, करडई हे नुसतेच लावले तरी रुजतात.
ओह्ह्ह.. तरीच येत नाहिये
ओह्ह्ह.. तरीच येत नाहिये काही!
आता असे करून बघते.. सांगितल्याबद्दल धन्स ग!
मी दोन चार जणांना विचारलं (अग्रीकल्चर मधली डिग्री असलेले लोक वगैरे..) पण कुणीच सांगितलं नाही..
मायबोलीकर्स्की जय हो!
भेंड्याचे बी टाकले होते.
भेंड्याचे बी टाकले होते. त्याची ही उगवलेली रोपे

मी आता हा मेसेज ५व्यांदा करते
मी आता हा मेसेज ५व्यांदा करते आहे. कंटाळा आला. सारखे सारखे टाईप करुन. असो.
मी दुबईमध्ये राहाते. माझ्या घराला मोठी बाल्कनी आहे. मला तिथे कुंड्या ठेवायच्या आहेत. मी मनि प्लांट, लवेंडर, कडीपत्ता, भोपळी मिरची, etc. लावले आहेत. पण आमच्याकडे कबुतरांचा फारच त्रास आहे. त्यावर उपाय काय? मी सध्या सर्व झाडे घरातच काचेच्या दरवाजासमोरच ठेवली आहेत.
भोपळी मिर्ची कुंडीत लागते?
भोपळी मिर्ची कुंडीत लागते? व्यवस्थित मिरच्या येतात? मस्तच.
कुंड्यांवर काहीतरी टांगुन ठेवा कबुतरांना भिववायला.
कुंडीत लावलेल्या मिरचीच्या
कुंडीत लावलेल्या मिरचीच्या रोपाला चांगल्या मिरच्या लागतात पण त्या रोपची काळजी घ्यावी लागते. लगेच किड लागते, आणि इतर झाडांवर पसरते सुद्धा.
भोपळा मी सुद्ध कुंडीत लावला आहे, फुले सुद्धा हेतात पण फळ मात्र आजुन पर्यंत धारलेले नाही.
मानक कुंड्यांच्या वरती जाळे
मानक कुंड्यांच्या वरती जाळे मांडवाच्या पडद्यासारखे लावा.
भोपळा कसा होईल रे कुंडीत
भोपळा कसा होईल रे कुंडीत सचिन? त्याला फळ धरायला जमिनच पाहिजे ना? तर ते रोप जोर पकडेल फळ धरण्याजोगा.
साध्या मिरच्या लागतात हे नक्की पण भोपळी मिरची खरंच लागते का? की नुस्तं फूल येतं आणि गळून पडतं.
भोपळयाचा वेल खुप पसरतो
भोपळयाचा वेल खुप पसरतो गावाठिकाणी हा वेल घराच्या कौलावरच सोडतात.
जागू, मग भोपळे छतावर पसरलेले
जागू, मग भोपळे छतावर पसरलेले दिसतात? कसं दिसत असेल ना?
छानच दिसतात. भोपळ्याचा भार
छानच दिसतात.
भोपळ्याचा भार वेलीला पेलवत नाही म्हणुन घरावर किंवा जमिनीवर वेल सोडावी लागते.
पण ते भोपळी मिरचीबद्दल सांग
पण ते भोपळी मिरचीबद्दल सांग ना. कुंडीत लागत असेल तर कशी लावायची ते ही सांग.
अग कुंडीत लावुन तिला
अग कुंडीत लावुन तिला व्यवस्थित खत घालून किटकनाशकाचे औषध फवारावे लागेल.
ते मी करेन. माझ्या मैत्रिणी
ते मी करेन. माझ्या मैत्रिणी भरपूर गांडूळ खत करतात आणि ते करताना जमा झालेलं वर्मिवॉश डायल्युट करुन रोपावर फवारलं तर ते कीड पडू देत नाही.
पण आपण भाजीला आणतो त्या मिरच्या आणून त्यातल्या बिया कुंडीत रुजवायच्या का? त्याला भो.मि. येतील का?
अग त्या बिया कोवळ्या असतात.
अग त्या बिया कोवळ्या असतात. त्यासाठी लाल झालेली मिरची बघुन घे. आणि त्यातल्या बिया रुजव.
बरं. आता शोधते
बरं. आता शोधते भाजीवाल्यांकडे लाल झालेली मिरची. पावकिलो मिरच्या आल्यातरी मी जाम खुश होईन.
मग काय बनवशील ?
मग काय बनवशील ?
चिंच गूळ, गोडामसाला घालून रस
चिंच गूळ, गोडामसाला घालून रस भाजी
अश्विनी, गांडूळ खत घरी कसे
अश्विनी, गांडूळ खत घरी कसे बनवायचे?
माधव, माझ्याकडे एक छान राईटअप
माधव, माझ्याकडे एक छान राईटअप होतं त्यावरचं. कुठेतरी जपून ठेवल्याने मिळत नाहिये. पण मैत्रिणीकडून घेऊन इथे जरुर टाकणार आहे.
आरतीने लेख टाकला होता तिच्या
आरतीने लेख टाकला होता तिच्या रंगीबेरंगीवरती गांडूळ खत अन कॉम्पोस्ट वगैरे बद्दल. त्यात बरीच माहिती अन या गोष्टी शिकवणार्या लोकांचं कॉन्टॅक्ट इन्फो पण होतं.
http://www.maayboli.com/node/5886
मी सुपर मार्केट मधुन बियांचे
मी सुपर मार्केट मधुन बियांचे पाकिट आणुन लावले आहे. आत्ता छोटी झाडे आली आहेत. ह्या कीडीबद्दल माहीती नव्हती. आता काळजी घेईन.
मानक, कबुतरे नालायक असतात..
मानक, कबुतरे नालायक असतात.. त्यांचा त्रास कमी करायचा उपाय म्हणजे जाळी बसवुन घेणे...
पक्षांचा त्रास कमी
पक्षांचा त्रास कमी होण्यासाठी,
छोटे छोटे आरसे मिळतात ते दोर्याला चिकटवुन अडकवायचे जिथे पक्षी येतात तिथे. आमचे बरेच टोमॅटो गेले या पक्षांमुळ.
नानबा ,धन भरडुन तर घेच पण कोथिंबीर रुजायला माझ्या मते ५ पेक्षा जास्त दिवस लागतात.
आणि पोकळा वगैरे पालेभाज्यांच बी पण टाकुन बघ.
आमची कोथिंबीर आणि पालक रुजून
आमची कोथिंबीर आणि पालक रुजून आले. पालकाचे तर मस्त रान आलय. लोक सध्या कढीपत्त्याची रोपे मागून नेत आहेत.
मेथी, टोमॅटो आणी भेंडीची वाट बघतोय. नक्की येतील. दरवर्षी येतात.
अळू तर कायमच असतो.
मधे एकदा मुळासकट पालेभाज्या लावल्या होत्या. त्याही छान आल्या होत्या. आमच्याकडे पडवळ, भोपळा याचे वेल पण चांगले लागलेले आहेत. मिरीचा आणि खाऊच्या पानाचा वेल सांभाळायचे काम माडाकडे आहे.
किटकनाशकाचे औषध फवारावे
किटकनाशकाचे औषध फवारावे लागेल. >> कृपया हे करु नका. खुपच कीड झाली तर कोक एखाद्या स्प्रे बॉटलमधे घालून फवारता येईल. आम्ही तेच करतो.
>>खुपच कीड झाली तर कोक
>>खुपच कीड झाली तर कोक एखाद्या स्प्रे बॉटलमधे घालून फवारता येई>><<
कोक फवारायचे? मग मुंग्या आल्या तर?
Pages