कालवणाचे साहित्य :
१ ते २ वाटे बोंबील ( डोके व शेपटी कापुन, स्वच्छ करुन.)
लसूण - ८-१० पाकळ्या ठेचुन
हिंग, हळद
१ ते २ चमचे मसाला
चिंचेचा कोळ
चविपुरते मिठ
१ मिरची मोडून
थोडी कोथिंबीर
तेल.
तळण्यासाठी लागणारे साहित्य :
बोंबिल ५-६ साफ करुन
लसुण किंबा आल लसुण पेस्ट
हिंग, हळद,
२ चमचे मसाला
मिठ
तांदळाचे पिठ किंवा रवा
तेल.
कालवणाची कृती :
तेलावर लसणाची फोडणी द्यायची मग त्यावर हिंग, हळद, मसाला, चिंचेचा कोळ टाकुन बोंबील टाकायचे. गॅस बारिक ठेवायचा. गॅस मोठा केला की बोंबील तुटतात. मग उकळी आली की त्यात मिठ, मोडलेली मिरची आणि चिरलेली कोथिंबीर घालायची. व २ ते ३ मिनीटांत गॅस बंद करायचा.
त़ळ्ण्याची कृती :
बोंबलाला आल लसुण पेस्ट, हिंग, हळद, मसाला मिठ लावुन ठेवावे. मग रवा किंबा तांदळाच्या सुक्या पिठात हे घोळून मिडीयम गॅस वर तळावेत. जर आल लसूण पेस्ट नसेल तर तेल तव्यात टाकल्यावर लसूण टाकावा व मग तळावेत.
पावसाळ्यात भरपुर प्रमाणात आणि एकदम फ्रेश बोंबील येतात.
वरील कालवण फोडणी न देता करण्याचीही पद्धत आहे. म्हणजे सगळ एकत्र करायच त्यावरच तेल टाकायच आणि फक्त उकळवायच. हेही खुप छान लागत.
तळलेले बोंबील खुपच रुचकर लागतात. अगदी नुसते सुद्धा मटकावता येतात.
बोंबील घेताना छोटे, मिडीयम फोटॉत दाखवल्याप्रमाणे घ्यायचे. जाड्या बोंबलांना जास्त चव नसते.
काही जण पाट्याखाली ठेवतात बोंबील मग त्यातल सगळ पाणी निघुन गेल की ते तळतात. ह्या प्रकारचेही खुप खरपुस लागतात.
हे आहेत बोंबिल
हे आहेत बोंबिल
जागु कशाला जेवण्याच्या
जागु कशाला जेवण्याच्या टायमाला मासे - बोंबिल पाकक्रुती आणी फोटो दाखवतेस ? आनी ते पण आज सोमवार असताना
जागु, एवढे बोंबील कशाला आणलेत
जागु, एवढे बोंबील कशाला आणलेत ग ? त्यातले थोडे माझ्याक्डेही पाठवून दे
आमच्या जॉइंट फॅमिलीला लागतात
आमच्या जॉइंट फॅमिलीला लागतात ग एवढे. तुझ्याकडच्या प्रवाहाचा मार्ग सांग सोडते तिकडे.
मेल मधून पाठव मला
मेल मधून पाठव मला
वाव... गेल्याच आठवड्यात
वाव... गेल्याच आठवड्यात खाल्ले बोंबिल... तु लिहिलेली उधवणीची चिवनी मिळते का पाहायला गेले होते, शेवटी तारल्या आणि बोंबिल घेऊन परतले... दुधाची तहान ताकावर....
मी नेहमी वजनाखाली ठेऊन पाणी काढुनच तळते. तांदळाचे पिठ लाऊन मस्त होतात कुरकुरीत..
तु लिहिलेस तसे कालवण करेन आता.. चिंचेचा कोळ किती घ्यायचा? जास्त आंबट होत नाही ना?
(मला मालवणी पद्धतीचेच कालवण येते, ज्यात खोबरे जरा जास्त असते)
जागु लसुणा सोबत थोडि अख्खी
जागु लसुणा सोबत थोडि अख्खी मेथी (अगदि सहा सात दाणे) फोडणि ला घालावी , म्हन्जे बोबिल कोसळ्त नाहित
मी कधीच मासे नाही खाल्ले
मी कधीच मासे नाही खाल्ले कुठल्याच प्रकारचे. केरळमधे गेलो असताना एक डीश घेतली होती पण खाऊ नाही शकलो. पट्टीचा खाणारा असेल त्याच्यासोबतच मासे खावे असं म्हणतात.
दिप्या अरे तु मासे खायल
दिप्या अरे तु मासे खायल केरळ्ला गेलास?
दीप्स, मासे खाऊ का नाही
दीप्स, मासे खाऊ का नाही शकला??
अरे कोळणीकडुन मासे घ्यावेत, मग त्यांना चांगले साफ करुन मसाला वगैरे लाऊन मस्त तळावेत आणि आपण भजी कशी खातो तसे खावे.. आता यात काय कठीण आहे ते सांग
.
थंडे साधना, मासे ह्या
थंडे
साधना, मासे ह्या विषयाबद्दल घोर अज्ञान आहे. अन पहिल्याच घासाला वास आला वेगळाच म्हणून नाही खाऊ शकलो. आता गेले ४-५ वर्षे नॉनव्हेज खातच नाही म्हणून कधी ट्राय पण नाही केले नंतर.
एका मैत्रीणीची आजी म्हणते मासे व्हेज आहेत, पाणबिया असतात म्हणून.
माझ्याकडे ये नाहीतर जागुकडे
माझ्याकडे ये नाहीतर जागुकडे जा मासे खायला. मलाही बाहेर मासे खायला आवडत नाही कारण ते नीट साफ केलेले नसतात. तुला त्यामुळॅच वास आला असावा..
तसे मीही नॉन्-वेज कधीमधीच खाते, पण मासे फेवरीट आहेत माझे..
साधना धन्यवाद एकदा खायचेच
साधना धन्यवाद एकदा खायचेच आहेत, इच्छा राहून जायला नको
दिप्या शक्यतो मासे बाहे खावे
दिप्या शक्यतो मासे बाहे खावे च नाहित, आणि त्या आजि प्रमाणे माझ्या ह्यांचा मित्र हि माशे म्हण्जे समुद्रातलि वनस्पति म्हन्तो
म्हन्जे बोबिल कोसळ्त नाहित
म्हन्जे बोबिल कोसळ्त नाहित >>>> ऑ ! बोंबिल कोसळतात? एरव्ही उभे रहातात?
ऑ ! बोंबिल कोसळतात? एरव्ही
ऑ ! बोंबिल कोसळतात? एरव्ही उभे रहातात?
उभे राहणे शक्यच नाही.. अश्वे तु एकदा बोंबिल हातात घेऊन बघ, त्या बिचा-याला पाठीचा कणा नावाचा प्रकारच नाहीये..
तसे तु मासे खात नसलिस तरी बोंबील हातात घ्यायला काहीच हरकत नाही, कुत्र्या मांजराना प्रेमाने जवळ घेतेस तसे घ्यायचे माशांनाही प्रेमाने जवळ..
:तीन ताड पळून जाणारी
:तीन ताड पळून जाणारी बाहुली:
मी कुत्र्या मांजरांपासूनही ४ हात दूरच रहाते गं.
थंड आता मेथी घालुन
थंड आता मेथी घालुन बघेन.
दिप्स एकदा मासे खाउन बघ. खाल्लेस की परत परत मागशील.
साधना लिंबाएवढाच चिंचेचा कोळ घालायचा. पाणी जास्त घालू नको. बोंबलाला असच पाणि सुटत.
हिरव कालवण करतात त्यात घालतात खोबर. ते फक्त मिरचीवर असत.
अश्विनी अग बोंबील कोसळतात म्हणजे निखळतात. म्हणजे त्याचे मांस सुटत जाते कालवणात.
ओह ! म्हणजे गुलाबजाम पाकात
ओह ! म्हणजे गुलाबजाम पाकात विरघळतात तसंच.
आता कस अश्विनी. अगदी
आता कस अश्विनी. अगदी बरोब्बर.
जागू, रेसिपी वाचुनच तोंडाला
जागू, रेसिपी वाचुनच तोंडाला पाणी सुटले.
य्म्म्म्म्मी... मुंबईला
य्म्म्म्म्मी... मुंबईला आल्यावर रोजरोज ओन्ली बोंबिल.. सायबा,गजाली,हाय वे गोमांतक इ.इ.इ. मध्ये
ओले बोंबिल,आमचा वीक पॉइंट.
ओले बोंबिल,आमचा वीक पॉइंट. इथे उसगावात नाही मिळत
जागू, तळलेल्या बोंबिलचा फोटो टाक की, तेवढेच आम्हाला बघितल्याचं तरी समाधान.
फोटो आणि प्रतिक्रिया बघवत
फोटो आणि प्रतिक्रिया बघवत नाही.. वाचवत नाही..
फोटो आणि प्रतिक्रिया बघवत
फोटो आणि प्रतिक्रिया बघवत नाही.. वाचवत नाही..
च्च्च्.... या आता भारतवारीवर....
गर्गि, वर्षू धन्स. दिपान्त
गर्गि, वर्षू धन्स.
दिपान्त आता परत आणले की टाकते फोटो.
बी तु ब्राम्हण आहेस की खायसाठी आतुर आहेस ?
बी तु ब्राम्हण आहेस की
बी तु ब्राम्हण आहेस की खायसाठी आतुर आहेस ?
कायच्या काय.. ब्राम्हण असता तर फक्त फोटुच बघवले नसते....
ब्राम्हण असता तर फक्त फोटुच
ब्राम्हण असता तर फक्त फोटुच बघवले नसते.... >>>
माझ्या मुलाचा पक्का (गैर) समज होता ब्राम्हण नॉनवेज खात नाहीत आसा
मासे नॉनवेज नाहीत असा
मासे नॉनवेज नाहीत असा निर्वाळा दिलाय ना वर कोणीतरी.. पाण्यातली भाजी ती, त्यात काय असायचे नॉनवेज..
मेजवानीमध्ये लालन सारंग मधुन्मधुन्येते. तिने मिक्सरमधुन तांदळाचे ताजे रवाळ पिठ करुन ते बोंबिलांना लावुन तळले तर अजुन कुरकुरीत होतात अशी मौलिक माहिती दिली होती. माझ्या आईने लगेच ते कृतीत आणुन, तिचे म्हणणे खरे आहे असा निर्वाळा मला दिला. आता पुढच्या वेळी बोंबिल घेतले की मी तसेच करुन पाहणार आहे.
मुंबईला आल्यावर रोजरोज ओन्ली बोंबिल.. सायबा,गजाली,हाय वे गोमांतक इ.इ.इ. मध्ये
मी गजालीत खाल्लेले एकदा आणि i hated it... घरच्या बोंबिलांची सर नाही आली त्यांना....
साधने, तू अगदी कट्टर
साधने, तू अगदी कट्टर मांसाहारी दिसतेस.. मी अगदी तुझ्या विरुद्ध
Pages