Submitted by kaaryashaaLaa on 1 October, 2008 - 00:06
का बंध रेशमाचे जुळले कधीच नाही
चित्रात रंग माझ्या भरले कधीच नाही
त्या सावळ्याच होत्या रात्री फिरून माझ्या
देहात चांदणे मग फुलले कधीच नाही
बरसात ही सुरांची तव मैफ़लीत होते
मज त्या सरींत भिजणे जमले कधीच नाही
डोळ्यात जागलेल्या रात्री कितीक माझ्या
स्वप्नात भेटणे तुज सुचले कधीच नाही
जखमा दिल्या जगाने, बुजल्या तशाच सार्या
का घाव तू दिलेले भरले कधीच नाही
जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते
का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेवटचे दोन
शेवटचे दोन शेर खूप आवडले! मस्त!
व्वा!!! खुप
व्वा!!! खुप आवडली गझल...शेवटचे दोन्ही शेर अप्रतिम!!!!!!!!
७ गुण
डोळ्यात
डोळ्यात जागलेल्या रात्री कितीक माझ्या
स्वप्नात भेटणे तुज सुचले कधीच नाही
सुंदर..!
७ गुण
================मी वैशाखातला दर्द, तू श्रावण हिरवागर्द..!
छान आहे ५
छान आहे
५ गुण
वा! मस्त
वा! मस्त जमली आहे.
६ गुण
-----------------------------------------------
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!
मस्त जमली
मस्त जमली आहे ही गझल...
मला मतल्यात एकवचन अनेकवचनाची गडबड वाटली..
पण तरी सुद्धा माझ्याकडून
८ गुण
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....
छान! ६ गुण
छान!
६ गुण
सुंदर! माझे
सुंदर!
माझे ७ गुण.
छान गझल!
छान गझल! स्वप्न शेर विशेष आवडला.
रंग, घाव - नाहीत हवे होते.
माझे गुण - ६.
आवडली
आवडली मलाही.
गुण - ७
वा, छान
वा, छान जमली आहे! अभिनंदन!!
३ गुण
------------------------------------------------------------
अव्यक्ताचे धुके दाटता.....व्यक्त साठते दवबिंदूसम !
वा मस्त
वा मस्त झाली आहे एकदम... कोणतरी experienced गझलकार दिसतोय्/दिसतेय..
७ गूण..
वाह! छानच
वाह! छानच जमली आहे.
(गुण देणे वगैरे मला रुचत नाही .... (शाळेतली मास्तरकी काय कमी झाली म्हणून सगळीकडे गुण वाटप करत हिंडायचं?) )
परागकण
सहिये गझल
सहिये गझल एकदम
आवडली...सगळीच
बरसात आणि
बरसात आणि शेवटचा शेर मस्त एकदम
एकूण गुण -- ६
बहोत खूब!
बहोत खूब! छान उतरली आहे!
आवडेश !!!
आवडेश !!! काय सुरेख उतरली आहे गझल ही !!
वाह!! जी खूश हो गया !
क्लास.. अति
क्लास..
अतिशय सुरेख गझल...
सगळेच शेर अप्रतिम..
गुण - ७
प्राजु
१० पैकी १०
१० पैकी १० गुण (गुण देणे हे मला काय, इथे कदाचित इतर कुणालाही जमत नसेल. पण कार्यशाळेनी गुण देणे आपल्यावर सोपविले आहे तेंव्हा जमेल त्याप्रमाणे गुण देणे हे केंव्हाही गुण न देण्यापेक्षा चांगले आहे.)
सुरेख..
सुरेख.. एकदम लयबध्द झालीये ही गझल.... खूपच आवडली.
गझल मनाला
गझल मनाला भिडली...
१० पैकी १० गुण...
वा छान
वा छान जमलीये गझल! ७ गुण
सहजता आणि
सहजता आणि आशय दोन्हीही जमलेत. गुण ७
शब्द सहज
शब्द सहज आलेत पण कल्पना नवीन नाही वाटल्या.
स्वप्नात भेटणे तुज सुचले कधीच नाही - आवडले.
६ गुण.
सही
सही उतरलीये. फ्लो मस्तच आहे. चांदणे, स्वप्नं, घाव आवडले.
माझे ७.
-----------------------------------------------------
वह सुबह का अहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ खुर्शीद सर्-ए-बाम तो आया
पुलस्तिशी
पुलस्तिशी सहमत...
मतला ""चित्रात कोणी रंग भरले नाहीत?" असा काहीसा अधांतरी राहतोय... (चुभूदेघे)..
पण तरीही सुंदर, सहज 'जमून आलेली ' आहे..
माझे गुण -६
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||
सहज.
सहज. प्रेममय. ६ गुण.
'बरसात,
'बरसात, जागलेल्या रात्री' हे शेर आवडले.
माझ्या मते ६ गु़ण.
-सतीश
चांगला
चांगला प्रयत्न.
माझे ४.
जग जिंकले
जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते
का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही
...
हे जर प्रेम असेल तर त्यात जिंकणं नसतं तर हरणंच असतं असं मला वाटतं. मला काही कल्पना नवीन वाटल्या नाहीत. सॉरी हं. ३ गुण.
Pages