कल्लेवाल्या माशाला फुटल्या मिश्या दोन

Submitted by एम.कर्णिक on 23 June, 2010 - 13:45

बनुताई आता मोठ्या झाल्यात. बंटीबाबाला कडेवर घेऊन एंजल मासे असलेल्या फिश टँकसमोर हे गाणं म्हणून त्याला रिझवतात. प्रत्येक कडव्यानंतर "है" म्हणत पहिलं कडवं रिपीट करताना बंटीबाबाला हळूच एक झोका देतात तेव्हाचं बंटीबाबाचं खिदळणंही ऐकण्यासारखं असतं.

कल्लेवाल्या माशाला फुटल्या मिश्या दोन
मनीमाउनं केला त्याला ट्रिंग ट्रिंग फोन
है........

"अरे फिशी फिशी, तुला आली कशी मिशी?
टोचेल न रे मला, मग खाऊ तुला कशी?"
है........

मासा हसला गडगडून म्हटला "द्दे ट्टाळी,
मनीमाऊ, खा आता फुटासची गोळी"
है.......

पाण्यात बुडवुन पंजा बसली मनीमाऊ टपून
चान्स बघता बघता गेली तिथच तशीच झोपून
है.......
कल्लेवाल्या माशाला फुटल्या मिश्या दोन
मनीमाउनं केला त्याला ट्रिंग ट्रिंग फोन

गुलमोहर: 

"है" एकदम मस्त! हाहा चालीत म्हणून पाहिली.. >> मी पण मनातल्या मनात Happy नाहितर ऑफिस मधले वेडे होतील Wink
मस्त आहे.

है....फिशीची मिशी वाचतानाच फार मस्त वाटतंय....... बनूताई आणि बंटीबाबापण बर्‍याच दिवसांनी भेटल्यामुळे बरं वाटलं.... छान चालीत म्हणता येते आहे कविता....है तर लै मस्त! Happy

बनूताई आणि बंटीबाबा बर्‍याच दिवसांनी भेटल्यामुळे खुप बर वाटलं.:स्मित: मी पण चालीत मोठ्याने म्हणून पाहिली.. खुपच छान Happy

सहीच आहे कविता. नवर्‍याच्या मित्राला दोघी जुळ्या मुली आहेत, त्याही एक फिश व दोन फिश्या म्हणतात त्याचीच आठवण झाली.

सर्वाना धन्यवाद.
हल्ली पूर्वीसारखे सातत्याने लिहिणे होत नाही. तरी पण मधूनमधून मायबोलीवर उपस्थिती देत रहातो. तुमचा लोभ असाच कायम रहावा ही प्रार्थना.
-मुकुंद कर्णिक