Submitted by निंबुडा on 21 June, 2010 - 06:41
लाल नाक
शिंकांना उधाण
रुमालाची अपरिहार्यता
आणि डोकेदुखी महान
घशात "ख"
डोळ्यांची जळजळ
कानात दडे
आणि नाकात हुळहुळ
आवाजाचा बोर्या
गरम पाण्याच्या गुळण्या
चहा आणि काढ्याच्या
घशाला डागण्या
छातीत कफ
आणि नाक बंद
नाकात बोलण्याचा
जडला हा छंद
खोकल्याची उबळ
गार पाण्याला मज्जाव
अॅलोपथी-आयुर्वेद
दोघांकडे धाव
हळद घालून दूध
व्हिक्स, वाफारा आणि काय काय
डोके जड झालेय
आता तुम्हीच सांगा उपाय
गुलमोहर:
शेअर करा
तुला खर्रच सर्दी आहे? मला
तुला खर्रच सर्दी आहे? मला वाटलं की काव्यातिसार सारखे काव्यपडसे झालेय की काय?
बघ हं कोबी किसून उकळत्या पाण्यात टाकायचा आणि तो वासखोलवर हुंगायचा(म्हण्जे वाफ घ्यायची गं)
आणि डोक्यावर पांघरुण घेऊन झोपी जावे, त्यामुळे दोन फायदे होतात एक तर सर्दी जाते आणि कोबीच्या वासाने घरातले आप्पापली नाके बंद करुन घेतात आणि त्यांना संसर्ग होण्याची शक्यता कमी होते!
(No subject)
आशु... : खोखो :
आशु... : खोखो :
अंजली तुझा उपाय जबहरा
अंजली तुझा उपाय जबहरा
मला वाटलं की काव्यातिसार
मला वाटलं की काव्यातिसार सारखे काव्यपडसे झालेय की काय?<<<<<<:हहगलो:
आले, लसुण, लवन्ग आणि चिन्चेला
आले, लसुण, लवन्ग आणि चिन्चेला धरुन ठेचा
रुमालात घ्या गाळुन आणि थेम्ब थेम्ब वेचा....
वाफारा घ्या त्याचा, मोकळा करा श्वास,
विश्वास ठेवा आयुर्वेदावर, पडेल आराम खास....!
(वरील उपाययोजना खरी मानुन कोणी केल्यास व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही......)
लाजो अग हा उपाय खराच आहे बरं
लाजो अग हा उपाय खराच आहे बरं सर्दीवर्चा! फक्त वासाने सर्दी बरी वास आवर म्हणायची पाळी येते पण नाक जरा मोकळं होतं!
भ्रमर क्या बात है
भ्रमर क्या बात है
निंबुडा
निंबुडा
शिंबुडा ओह... निंबुडा
शिंबुडा

ओह... निंबुडा बोलायचं होतं मला!!!
शिम्बुडा शिम्बुडा
शिम्बुडा शिम्बुडा शिम्बुडा...
अरे पिला पिला गिला गिला... शिम्बुडा लाई दो......!
सर्दीवर ऊपाय नाही
सर्दीवर ऊपाय नाही .....
Allergic असेल तर Benadryl घ्या. अजुन कवीता सुचतील
आल्याचा चाहा
हळदीचे दुध
कंठसुधारक वटी
आराम
छान आहे
छान आहे
उपाय @ निंबुडा चिकन
उपाय @ निंबुडा
चिकन सुप..
ब्रँडीची बाटली...
एकच ग्लास..
फुल्टू भरलेला ...
बॉटम्स अप..
एकाच दमात ...
सर्दीचा टाटा ..
पक्का ठरलेला ...
नींबुडा एक कर (जमल्यास)...
नींबुडा एक कर (जमल्यास)... गवती चहा + आलं + पारीजातकाच्या झाडाचं एक पान ह्याचा काढा दीवसातुन २ वेळा गरम - गरम पी.
नीलगीरी तेलाचे २-३ थेंब एका चमच्यात साखर घेऊन त्याच्यावर टाकायचे आणि लगेच ती साखर खायची. लगेच फरक पड्तो.
विशल्या
विशल्या
एक जालीम उपाय आहे.....
एक जालीम उपाय आहे.....
गोटॉलने गुळण्याकरा....:खोखो:
निंबूडा, सर्दीवर सगळ्यात
निंबूडा,

सर्दीवर सगळ्यात जालीम उपाय ...
पावसात मनसोक्त भिजा ,तो नसेल तर नदी/विहीरीमध्ये तासभर पोहुन या ...
(काट्यानेच काटा काढायचा असतो ना ... )
सर्व पोस्टांमधे दिलेले सर्व
सर्व पोस्टांमधे दिलेले सर्व उपाय एकदम करुन पहा काय होते ते
"राम" "बाण" ऊपाय रामा कडे
"राम" "बाण" ऊपाय
रामा कडे जाऊन त्याला सांग की तु शुर्पनखा आहेस
मग राम तुझे नाक कापेल
ना रहेगा नाक ना रहेगी सर्दी
ऊपायाची उपयुक्तता शुर्पनखेला विचारावी... तिला नक्कीच अनुभव असेल
संपर्का साठी क्रुपया डायल
संपर्का साठी क्रुपया डायल नंबरच्या आधी ००० डायल करा..........
रामा कडे जाऊन त्याला सांग की
रामा कडे जाऊन त्याला सांग की तु शुर्पनखा आहेस
मग राम तुझे नाक कापेल>>>>>
म्हणजे कुणाकडे जायचे विक्रमकडे कि अभिषेककडे? कारण इथे सीताच रावणाच्या प्रेमात पडलेली दाखवलीय..
मग नक्की राम कुठला मानायचा...?
हरे राम...त्राहि माम !
व्हर्जीनल रामाकडे जा
व्हर्जीनल रामाकडे जा
नीलगीरीचा ऊपाय कर नक्की बरं
नीलगीरीचा ऊपाय कर नक्की बरं वाटेल.
हे आणि ते पोटदुखीवाले,दोन्ही
हे आणि ते पोटदुखीवाले,दोन्ही गाणी रॅपस्टाईलमधे गाउन पाहिली
सरळ गरम पाण्यात वि़क्स घाल
सरळ गरम पाण्यात वि़क्स घाल आणि वाफारा घे !!
माझी पण आज हीच स्थिती आहे, आज
माझी पण आज हीच स्थिती आहे, आज घरून काम (?)!
जुने दर्दभरे दिवस पुन्हा
जुने दर्दभरे दिवस पुन्हा आठवायचे दिवस परत आले

आक्क् छ्छी !!!
:रुमालाने नाक पुसणारी बाहुली:
Pages