Submitted by निंबुडा on 21 June, 2010 - 06:41
लाल नाक
शिंकांना उधाण
रुमालाची अपरिहार्यता
आणि डोकेदुखी महान
घशात "ख"
डोळ्यांची जळजळ
कानात दडे
आणि नाकात हुळहुळ
आवाजाचा बोर्या
गरम पाण्याच्या गुळण्या
चहा आणि काढ्याच्या
घशाला डागण्या
छातीत कफ
आणि नाक बंद
नाकात बोलण्याचा
जडला हा छंद
खोकल्याची उबळ
गार पाण्याला मज्जाव
अॅलोपथी-आयुर्वेद
दोघांकडे धाव
हळद घालून दूध
व्हिक्स, वाफारा आणि काय काय
डोके जड झालेय
आता तुम्हीच सांगा उपाय
गुलमोहर:
शेअर करा
चहा आणि काढ्याच्या घशाला
चहा आणि काढ्याच्या
घशाला डागण्या
काकाक लिहून इतरांचं डोकं जड
काकाक लिहून इतरांचं डोकं जड करणे म्हणजे तुझ्या डोक्यातला जडपणा वाचणार्याच्या डोक्यात जाईल हाच उपाय
(No subject)
काकाक? आल्ल घालून च्या घे बरे
काकाक? आल्ल घालून च्या घे बरे वाटेल!
निंबुडा नाव बदल. वर्षभर असं
निंबुडा नाव बदल. वर्षभर असं आंबट खाल्लं की सर्दी नाहीतर काय होणार?
हल्के घ्या लिंबादेवी. 
वर्षभर असं आंबट खाल्लं की
वर्षभर असं आंबट खाल्लं की सर्दी नाहीतर काय होणार >> आंबट खाल्ल तर खोकला होतो सर्दी नाही
नाकात बोलण्याचा
जडला हा छंद
भन्नाट हं सगळं.
भन्नाट हं सगळं.
निंबूडे .. कैच्याकै मधे तू
निंबूडे .. कैच्याकै मधे तू ग्रेट आहेस.. सर्दीवर सुद्धा कविता.. प्रतिभावंतीण आहेस.
नीट उपाय सांगा.......... के
नीट उपाय सांगा..........
के अंजली, थोड्या वेळापूर्वीच घेऊन आले गं. अजून आराम नाही
नाक ओढून ओढून दमलं बिचारं.......
आय्ला. मला वाटलं गम्मत. कचिता
आय्ला. मला वाटलं गम्मत. कचिता भारी सुचली हो पण.
अरे रंपा चे उपाय नाही
अरे रंपा चे उपाय नाही सांगितले का तुला कोणी अजुन पर्यंत
हाफिस मधे शिंका शेजार्याना
हाफिस मधे शिंका
शेजार्याना शन्का
स्वाइन फ्लुचा धोका
घरि जाउन झोपा.!
(No subject)
अरे मलाही वाटलं गम्मत
अरे मलाही वाटलं गम्मत
रंपा चे उपाय ??? ते काय असतं
रंपा चे उपाय ???
ते काय असतं ??
निंबुडे रंपा= रंगीत पाणी =
निंबुडे रंपा= रंगीत पाणी = अपेय पान = दिवाणे खास
रंपा= रंगीत पाणी >>> असांय
रंपा= रंगीत पाणी >>>
असांय होय........ नको. तो उपाय नक्को......... मोदकला "रब्बा मेरे मैनु बचा........" असं गाणं म्हणत माझ्या मागे फिरावं लागेल
निंबुडे, हळदीची फक्की घे...
निंबुडे, हळदीची फक्की घे... हळद घालुन दुध नको!
तुळस - दालचिनी - लवंग - मिरी
तुळस - दालचिनी - लवंग - मिरी - बेलाची पाने - धणे - आले पाण्यात घालून उकळले की जे रंगीत पाणि तयार होते ते प्यायचे आणि जाड जुड पांघरूण घेऊन झोपी जायचे. हा उपाय मला सुचवायचा होता
रच्याकने - ते कोणितरी सांगितलेले रंपा किती उपेगाचे आहे ते मात्र मला माहीत माही
सचिन मी फक्त फुल्लफॉर्म
सचिन मी फक्त फुल्लफॉर्म सांगितला, तो रंपाचा उपाय ऋयामने सुचवलाय
तुला खरंच काढा हवाय का?
तुला खरंच काढा हवाय का? "तुळस, जेष्ठ्मध, लवंग, खडीसाखर, सुंठ पावडर, बडी शोप हे सगळ पाण्यात घलुन उकळ. " १ कपाचं पाव कपा पेक्षा कमी होई पर्यंत उकळ. आणि पी.
बाकी कवीता झकास.
तुळस, जेष्ठ्मध, लवंग,
तुळस, जेष्ठ्मध, लवंग, खडीसाखर, सुंठ पावडर, बडी शोप >>> झकास........ हे सगळं नक्की असेल घरात.
एक दिवस सर्दीचा एक दिवस
एक दिवस सर्दीचा
एक दिवस तापाचा
एक दिवस खोकल्याचा
एक दिवस उलट्यांचा
एक दिवस पाठदुखीचा
एक दिवस पोटदुखीचा
.
.
.
पुढील कवितांच्या प्रतिक्षेत
शालिवाहन हे घ्या
शालिवाहन हे घ्या
http://www.maayboli.com/node/17186
निंबुदा, वाह! क्या सर्दी आहे
निंबुदा,
वाह! क्या सर्दी आहे !
पण १ नाही ३ दिवस् असते ती !
पण १ नाही ३ दिवस् असते ती
पण १ नाही ३ दिवस् असते ती !<<
म्हणजे उद्याचा दिवास तुफान सर्दिचा का ??
अरे काय हे, सर्दीवरही
अरे काय हे, सर्दीवरही काव्य?
नक्किच १००री गाठणार निंबुड्काव्य!!
ओ क्विटाताई <सचिन मी फक्त
ओ क्विटाताई
<सचिन मी फक्त फुल्लफॉर्म सांगितला, तो रंपाचा उपाय ऋयामने सुचवलाय फिदीफिदी>
मी कवा म्हनलो वो रंपा म्हनुन? बघाबघा.. मलातर माहितही नाही. रंपा म्हणजे काय रे सचिन्भाऊ??
निंबे,आता ३ दिवस नावातल्या
निंबे,आता ३ दिवस नावातल्या 'न' च्या जागी 'श' जास्त शोभेल
एलोएल आशुतोष
एलोएल आशुतोष
Pages