१० अंबाडीच्या जुडीतल्या काड्या (इथे भारी मोठा गठ्ठा मिळतो इं ग्रो मधे) चिरल्यावर साधारण २ वाट्या
१/२ वाटी तांदुळ,
५,६ लसूण पाकळ्या,
३,४ लाल मिरच्या
अंबाडीची भाजी मला अतिशय आवडते. आणि मीच त्याची झटपट होइल अशी माझ्यासाठीची पाकृ तयार केलीये.
अंबाडीची पाने खुडुन घ्यावीत. व्यवस्थित धुवुन बारिक चिरावीत.
१ वाटी तांदुळ घेउन ते धुवावेत त्यात २.५ वाट्या पाणी टाकुन वर चिरलेली आंबाडी टाकावी (हा माझा शॉर्ट्कट )
भांडं कुकरला लावावं. भाताबरोबरच अंबाडी मस्त शिजते.
कुकर झाल्यावर भात व अंबाडी नीट घोटुन घ्यावी. लसूण ठेचुन घ्यावा.
कढईत मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करुन लसूण टाकवा. लसूण थोडा लाल झाला की मिरच्या टाकाव्यात, थोडं तिखट टाकावं. घोटलेल भात, अंबाडीचं मिश्रण टाकावं. चवीनुसार मीठ टाकुन चांगलं परतुन एक वाफ द्यावी.
भाजी भाकरी किंवा पोळीबरोबर चापावी. माझी लेक तर नुसतीच खाते.
(खालिल फोटोतल्या भाजीत मी तिखट घातलं नाहीये.)
१. नॉर्मली भाताबरोबर अंबाडी शिजवत नाहीत. निराळी शिजवुन पण भात मिक्स करु शकता.
२. फोडणी कमी वाटली तर अजुन लसणी घालुन वर फोडणी ओतावी.
३. दुसर्यादिवशी पुन्हा खाणार असाल तर फोडणी अतिआवश्यक
४. भाजी पानात वाढुन मधे खळगा करुन त्यात कच्च तेल ओतावं. स्वर्ग गाठला जातो.
अमृता आंबाडीची भाजी आमच्याकडे
अमृता आंबाडीची भाजी आमच्याकडे येते विकायला पण मी कधी केली नाही आता तुझ्या रेसिपीने करेन.
अमृता, मी पण गूळ घालून
अमृता, मी पण गूळ घालून अंबाडीची भाजी करूच शकत नाही. पण तुरीची डाळ शिजवून घोटून घालते आणि तांदूळाच्या कण्याही.. त्यामुळे वरण भातात घातलेली पालेभाजी असं आईला आम्ही चिडवायचो. पण ती लसूण सुक्या मिरच्यांच्या फोडणीची लज्जत आणि खुमारी भाजी करायला लागल्यावरच कळली.
मस्त हिरवी पिवळी भाजी दिसते. आणि कच्चं तेल घालून स्वर्ग वगैरे डिट्टो
अम्रुता, ही भाजी खासच लागते,
अम्रुता,
ही भाजी खासच लागते, पण त्यात शेंगदाणे आणि डाळ असल्याशिवाय खरी चव नाही येणार ...
ही भाजी खाण्यामागे काहीतरी शास्त्रीय कारण आहे का किंवा यामुळे नेमका काय फायदा होतो ?
हे कुणीतरी सांगा ...
ह्म्म, मलाही आवडते अंबाडी पण
ह्म्म, मलाही आवडते अंबाडी पण अमृताची (भाताची) रेसिपी नव्हती माहित
पण ही भाजी गरम, ताजीच छान लागते, डब्यात नेलेली गारढोण झालेली भाजी नाही लागत चांगली
सही.
सही.
हो ग अगो...अंबाडी म्हणजे
हो ग अगो...अंबाडी म्हणजे घोंगुरा लीव्हज च.. ईथे आंध्रात याचे लोणचे मस्त करतात...
अगो, खाके देखो. म्हणुनच मला
अगो, खाके देखो. म्हणुनच मला भात जास्त लागत असावा.
जागू, तु नाही केलीस अजुन? आता घे पुढच्या वेळी.
मंजूडी, अगदी अगदी आधी मीही आईला असच चिडवायचे.. भाताबरोबर पोळी नाही खाणार म्हणुन. करु लागल्यावर खरी गंमत कळली.
अनिल, मी हेच उलट बोलते. लसूण, तेल, लाल मिरच्या, तांदूळ शिवाय खरी चव नाही
पूनम, बघच मग करुन आता. झकास लागते.
माझी आवडती भाजी. आईपण
माझी आवडती भाजी. आईपण तांदूळकण्या घालुनच बनवते. मला नीट पाकृ. माहिती नाही. पण अशीच असेल.
लसूण, तेल, लाल मिरच्या, तांदूळ शिवाय खरी चव नाही>>> अगदी अगदी.
बघते इकडे मिळाली तर...
अहाहा... काय काय पण बाफ काढता
अहाहा... काय काय पण बाफ काढता राव तुम्ही... आधी शेपू झाला आता अंबाडी... वा वा...
माझी अत्यंत आवडती भाजी..
अर्थात त्यात डाळ, दाणे आणि तळलेली सांडगी मिरची हवीच...
अंबाडी, तांदूळाच्या कण्या, डाळ, दाणे एकत्र करुन कुकर मध्ये शिजवून घ्यायचं. मग त्यातलं पाणी काढून टाकायचं.. नाहीतर हे मिश्रण अॅसिड सारखं आंबट लागतं... नंतर नेहमीसारखी फोडणी करायची.. योग्य प्रमाणात गूळ घालायचा... सांडगी मिरची तळून घ्यायची आणि त्याच तेलात लसूण मस्त करपूस करुन घ्यायचा.. आणि मिरची आणि लसणाची एकत्र वरून फोडणी द्यायची... आणि भाकरी बरोबर मस्त हाणायची...
वा वा! मस्त नव्या नव्या पाकृ
वा वा! मस्त नव्या नव्या पाकृ मिळतायत.
देशावर ही भाजी ज्वारीच्या
देशावर ही भाजी ज्वारीच्या कण्या घालून पण करतात ( Just FYI )
मिनोती, हो मीपण ज्वारीच्या(च)
मिनोती, हो मीपण ज्वारीच्या(च) कण्या घालून केलेली खाल्ली आहे. पण अंबाडीपेक्षा चुक्याची डाळ घालून, भरपूर लसणाची फोडणी दिलेली मला जास्त आवडते. बरोबर ज्वारीची भाकरी आणि दाण्याची चटणी, घरचं घट्ट दही
http://vadanikavalgheta.blogs
http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/09/maharashtrian-style-gongura...
ही पण रेसिपी छान आहे.
Pages