लहान मुलांची सुरक्षितता

Submitted by तृप्ती आवटी on 15 June, 2010 - 10:51

काल प्रविणपा ह्यांनी बे एरिया बाफवर टाकलेल्या खालील पोस्टवरुन हा बाफ काढावा असे वाटले:
"काल एक वाईट्ट अपघात घडताना पाहिला. एका SUV चे टायर फुटून ती फास्ट लेन मधून ३-४ कोलांट्या उड्या खात स्लो लेन मध्ये येऊन पडली. गाडीतल्या सर्वांना फार लागलं पण त्यांची ९-१० महिन्यांची मुलगी मात्र साधा एक ओरखडा सुदधा न येता बचावली. तिला तिच्या पालकांनी कार सिट मध्ये व्यवस्थित बांधून ठेवलं होतं. मी स्लो लेन मध्ये मर्ज करत होतो. साधारण ५-१० सेकंद जर का माझी मोटर सायकल तिथे अगोदर पोचली असती तर बहुतेक हा मेसेज मी लिहू शकलो नसतो. सर्वांना एकच विनंती आहे की सिट बेल्ट, कार सिट वगैरे safety measures वर compromise करू नका. एका सेकंदात होत्याचं नव्ह्तं होऊ शकतं"

आपल्या मुलांची आपण काळजी घेतोच. पण कधी मुलांच्या तर कधी भारतातुन आलेल्या नातेवाईकांच्या हट्टामुळे मुलांना कार सीटमध्ये न बसवण्यासारखी चूक करु शकतो. इतरांनी केलेल्या आग्रही मतप्रदर्शनामुळे कदाचित असे होणार नाही. सीट बेल्ट व्यतिरिक्त अजून काही सुरक्षेचे उपाय (उदा: किचन गेट) तुम्ही अमलात आणत असाल तर इथे लिहा.

** डाळीच्या पीठाने पोटदुखीचा त्रास होतो ह्यासारखे सल्ले कृपया लहान मुलांचे आरोग्य ह्या धाग्यावर लिहा. इथे लहान मुलांच्या जीवाची सुरक्षा ह्या अनुषंगाने काही लिहिणे अपेक्षित आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या घरात किचन गेट लावण्यासारखी जागा नाहीये. त्यामुळे स्वयंपाक करताना ईशान सहज तिथे येतो. तो उभा रहायला लागल्यापासून मी शक्यतो मागच्या दोन शेगड्यांवर स्वयंपाक करते. आमटी, तापलेले तेल, चहा असे काही अलीकडच्या शेगड्यांवर ठेवत नाही. पण कधी तरी तो पराठ्यावर तेल सोडायचे आहे म्हणून कडेवर घे म्हणतो. बरेचदा मी तसे केले पण आहे. एकदा पेरेंटिंगच्या एका इशुमध्ये एका आईने, 'माझ्या मुलीला स्वयंपाकघरात होऊ शकणार्‍या ईजेपेक्षा टी व्ही बघून होणारी ईजा नक्कीच निग्लिजिबल आहे. त्यामुळे स्वयंपाक करत असताना तिने हट्ट केलाच तर मी तिला टीव्ही लावून देते पण तिथे किचनमध्ये येऊ देत नाही' असे लिहिले होते. मला तरी ते पटले. तेव्हापासून वेळ आली तर लेकाला टीव्ही लावून देते किंवा शक्य झाल्यास स्वयंपाकाचं बाजुला ठेवते पण त्याला तिथे ओट्यापाशी अजिबात नेत नाही.

सिंडे,
अगदी बरोबर. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही कारणासाठी मुलांच्या सुरक्षिततेसाठी तडजोड करू नका. माझी मुलगी ९-९|| वर्षांची होईपर्यंत कार सीट / बूस्टर मध्ये बसत होती. वजनाने थोडी कमी असल्यामुळे आम्ही तिच्याबाबतीत ही तडजोड केली नाही.

चांगला धागा!
वय ३ पर्यंत मुल बारिक सारि़क गोष्टि जस पीन्,नाणी,नट्स घशात अडकवू शकतात तेव्हा त्या मुलांच्या हाताशी येणार नाही हे बघावे.
फर्निचर कॉर्नर लागुन दुखापत होवु शकते त्यासाठी कॉर्नर गार्ड मिळतात ते लावुन घेता येतील.
किचन्-गेट सहज लावता आणि काढता येइल असे बसवुन घ्यावे.
हे सगळे उपाय मुलगी लहान असताना आम्हि केलेले काही आधिच जस कॉर्नर गार्ड बसवणे वैगरे आणि काही अनुभवातुन शहाणे होवुन.
वस्तु,खेळणी यासाठी 'नॉट फॉर अंडर ३' ही सुचना नक्की पाळावी.
कमित कमी अतंरासाठी सुद्धा कारसिट्-बेल्ट नक्की लावावा.

माझीही मुलगी (१० वर्षाची) आवडीने बसते बूस्टरमध्ये. गरज नाही खरीतर. पण तिला आवडतं.
गेल्या आठवड्यात माझ्या शेजारचीच्या मोठ्याने (५.५ वर्ष) धाकट्याच्या (१० महिने) कानात डॉक्टर डॉक्टर खेळतोय म्हणत टेंपरेचर बघायला म्हणून थर्मामीटर घातला. बहुतेक खूप जोरात खुपसला असावा. धाकट्याच्या कानाचा पडदा फाटला आणि ३०% हिअरिंग लॉस झालाय. त्याला सर्जरी करावी लागेल बहुतेक किंवा आपोआप हील झालं तर. तेव्हा अशा कोणत्याही वस्तू मुलांच्या आसपास ठेवू नका.
माझ्या धाकट्यानेही लहान असताना छोटी गोल बॅटरी असते ती गिळली होती. लगेच लक्षात आलं म्हणून त्याला उलटं करुन पाठीवर फटके मारले. त्यानेही ती बॅटरी बाहेर पडली पण आणखीनही काही खाल्लंय की काय हे माहित नसल्याने ९११ ला बोलावलं पण ते आल्यावर तो व्यवस्थित होता.

सिट बेल्ट बद्दल दुमत नाही.

अजुनही किचन मधे मला जुई आली की भिती वाटते आणि तिला जेव्हा मदत करायची असते तेव्हा किरकोळ काम सांगितलेली चालत नाहीत. तरी गॅस जवळ येणं सुरक्षीत नाही हे तिला माझ्या हातावरचे तेलाचे डाग पाहुन पटलय. Proud

मुल गॅसचे knobs सुरु करु शकतात. बेबीज आर अस मध्ये त्यावर प्रोटेक्टिव्ह कव्हर मिळत ते बसवुन घ्या.
माझ्या भाच्यान परवा हा पराक्रम केलाय म्हणुन लिहिल.

वय ३ पर्यंत मुल बारिक सारि़क गोष्टि जस पीन्,नाणी,नट्स घशात अडकवू शकतात तेव्हा त्या मुलांच्या हाताशी येणार नाही हे बघावे >>>> हो आणि फळं खायला देताना शक्यतो julienne cut करुन द्यावे. चोकिंग रिस्क कमी होते.

मी Vehicle Crash Test मधे काम केलं आहे.

अगदी ताशी २५ मैल च्या वेगाने (छोट्या रस्त्यावरील वेग) स्थीर वस्तूवर (ताशी शून्य मैल वेग) धडक बसली तरी किती मोठं नुकसान होतं / होऊ शकतं हे स्वत: टेस्ट केले आहे. वेग थोडा जरी वाढला (३० मैल / तास) किंवा विरूद्ध दिशेने येणारी गाडी सुद्धा त्याच वेगाने येत असेल तर नुकसान** कितीतरी पटीने वाढते हे सुद्धा पाहिले आहे.

तेव्हाच हे ठरवून टाकले की मुलांना कार सीट मधेच ठेवायचे. कितीही रडली तरी चालेल. हे अगदी कोपर्‍यावरच्या दुकानात जायचे असो किंवा मोठ्या प्रवासामधे असो. मुलांना कार सीट मधे बसविल्या शिवाय गाडी बाहेरच काढत नाही. मी कटाक्षाने पाळतो आणि दुसर्‍यांना सुद्धा असे करायला लावतो.

** bodily injuries

मी किचन गेट लावले आहे. भारतात होतो तेव्हा लाकडी काढता-घालता येणारी फळी लावून घेतली होती.
माझ्या मैत्रिणीला कुकर उघडत असताना त्याचा स्फोट होऊन भाजले होते. तिची मुलगी एरवी कायम तिच्या पायाशी खेळत असायची स्वयंपाक करताना. सुदैवाने त्या वेळी तिचा नवरा घरी होता आणि ती त्याच्याबरोबर होती. नाहीतर काय झाले असते कल्पनाही करवत नाही. मुलांनी कितीही हट्ट केला तरी त्यांना ओट्याच्या आसपास अजिबात वावरु देऊ नये. माझा मुलगा लहान असताना रडत राहायचा तेव्हा स्वयंपाक करताना मी त्याला प्रॅममध्ये बसवायचे किचनच्या बाहेर आणि एकीकडे गाणी,गप्पा असं काहीतरी करत राहायचे. फार रडला तर सरळ गॅस बंद करुन बाहेर जायचे पण त्याला आत कधीच घेतले नाही.
तीन-चार वर्षाखालील मुलांच्या हातात नाड्या, सुतळ्या, मोठ्या दोर्‍या लागू देऊ नयेत. का कुणास ठाऊक मुलं बरेचदा त्या गळ्याभोवती आवळायला जातात. प्लॅस्टिकच्या पिशव्याही आपल्या देखरेखी शिवाय हातात खेळायला देऊ नये. डोक्यात घालून घेऊन गुदमरण्याचा संभव असतो. हे पहिली दोन्-अडीच वर्षं तर अगदी कसोशीने पाळावे.
विजेची सगळी सॉकेट्स सेफ्टी प्लग घालून बंद करुन ठेवावी.

मुलं झोपताना सॉफ्ट टॉइज किंवा इतर कुठलीही खेळणी बेडमध्ये ठेवू नयेत. अगदी हट्टच केला तर झोप लागल्यावर काढून घ्यावीत.

कार सीट बेल्ट लावन्यामधे कधिही कंटाळा करु नये. माझ्या गाडीला सिग्नल वर एकाने मागुन ठोकले (हार्ड्ली काहि स्पीड होता) पण धक्का इत़का जोरात होता कि मी तर अल्मोस्ट स्टीरिन्ग व्हील वर आदळले पण मुलिचे सीट बेल्ट लावले होते म्हणुन ती पडली नाहि.
अजुन एक म्हण्जे इथे खिड्क्यांचे bliends वर केले तर ती दोरि वर टांगुन ठेवा. मुलं हमखास गळ्याभोवति गुनडाळुन घ्यायला बघतात.

अरे बापरे. सायो.

उत्तम धागा.
१) आमच्या डायवरसाहेबांचा मुलगा एका मोठ्या दुखापतीतून बचावला (मागे त्याबद्दल लिहीले होते), जेमतेम ३ आठवडे गेले, तो रमजानसाठी पुर्‍या तळत असताना मुलगा खेळता खेळता मध्ये आला आणि त्याच्या अंगावर उकळतं तेलं सांडलं. Sad खुप हाल झाले त्या लेकराचे. (आता बरा आहे)
२) भारतीय हवामानासाठी डायपर उपयोगी नाही असे आमच्या घरातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. आपण आपल्याला योग्य वाटेल ते करावे. मातोश्रींकडे आलेले एक पेशंट येणेप्रमाणे : टीव्ही वरल्या जाहिराती पाहुन (जरा कमी शिकलेले पेशंट) डायपर न बदलता ठेवत असत. तो सर्व भाग अक्षरशः सडायची वेळ आली होती.
तसेच Concentrated Dettol च्या पाण्यात बाळाचे लंगोट धुणे. यानेही लहान बाळाची स्कीन सोलुन निघाली.
आमच्या एका हापिसातील सहकार्‍याच्या दुसर्‍या बाळाला अश्याच भयंकर डायपर रॅश आणि इ-कोली बॅक्टेरियाने अ‍ॅडमिट करावे लागले. डायपर बंद करण्यापासुन इलाज नव्हता.
३) सायोने दिलेल्या उदाहरणाप्रमाणे मोठ्या मुलांपासुन बाळांना थोडे जपावे. सतत लक्ष ठेवावे. मातोश्रींच्या एका पेशंटच्या घरी मोठ्या मुलाने भावाला गायब करायला(म्हणजे थोडा वेळ तरी आई आपल्याशी खेळेल) वॉशींग मशीन मध्ये टाकले. (ते चालु नव्हते हे नशीब).
४) लहान मुलं प्लॅस्टीकच्या पिशवीशी चिक्कार खेळतात. खेळता खेळता प्लॅस्टीक डोक्यावर ओढुन घेतात. याने श्वास कोंडुन फार धोका असतो. तसेच प्लॅस्टीकच्या पिशवीचे मोठे तुकडे तोडुन ते खाल्ल्यास मुल दगावायची शक्यता असते.
५) माझी मुलगी वर्षाची असेल. तिचा एक बसायचा पाळणा होता. त्यावर किती किलो वजन चालेल हे लिहीलेले नव्हते. त्याला एक बेल्टहोता,पण एक दिवस बेल्ट तुटला आणि अचानक ती बदकन त्यातुन खाली पडली. नशीबाने काही झालं नाही. पण हे फार रिस्की आहे. त्या दिवशीच तो पाळणा आम्ही काढुन टाकला. थोडक्यात निभावले.
५) आमच्या समोरचा छोटा मुलगा प्रचंड बदमाष. त्याने शबनम पिशवी गळ्यात घालुन ती गरागरा फिरवुन गळ्याला ऑलमोस्ट फास लावला होता. तसेच आपले आय कार्ड. पोरं ती गळ्यात घालुन गरागरा फिरवतात. हे अत्यंत धोक्याचे आहे.
६) नोकरी करणार्‍या सर्वांने फ्रीजवर किमान ५ इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर, डॉक्टरांचे नंबर इतर इतर लावणे मस्ट आहे. आमच्यावर वेळ आली तेव्हा नेसत्या वस्त्रानिशी ट्रीटमेंटसाठी बाहेर पडायची वेळ आली होती. तेव्हा शिकलेला हा फार महत्त्वाचा धडा आहे.
७) भारतात दारांना खिट्या लावणे मस्ट आहे. दारं धडाधडा लागतात. पोरं आत अडकुन पडु शकतात.
८) मुलांना लटकता येतील असे रॉडस येतात. त्याला पोरं लटकु/ लोंबकळू शकतात. नणंदेचा मुलगा लटकत होता, तो रॉड बदकन खाली आला (चांगला खिळ्यांनी फिट केलेला) तो तोंडावर आपटला. दाढ हलली. Sad
९) लोकं खिडक्यांच्या कठड्यांवर/ गच्चीच्या कठड्यावर बसवुन, बाहेरची गंमत दाखवत मुलांना जेवायला वगैरे भरवतात. हे अतिशय अतिशय धोकादायक आहे. लहान मुलं कधीही उसळी मारु शकतात.

हल्लीच माझ्या छोट्या भाच्याने हातात कात्री सापडली म्हटल्यावर स्वतःच्या डोळ्यावर हात ठेऊन हेयरकटिंग करून घेतले..
(पुढचे केस उडवले)..
माझ्या कन्येने पडदे, पांघरायची दुलई, आणि लेदरचे सोफे कात्रीने कापून ठेवले होते... Happy

१) बेबी क्रिब्ज असतील तर फार फार काळजी घेणे. त्या क्रिब्ज ना रेलिंग्ज असतात, बहुधा उभ्या दांड्या. लहान बाळ त्या दोन दांड्यांमधून अर्धवट बाहेर येऊ शकते. खूप क्रिब्ज वर रीकॉल असतात. तेही बघून घ्या. शक्यतो ग्रिल/ उभ्या दांड्यांचे डिझाइन घेऊच नका. मधे एका मायबोलीकराने एक किस्सा लिहिला होता त्याच्या पुतणीचा. फार भयंकर वाटलं होतं वाचून.( ती वाचली ही आनंदाची गोष्ट!)
२) अमेरिकेत खिडक्यांचे / दरवाज्यांचे ब्लाइन्ड्स टिपिकल असतात. बर्‍याच वेळा त्या सरकवण्यासाठी दोन दोर्‍या असतात, त्यांमधे मान अडकवून घेऊन अपघात घडतात. या दोर्‍या मुलांच्या हाताला येणार नाहीत इतक्या कमी लांबीच्या ठेवाव्यात. बर्‍याच डिझाइन्स मधे तर त्या दोरीचा एक लांब लूप केलेला असतो, हा तर अपघाताला आमंत्रण्च असतो! ते डिझाइन टाळावं.
३) बाथरूम मधे टब मधे किंवा बादलीत अजिबात पाणी राहू देऊ नये. अगदी लहान मूल पाण्यात उलटं पडू शकतं वाकून खेळण्याच्या नादात.

"पोर ईतकं रडत होतं की शेवटी विचार केला मरू दे तो मामा. काढलं कारसीट मधून आणी घेतलं मांडीवर." नुकताच एकीकडून हा डायलॉग ऐकला आणी फार नाही गेल्या दोन वर्षातलीच घटना आठवली. नवर्‍याचा मित्र , त्याची बायको आणी वर्षाच्या आतलं बाळ असे ओळखीच्यांकडे जेवायला गेले होते. परत येताना उशीर झाला. पाऊस सुरू झाला आणी भरीत भर म्हणून पोर रडायला लागलं. म्हणून आईने बाळाला मांडीत घेतलं तेही फ्रंट सीटवर. ही फॅमिली अमेरिकेत येऊन वर्षही झालं नव्हतं. मुलाचा जन्म भारतात झालेला. लवकर घरी पोचायचं म्हणून साहेब स्पीड करत होते. मामाने स्पीडींग साठी पकडलं. आणी डोकावून पाहिल्यावर त्याला ह्यांचे पराक्रम कळले. आई बाप जेलमधे आणी वर्षाच्या आतलं बाळ स्टेट कस्टडी मधे. चार्जेस :- स्पीडींग + एंडेंजरींग द लाईफ ऑफ मायनर. भरीत भर हा प्रकार झाला शुक्रवारी रात्री. म्हणजे सोमवार उजाडल्या शिवाय काही होऊ शकलं नाही. ऑफीस मधल्या मित्रांची पळापळ ह्याला वकील मिळवून द्यायला.दोन दिवस आई बापाची पोरा पासून ताटातूट. कुणाच्या जिवाला चैन नाही. हे का झालं कारण आईबापांचीच चूक. शेवटी " आम्ही नवीन आहोत. आम्हाला ह्या नियमांची आणी परिणामांची तीव्रता माहीत नव्हती." असली काही कारणं देऊन सुटले. पोर अमेरिकन सिटीझन नव्हतं म्हणून परत मिळायला फार त्रास नाही झाला.ईथले रेकॉर्ड खराब व्हायचे ते झाले. मनस्ताप झाला. आणी दोन महिन्यात गाशा गुंडाळून देशात परत. विषाची परीक्षा कधी घेऊ नये हेच खरं.

माझा लेक सव्वा वर्षांचा असताना त्याला घेऊन नणंदेकडे गेले होते. परत निघतांना त्याला कारसीटमधे बसवून बेल्ट वगैरे लावला. तितक्यात काहीतरी राहिलेलं द्यायला नणंदेने हाक मारली, म्हणून ते घ्यायला मी दोन मिनिटं कारपासून दोन पावलंच लांब गेले असेन. वस्तू ताब्यात घेऊन दोन मिनिटं बोलून मागे वळत्ये तोवर लेकाने सीटबेल्ट काढून उतरून कार लॉक केली होती. माझी कारची किल्ली पर्समधे आणि पर्स आत कारमधे! भर उन्हाळा आणि खिडक्या पॅकबंद. बाहेरून खुणा करून त्याला लॉक उघडायला सांगितलं पण अर्थातच त्याच्या ते लक्षात येई ना. ताबडतोब 911 ला फोन केला. पोलिसांकडे एक मेटलची चपटी आणि लांब पट्टी होती, ती खिडकी आणि काचेच्या मधल्या जागेत नेमकी घालून त्यांनी कार अनलॉक केली.

तात्पर्यः
१. हे 'दोन मिनिटं', 'दोनच पावलं', 'दोन शब्द' हे प्रकार फार घातक असतात.
२. उन्हाळ्यात मुलांना बंद कारमधे सोडून जाऊ नये. कार आतून भयंकर तापते आणि मूल डीहायड्रेट होवू शकतं. माझ्या सुदैवाने पोलिस लगेच आले आणि बाकी काही प्रसंग ओढवला नाही.

हो कारच आतल टेंपरेचर वेगान वाढत असत.टेक्सास मध्ये दरवर्षी यामुळ ८/१० मुल दगावतात. Sad मला फार भिती आहे त्या गोष्टीची.

स्वयंपाकघरात मुलांना प्रवेश बंदच ठेवायला हवा. पण ते 100% जमतंच असं नाही. Sad
किचन ट्रॉलीज अगदी 7-8 महिन्याच्या बाळांनाही सहज उघडता येतात.

आमच्या हिरॉईनला वाचायला येत नाही अजून पण लेबलावरून औषधं ओळखते. एकदा तिला खूप ढास लागली होती तर आजीच्या हातात सितोपलादी चूर्णाची डबी आणि मधाची बाटली नेऊन दिली.

आता वॉशिंग मशीनच्या बटणांपर्यंत उंची पोचायला लागली आहे. एकदा वॉटर लेव्हल कमी करून टाकली आणि ओव्हरलोड होऊन मशीन ठणाणा करायला लागलं.

ही काहीच संभाव्य धोक्यांची यादी आहे. डोळ्यात तेल घालून उपदव्यापांकडे लक्ष ठेवणे याशिवाय दुसरा उपाय आम्हाला अजून सापडलेला नाहीये.

अजून एक, प्रेशर कूकरमध्ये काही धोका आहे हे जाणवताचक्षणी ताबडतोब शिट्टी, व्हॉल्व, रींग बदलून घ्या. आमच्या शेजारी व्हॉल्व उडून कूकरचं झाकण तुटलं, चारही भिंतीवर भाताची शितं, भात ठेवलेल्या भांड्याचे दोन तुकडे आणि शेगडीही तुटली. त्यांची जुळी बाळं 8 महिन्यांची आहेत.

बापरे, काय तरी एकेक किस्से.
हा किस्सा माझाच. पहिलीत असतानाचा. होळीचा दिवस होता. आई ऑफिसातून येताना पिचकार्‍या घेऊन आलेली त्या भरायची घाई. किचन आणि बाहेरच्या खोलीला पडदा होता त्यामुळे किचनमधून उकळती आमटी बाहेर घेऊन येणारी ताई दिसली नाही आणि ती आमटी माझ्याच खांद्यावर सांडली. अजूनही त्याचा डाग आहे.

एक अतिशय दुर्दैवी घटना पेरेंटिंग मासिकात वाचलेली. मध्यमवर्गीय कुटुंबात दोन बाळं होती. एक जरा मोठा ३-४ व.चा आणि एक दीड-दोन व.चा. मोठ्याला बरं नव्हतं म्हणून वडिल सुट्टी घेऊन घरी थांबले. धाकट्याला डे केअरला सोडायचे म्हणून आई बरोबर घेऊन गेली. मुलांची आजरपणं, जागरणं, ऑफिसमध्ये काय स्ट्रेस असेल तो ह्या सगळ्याचा परिणाम कसा होउ शकतो आपण कल्पना करु शकत नाही. ती बाई सरळ ऑफिसला गेली. मुलगा गाडीतच विसरली. दिवसभर ही ऑफिसमध्ये. तिने लोकांना सांगितले सुद्धा की "आज धाकट्याला मी डे केअरमध्ये सोडलेय पण तो सुद्धा आजारी पडला तर मला लवकर जावे लागेल". संध्याकाळी डे केअरमध्ये गेली तर तिथल्या बाईने सांगितले आज तिचं बाळ आलच नाही. तेव्हा तिच्या डोक्यात प्रकाश पडला पण तोवर खूप उशीर झाला होता Sad

हे असं कुणाचही होऊ शकतं. माझ्या मैत्रिणीच्या नवर्‍याने असं केलेलं. पण त्यांची मुलगी मोठी होती, तिने डॅडीला ही नाही माझी शाळा सांगितलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं.

ह्यावर उपाय असा नाही. पण आई-वडिलांनी दिवसातुन एकदा एकमेकांना मुलांची चकशी करायला फोन करणे, आपली महत्वाची वस्तू (पर्स - जी घेतल्याशिवाय आपण कुठे जाणार नाही) मागच्या सीटपाशी ठेवणे, रोज ऑफिसमध्ये गेल्यावर डे-केअरमध्ये फोन करणे (मी गेल्यावर तो रडला का ? आज त्याने दूध पिलं का ? किंवा तो कसा आहे ? ह्यासारखे प्रश्न विचारु शकता), आपलं बाळ गैरहजर असल्यास टीचरला फोन करायला सांगणे, इ करु शकतो.

१. हे 'दोन मिनिटं', 'दोनच पावलं', 'दोन शब्द' हे प्रकार फार घातक असतात.
>> अगदी अगदी! मी बाथरुम मधे जावुन येईंपर्यंत पोरिने रांगत जावुन(वय ७ महिने)entertainment सेंटर आणि भिंतिमधल्या चिंचोळ्या जागेत स्वत:ला अडकवुन घेतल होत.
माझ्या पुतणीने(भारतात) भांडे घासायच लिक्विड पिल होत,उलट्या करुन काढाव लागल.
सगळे क्लिनिंग प्रॉडक्टस लॉक्स कपाटात किंवा उंच जागी ठेवावे.

हो हे मीही लिहिणार होते. ही दोन मिनिटे, पाच मिनिटे जिवावर बेतू शकतात. मुलांना कार मधे बंद ठेवून अज्जिबात कुठे जाऊ नये.

लहान मुलांना घालायचे पांघरुण लहान, कमी वजनाचे, कमी जाड असावे. झोपेत लोळताना पुर्ण अंगाभोवती लपेटुन घेतात.

घरात सेफ्टी गेट कोणते वापरता तुम्ही सगळे? माझ्या नवीन अपार्ट्मेंट मध्ये दार उघडताच जिना आहे. त्या जिन्याच्या वर गेट लावायचे आहे.

चांगला धागा आहे. हे पुढचे काही मुद्दे अगदी लहान मुलांना लागू होणार नाहीत, पण थोड्या कळत्या वयातल्या मुलांसाठी-

मुले लहान असतात तेव्हा सुरक्षित वातावरणात ठेवणं ही आपली जबाबदारी आहे तसंच जरा कळत्या वयाची झाली की हे धोके त्यांना समजावून द्यावेत. धोक्याची योग्य भीती असणं गरजेचं आहे.

- सायकल चालवताना नेहमी हेल्मेट हे वापरलेच पाहिजे. (योग्य मापाचे आणून देण्याचे काम आपले.)
- घराबाहेर आजूबाजूला खेळताना कुठपर्यंत लांब गेले तर चालते याबद्दल तुम्हाला योग्य वाटेल ती मर्यादा आखून द्यावी.
- "strangers". बद्दल जागरुकता निर्माण करावी. (याबद्दल पुस्तके उपलब्ध आहेत.)
- हरवल्यास काय करावे, कोणाकडे जावे याबद्दल माहिती द्यावी. अशी वेळ सहसा मॉल, पार्क, एअरपोर्ट इ. गर्दीच्या ठिकाणी येऊ शकते.
- घरचा पत्ता, फोन नंबर सांगता आला पाहिजे.
- जरा अजून मोठ्या मुलांना सुरुवातीला मायक्रोवेव वापरु द्यायला हरकत नाही, तो सेट केलेल्या वेळानंतर आपोआप बंद होतो. स्वतःच्या देखरेखीखाली गॅस वापरु द्यावा.

इतर-
- severe अ‍ॅलर्जी, आजार असेल तर पालकांनी योग्य ती औषधे नेहमी जवळ बाळगावीत.
- इमर्जन्सी इन्फो (पत्ते, फोन, मित्र, शेजारपाजारी यांची नावे) ही गरज पडेल तशी अपडेटेड ठेवावी.
- दुर्दैवाने पूर्णपणे काळजी घेऊनही अ‍ॅक्सिडेण्ट्स होतात हे लक्षात ठेवावे. आपण आपल्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतली की टेन्शन कमी होते. काळजी घेणे वाईट नाही, पण अनावश्यक भीती, घाबरटपणा नको.

अजून आठवेल तसे लिहीन.

मुख्य दाराला वरती चेन लावावी.खूप लोकं करत नाहीत खरेतर्..एकदा मुलांना दार उघडता यायला लागले की पळायला पाहतात बाहेर..

Pages