टेरीचे फतफते
१ जुडी टेरी, म्हणजेच पावसाळ्यातील आळू
पाव वाटी शेंगदाणे (भिजवुन)
पाव वाटी चणाडाळ (भिजवुन)
सुक्या खोबर्याचे १०-१२ पातळ तुकडे (चिवड्यात घालतो तसे)
२ कांदे चिरुन
आल लसुण पेस्ट
फोडणी - राई, जिर, कढीपत्ता, हिंग
पाव चमचा हळद,
१ ते २ चमचे मसाला
अर्धा ते १ चमचा गरम मसाला
चिंचेचा कोळ
गुळ
चवीपुरते मिठ
थोडस ओल खोबर खरवडून
प्रथम टेरी म्हणजे आळूची पाने चिरुन चिरुन घ्यावी व थोडी शिजवुन मिक्सरमध्ये पेस्ट करावी. पानांच्या देठांची साल काढुन त्याचे अर्धा इंचिचे तुकडे करावेत. भांड्यात तेल टाकुन वरील फोडणी द्यावी. आता ह्यात कांदा घालावा. कांदा शिजवायची गरज नसते. जरा परतुन आल लसुण पेस्ट, टेरीच्या पानांची पेस्ट, भिजवलेले शेंगदाणे, चणाडाळ, खोबर्याचे तुकडे, टेरिंची देठे घालावीत. आता हे सगळ शिजू द्याव. शेंगदाणे शिजले का ते पाहायचे मग त्यात गुळ, चिंचेचा कोळ, मिठ, गरम मसाला घालायचा. थोड खोबर घालायच मग थोडा वेळ उकळवुन गॅस बंद करायचा.
ही रेसिपी आणि टेरी बर्याच जणांना माहीत असेल. टेरिंची पाने हिरवीगार व देठ पांढरी असतात. काही काही टेरी विकायला येतात त्यांची पाने काळपट (वडीच्या पानांच्या आळूची पाने एकदम काळी असतात त्यापेक्षा कमी काळी असतात) ह्या काळपट देठांच्या आळूला खाज येते. साफ करतानाही. ह्यात चिंच जास्त घालावी लागते. पाढर्या देठाच्या टेरीला खाज कमी असते. साफ करताना काही वाटत नाही.
फतफत्यामध्ये सुक्या खोबर्याचे काप तसच ओल्या खोबर्याचा किस नाही घालता तरी चालतो.
शेंगदाणे आणि चणाडाळ च्या ऐवजी वालाच बिरड, पाढरे वाटाणेही छान लागतात.
चिंच गुळाचे प्रमाण व्यवस्थित झाले म्हणजे छान लागते हे फतफते.
अजुनही मी नुसते खाते.
ह्या पाहा टेरी.
ह्या पाहा टेरी.
पहिल्यांदाच जागुने टाकलेली
पहिल्यांदाच जागुने टाकलेली भाजी , रेसिपीसकट माहितीय व खाल्लीय !!
आता अळू कुठून आणू! पण पालकाची अशीच छान होते, ती उद्या करते..
फोटो मस्त फ्रेश आहे अगदी!
जागो, कुलू च नाव आत्ता वाचल,
जागो, कुलू च नाव आत्ता वाचल, अलिबागच्या जवळ सध्या जिथे मी आणि किरु काही गमतीजमती करतो आहोत तीथे ही कुलू भरपूर आहे, तिथल्या आदिवाश्याने दाखवली.
बादवे, अळवाचे भाजीचं आणि वडीच असे दोन प्रकार असतात ना, त्याबद्दल पण लिही की
असुदे घेउन या भाजी तिथून
असुदे घेउन या भाजी तिथून माबोकरांना.
टिपेमध्ये टाकले आहेत दोन प्रकार.
<< टिपेमध्ये टाकले आहेत दोन
<< टिपेमध्ये टाकले आहेत दोन प्रकार >.
हो क्काय ? मी नाय टिपले तीथे.
खाणार्याना देणार....
जागू, बेसन नाही का लागत
जागू, बेसन नाही का लागत फतफत्याला?
मी 'ब्राम्हणी' पद्धतीच्या फतफत्याचा झब्बू देऊ का?
(संदर्भ : मुगाच्या बिरड्याचे वेगवेगळे प्रकार. बाकी गैरसमज नसावा)
अम्या, आमच्यासाठी कडवे वाल आणि पोहे घेऊन ये की... तुझ्या घरी येऊन घेऊन जाईन आणि कॉर्नेटो पण खाऊन जाईन
तीथे ये... मग इमूच मागशील
तीथे ये... मग इमूच मागशील खायला....
त्याच्या अंड्याचं आम्लेट
त्याच्या अंड्याचं आम्लेट किंवा भुर्जी घाल मला खायला... पण इमू नको
अख्ख्या अंड्याचं खाशील एकटीने
अख्ख्या अंड्याचं खाशील एकटीने ? १० १२ जणांना पुरतं म्हणतात
जल्लां मी एकटी येणारे का
जल्लां मी एकटी येणारे का तिकडे?? तुम्ही सर्वे लोक पण असणारच ना........
असो. इथे आपण टेरीबद्दल टिवटिव करूया..
खरय तूझं, टेरी जरा टेरीबलच
खरय तूझं, टेरी जरा टेरीबलच वाट्टेय नाय ? ते रंगीत अळू कस्ल जीवघेणं गोड दिस्त नाय ?
अख्ख्या अंड्याचं खाशील एकटीने
अख्ख्या अंड्याचं खाशील एकटीने ? १० १२ जणांना पुरतं म्हणतात
म्हणतात?? म्हणजे तु अजुन खाल्लंच नाहीयेस?????????
ते रंगीत अळू कस्ल जीवघेणं गोड दिस्त नाय
रंगीत?? फक्त हिरव्या रंगाचेच आहे ना अळू???? बाकी गोड दिस्तय की कसं माहित नाही, पण माझ्या तोंडात पाणी गोळा होतंय त्याचे फतफते केल्यावर काय मजा येईल त्याची कल्पना करुन...
जागू, अळुचे फतफते हा माझा अत्यंत आवडता प्रकार आहे. मी सुद्दा असाच खाते. माझ्या घरी मी एकटीच आहे खाणारी हा प्रकार.. त्यामुळे अगदी मनसोक्त खाते... आता श्रावणात हे अळु मिळायला लागेल...
अळवापेक्षा त्याच्या मुंडल्या
अळवापेक्षा त्याच्या मुंडल्या (काय नामभेद असतील ते जाहीर करा लग्गेच) मस्त लागतात.. उकडून / भाजी करुन.
अळकुड्या-अरबी
अळकुड्या-अरबी
तस नाय ग साधना, रंगीत म्हणजे
तस नाय ग साधना, रंगीत म्हणजे शोभेच अळू येतं, (जरा हळू येत) ते काय उपयोगाच नाही. पण दिस्त गोड.
हो ते ठिपकेवाले मला माहित
हो ते ठिपकेवाले मला माहित आहे, पण इथे कुठे दिसले तुला?? मला वाटले वरती फर्शीचे ठिपके दिसताहेत तेच अळू वाटले की काय??? (हल्ली अलिबागेत फिरतोस, त्यामुळे तिथलाच झाला असशील अशी एक शंका चाटुन गेली मनाला :P)
साधना कशाला ग त्याला अलिबागसे
साधना कशाला ग त्याला अलिबागसे आया है करतेस ?
असुदे अळकुड्यांचा आळूही वेगळा असतो. त्याची पाने गोल आणि देठे जरा जाड असतात. तो खवत नाही जास्त. त्याच्या पानांचीही भाजी आणि फतफते करतात.
मराठवाड्यात ह्याला चमकुरा
मराठवाड्यात ह्याला चमकुरा म्हणतात
मला आवडते ही भाजी.
जागू रानभाज्या १) कुरडूची
जागू रानभाज्या
१) कुरडूची भाजी - http://www.maayboli.com/node/9313
२) कंटोळी - http://www.maayboli.com/node/9329
३) टाकळा - http://www.maayboli.com/node/9351
४) भारंगी - http://www.maayboli.com/node/9381
५) कुलू - http://www.maayboli.com/node/9406
६) शेवळ - http://www.maayboli.com/node/16771
७) आंबट वेल - http://www.maayboli.com/node/16838
इतक्या रानभाज्या माहिती असणारी तू एकटीच असशील बहूदा. आता या सगळ्या भाज्या कुठे शोढू हा प्रश्न पडलाय मला
रच्याकने, सगळ्याच रेसिपी मस्त आहेत .
आरती अग सोप्प आहे. माझ्याकडे
आरती अग सोप्प आहे. माझ्याकडे मिळतील. ये माझ्याकडे.
नक्की गं . धन्स
नक्की गं . धन्स
दिप्स, विदर्भात पण याला
दिप्स, विदर्भात पण याला चमकुरा याच नावाची ओळखतात. पुर्वी मला अळू कळायचेचं नाही. आमच्याकडे अळूची वडी मात्र प्रसिद्ध नाही. जीभ ओढते ना ही भाजी खाल्ली की? आम्ही ही भाजी पिठ पेरुन करतो.
जागू, आमच्या घरी हा पांढरा
जागू,
आमच्या घरी हा पांढरा अळू (आईचा शब्द) आणत नाहीत, आई नेहमी काळ्या देठाचाच आणते. तिच्या मते तोच जास्त टेष्टी असतो.
माडावरचा अळू असा पण प्रकार असतो. आणि गोव्याला कासाळू म्हणून एक प्रकार असतो. (मी लिहिन त्याबद्दल)
आता फोणशी (कोचिंदा) पण मिळायला लागेल. त्याला काय म्हणता तूम्ही ? (गवतासारखी, पांढर्या देठाची भाजी !)
दिनेशदा कोचिंदा म्हणजे कुलू
दिनेशदा कोचिंदा म्हणजे कुलू का ? मी केली होती त्याची भाजी परवा. येतो आता. माज्या सिरिजमध्ये ५ नंबरला आहे बघा रेसिपी.
तुमच्या आईचे बरोबर आहे. पांढर्या आळु पेक्षा काळपट आळुच चविष्ट असतो. माझ्या माहेरी ह्याचेच फतफते करतात. सासरी पांढर्या आळुची करतात. त्यामुळे मला आता तिच सवय झाली आहे. आणि अजुन एक कारण म्हणजे हा पांढरा आळू हाताला खाजवत नाही. पण काळा आळु खाजवतो हाताला.
'तेरं अळू' म्हणतात ते हेच का?
'तेरं अळू' म्हणतात ते हेच का?
अळुचे अजुन काही
अळुचे अजुन काही प्रकार.
दिनेशदा म्हणतात तो हा अळू. हाच फतफत्यासाठी खरा चविष्ट असतो.
हा वडीचा अळू
हा आहे रंगित शोभेचा अळू. * हा अळू खात नाहीत. फक्त शोसाठी लावतात.
एकसे एक आहेत ग तुझ्या रेसिपीज
एकसे एक आहेत ग तुझ्या रेसिपीज तोंपासू एकदम
मी काल आणलंय भाजीचं अळू.
मी काल आणलंय भाजीचं अळू. उद्या परवाला करणार फतफतं आत्ताच तोंपासु.
जागू.. नवीन चित्र मस्त आणि
जागू.. नवीन चित्र मस्त आणि माहिती देणारी आहेत.
कविता, बी धन्यवाद. अश्विनी
कविता, बी धन्यवाद.
अश्विनी नक्की कधी येउ तुझ्याकडे उद्या की परवा ? फतफत खायला ?
Pages