नेहमी माईंना रघुरामाच्या मंदिरात आल्यावर फार निवांत आणि प्रसन्न वाटत असे. मंदिरातली ती धीरगंभीर शांतता नेहमी त्यांना उल्हासित करत असे. घंटेचा निनाद गाभार्याबरोबर रोमारोमातही भरुन राही आणि नंतर कित्येक वेळ त्याचा प्रतिध्वनी त्यांच्या अंतरात प्रतीत होई. पण आज काहीतरी बिनसले होते. आज त्या उद्विग्न होत्या. कित्येक वर्ष झाली माई नित्यनियमाने मंदिरात येताहेत. काळ्याचे पांढरे झाले पण नेम कधीही चुकला नाही. पण आजच्याप्रमाणे त्या कधीही आपल्या श्रीरामाकडे तक्रार करायला आल्या नव्हत्या.
माईंनी रामरायाचे डोळेभरुन दर्शन घेतले. कित्येक वर्षांचे त्यांचे ऋणानुबंध जुळलेले होते. माई दर्शन घेउन आपल्या नेहमीच्या जागी येऊन बसल्या. आज मंदिरात कोणातरी बुवांच प्रवचन होते. डोळे मिटुन रामरायाचे चिंतन करता करता त्या ऐकु लागल्या. प्रवचन रंगात आले होते. बुवा सांगत होते..."भक्त आणि परमेश्वर एकदा वाळ्वंटामधुन बरोबर जात होते. दोघांच्या पायांच्या खुणा त्या शुभ्र वाळूवर बरोबरीने उमटत होती. चालता - चालता भक्ताचे लक्ष त्या पाऊलखुणांकडे गेले. त्याला दिसले की, काही वेळा चारच्या ऐवजी दोनच पाऊले उमटली आहेत. भक्ताच्या मनात त्यामुळे अस्वस्थता आली. ती त्याच्या चेहर्यावर दिसु लागली." बुवा अगदी रंगवुन सांगत होते. माईना पण आता कथेत रस निर्माण झाला होता.
बुवा पुढे सांगु लागले "शेवटी न राहवून तो देवाला म्हणाला, देवा, ही वाळुत उमटलेली पाऊले पाहिलीस का? काही ठीकाणी फक्त दोनच पाऊले आहेत... म्हणजे देवा संकटात तुही माझी संगत सोडलीस ना?.. देवाने फक्त मृदु स्मित केले, त्याने भक्ताच्या खांद्यावर प्रेमभराने हात ठेवला आणि म्हणाला, अरे वेड्या ती जी पाऊले तु पाहतोयस ना ती माझी आहेत कारण तेव्हा तुझ्यावर संकटं येत होती म्हणुन तुला मी खांद्यावर घेतले होतं."
क्षणभर माईंच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यांनी एकवार त्या सावळ्या रघुनंदनाकडे कृतज्ञतेने पाहिले आणि डोळे घट्ट मिटून घेतले. सगळा जीवनपट त्यांच्या नजरेपूढुन झरझर सरकू लागला. काय काय नव्हतं सहन केलं त्यांनी आज्पर्यंतच्या आयुष्यात. गरिबी, सासुरवास, त्यानंतर आलेले एकटेपण, तीन मुलांची जबाबदारी पेलताना केलले अपार कष्ट आणि त्याची मिळालेली कटू फळं. माई सगळ्यामधुन तावुन-सुलाखून निघाल्या होत्या.
माईंच लहानपण खुप गरिबित गेलं. आई-वडिलांनी फारशी चौकशी न करता केवळ जबाबदारीतून मोकळं होण्यासाठी त्यांचे लग्न लावुन दिले. नवरा बाहेरख्याली आणि दारुडा होता. माईंना रोज मारहाण करीत असे. फारसा कामधंदाही करत नसत. दोन्-दोन - तीन्-तीन दिवस उपासमार होत असे. अशा दीनवाण्या संसाराची देण म्हणजे त्यांची तीन मुलं होती. मोठा सुधाकर, मधला मधुकर आणि धाकटी मालती. मालती सहा महिन्यांची असतानाच त्यांचे यजमान गेले... निमित्त होते ते 'माडीवर' झालेल्या भांडणाचे आणि त्यातून झालेल्या विषप्रयोगाचे. पण सगळे खापर माईंवर फोडून सासरच्यांनी त्यांना नेसत्या वस्त्रानिशी मुलांसह बाहेर काढले. माई माहेरी आल्या... पण माहेरीच इतके दैन्य होते की हाता-तोंडाची गाठ पडणे कठीण होते. माईंना डोक्यावर छप्पर मिळाले होते पण पोटाचा प्रश्न सोडवायचा होता. मुलांना मार्गी लावायचे होते. एकट्या बाईला डंख मारुन घायाळ करायला डोमकावळे टपलेलेच होते. प्रश्न चहोबाजुंनी आ वासुन उभे होते. जीवाचे बरे-वाईट करुन टाकायचा विचार सतत मनात डोकावत होता. पण आपल्यानंतर मुलांकडे कोण पाहिल या विचाराने त्यांनी पुन्हा जगण्याला होकार भरला आणि परिस्थितीला तोंड देण्यासाठी कंबर कसली. मुलं लहान होती म्हणुन त्यांनी एका जवळच्याच प्रसुतीगृहात रात्रीची आयाची नोकरी पत्करली आणि घरी सकाळची खानावळ सुरु केली. मदतीला कोणीच नव्हते पण खोडा घालनारे अगणित होते.
मुलं मोठी होत होती... त्यांच्या दैनंदिन गरजा भागवताना माई मेटाकुटीला येत होत्या. मोठा सुधाकर जरा जास्तच बंड होता. सतत त्याचे कोणा-न्-कोणाशी त्याचे भांडण होत असे. कधी मारामारी करुन येत असे. माई त्याच्या अशा वागण्याने व्याकुळ होत असत. सुधाकरमधे माईंच्या संस्कारापेक्षा रक्ताचे गुण अधिक गडद होते. त्यामुळे माई धास्तावल्या होत्या आणि त्यांची भिती खरी ठरली. १५-१६ वर्षाचा असतानाच सुधाकर माईंच्या इच्छा-आकांक्षा पायदळी तुडवून फरार झाला. माई नखशिखान्त हादरुन गेल्या. त्यांना कळेच ना की, त्या कोठे कमी पडल्या. वडिलांची कर्तव्य पार पाडता पाडता आपण आईपण निभावु शकलो नाही या भावनेनं त्यांची झोप उडाली. पण खचुन चालणार नव्हतं. आयुष्यातली एक व्यक्ती कमी झाली म्हणून आयुष्य संपणार थोडच होतं? जोपर्यंत श्वास आहे तो पर्यंत जगणे क्रमप्राप्तच असतं. अजुन मधुकर आणि मालतीसाठी त्यांना आयुष्याशी लढायचे होते.
त्यानी पुन्हा एकदा उभारी धरली. दवाखान्याची नोकरी सोडली. घरीच पुर्णवेळ खानावळी करु लागल्या. पण दोन्ही वेळ्ची खानावळ एकट्याने चालविणे खुप कष्टाचे होते. पहाटे चारला त्यांचा दिवस सुरु होई आणि रात्री बारापर्यंत अखंडपणे त्यांचा हात चालत राही जणू किल्ली दिलेले कामाचे मशिनच त्या बनल्या होत्या. यथावकाश खानावळीचा कारभार वाढत होता. स्वच्छता, रुचकर ताजे पदार्थ, जातीने प्रत्येकाची चौकशी यामुळे सतत गिर्हाईकांची चलती असे. हळुहळु माईंनी उन्हाळी साठवणीचे, दिवाळीचे पदार्थ करुन देण्याचेही काम सुरु केले. माईंच्या कष्टाचे आताशी कोठेतरी चीज व्हायला लागले होते.
मधुकरची त्या खुप काळजी घेत होत्या. त्याचं शिक्षण, क्लासेस, अभ्यास, पुस्तकं यासाठी त्या काहीही कमी पडु देत नव्हत्या. शक्यतो खानावळीचे कोणतेही काम त्याच्यावर पडू नये म्हणून त्या विशेष काळजी घेत होत्या. मधुकरही अभ्यासात हुशार होता. तो ही मन लावुन शिकत होता. त्याने पदवीपरिक्षेबरोबर बँकेच्या परिक्षा दिल्या आणि लगेचच एका बँकेत रुजु झाला. कधी नव्हे ते 'यश' माईंशी पाठशिवणीचा खेळ खेळायला विसरले आणि आपले पुर्ण माप त्यांच्या पदरात टाकले. माईंना वाटले आता आपले कष्टाचे दिवस संपले.
दरम्यानच्या काळात मालतीही सुस्थळी पडली होती. आता मधुकरसाठी त्यांना मुली सांगुन येऊ लागल्या. त्यांनी एकेदिवशी मधुकरजवळ लग्नाचा विषय काढला, तेव्हा त्यांना उमगले, ज्याला त्या आपल सर्वस्व मानत होत्या..तो केव्हाच परका झाला आहे. तो केव्हाच आपलं लग्न ठरवून मोकळा झाला होता. माईंना याबद्द्ल सांगण्याची त्याने साधी तसदीही घेतली नाही. त्यांची होणारी सुन समाजातल्या एका बड्या बापाची लेक होती. तिला माईंच्या कष्टावर वाढलेला मुलगा चालत होता पण त्यासाठी कष्टनारी माऊली नाही. माईंवर आभाळ कोसळले. पण मधुकर बधला नाही. थोड्याच दिवसात त्याने आपले स्वतंत्र बिर्हाड केले.
माई पून्हा एकदा एकट्या पडल्या. आतापर्यंतच्या आयुष्याने त्यांना मोठे धडे दिले होते पण त्यासाठी जबर किंमत त्यांना मोजावी लागली होती. यासगळ्याने माई आगतिक झाल्या होत्या आणि शेवटची आशा म्हणुन आपल्या रामरायाला जाब विचारायला आल्या होत्या. पण त्यांनी काही सांगण्याआधीच बुवांच्या मुखाने प्रभुने त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली होती. आकाश पून्हा निरभ्र झालं होतं
हरिनामाचा गजर झाला आणि माई भानावर आल्या. ऊन्ह पुर्ण कलली होती. दिवस आणि रात्रीला जोडणारी संध्याकाळ आता सोबतीला आली होती. भविष्याच्या रात्रीला माईंनी रामरायाच्या भरवशावर सोडले होते. मनातली खळबळ निवली होती.. माई शांत झाल्या होत्या. नेहमीच्या कणखरपणे त्या उठल्या, त्यांच्या सावळ्या रघुनंदनाला पुन्हा एकदा डोळ्यात साठवुन त्या घराची वाट चालु लागल्या.
छान.. पण
छान..
पण अजुन रंगवली असतिस तर जस्त छान वाटलं असतं.
*******************************
If there is a way, I will find one.
If there is none, I will make one.
पल्लवी, कथा
पल्लवी,![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
कथा छान लिहीली आहेस गं. वाचून वाईट वाटलं. घरोघरी मातीच्या चुली.
आजकाल म्हातारे आई-वडील मुलांना नकोच असतात घरात.
अनघा आणि
अनघा आणि दक्षिणा प्रतिसादाबद्दल आभार ... खुप गॅप पडली होती लिखाणात.. कोणी अशी दखल घेतली की लिहायला हुरुप चढतो.
**********************
नजरेला काय हवी... स्वप्न थोडी जास्त !
अगं लिहीत
अगं लिहीत रहा, मला तर कथा वगैरे लिहीता येत नाही, तू लिही आम्ही नक्की वाचू. फक्त लिहीलीस की मला खरडवहीत संदेश पाठव, म्हणजे लगेच वाचता येईल. इथे नविन मायबोलीवर काही लवकर सापडत नाही.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
छान! आवडली
छान! आवडली कथा!
खुप आवडली
खुप आवडली पण लवकर संपल्यासारखी वाटली.अजुन खुलवायला हवी होती.
छान आहे
छान आहे गोष्ट.
अरे वेड्या ती जी पाऊले तु पाहतोयस ना ती माझी आहेत कारण तेव्हा तुझ्यावर संकटं येत होती म्हणुन तुला मी खांद्यावर घेतले होतं >>> हे फारच आवडलं.
सिंड्रेल्
सिंड्रेल्लाताईंना मोदक. मलाही ते फार्फार आवडलं.
कणखर माई
कणखर माई आवडल्या.
आयटी गर्ल,
आयटी गर्ल, चिनु, सिंड्रेला, सुप्रिया आणि मृण्मयी... प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. माईंचा संघर्ष मलाही अजुन वाढवायाचा होता, पण मग ती लघुकथा राहणार नाही अशी शंका वाटली, म्हणून आटोपती घेतली.. शिवाय लिखाणाला सलग वेळही मिळत नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
**********************
नजरेला काय हवी... स्वप्न थोडी जास्त !
अप्रतिम
अप्रतिम आणि ह्रुदयस्पर्शी कथा आहे ...अरे वेड्या ती जी पाऊले तु पाहतोयस ना ती माझी आहेत कारण तेव्हा तुझ्यावर संकटं येत होती म्हणुन तुला मी खांद्यावर घेतले होतं >>> मला हे खुप च आवड्ले..कथेचा शेवट ही छान झाला आहे..
असच लिहित रहा..
छान
छान लिहिलीयेस पल्लवी... लिहित रहा...
छान
छान लिहिलय, वीलाप. (मलाही अजून वाचायला आवडली असती)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नेहु,
नेहु, सरिवीणा धन्यवाद...
दाद तुझी प्रतिक्रिया वाचुन आनंदाने मी क्षणभर उडाले. तुझे लिखाण वाचताना मला नेहमी वाटायचे व्यक्तिंचे भावचित्रण तु किती सुरेख आणि नेमकं करतेस.. कसं काय जमत असेल तुला? .... तुझ्या प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार.
**********************
नजरेला काय हवी... स्वप्न थोडी जास्त !
छानच!
छानच! मलापण आवडली कथा.
क्या जम्या
क्या जम्या है छोटी बहन!! व्वा.. कथेचा शेवट आशावादाने केलास हेच खूप भावलं.. थोड्या फार प्रमाणात आपल्या सर्वांच्याच आयुष्यात हे चढ उतार येत राहतात.. पण "तो" आपला "अंतर्यामी , सखा" आहे आपल्यासाठीच!!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल , पण लयलूट करायची ती सुगंधाचीच!
सुरेख कथा आहे
सुरेख कथा आहे