अग मला अगदी भुताटकी झाल्यासारख वाटतय.
का ग?
हे बघ ना परवाच्या पिकनिकचे फोटो. बहुतेक फोटोत हे कायतरी लांबट काळपट काय दिसतेय तेच काळात नाहीये. आणी हे दिवसाचे भूत आहे कि काय कोण जाणे. रात्रीच्या फोटोत काही प्रोब्लेम नाहीये.
************
आपल्या पैकी बऱ्याच जणांकडे कॅमेरा असेल. असेल म्हणजे असणारच. अगदी एस एल आर (SLR Single Lens Reflect Camera) नसला तरी पॉइंट एंड शूट वाला डिजीटल किंवा फिल्मवाला तरी नक्कीच. कॅमेरा खरतर किती नेहेमी वापरला जातो. पण त्याच्या साफ सफाई कडे फारसे लक्ष दिले जातेच असे नाही. मग एक दीवस केव्हातरी फोटोवर ठिपके डाग दिसायला लागतात. कधीकधितर अगम्य असे अजून काय काय फोटोत दिसायला लागते. भुताटकी कि काय असा वाटायला लागत. आणि मग हे असे वरचे संवाद झडतात.
हि सगळी किमया बहुतेकवेळा कॅमेरा साफ नसल्यालेच घडलेली असते. तुमच्या घरातल्या फर्निचरवर जशी धूळ बसते तशीच ती कॅमेऱ्यावर पण बसते. पण कॅमेऱ्यावर आणखीही इतर गोष्टींचा परिणाम होतो.
मग आपला कॅमेरा कसा बर नीट ठेवायचा?
तुमचा पॉइंट एंड शूट (बघून नुसते बटन दाबायचा) कॅमेरा असेल तर काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यात तरी पुरे आहेत.
पण एस एल आर किंवा एस एल आर लाईक कॅमेरा असेल तर मात्र बरीच काळजी घेण आवश्यक आहे. अशी काळजी घेऊन भुताटकी नक्कीच थांबवता येईल आणि तुमचे फोटोपण चांगले येत रहातील.
कॅमेराची लेन्स हि बऱ्याच प्रकारची भिंगं एकत्र जुळवून बनवली असते. प्रकाश नीट आणि हवा तेवढाच कॅमेरात जावा यासाठी लेन्सवर खूप केमिकल आवरणाचा मुलामा (coating) असतो. खराब वापरण्याने, कसेही पुसण्याने ते खराब होतं आणि फोटोंची प्रत खराब होते.
त्यामुळे कॅमेराची काळजी घेताना, वापरताना काही सावधानता बाळगायला हवी.
धूळ आणि तत्सम:
कॅमेरा गळ्यात घालून फिरताना त्यावर धूळ हि बसणारच. नको असेल त्यावेळी लेन्स कव्हर लाऊन ठेवणे. कॅमेरा कसाही कुठेही खाली न ठेवणे या गोष्टी गरजेच्या आहेत.
तरीही लेन्स च्या पुढच्या भागावर बारीक कण तंतू इत्यादी बसताच आणि ते काढणं फारच सोपं. नुसत्या ब्लोअर (हवेचा हातांना दाबता येणारा छोटा पंप) ने ती काढता येते.
पण कॅमेरात आतमध्येहि बऱ्याच वेळा धूळ जाते. हे कस कळतं तर तुमच्या फोटोमध्ये धुसर ठिपके दिसतात. डिजीटल फोटो असेल तर कॉम्पुटर स्क्रीन वर फोटो एकदम मोठा करून सगळी कडे बघितलत तर सगळ्या फोटोत ठराविक ठिकाणी हेच धुसर डाग दिसतात.
अशा वेळी सहसा कॅमेऱ्याची लेन्स काढावि. कॅमेरा मेन्यू मधे मिरर लॉक अशा प्रकारचा एक ऑप्शन असतो. त्याने मिरर लॉक करावा. (कॅमेरा मन्युअल नीट वाचले तर याची नक्की माहिति मिळेल.) मिरर लॉक केले की सेन्सर दिसतो. मग कॅमेरा उलटा करुन म्हणजे सेन्सरचा (डिजीटल कॅमेऱ्याचा) भाग जमिनी कडे करून हळुवार पणे ब्लोअरने फुंकून टाकावी. हे करताना अगदी हळुवार पणे करणे नाहीतर सेन्सर खराब होऊ शकतो. एवढ्या एका उपायाने पण बराच फरक पडेल. कुठ्ल्याहि परिस्थितीत डिजिट्ल कॅमेर्याच्या सेन्सरला हात लाउ नये. ब्लोअर कॅमेर्याच्या अगदि आतल्या भागात पण नेऊ नये. शक्य तितका बाहेर ठेवावा. मिरर अचानक बंद झाल्यास ब्लोअरवर आपटुन मिरर खराब होइल.
ब्लोअर म्हणून एअर डस्टर जे मिळत ते अजिबात वापरू नये.त्याने सेन्सर दुरुस्त न होण्याइतके खराब होईल. ते कॉम्प्युटर वैगेरे साठिच असते.
कधी कधी लेन्स च्या पुढच्या भागावर बारीक कण तंतू अस काहीतरी चिकटून बसत. त्या साठी मात्र कॅमेऱ्याच क्लिनिंग लिक्विड मिळत ते वापरावं. कॅमेऱ्याच क्लिनिंग किट मध्ये हे लिक्विड, एक कापड किंवा क्लिनिंग पेपर मिळतात तेच वापरावे. इतर कोणत्याही कापडाने लेन्स वर चरे, ओरखडे पडण्याची दाट शक्यता असते
तर हे लिक्विड टाकून त्या कापडाने हळुवार गोलाकार हात फिरवत लेन्स पुसून काढावी. जास्त जोरात न केलेले उत्तम.
काहीवेळा जर लेन्स बऱ्याच वेळा बदलत असाल तर कधी कधी लेन्स आणि कॅमेरा जिथे जुळतात (lens mount) तिथे कचरा जमू शकतो. किवा तळहाताचे तेल, घाम त्या जोडणीच्या (joints) ठिकाणी जमू शकते.
यामुळे कॅमेरा कधीकधी लेन्स लावून सुद्धा लावलेली नाही असा संदेश देतो (lens not detected) किंवा फोटो काढता काढता कॅमेरा बंद पडू शकतो. यावर उपाय म्हणजे हात स्वच्छ करून मगच लेन्स बदलणे. आणि खूप वाऱ्याच्या, धुळीच्या ठीकाणी शक्यतो लेन्स न बदलणे.
तरीहि अस झालच तर त्याच क्लिनिंग लिक्विड आणि कापडाने हे जोडणीचे भाग हळुवार साफ करायचे. हे पण अगदी हळुवार करणे गरजेचे आहे. त्या भागांवर सोन्याचा मुलामा असतो तो निघाला किंवा त्यावर चरे पडले तर लेन्स कॅमेऱ्याला नीट जोडली जाणार नाही.
फंगस अर्थात बुरशी:
आश्चर्य वाटल का? पण हा खूपवेळा दिसणारा प्रकार आहे. मुळात बुरशी येते कशी तर हवेतून. हवेत बुरशीची ण दिसणारी बीजं तरंगत असतातच. ती बीजं ओलसर ठिकाणी पडली कि त्याची वाढ होते आणि बुरशी दिसायला लागते. म्हणून कॅमेरातही ती हवेतूनच येते. कॅमेरा किंवा लेन्स च्या आतल्या वाजुला आली असेल तर साफ करणे महा त्रासाचे असते. इंटरनेट वर बुरशी साफ करायचे बरेच उपाय सापडतीलाही पण ती माहितगार माणसाकडून किंवा सर्विस सेंटर कडून साफ करून घेणे चांगले.
बुरशी आलीये हे कस कळतं तर कॅमेरयामध्ये किंवा लेन्स मध्ये पांढरट पिवळट तंतू सारखे काहीतरी दिसायला लागते. नीट बघितल तर त्याला अतिशय सूक्ष्म आडवे आडवे तंतू पण दिसतात. ती अगदी घट्ट काचेला किंवा लेन्सला चिकटलेली असते. फोटोत पण भुताटकी दिसायला लागते. काळपट , रात्रीच्या फोटोत जाणवून येत नाही. पण दिवसाचे , निळ्या आकाशाच्या फोटोमध्ये लगेचच दिसते.
बहुतेक वेळा हि आल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा येउ नये म्हणून प्रतिबंध करणे उत्तम.
सगळ्यात सोपा आणि बिन खर्चाचा उपाय म्हणजे कॅमेरा नेहेमी वापरत असावा. खूप दिवस बंद करून ठेवलेल्या कॅमेऱ्यात बुरशी होण्याची शक्यता जास्त असते. अगदी फोटो काढायचे नसेल तरी महिन्यातून एकदा नुसताच बाहेर काढून काही क्लिक कराव्या.
बुरशी वाढते ओलाव्यावर. म्हणून कॅमेरा ठेवल्याजागी ओलसरपणा दमटपणा नसावा. कॅमेऱ्याची बग ओली झाल्यास चांगली वाळवून मगच वापरावी. खाण्याचे पदार्थ असलेल्या बॅगेमध्ये कॅमेरा ठेवू नये.
आर्द्रता (humidity) नियंत्रित ठेवण्यासाठी कपाटे (cellar) मिळतात. पण ती फार महाग असतात.बरेच कॅमेरे आणि लेन्स असतील तर ठीक आहे.
पण इतरहि काही उपाय आहेत आर्द्रता कमी करण्यासाठी.
कॅमेरा बंद कपाटात ठेवून ज्या कप्प्यात ठेवला असेल तिथे एक बल्ब लावून ठेवायचा. यामुळे कप्पा गरम राहातो व आर्द्रता कमी होऊ शकते.
कॅमेऱ्याच्या दुकानात एक सिलिका जेल (Silica gel) मिळते. नावात जेल म्हटल तरी ते खडे असतात. साधारणपणे निळसर झाक असलेले आणि पारदर्शक असतात. नवीन घेतलेल्या बुटात , लेदर पर्स मध्ये पण याच्या चिमुकल्या पुड्या असलेल्या तुम्ही बघितल्या असणार. तेच हे सिलिका जेल.
पण ते असे चिमुटभर आणून उपयोग नाही. बऱ्याच प्रमाणात आणून आणून एका कापडात पुरचुंडी बाधून या कप्प्यात ठेवायचं. हे जेल हवेतली आर्द्रता (humidity) शोषून घेतं. पाणी साठवून त्याचा रंग बदलतो आणि ते अपारदर्शक पांढरट अस होतं. अस झाल कि एकदिवस कडक उन्हात वाळवायाच. मग परत ते पहिल्यासारख पारदर्शक बनतं. याला जेल रिजनरेट / रिस्टोर म्हणतात. एकदा विकत घेतलेले जेल बराच काळ रिजनरेट करत अस वापरता येतं.
काही वेळा पांढर जेलपण मिळत. हे जेल रंग बदलत नाही पण त्याच्या वजनावरून त्याच्यात पाणी शोषलं गेलय कि नाही हे ठरवता येत. पाणी शोषलं गेल असेल तर त्याच वजन अर्थातच वाढतं.मग रिजनरेट केल्यावर वजन कमी होतं.
आणखी एक उपाय मी बऱ्याच वर्षापूर्वी ऐकलेला आठवतो. तो म्हणजे ओव्याची पुरचुंडी (कॅरोम सीड्स) कप्प्यात ठेवायची. ओव्यात असलेल्या कुठल्याशा द्रव्याने बुरशीची वाढ बंद होते म्हणे. पण मी हा उपाय कधी केलेला नाही. अजून पर्यंत तरी माझ्या कॅमेऱ्यात बुरशी झाली नाहीये. ज्याना बुरशीचा त्रास असेल त्यांनी करून मला नक्की सांगा काय होत ते.
बघा हे उपाय करून तुमच्या कॅमेऱ्यातल्या बुरशीला आणि धुळीला टाटा करता येतोय का!
अजुन काही गोष्टींबद्दल पुढच्या वेळेला लिहायचा प्रयत्न करेन.
धन्यवाद आणखी माहितीची वाट
धन्यवाद
आणखी माहितीची वाट बघत आहे.
चांगली माहिती. धन्यवाद.
चांगली माहिती. धन्यवाद.
रैना, आउट्डोअर्स,सायो तुमच्या
रैना, आउट्डोअर्स,सायो तुमच्या विनंतिप्रमाणे ( वाचा: हुकुमाप्रमाणे) लिहायचा प्रयत्न केला आहे बघा आवड्तो का ते. तुमच्या प्रतिक्रिया कळ्वा.
उपयुक्त माहिती स्वप्नाली.
उपयुक्त माहिती स्वप्नाली. प्रिंट घेणारे.
धन्यवाद गं.
उपयुक्त माहिती. धन्यवाद.
उपयुक्त माहिती. धन्यवाद.
स्वप्नाली, खूप खूप अरिगातो
स्वप्नाली, खूप खूप अरिगातो गं. अतिशय छान आणि उपयुक्त माहिती. आमच्या विनंतीला (हुकुमावजा) मान देऊन वेळात वेळ काढून हे लिहिलंस त्याबद्दलही.
अगं, कॅमेरा जेव्हा नवीन होता तेव्हा मला एका फोटोग्राफर मित्राने हे सिलिका जेल दिलं होतं. ते मी गरम करुन ठेवायचे सुद्धा. पण नंतर एकदा कॅमेरा दुरुस्तीला गेला, तेव्हा त्या कॅमेर्याच्या बॅगबरोबर ही पुरचुंडीसुद्धा गेली. आणि गेली ती गेलीच. आता मला हे सिलिका जेल अगदी कॅमेर्याच्या दुकानातही मिळत नाहीये कुठे. पण हा ओव्याचा उपाय करून बघू कां?
फार उपयुक्त माहिती... धन्यवाद
फार उपयुक्त माहिती... धन्यवाद सावली
अशा वेळी सहसा कॅमेऱ्याची
अशा वेळी सहसा कॅमेऱ्याची लेन्स काढून
हे कसे करायचे???
लेंस वर UV filter कायम लाउन
लेंस वर UV filter कायम लाउन ठेवला तर लेंस ला प्रोटेक्शन मिळते . UV filter ने एक्स्पोजर ला काही ही फरक पडत नाही आणि लेंस साफ करण्या पेक्षा फिल्टर साफ करणे आणि गरज पडलीच तर बदलणे सोप्पे असते.
खुप महाग लेंस असतील तर rubber lens hoods मिळतात ती लावुन ठेवावीत, जर चुकुन लेंस पडली तर फुटणार नाही.
LCD veiwer वर लावायला ट्रांस्परन्ट फिल्म मीळते .
कॅमेरा शक्यतो फार वेळ उन्हात ठेउ नये , उन्हात खुप वेल कॅनेरा राहणार असेल तर त्यावर येखादा टॉवेल किंवा कपडा टाकुन ठेवावा
सगळ्याना धन्स. आऊटडोअर्स
सगळ्याना धन्स.
आऊटडोअर्स amazon वर सर्च करुन बघ. हे अस मिळेल
http://www.amazon.co.jp/阪神局方-シリカゲル-500g/dp/B0013Z8WOW/ref=pd_sim_hpc_1
जपान वरुन कोरिया ला amazon वाले पाठवतात का ते माहित नाहि। पण मग US वरुन मागवुन बघ.
हे ५०० gm अाहे ते सगळच एका उघड्या डब्यात ठेव
कॅमेऱ्याची लेन्स काढून >>>साधना जर तुझ्याकडे SLR कॅमेरा असेल तरच हे शकय अाहे. SLR कॅमेरा manual मधे लेन्स कशी काढायची ते असणार. हे कॅमेऱ्ा कंपनि प्रमाणे बदलते. बहुतेक वेळा डाव्या बाजुला एक बटण असते ते दाबून लेन्स फिरवून काढता येते.
पाटील
filter बददल खरतर नंतर लिहिणारच अाहे. पण बर झाल इथे टाकलेत. एक्स्पोजर ला काही ही फरक पडत नाही पण quality मधे कदाचित फरक पडू शकतो. हा फरक अापल्या नजरेला पटकन दिसत नाहि पण खुप जास्त enlarge केल तर दिसु शकतो. तरि महागड्या लेन्सला हा लावून ठेवणे बरे पडते. बहुतेक वेळा ते scrach proof करण्यासाठी असते.
उन्हात खुप वेळ कॅमेरा ठेवायचा झाला तर लेन्स काढून ठेवणे. का ते नंतर लिहेन मी.
धन्यवाद सावली. सध्या तरी
धन्यवाद सावली. सध्या तरी माझ्याकडे एसेलार नाहीये
अत्यंत उपयुक्त माहिती. माझा
अत्यंत उपयुक्त माहिती. माझा कॅमेरा गेली ५ वर्षे तरी नियमित वापरतोय. पण कधी त्याची साफसफाई करायचे धाडस झाले नाही. आता बघावे म्हणतोय.
सावली, मी लेन्सवर UV Filter
सावली, मी लेन्सवर UV Filter लावलेला आहे. लेन्सवर कचरा जमण्याचा इतका प्रॉब्लेम येत नाही मला, पण ह्या सेन्सरनेच अगदी वीट आणलाय मला. मागच्या भारतवारीत निकॉनच्या सर्व्हिस सेंटरला घेऊन गेले तर मला तिथला माणूस मला म्हणाला, हा फंगस क्लीन करायचा खर्च १५-२० हजार होईल. मी त्याला म्हटलं एवढ्या पैशात मी नवीन कॅमेरा नाही का घेणार? मग तो कॅमेरा मी तसाच भारतात ठेऊन आले होते. यावेळेस नवर्याला कॅमेरा घेऊन त्या सर्व्हिस सेंटरला पाठवला आणि क्लीन करून घेतला तर ४००० खर्च आला. त्या सेन्सरला हात लावायला खूप भिती वाटते गं.
त्या सर्व्हिस सेंटरमधल्या माणसाने मला सांगितलं की, फोटो काढून झाल्यावर जनरली आपण कॅमेरा लगेच आत ठेवून देतो, तसे न करता थोडा वेळ त्याला बाहेर ठेवायचा. तसंच बॅटरी म्हणे कॅमेर्यात ठेऊन देऊ नका, काढून ठेवत जा.
आऊटडोअर्स सेन्सरला हात लाउ
आऊटडोअर्स सेन्सरला हात लाउ नकोस. आपल्याला कितिहि स्वच्छ वाट्ल तरि आपल्या हाताला घाण असतेच.
कुठ्ल्याहि परिस्थितीत डिजिट्ल कॅमेर्याच्या सेन्सरला हात लाउ नका. सर्व्हिस सेंटरमधे ते लोक स्पेशल स्पेस आणि टुल्स वापरतात सेन्सर क्लीनींग साठी.
जर सेन्सर वर फंगस असेल तर खरच एवढा खर्च येवू शकतो. आणि त्यापेक्षा खरच नविन कॅमेरा घेण परवडत.
आता फंगस पूर्ण गेला असेल तर मी वर सांगितलेले उपाय करुन बघ. ओव्याचा उपाय करून बघ. नहितरि एक पूडीच ठेवायचि आहे त्या कप्प्यात. याने अपाय कहिच होणार नाहि.
परत फंगस आला तर मात्र तुला कॅमेरा बदलण्याबद्द्ल विचार कराव लागेल.
सावली, धन्यवाद. मी ओव्याचा
सावली, धन्यवाद. मी ओव्याचा उपयोगच करावा म्हणतेय. या फंगसच्या कटकटीमुळेच माझा कॅमेरा बदलायचा विचार चाललाय.
वरिल लेखात खाली दिल्याप्रमाणे
वरिल लेखात खाली दिल्याप्रमाणे थोडा बद्ल केला आहे :
अशा वेळी सहसा कॅमेऱ्याची लेन्स काढावि. कॅमेरा मेन्यू मधे मिरर लॉक अशा प्रकारचा एक ऑप्शन असतो. त्याने मिरर लॉक करावा. (कॅमेरा मन्युअल नीट वाचले तर याची नक्की माहिति मिळेल.) मिरर लॉक केले की सेन्सर दिसतो. मग कॅमेरा उलटा करुन म्हणजे सेन्सरचा (डिजीटल कॅमेऱ्याचा) भाग जमिनी कडे करून हळुवार पणे ब्लोअरने फुंकून टाकावी. हे करताना अगदी हळुवार पणे करणे नाहीतर सेन्सर खराब होऊ शकतो. एवढ्या एका उपायाने पण बराच फरक पडेल. कुठ्ल्याहि परिस्थितीत डिजिट्ल कॅमेर्याच्या सेन्सरला हात लाउ नये. ब्लोअर कॅमेर्याच्या अगदि आतल्या भागात पण नेऊ नये. शक्य तितका बाहेर ठेवावा. मिरर अचानक बंद झाल्यास ब्लोअरवर आपटुन मिरर खराब होइल.
माहितीपुर्ण लेख. ब्लोअर का
माहितीपुर्ण लेख.
ब्लोअर का वापरायचा ते पण सांग... तोंडाने लेन्सवर्/कॅमेरामधे कधिही फुंकू नये कारण तोंडातुन येणारी हवा दमट असते (कधि कधि तर त्यात थुंकीचे बारिक थेंबपण असु शकतात) त्यामुळे काही फायदा तर नाहीच.. झाला तर तोटाच होइल.
बाकी SLR साठी UV Filter असायलाच हवे.
अतिशय छान आणि उपयुक्त माहिती.
अतिशय छान आणि उपयुक्त माहिती.
मला हे नक्की कुठे विचारायचे
मला हे नक्की कुठे विचारायचे ते कळत नाहीया पण इथेच बहुधा बरोबर वाटते आहे. माझ्या कॅमेर्याच्या एस.डी कार्ड् मधुन काही फाईल्स लॉस झाल्या आहेत. कश्या रीकव्हर करायच्या? कुठ्ले रीलायबल सॉफ्ट्वेयर आहे का?
अमया बहुधा हा प्रश्न
अमया बहुधा हा प्रश्न http://www.maayboli.com/node/12225 -तंत्र आणि मंत्र इथे विचारलात तर जास्त योग्य उत्तर मिळेल. तुम्ही फाईल लॉस झाल्यावर त्यात पुन्हा फोटो काढले / सेव्ह केले नसतील तर फाईल रिकव्हरीचा काही चान्स असेल.
मी भांडुपला राहतो माझ्याकडे
मी भांडुपला राहतो माझ्याकडे सोनी कंपनी चा सायबर शॉट हे मोडेल आहे पण गेल्याच आठवड्यात मी अलिबाग गेलेलो त्यावेळी मित्रांनी त्याच्या मस्तीत वाळू गेली लेन्स मध्ये कॅमेराला ३ महिनेच झाले आहेत घेतल्यावर मला सांगेल का कोणी सोनी च जवळपास service center कुठे आहे.
सावली.... छान आणि उपयुक्त
सावली.... छान आणि उपयुक्त माहिती आहे..
मज़े अबूधाबी इथे वास्तव्य आहे. साध्या इथे कड़क उन्हाळा असल्याने बाहेरचे तापमान खुपच जास्त आहे. त्यामुळे घरात सतत AC चालू असतो..पण अशा एकदम कमी तापमानातुन उच्च तापमानात कॅमेरा नेल्यास लेंस आणि स्क्रीन वर moisture जमा होते. अशा वेळी काय करावे? या बद्दल सल्ला द्याल का?
माझ्या कॅमेऱ्याच्या
माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये फंगस दिसतंय. कॅमेऱ्याला काही issue नाहीये अजून तरी. काय करू?