गिनिपिग - भाग 1
``शशांक, मी काय म्हणतेय, अरे गेले पंधरा दिवस माझ्याशी तु धडपणे नीट बोलतही नाहीस . काय झालय काय तुला ?``
`` काही नाही ग. ऑफिसमध्ये एवढ काम साचलय न की मलाच कळत नाही कि मी ते कसे संपवेन ?``
``एचढच कारण ?``
``हो मग दुसर काय असणार ?``
``नक्की ?``
``अग ..,
``मग मला सांग चिन्मयचे रिपोर्टस आले ? गेले दोन तिन आठवडे झाले तु काहीना काही कारणाने त्याच्या रिपोर्ट बद्दल माझ्याशि बोलतच नाहीस . का काहि ...``.
``तस काही नाही ग, तु आराम कर बघु. आता तुझ्या डिलिव्हरिच्या डेटला दोनच आठवडे राहीलेत. तु खरच आराम कर ग``.
``बर मग मी अत्ता इथे आल्यावर तु नेटवर कसली साईट बघत होतास ?``
``साईट?``
``हो ती बघ तु खाली ती मिनिमाईज करुन ठेवलीयस``.
`` बापरे 9.30 वाजले ?अग चल माझ्या लक्षातच नाही बघ. चल मी जेवायची पान घेतो. ``.
``मला आधी ती साईट बघु दे``.
``अग काय सारखी साईट साईट करत्येस ? माझ्यावर विश्वास नाही का ?``
``आहे न, मग बघु दे की मला. तुला काय प्रॉब्लेम आहे ?``
``प्रत्येक गोष्ट तुला कळलीच पाहिजे का ?`` अस म्हणत शशांक ने पिसी स्विच ऑफच करुन टाकला.
``हे बघ बाईनी सगळा स्वयंपाक तयार करुन ठेवलाय. ट्रेनने ऑफिसमधून येतांना मि घामाने भिजलोय.पटकन आंघोळ करुन येतो. दोन मिनीटात आलोच, लगेच जेवायला बसू. चिन्मयला पण भुक लागली असेल,`` सावनीच्या मनात आले शशांक माझ्याशी कधी असा वागु शकेल अशी कल्पनाही नव्हती. काय बघत होता तो ? सावनीने सर्व विचार बाजूला केले व पिसीचा स्वीच ऑन केला. नेट लॉगईन केल्यावर स्क्रिन वर आले, ``जुनेच सेशन चालु ठेवायचे की नवीन सेशन स्टार्ट करायचे`` तिने पटकन जुन्यावरच क्लिक केले. समोरची साईट बघुन तिला धक्काच बसला. एक भयानक कळ अंगभर पसरली. पटकन तिने पिसी बंद केला.
``झोपला कां ग चिन्मय ? ``
``हो झोपला पण काही जास्त खाल्ल नाही. भुक नाही म्हणतो, हल्ली त्याचे जेवण एकदमच कमी झालेय. एक विचारु ....... त्याला कॅन्सर झालाय का ?``
``कोण म्हणतो कॅन्सर झालाय ? तुझ डोक बिक फिरल काय ?``
``तु माझ्यावर कां चिडतोस ? तु आंघोळीला गेल्यावर मघाशी मी पिसीवर तु बघत असलेली साईट बघितली. ल्युकेमियाची होती. पण म्हणजे , चिन्मयला ... आणि तु हे माझ्यापासून लपवलेस ? का मी कुणीच नाही त्याची ?``
``हे बघ, हे बघ, मी तुला ..." आणि शशांकचे डोळे भरुन आले.
``हे बघ काय झाल मला नीट सांगशिल का ?`` शशांकच्या डोळ्यासमोर तो पंधरा दिवसापुर्वीचा प्रसंग आला.
``या , या बसा``
``सर, नाही म्हणजे तुम्ही मला अहोजाहो करु नका. नुसत शशांक म्हटल तरी चालेल.``
``बर बर. मलाही आवडेल तस म्हणायला. कारण तुम्ही माझे पेशंट नाही , तु .. म्हणजे चिन्मय माझा पेशंट व्हायच्या आधी तु माझ्या मुलाचा शाळेतला मित्र आहेस. मला तुझ्याशी थोड बोलायचही होत म्हणून तुला सर्वांत शेवटी थांबवून ठेवल. शशांक चिन्मयचे सगळे रिपोर्टस गेल्याच आठवडयात आलेत. पण मीच तुला सांगायला उशीर केला. त्याला ल्युकेमिया, म्हणजे ब्लड कॅन्सर आहे. माझ्या मते तो जस्ट सेकंड स्टेजला आहे. पण मीही ज्यांना माझे सिनियर मानतो ते डॉ. फोर्ड जे न्युयॉर्कला असतात त्यांच्याकडेही हे सगळे रिपोर्टस मि पाठवले होते. कालच त्यांचा मेल आला की त्यांच्यामते ही पहिलीच स्टेज आहे. "
डॉ. गोखल्यांच्या प्रत्येक शब्दा गणीक शशांकचा धीर सुटत होता.
``अस कस हो झाल डॉक्टर ? हा एवढासा तीन वर्षाचा मुलगा ? देव एवढा निष्ठुर कसा हो ?"
``शांत हो शांत हो शशांक, हे आधी पाणी पी बघु`` ग्लासभर पाणी प्यायल्यावर शशांक दोन मिनिटे खुर्चीतच हबकुन बसला होता.
``डॉक्टर खरतर हा मुलगा झाला व माझ नशीबच उजळल. हा झाल्या झाल्या मला प्रमोशन मिळाले, तुम्हाला माहीतीच आहे आम्ही दोघेही आय.टी. इंजिनियर आहोत. पण हिला प्रेग्नसीमध्ये खुप त्रास व्हायचा. सारखी रजा घ्यावी लागायची व त्यात आय.टी. सेक्टरमध्ये रिसेशन आले होते, तेव्हा कंपनीने हिला तात्पुरते ओव्हरस्टाफ म्हणून कमी केले. पण हा झाल्यावर तिन महिन्यातच तिला कंपनीने परत बोलावले. गेल्याचवर्षी आम्ही नविन घरातही शिफ्ट झालो. आमचीच आम्हाला दृष्ट पडली असणार. "
``शशांक , शशांक जस्ट रिलॅक्स . अरे आत्ता तर लढाईला सुरवात झालीय आणि तु आधीच शस्त्र खाली ठेवतोस ?
``लढाई, कसली लढाई ? कॅन्सर म्हणजे .... चिन्मय ``अस म्हणत त्याने आपले तोंड ओजळीत लपवले.
`` शशांक हे बघ तुच जर असा ढेपाळलास तर तुझ्या मिसेसच , नांव काय म्हणालास तिच ? "
``सावनी``
``हं सावनि . तर तीचि काय अवस्था होईल ?``
`` ति प्रेग्नंट आहे. आत्ताच नववा महिना सुरु झाला आहे``.
`` हे बघ चिन्मयचि ही गोष्ट तिचि डिलिव्हरी होईस्तो शक्यतो तिच्यापासून लपवुन ठेव. तिला आणखिन काहि त्रास व्हायला नको."
``पण डॉक्टर अचानक हा रोग, म्हणजे ह्याचे सिम्टन्स कधी दिसले नाहीत.``
``हे बघ तुला मी साध्या भाषेत सांगतो. आपल्या शरीरातील जी काही मोठी लांब हाडे असतात न म्हणजे मांडितले , स्पाइनचे , ज्यात बोनमॅरो असतो. खर सांगु हे आपल शरीर आहे न ती म्हणजे अलीबाबाची गुहा आहे. त्यात जेवढे आत शिराल तेवढे नवीन नवीन पहायला, शिकायला मिळते. हे सर्व बघुन थक्क व्हायला होते व ज्याने आपल्याला बनवल त्या विधात्या पुढे किंवा त्या शक्तिपुढे नतमस्तक व्हायला होत. आपल्या शरीरात एक अग्राच्या शतांश ही अशी गोष्ट नाही जिचा उपयोग नाही. तर मी काय सांगत होतो... हं म्हणजे हे सर्व मी तुला ह्या रोगाची बेसिक कल्पना यावी म्हणून सांगतोय. तर ह्या मॅरो मध्ये इममॅच्युअर ब्लड स्टेमसेल्सची निर्मिती होते. ज्याचच पुढे मॅच्युअर ब्लड सेल्समध्ये रुपांतर होत. ह्यात सुध्दा पुढे बरेच प्रकार आहेत पण एवढच सांगतो की ह्यातले एका टाईपचे सेल रेड ब्लड सेल तयार करतात ज्यांच्यामुळे आपल्या शरीराला ऑक्सीजनचा पुरवठा होतो. दुसरे व्हाईट ब्लड सेल तयार होतात. ज्यांचा उपयोग आपल्याला रोग प्रतिकारक शक्ति करता होतो व तिसरे प्लेटलेटस म्हणजे ज्यांच्यामुळे एखादी जखम झाली, रक्त वहायला लागले तरी ते लगेच गोठ्ते. चिन्मयच्या रक्तात काही कारणाने पांढ-या सेल्सची जास्त निर्मिती होते. ह्याचीच प्रचंड प्रमाणात निर्मिती झाल्याने बाकीच्या सेल्सना जागाच राहात नाही, व जे आहेत ते वीक होतात . असंच दुष्टचक्र सुरु होते``.
``ह्यालाच ब्लड कॅन्सर म्हणतात ?``
``हं म्हणजे त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे. पुर्वी असे होत की कॅन्सर म्हटले किंवा नुसते टाटात जाऊन चेकिंग करा म्हटल तरी माणस हाय खायची व त्यानेच आधी जायची. शशांक आता अशी गोष्ट राहिली नाही. बरच संशोधन सुरु आहे``.
``पण मग तुम्ही म्हणालात ही पहिली स्टेज, दुसरी स्टेज म्हणजे काय ?``
``पहिली स्टेज , दुसरी स्टेज ही पांढ-या सेल्सच्या रक्तातल्या काऊंटवरुन व आणखीन काही गोष्टींवरुन ठरवतात. चिन्मयची जर ही डॉ फोर्ड ह्यांच्या म्हणण्यानुसार पहिलीच स्टेज असेल तर सुरवातीला काही टॅबलेटस् आहेत त्या देऊन पाहुया. रेडिएशन , केमोथेरपीचीही शक्यता बघावी लागेल , नाहीतर मग बोनमॅरो ट्रान्सप्लांट ही कराव लागत. हे म्हणजे अगदी सगळे उपाय थकले तर . तु तर आय.टी. मधलाच आहेत म्हणून सांगतो, नेटवर ह्या विषयीच्या ब-याच साईटस आहेत त्या तु बघ. तुला त्यातुनही बरीच माहिती कळेल. "
``डॉक्टर कसही करुन चिन्मयला वाचवा. माझा जीव की प्राण आहे तो``.
``शशांक मी एवढच सांगतो की आता आपण ह्यावर औषधोपचार सुरु करुयात. पण शंभर टक्के बर होण्याची कुणीच खात्री देऊ शकत नाही एवढच लक्षात ठेव``.
``हे काय , आज परत उशिर." डॉ. गोखल्यांकडुन आल्याआल्या सावनिने विचारले.
``आता सगळेच महीने मार्चसारखे व्हायला लागलेत". आता त्याला सावनिशि काहीना काही खोटे बोलाव लागत होत .खरतर इतक्या वर्षात दोघांनीही एकमेकांपासून काहीही लपवल नव्हत. पण आता त्याला खुप जड जात होत. प्रेग्नन्सीमध्ये दोनदा सावनीला अतिबिल्डींगमुळे हॉस्पीटलमध्ये ठेवाव लागल होत. डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे डिलिव्हरी होईस्तो तरी ही गोष्ट त्याला तिच्यापासून लपवावीच लागणार होती.
``अरे मला समजत का नव्हत की तु माझ्याशी खोट बोलतोयस म्हणून....``
``नाही म्हणजे , तुला आधीच त्रास , त्यात हे सांगण म्हणजे ... पण हे बघ तु आता ह्यावर जास्त विचार करु नकोस . आधी तुझी डिलिव्हरी होऊन जाऊ दे ."
चिन्मय शांतपणे बाजुला निजला होता. त्याच्या केसातून हात फिरवताना तिला रडु कोसळले. एक हात चिन्मयच्या डोक्यावर व एक हात पोटावर ठेऊन रडतच ति म्हणाली ``अरे देवा "
" ह्याचकरता, ह्याचकरता मी तुला सांगत नव्हतो. कधी नव्हे ते खोट बोलत होतो``.
चिन्मयचा व शशांकचा हात आपल्या दोन्हि हातात धरुन ती रडतच होती.
जरा सावरल्यावर ति म्हणालि ``डॉक्टर काय म्हणाले ? बरा होईल न तो ? "
``हो, म्हणजे त्यांच्या म्हणण्या प्रमाणे ह्या रोगाची चिन्मयचि हि फर्स्ट स्टेजच आहे. त्यामुळे आतातरी काही औषध देऊन बघणार आहेत की बॉडी त्याला किति रिस्पॉन्स देते ते ."
``मला काही समजेनासच झालय रे, पण जर मग औषधाने बरा झाला नाही तर -"
`` माझे रोज संध्याकाळी डॉ. शी बोलणे होतय. त्यांचेही प्रयत्न सुरु आहेत. म्हणजे त्यांनी ह्याची केस काही खाजगि कंपन्या ज्या ह्याच्यात रिसर्च करत आहेत त्यांनाही कळवले आहे. आता त्याला औषधही सुरु केलीत. त्याचा थोडा परिणाम होईल. थोड त्याला ग्रिडीनेस येईल. उलटी होतेय की काय अस वाटेल, भुक कमी होईल पण काही दिवसांनी त्यांनी परत काही टेस्ट करायला सांगितल्या आहेत``.
``खरतर गेले वर्षभर मी किति सुखात होते. खरच आपल सगळ व्यवस्थित झाल होत. नवीन घर ही मिळाल. चुकुन का होईना पण मनात नसतांना आपण दुस-या बाळाकरता ही तयार झालो. अस सगळ होताना आपल्या संसाराला अचानक हे कसल ग्रहण लागल ?"
``हे बघ आता आपल्याला धीरानेच सर्व घ्यावे लागेल. आणि तु जास्त त्रास करुन घेऊ नकोस``.
`` पण कॅन्सर आणि नुसत्या गोळ्यांनी बरा होईल ?``
``नाही म्हणजे पुढे जर गोळ्यांनि बर वाटल नाही तर रेडिएशन , केमोथेरपी , नाही तर बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट ......."
``बापरे " म्हणत तिने चिन्मयला कवटाळले.
"केमोथेरपीने काय अवस्थ होते ती पाहिलीय मी एका ओळखीच्यांची. पण हे बोनमॅरो म्हणजे ......"
``अग म्हणजे`` - शशांकने डॉक्टरांनी सांगितलेले सर्व सांगायला सुरवात केली.
``.... जास्त करुन तो मॅच पेशंटच्या भावंडातच होतो ``.
``नाही ह.. मी नाहि ह्या बाळाला हात लाऊ देणार . ``सावनी ओरडलीच.
``अग शांत हो , शांत हो . ते काय लगेच बाळाच बोनमॅरो चेक करायला व मँच करायला काढणार आहेत का ?"
``काहीही झाल तरी एवढ्याश्या ह्याला मी कसा हात लाऊ देईन ? बोनमॅरो कसा टेस्ट करतात ते माहितीय मला`.
``अग एवढी काय एक्साइट होतेस. हे सर्व लगेच का करणार आहेत ? आणि पुढे मागे कधी कराव लागल तर काय झाल ? "
``तुम्हा पुरुषांच बरय रे. तुम्ही फक्त बाप होण्याच कार्य करता व नामानिराळे राहता. आमच तस नाही. नउ महिने ह्यांना पोटात वाढवतो. ही मुल असतात ती आमच्याच रक्तमांसापासून वाढतात. त्याचि वेदना , संवेदना आहे न ती मि तुला सांगु शकत नाहि . काही महिन्यांपासून हे बाळ न मी आनंदी असले की काय लाथा मारत , पोटात फिरत काय ,त्या.. त्या स्पर्शातुनही ते आनंदी असल्याच कळत. ते मऊ मऊ पाय , पायच किंवा हातही जेव्हा आत पोटात स्पर्श करतात ना , तो स्पर्श ...नाही हे तुला कस कळणार? म्हणून बाळाचि जेवढी ऍटॅचमेंट आम्हाला असते तेवढी ती तुमच्याशी नसते. जाऊ दे, मला झोप आलीय. मी झोपते आता``.
आता ह्या क्षणी तरी तिला चिन्मय सोडुन दुसर कुणीही जवळ असू नये असच वाटत होत, अगदी शशांक सुध्दा. म्हणुनच तिने झोपायच कारण सांगितले. बापरे म्हणजे आपण इतके त्रास सोसुन नऊ महिन्यापर्यंत ह्यांना पोटात सांभाळायच आणि हा एवढा मोठा झालेला मुलगा अचानक ह्याच्यात काही तरी अॅबनॉर्मिलिटी होणार आणि हा आपल्या पासून दुर जाणार? शशांकला कळु नये म्हणून ती दात ओठात घट्ट धरुन रडत होती. चिन्मयच्या अंगभर हात फिरवत होती. कुठली आई आपल्या मुलाची काळजी घेणार नाही ? त्याच खाण पिण व्यवस्थितच करणार. आपणही काही कुठे कमी केल नाही. मग हे अस अचानक रक्तातअॅबनॉर्मिलीटी येते कशी? बोलताना शशांक म्हणाला की जेनेटिक डिसऑर्डरने ही हे होवू शकत. म्हणजे , म्हणजे आपल्या पोटातल्या बाळालाही हे होउ शकेल ?. तिला गरगरायला लागल. पोटात आगडोंब उसळल्यासारखे झाले. शेवटी व्हायचे तेच झाले. दोन आठवडे आधीच डिलीव्हरीकरता तिला मॅटर्निटीहोममध्ये हलवाव लागल.
छान चालु आहे... पण अवनी की
छान चालु आहे... पण अवनी की सावनी...?
(No subject)
कथा चांगली आहे...लवकर येऊ
कथा चांगली आहे...लवकर येऊ द्या पुढचा भाग...
पण अवनी की सावनी...?>> अनुमोदन.
खुप छान... प्रस॑ग समोर चालु
खुप छान... प्रस॑ग समोर चालु आहे अस वाट्ल.....
लवकर येवु द्या पुढचा भाग....
लवकर येवु द्या पुढचा भाग.... छान जमलीये पुलेशु
फार भावनीक व्हायला होत रे
फार भावनीक व्हायला होत रे सुनील ही कथा वाचताना.
थोडेसे अवांतर फक्त
थोडेसे अवांतर फक्त माहितीसाठी.
नवजात अर्भकाचे बोनमॅरो पाहिजे असे नाही तर कॉर्ड ब्लड पण कॅन्सर च्या उपचारासाठी चालते.
आम्च्या इथे एक कपल आहे, त्यांच्या पहिल्या मुलिला कॅन्सर झाला म्हणुन तिच्या उपचारासाठी ते मुद्दामुन प्रेग्नट झाले आणि कॉर्ड ब्लड वापरुन मुलिचा कॅन्सर बर पण झाला.
http://kidshealth.org/parent/pregnancy_newborn/pregnancy/cord_blood.html
लेख छान आहे, प्रसंग भयानक
लेख छान आहे, प्रसंग भयानक आहे. फक्त एक सुधारणा करा अतिब्लिडिंग चे >>>अतिबिल्डींगमुळे झाले आहे.