२ कच्ची केळी (plantains) उकडून आणि खिसून
२ मोठे बटाटे उकडून आणि खिसून
२ गाजर खिसून आणि वाफवून
२ मोठे कॉलीफ्लावरचे तुरे खिसून आणि वाफवून
१/२ वाटी मटार वाफवून
१/२ वाटी मक्याचे दाणे वाफवून
१ मध्यम लाल कांदा बारिक चिरून (असल्यास कांद्याची पात बारिक चिरून)
१ वाटी पनीर खिसून
१ मोठा चमचा आलंलसूण पेस्ट
मूठभर कोथिंबीर बारिक चिरून
मूठभर पुदिना बारिक चिरून
१ मोठा चमचा भरून हि. मिरची बारिक चिरून
१ टि. स्पून धने पावडर
१ टि. स्पून जीरे पावडर
१-२ टि. स्पून चाट मसाला
१ टि. स्पून बडिशेप भरड कुटून
१ टे. शानचा शीख कबाब मसाला (नसला तर गरम मसाला)
१/२ वाटी काजू तुकडे
लागतील तसे ब्रेडक्रम्स
चवीपुरते मीठ
वरील सर्व जिन्नस एकत्र करुन १/२ तास ठेवावे.
हवा तसा आकार देऊन (गोल चपटे किंवा शीख कबाब सारखे लांब) तळून घ्यावेत किंवा शॅलो फ्राय करावेत. कोळशाच्या ग्रीलवर ग्रील केले तर सुंदर चव येते. सर्व्ह करण्याआधी थोडा चाटमसाला भूरभूरावा.
कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, जीरे वाटून दह्यात कालवलेल्या चटणीबरोबर सर्व्ह करावेत. सोबत कांदा, लिंबाच्या चकत्या द्याव्यात.
धन्यवाद अंजली. चवदार पाकृ.
धन्यवाद अंजली. चवदार पाकृ.
वा वा मस्त!
वा वा मस्त!
मस्तच! नक्की करणार!
मस्तच! नक्की करणार!
खुप खुप धन्यवाद अंजली.
खुप खुप धन्यवाद अंजली.
मस्त !
मस्त !
अरे वा मस्तच
अरे वा मस्तच
मस्त!
मस्त!
मस्तच एकदम चमचमीत
मस्तच एकदम चमचमीत वाटतायत...करुन पहाणार नक्की!
अंजली, मस्तं रेसिपी . BBQ
अंजली,
मस्तं रेसिपी :).
BBQ ग्रिल वर केलेले कबाब पण क्रिस्पी होतात का ?
हो होतात गं. पण ते काड्यांना
हो होतात गं. पण ते काड्यांना लावून फिरवण्याच तंत्र जमलं पाहिजे.
आंजाक्का, व्हेज कबाब्ज आहेत
आंजाक्का, व्हेज कबाब्ज आहेत म्हणजे करुन बघता येतील पण जमल्यास फोटो टाकायला काय घ्याल?
तोंपासु!!! पण पूर्वतयारी खूप
तोंपासु!!!
पण पूर्वतयारी खूप आहे बुवा
मस्तच! मी केळी घालून पाहिलं
मस्तच! मी केळी घालून पाहिलं नाही कधी. नक्की करून पाहीन.
अरे वा घरी आलीच आहेत कच्ची
अरे वा घरी आलीच आहेत कच्ची केळी. आता करेनच.
सायोतै, परत केले की काढते
सायोतै,
परत केले की काढते फोटो. परवा फोटो काढायची आधीच लोकांनी कबाब पळवले
धन्यवाद अंजली. छान झाले.
धन्यवाद अंजली. छान झाले. सर्वांना खूप आवडले. फोटो टाकते आहे.
काजू आणि पात सोडल्यास मी बाकी सगळे घातले. फोटोतल्या आकाराचे २८-३० कबाब झाले.
हे भाजण्यापूर्वी
नंतर. काही ग्रिलवर भाजले काही शॅलो फ्राय केले पॅनमध्ये. ग्रिलवरचे छान कुरकुरीत होतात.
आज त्याचे रॅप केले. कांदा, टोमॅटो, चिरलेली ताजी मेथी आणि चटणी घालून fajita ..
लालू, मस्त दिसत आहेत फोटो
लालू,
मस्त दिसत आहेत
फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद...
आयहाय.. कसले दिसतायत ग लालू.
आयहाय.. कसले दिसतायत ग लालू. अगदी तोंपासु.
मस्त फोटो!
मस्त फोटो!
मस्तच्.........करुन बघणार!
मस्तच्.........करुन बघणार!
कल्लोळातली एक चवदार रेसिपी!!
कल्लोळातली एक चवदार रेसिपी!! यम्म....
छान
छान
अंजली कल्लोळाला हे वेज कबाब
अंजली कल्लोळाला हे वेज कबाब केले होतेस का? अमेझिंग टेस्ट होती याची
रूनी, हेच कबाब होते.
रूनी, हेच कबाब होते.
धन्यवाद अंजली. कालच हे कबाब
धन्यवाद अंजली. कालच हे कबाब केले होते.छान झाले. सर्वांना खूप आवडले. मी ओव्हन मधे ग्रिल केले. खूप छान कुरकुरित झाले होते.
मस्त रेसीपी. प्रिया७, किती
मस्त रेसीपी.
प्रिया७, किती तापमानावर व किती वेळ ओव्हन मधे ग्रिल केले होतेस?
मस्त दिसताहेत हे
मस्त दिसताहेत हे
व्वा लालु, मस्तच दिसतायत कबाब
व्वा लालु, मस्तच दिसतायत कबाब
अंजली, कच्च्या केळ्याच्या ऐवजी काय घालता येइल? की बटाटेच जास्त घालुन बघु?
आश ३७५ degree F वर ग्रिल
आश ३७५ degree F वर ग्रिल केले. ४५ मिनिट लागले. मी सारखे चेक करत होते आणि उलटवले १-२ दा. फॉईल वर ऑईल स्प्रे मारुन ठेवले होते. ग्रिल करायचि जाळि असेल तर लवकर होतिल आणि अजुन छान होतिल.
धन्स प्रिया. चला या विकांताचा
धन्स प्रिया. चला या विकांताचा मेन्यु तयार!
Pages