पोस्ट्मन काका

Submitted by सुनिल जोग on 28 May, 2010 - 06:23

बरयाच दिवसानी घरी परतलो. कारणही तसच होतं. माझे वडील वारले होते. दिवस कार्य सुरू होते.विविध क्शेत्रातील परिचयातील माणसे,नातेवाइक भेटून सांत्वन करून जात होते. इतक्यात एक चेहरा ओळखीचा पण नाव काहीकेल्या आठवत नव्हते. माझी गडबड पाहून ते स्वतःहून पुढे आले आणि म्हणाले" अरे सुनिल ना तू ? मी देशपान्डे काका - तरीही माझ्या चेहर्यावरील प्रश्न्चिन्ह पाहून हसले आणि म्हणाले अरे मी पोस्ट्मन काका ! "
मी कसनुसं हसलो. शेवटी त्यानीच पुढाकार घेऊन गप्पांचा ओघ पुढे नेला. मी हो हो करत होतो पण काकांचा उत्साह पाहून त्याना थाम्बवण्याचे धाड्स होइना. मी श्रवणभक्त झालो. मला पण कळत नव्ह्ते की पोस्ट्मन ने समाचाराला येणे कसे काय आणि याचे नाते काय आणि कसे.
पुढे त्यानी जो किस्सा सांगितला तो ए॑कून मी आशर्यचकितच झालो. काका सांगू लागले.आमची खूप वर्शाची मेत्री होती. रोज पोस्ट्मन काका हळी द्यायचे - "जोग ! की माझे बाबा ग्यालरीतून दोरीला बान्धलेला चिमटा खाली सोडायचे.की त्या चिमट्याला पत्रे लावली जात आणि ती दोरी माझे बाबा वर ओढून वर घेत. " माणूसकीला जपणारा माणूस होता तुझा बाप!. अरे मी एक साधा पोस्ट्मन पण माझे गुढगे दुखतील म्हणून काळजी घेणारा कोण असतो आजच्या जगात ? " असे म्हणत त्यानी डोळे पुसले. मी अवाक झालो. एव्ह्ढी माणूसकी जपणारा आहोत का आपण असा प्रश्न पड्ला.काका केव्हा गेले ते कळले नाही. अजूनही त्यान्ची मूर्ती डोळ्यासमोर आहे - काळ होता - २८ वर्षापूर्वीचा ! आपण किती बदललो आहोत पण माणुसकी कुठे गेली ?

गुलमोहर: 

नमस्कार सुनिल जोग. मायबोलीवर आपले स्वागत आहे.
आपण लिहीलेला वरील किस्सा हा कथा म्हणून तुम्ही लिहीला आहे का? का खरेच घडलेला किस्सा आहे?
खरेच घडलेला किस्सा असेल तर अशा किश्श्यांसाठी वेगळा धागा आहे
http://www.maayboli.com/node/7241

कृपया आपले किस्से तिथे लिहीलेत तर ते यथोचित ठरेल. धन्यवाद !