Submitted by अमृता on 25 May, 2010 - 12:13
इथे मिरच्यांच्या चटण्या, ठेचे, तिखट्या इ. तोंपासु पाककृत्या येउदेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे मिरच्यांच्या चटण्या, ठेचे, तिखट्या इ. तोंपासु पाककृत्या येउदेत.
आईग.. हे असले प्रकार कधी केले
आईग.. हे असले प्रकार कधी केले नाहीत मी!
आता करून पाहणार!
अहाहाहा!! अमृताबाई, एकावर एक
अहाहाहा!!
अमृताबाई, एकावर एक बाफ काढताय तुम्ही!! तांदळाची भाकरी काय, मिरचीचा ठेचा काय!!
आता एक झुणका/पिठलंचा आणि एक भरल्या वांग्याचा काढ!
करणं जमलं नाही तर नुस्ते बाफ वाचून दु त ता भागवेन!
करायला पण जमव. बस्के, सगळे
करायला पण जमव.
बस्के, सगळे प्रकार आत्ता करायला मुख्य म्हणजे खायला जाउ नकोस.
सहीच.. मिर्ची ठेच्याचे फॅन
सहीच.. मिर्ची ठेच्याचे फॅन सगळॅच असतील :).
पुण्यातला प्रसिध्द 'गणेश भेळ' (कोथरुड मधला) भेळे मधे पण लाल मिर्ची-लसुण घालून केलेला ठेचा घालतो .. थोडा फार वर्हाडी ठेच्या सारखी चव असते त्याला, आंबटपणा कमी असतो ठेच्याला, पण तय सवयीमुळे भेळ मिर्ची लसुण ठेच्या वाचून खाणे म्हणाजे फार च मिळमिळीत !!..
आमच्या आईच्या भेळ रेसिपी मधे हा ठेचा आणि चिंच गुळाच्या पाण्यात सुध्दा थोडा कान्दा लसुण मसाला असतो.. झणाझणीत सही लागते !!....तों पा सु..
Schezwan हक्का नुडल्स करताना Schezwan sauce ऐवजी वर्हाडी ठेचा घातला तर मस्तं होतात :).
डिजे, भेळेची तशीच लाल
डिजे, भेळेची तशीच लाल मिरच्या,लसूण वाली चटणी इथेही मिळतेच की. तसंच स्वादचं रेडिमेड भेळेचा पॅक आणला तर त्यातही येते ती चटणी. मस्त झणझणीत होते त्याने भेळ.
सायो, चटणी नाही गं, ठेचा
सायो,
चटणी नाही गं, ठेचा टाइप.
स्वाद ची खाली होती कधी तरी भेलपुरी, चांगली होती .
मिरचीचा ठेचा ठेचा खाल्ला की
मिरचीचा ठेचा

ठेचा खाल्ला की तोंडातुन ,नाकातुन , डोळ्यातुन , अजुन कशाकशातुन पाणी सुटतं
अग इथे बाटलीत येते ती अगदी
अग इथे बाटलीत येते ती अगदी घट्ट ठेचा टाईप नाही पण पातळही नाही. अशा टाईपची चटणी आहे. आणून बघ कधीतरी
बायांनो, बाफ फार चांगला आहे.
बायांनो, बाफ फार चांगला आहे. अगदी तोंपासु. पण आता दोन दिवसांनी आरोग्यम धनसंपदामध्ये दुसरा एक बाफ काढायला नाही लागला म्हणजे मिळवली

अगो, उद्याच जळजळ फॅन क्लब
अगो, उद्याच जळजळ फॅन क्लब काढणार आहोत. जॉइन कर.
पण आता दोन दिवसांनी आरोग्यम
पण आता दोन दिवसांनी आरोग्यम धनसंपदामध्ये दुसरा एक बाफ काढायला नाही लागला म्हणजे मिळवली
अगो, उद्याच जळजळ फॅन क्लब काढणार आहोत.
>>
अगो, ते चीज केकसारख नाही
अगो, ते चीज केकसारख नाही खायच. चटणीसारखं खायचं. थोड तिखट खाणं चांगल अस परवा रेडिओवर ऐकलं.
थोड तिखट खाणं चांगल अस परवा
थोड तिखट खाणं चांगल अस परवा रेडिओवर ऐकलं. >>>> हो, शरीर डिटॉक्स होते ना
अगो अजून एक प्रकार हिरव्या
अगो
अजून एक प्रकार
हिरव्या मिरच्या तळून त्याचे बारीक तुकडे करायचे आणी त्यात दाण्याचं कूट, मीठ, साखर आणी घट्ट गोड दही घालायचं
मूग-तांदळाच्या खिचडीबरोबर मस्त लागतं
खरंच तोंपासू !!!
खरंच तोंपासू !!!
माझ्याकडे पण खूप रेसीपीज आहेत
माझ्याकडे पण खूप रेसीपीज आहेत ठेच्याच्या.
हे तोंपासू म्हणजे नक्की काय?
इथे कुणी पित्झ्यावर पसरवतात ती डाळिंबी चटणी वापरली आहे का?
लाल सुक्या मिरच्यांना एक दिवस उन द्यायचं. त्या खणखणीत वाळल्यात की कढईत एक दोन चमचे तेलावर मिरच्या भाजायच्या. मग त्यात अर्धा चमचे मीठ घालायचे. मिक्सरमधून इतकं भरडं काढायचं मी डाळिंम्ब्या दिसायला हव्यात. चव खूप वेगळी येते या चटणीची. हवं तर थोडं सुक खोबर, धणे पण घालता येतात.
मस्त बीबी. ठेच्यात दही घालून
मस्त बीबी. ठेच्यात दही घालून वरून तेल मोहरी कढीपत्ता घालूनही मस्त लागते.
तोंपासू-तोंडाला पाणी सुटले
तोंपासू-तोंडाला पाणी सुटले -बहुतेक
अमृता, काढलास बीबी!!
अमृता, काढलास बीबी!! सही!
सगळ्याच पाकृ मस्त..
रच्याकने, हा माबोवरचा सगळ्यात "जहाल" बीबी म्हणून प्रसिध्द होईल असं दिसतयं
नुसत्या रेसिप्या वाचून
नुसत्या रेसिप्या वाचून तोंपासू, आणि हा फोटो पाहून? ???
भोमाकफ
दक्स..भोमाकफ??????? म्हंजे
दक्स..भोमाकफ??????? म्हंजे काय गं????????
मला तर हा बीबी खूप्प्प्प्प
मला तर हा बीबी खूप्प्प्प्प आवडलाय्..सध्या रेसिपीज वाचूनही खोकला येतोय्(:राग: )
पण सर्व रेसिपीज उतरवून घेईन मात्र
भोआकफ माहीतीय .. भोगा आपल्या
भोआकफ माहीतीय .. भोगा आपल्या कर्माची फळं.. मा म्हणजे माझ्या असावे!
फोटो.. तोंपासु !
ओ धन्स बस्के
ओ
धन्स बस्के
कांदा चटणी २ कांदे, जरा तुकडे
कांदा चटणी
२ कांदे, जरा तुकडे करून घ्या + चांगले ४/५ चमचे लाल तिखट + मीठ + दाण्याचे कूट १ च. मस्त फिरवून ह्या. अगदी गंध नको पण बारीकच करा. याला १ च. तेलाची मोहोरी, हिंग व परत १ च. लाल तिखटाची फोडणी द्या.
अगदी मस्त चरचरीत!
झाली चटणी. काय? तोंपासू की नाही?
बापरे! काय तिखट खाता गं! मला
बापरे! काय तिखट खाता गं!
मला अजिबात सहन होत नाही तिखट, एकदम कोकणस्थी गोडखाऊ मी या बाबतीत. दोन रुपायांच्या मिरच्या मला महिनाभर जातात! 
त्यामुळे नुस्त्याच कृती वाचते. (कोणी करून दिला तर नखभर खाईन ;)) मस्त वाटत आहेत. फोटोही येत आहेत मस्त मस्त
पूनम खाऊन पहा गं कधीतरी, मजा
पूनम खाऊन पहा गं कधीतरी, मजा येते, झन्नाट... काटाकिर्रर्र!!
चला ही रेसिपी अजुन कोणी नाही
चला ही रेसिपी अजुन कोणी नाही टाकली म्हणायची अजून.
हिरव्या मिरच्या बारीक चिरुन, थोडं तिळाचं कुट, गुळ, चिंचेचा कोळ, कढीपत्ता, चवीपुरतं मीठ, पाणी, फोडणीसाठी तेल, हिंग.
तेल तापवुन हिंगाची फोडणी करावी, त्यात कढीपत्ता आणि मिरच्या घालाव्यात, थोडसं परतुन मग त्यात तिळाचं कुट, चिंचेचा कोळ, गुळ आणि मीठ घालून थोडं पाणी घालून ढवळून एक उकळी येउ द्यावी.
इडलीच्या चटणी इतकी consistancy असु द्यावी.
कश्या बरोबरही खाऊ शकतो.
मिरचीचं पंचामृत म्ह्णतो आम्ही याला.
रेडिओ मिर्चीने बीबी स्पॉन्सर
रेडिओ मिर्चीने बीबी स्पॉन्सर केला की काय?
वंजारी खुडा: खान्देशात
वंजारी खुडा: खान्देशात ठेच्याला खुडा म्हणतात.
थोड्या कोरड्या लाल मिरच्या घेउन थोड्या पाण्यात हातानेच (जरा जाडसर)चुराव्यात. वरुन लसणाचे बारीक तुकडे आणि चवीपुरते मीठ आणि पळीभर तेल घालुन खुडा जरासा पातळसरच करावा.
'कळण्या'च्या भाकरीबरोबर तर चांगला लागतोच....पण सर्वात मजा येते ती शिळ्या कडक भाकरी/पोळ्यांबरोबर खायला! याला वंजारी खुडा का म्हणतात माहिती नाही, पण वंजारी ही भटकी जमात असा खुडा करत असावी....!
Pages