Submitted by admin on 9 July, 2008 - 21:50
घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.
ओके सीमा, थँक्स! तु म्हणालीस
ओके सीमा, थँक्स!
तु म्हणालीस तसं आता फुलांच्या पाकळ्या पडून गेल्यावरच सगळे गुलाब थोडे कट करेन.
सध्या तर सगळी गुलाबांची झाड लिंबाच्या झाडाहून उंच झाली आहेत
पुढल्या वर्षी मात्र स्प्रिंगच्या आधीच करेन कट करेन झाडं.
भाग्य, मग घरात सगळीकडे गुलाब
भाग्य, मग घरात सगळीकडे गुलाब का? नायजेला ( कुकरीवाली) हिच्याकडे तर्हे तर्हेचे बाट्ल्य कॅन्स वगैरे आहेत जुने ज्यात ती पुश्परचना करून ठेवते. लै मस्त.
मरवा, दवना, नागरमोथा हे परफयुमरीतील अगदी कॉर्नरस्टोनस आहेत. त्याचे बेस असतात व वरून काही टॉप्नोट्स देतात. परफ्युम अॅन्ड फ्लेवर्स असो. ईंडिया आहे त्याचे त्रैमासिक निघते त्यात अश्या हर्ब्स वगैरे ची माहिती असते.
मी तुळशीच्या कूंड्यांमधली
मी तुळशीच्या कूंड्यांमधली माती बदलताना त्यात मधे मधे संत्र्याच्या वाळलेल्या सालांची पूड, तुळशीच्याच सुकलेल्या पानांचा आणि तोरणातल्या वाळलेल्या पानाफुलांचा चुरा यांचे थर दिले. त्यानंतर तुळशीला अशा मंजिर्या आल्या आहेत, की मी तरी कधीच पाहिल्या नव्हत्या. त्यात अगदी रंगीत फुले(खूप छोटीशी दिसताहेत). लोकसत्तामधल्या एका कॄषिविषयक लेखात तुळशीला फार पाणी घालू नये असे वाचले होते, तेव्हापासून पाणी पण कमी केले. आता उन्हाळ्यात मात्र दोनदा पाणी द्यायला लागते.
मामी, त्या परफ्युम अॅन्ड
मामी, त्या परफ्युम अॅन्ड फ्लेवर्स असो. ईंडिया यांची वेबसाईट असेल तर शेयर करा प्लीज.. आणि तुम्ही पण जरा जास्त माहिती लिहा कुठेतरी.
माझ्या दारात प्रचंड प्रमाणात लॅव्हेंडर(४ मोठी ३ लहान) आणि रोझमेरी (१० झाडे) आहे. मी काढून कुणकुणाला वाटते. अजुन त्याचे काय करता येईल. मामी आयडीया द्या!
लॅव्हेंडरच्या बिया अन सुकी
लॅव्हेंडरच्या बिया अन सुकी पानं मला चालतील ( पळतील ).
ती पानं एका कापडी पुरचुंडित घालून ड्रायर मधे फिरवावीत किंबा ओव्हन मधे एका ट्रे वर २५०-३०० ला थोडा वेळ ठेवावीत., घरभर मस्त सुवास पसरतो ...
मेधा, पाठवुन देते नक्की. हे
मेधा, पाठवुन देते नक्की. हे सगळे मी करते ग. पण खुप असतात ते तुरे मग काहितरी साठवनीचे करावे काय असे वाटते.
दादरला फूलबाजारात दवणा सहज
दादरला फूलबाजारात दवणा सहज मिळतो. सकाळी लवकर गेले पाहिजे. (कोल्हापूरच्या ज्योतिबाला, मला वाटते, दवणा वाहतात. )
पुर्वी एक झिपरी नावाचे झाड असायचे, त्याची पाने गजर्यात वापरत. ती हिरवीगार असतात, पण त्याला सुगंध नसतो.
नागरमोथा, नदीकाठी मिळतो. तर शिकेकाई साधारण डोंगरावर मिळते (विशाळगडावर खुप आहे.)
पावसाळा येतोय मुंबईत . कुंडीत
पावसाळा येतोय मुंबईत :-). कुंडीत काय लावता येईल. आमची सगळी बाग बॉक्क्स ग्रील मध्ये आहे.
कारल्याचे वेल थकले आहेत आता. आणी ट्र्बुज पण. दुसरं काही लावता येईल का? काकडीचं बी कुठे मिळेल?
गणेश वेलाचं बी टाकून ठेवा.
गणेश वेलाचं बी टाकून ठेवा. गोकर्ण पण चालेल. झेंडु, शेवंती. सध्या तरी पटकन हे आठवले. आता लावलेत तर गणपती आणि पुढे दसर्यापर्यंत फुलं होतील घरची.
झेंडुची फुल मी कुस्करली होती
झेंडुची फुल मी कुस्करली होती कुंडीत, पण नाही उगवली :-(..परत करायला हव
मिरची, मायाळू, कडीपत्ता,
मिरची, मायाळू, कडीपत्ता, दोडके, हे खाण्याचे प्रकार, तुळस, गवती चहा, हळकुंडं ( पानांसाठी), लसणीच्या पाकळ्या ( पातीसाठी) , कोथींबीर, मेथी, मोहरी,
मोगरा, अबोली, शतावरी , फर्न्स ( नेचा ) पेपरोमियाच्या व्हरायटीज असं बरंच काही लावता येइल.
भरपूर उन असेल तर गुलाब पण लावता येतील .
Topsy Turvy
Topsy Turvy :
http://www.nytimes.com/2010/05/20/garden/20tomato.html
शोनु, मुंबईच्या पावसाळ्यात
शोनु, मुंबईच्या पावसाळ्यात मेथी ती पण कुंडीत. मरतुकडी होइल ना एकदम. घोसाळी/दोडकी इ वेल लावले तर चालतील. पण ते आजु-बाजुच्या बाल्कनीत जाणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल.
पुण्यात मिनिएचर झाडं मिळतात
पुण्यात मिनिएचर झाडं मिळतात का? असतील तर कुठे?
म्हणजे काय ? बोन्साय ?
म्हणजे काय ? बोन्साय ?
होय.. मी बोन्साय या अर्थी
होय.. मी बोन्साय या अर्थी वापरलं मिनिएचर ..
मिळतात का?
बोन्झाय विकत आणण्यापेक्षा
बोन्झाय विकत आणण्यापेक्षा स्वतः केलेले चांगले. (काहि जणांना क्रूरपणा वाटतो त्यात. ) पण निसर्गात हि काहि झाडांचे बोन्झाय होते. बिल्डीगच्या फटीत आपोआप उगवलेले, पिंपळ, वड वा उंबराचे झाड अलगद सोडवून आणले तर छान बोन्झाय होते त्याचे.
काहि जणांना क्रूरपणा वाटतो
काहि जणांना क्रूरपणा वाटतो त्यात
>> हो मलाही असंच काहीस वाटायचं .. पण फ्लॅट मधे झाडं लावण्याचा दुसरा कुठला उपाय नाही .. आणि झाडांचा इतका अभाव नको वाटतो
म्हणजे झाडांना जगायची संधीच न देण्यापेक्षा हे बरं.. असं वाटतय (अर्थातच माझा स्वार्थही आलाच).. माहित नाही बरोबर का चूक
http://www.guide-to-houseplan
http://www.guide-to-houseplants.com/common-house-plants.html
http://www.guide-to-houseplants.com/tropical-house-plants.html
http://www.floridata.com/lists/indoor_plants.cfm
घरात झाडे हवित म्हणुन बोन्साय हे पटले नाही. बरीच इनडोअर झाडे मिळतात अगदी पुण्यात देखील. नर्सरीमधे चौकशी करावी लागेल. सुरवात करताना मनीप्लांटने करायला हरकत नाही.
हो नानबा, घरात झाड हव असेल तर
हो नानबा, घरात झाड हव असेल तर बरीच इनडोअर झाडं मिळतात अग. हा तुला बोन्सायच हव असेल तर तेच घे.
हा तुला बोन्सायच हव असेल तर
हा तुला बोन्सायच हव असेल तर तेच घे
>> हे हे हे.. तसं काही नाहिये ग...
पण आता इथून गेल्यावर भारतातल्या रखरखाटाचा विचार करायलाही नको वाटतोय.. इथे सगळीकडे किती मस्त हिरवं गार आहे!
तिकडे झाडं लावायची म्हटलं तरी सध्या मालकीची जमीन नाही.. त्यामुळे ....:(
भारतात कुंड्यांमधली झाडं
भारतात कुंड्यांमधली झाडं झिंदाबाद. नर्सरीमधे जा कुठल्यातरी एकसे एक सुरेख झाडं मिळतात.
नानबा, भारतात तू अगदी मोगरा,
नानबा, भारतात तू अगदी मोगरा, जास्वंद वगैरेपण कुंडीत लावू शकतेस.
हो शोभेचा अळू, नेचे (फर्न्स),
हो शोभेचा अळू, नेचे (फर्न्स), गोकर्ण, सदाफुली असली झाडं येतील लावता घरात सहज, नेचावरुन आठवलं माझ्या माहेरी घरी ऊन थोडंच यायचं त्यामुळे गुलाब वगैरे कधी लावले नाहीत. पण नेचा खूप मस्त फोफावायचा. आणि दिसतोही किती भरगच्च आणि एकदम हिरवागार!
ह्म्म... आता पुण्यात गेले की
ह्म्म... आता पुण्यात गेले की बघते काय काय करता येतय ते..
नानबा जानेवारीत(बहुदा)
नानबा जानेवारीत(बहुदा) पुण्यात रोझ प्रदर्शन भरत. मी पाहिलेले दोन्/तीनदा तेव्हा तरी टिळक स्मारक मध्ये असायच. तिथे हवी ती झाडांची व्हरायटी तर मिळतेच आणि माहिती पण. जावुन बघ गेलीस कि. आणि गॅलरीत सुद्धा भरपुर झाड लावता येतात. फर्न वगैरे घरात सुरेख येतात.
नानबा, घरात, बाल्कनीमधे,
नानबा, घरात, बाल्कनीमधे, खिडक्याच्या 'सिल' वर ( याला मराठीत काय म्हणतात ) कितीतरी प्रकारची झाडं लावू शकता. तुळस, कडीपत्ता, मिरच्या , गवतीचहा, हळद, लसणीची पात, मोहरी चे स्प्राउट्स हे सगळं लावता येईल. उन छान मिळत असेल तर गुलाब, मोगरा, अबोली वगैरे लावत येईल.
(बहुतेक जुन्या मायबोलीत ) मीनू ने तिच्या वडलांनी गच्चीत लावलेल्या बागेचे फोटो टाकले होते. त्यावरून सुद्धा बर्याच आयडीया येतील. शोभेच्या झाडांमधे सुद्धा घरात / बाल्कनीत लावता येणारी कितीतरी प्रकारची झाडं आहेत.
इथे पहा अजुन आयडियाज आहेत : http://www.apartmenttherapy.com/la/gardening/best-plant-containers-for-s...
इकडनं थोडं ग्रास सीड नेऊन उथळ पॉटमधे दाटीवाटीने पेरल्या तर पाहिजे तिथे एकेक तुकडा हिरवळ करू शकतेस :- )
साईट मस्त आहे मेधा. कसल्या
साईट मस्त आहे मेधा. कसल्या सही आयडीयाज आहेत.
हे टॉप्सी टर्वी छोटे रोप
हे टॉप्सी टर्वी
छोटे रोप लावले, आता थोडे मोठे झाले आहे पण सरळ खाली न वाढता वर वळले आहे.
दीनेशदा, नमस्कार ! मी माबोवर
दीनेशदा,
नमस्कार !
मी माबोवर प्रथमच लीखाण करत आहे. मला टाईप करताना थोडा त्रास होतो आहे, चुक झाल्यास क्षमा असावी. मी तुमच्या लीखाणाचे नीयमीत वाचन करते. मला आत्ता पावसाळ्यात मुम्बईत छोटया जागेत कोण्त्या भाज्या पेरता येतील ? तसेच पीकलेल्या टाँ म टो च्या बीया पेरल्या तर त्या रूजतील का ? हे विचारायचे आहे. क्रुपया सवीस्तर ऊत्तर द्यावे.
कमल.
Pages