मिरची ठेचा उर्फ तोंपासू फॅन क्लब

Submitted by अमृता on 25 May, 2010 - 12:13

इथे मिरच्यांच्या चटण्या, ठेचे, तिखट्या इ. तोंपासु पाककृत्या येउदेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हि तिखटी

खरडा
जिरं, मिरच्या आणि लसूण तव्यावर तेल टाकुन परतायच्या, वर २ मि. झाकण ठेवायचं. खलबत्यात काढुन वर मिठ टाकुन कुटायच. झकास खरडा रेडी.

मिनी,
मी ह्याच रेसिपीत दाण्याचा कुट घातले. मिरचीचा ठेचा म्हणतो आम्ही त्याला. एकदम यम्मी लागतो.

स्वाती आंबोळे
त्यात चिंच घातली की चिंचेचा खर्डा

अगदी थोड्या तेलावर हिंग, जिरेपूड, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि तीळ खरपूस परतायचे. मीठ घालून भरडायचं. (म्हणजे फार बारीक वाटायचं नाही.)

मिरचीचा कुट्टा:
मिरची थोडं मीठ घालून बारिक करून तेलात चांगली परतून घ्यायची. थोडं दाण्याचं कूट घालून चांगली वाफ आणायची. हा कुट्टा बरेच दिवस टिकतो. चवीत बदल हवा असेल तर लसूण वेगळा बारिक करून घालायचा.

मस्त धागा!

हिरव्या मिरचीचा ठेचा

साहित्य :

९-१० हिरव्या मिरच्या त्यांची डिखळे काढून व धुवून कोरड्या करून
८-९ लसणीच्या पाकळ्या सोलून
मूठभर भाजलेले शेंगदाणे (शक्यतो फोलपटे काढून)
मीठ - चवीनुसार
चमचाभर तेल

कृती :

कढई/ तव्यावर चमचाभर तेल गरम करून त्यात मिरच्या व लसूण भाजून घ्यावेत. त्यांचा रंग बदलला पाहिजे. खलबत्त्यात/ पाट्या वरवंट्याने/ मिक्सरमध्ये मिरची व लसणाच्या जोडीला दाणे व मीठ घालून भरड बारीक करावे. भाकरी, पोळी, ब्रेडबरोबर मस्त! काहीजण शेंगदाणे न घालताही हा ठेचा करतात.

मिरच्या बारीक चिरुन
कोथिंबीर बारीक चिरून
ताजं खोबरं खऊन

थोड्याश्या जास्त तेलावर हिंग मोहरीची फोडणी करायची त्यात मिरच्या आणि कोथींबीर टाकायची आणि थोडी हळद. थोडी कुरकुरीत झाली की त्यात खोबरं घालायच. परतून लिंबाचा रस, मीठ आणि साखर घालायची. चपातीबरोबर मस्त लागतं.

हिरव्या मिरच्या, लसूण, खडं मीठ, भाजलेले दाणे भरड वाटून घ्यायचे (भारतात मिरची कटर मिळते त्यातून). तेल गरम करुन त्यात सगळे वाटण खरपूस परतायचे.

लसणाची पात, हिरव्या मिरच्या, खडं मीठ पाट्यावर वाटायचे. कच्च तेल घालून भाकरीबरोबर चापायचे. तिखट झेपले नाही तर खाताना थोडा दाण्याचा कूट घालावा.

लाल (ओल्या/ताज्या) किंवा हिरव्या मिरच्या, खडं मीठ, लसूण पाट्यावर वाटून. ह्यातच वाटताना खोबरं अथवा नारळ घालायचे.

मिरचीच्या ठेच्या बरोबरच आमच्यात लाल मिरचीचा रंजका करतात.
नक्की रेसीपी मला येत नाही (आईला विचारायला पाहिजे) पण ओल्या लाल ब्याडगी मिरच्या कुटुन करुन त्यात गुळ आणि चिंचेचा रस ,लिंबाचा रस घालतात. खुप मस्त लागतो. त्याला आपल्या ब्याडगी मिरच्याच पाहिजेत खर.

अमृता ताई आमचा हो का अन्नुलेख?? Light 1
तव्यावर जिरं ,मिरच्या,कोथिंबीर परतायचं आणी दाण्याचा कूट , मीठ घालून कुटायचं.
अजून एक व्हेरिएशन म्हणजे परतताना कच्चे दाणे घालायचे. ते पण छान लागतं.

लाल मिरच्यांचाही ठेचा करतात. लाल मिरच्या, जिरे, मीठ एकत्र वाटायचे - वरून लिंबाचा रस पिळायचा. मोहरीची फोडणीही वरून छान लागते.

सीमा वर्‍हाडी ठेचा म्हणतात तो हाच ना? एकदम मस्त झणझणीत. मुगाच्या डाळीची भजी करताना आई पिठात थोडा कालवते हा ठेचा. मस्त चव येते.

प्रज्ञा ,वर्‍हाडी ठेचा वेगळा होईल खुपच. थोडा कोरडा असतो ना तो?
रंजका थोडा पातळसर असतो. निपाणी ,चिकोडी,बेळगाव भागाची स्पेशॅलिटी आहे ही.

तिखट ओल्या लाल मिरच्यांचे वाटीभर तुकडे
पाव वाटी तिखट पावडर (ऐच्छिक)
वाटीभर- सोललेला लसूण
वाटीभर तेल
हिंग
तेल, हिंग सोडून बाकी एकत्र वाटून घ्यायचं. वाटीभर तेल कढवून त्यात फक्त भरपूर हिंग घालून वाटणात ओतायचं. नागपूरला 'पंडीतांचे विविध वस्तू भांडार' मधे 'वाटलं' नावाखाली मिळायचं. त्याचे व्हेरिएशन्स म्हणून भाजके तीळ, जवस, मोहरीडाळ वगैरे घालून खाल्लं. पण ओरिजिनलची चव नाही.

सीमा .. prady म्हणते ते लाल मिरच्यांचा ठेचा .. अप्रतिम लागतो तो .. आणि दिसायला तर लैच झ्याक.. ..सुका होत नाही कारण या मिरच्या ओल्या असतात.. गाव वेगळी म्हणून नाव वेगळी असणार.. आणि पद्धत पण ..

नाशीकला शिकायला असताना आमच्या हॉस्टेलच्या मेसचा भय्या हा प्रकार करायचा. तेला मधे सुक्या लाल मिरच्यांची भरड्,थोडी भाजलेल्या धण्यांची भरड आणी तिखट मीठ असं परतून चटणी सारखं द्यायचा.बा़की हॉस्टेल मेस म्हणजे जेवण दिव्यच असायचं पण मग ज्या दिवशी ही मिरचीची चटणी असायची आम्ही भाजी सारखी हीच हादडायचो.

इडली पात्रात न करता वाट्यांमधे केलेल्या इडल्यांबरोबर खायचा ठेचा
तिखट हिरव्या मिरच्या, खडा मीठ, एकत्र भरड वाटावे. त्यात थोडा खडा हिंग ( मिरचीच्या बी एवढाच ) नीट कालवावा. वरून भरपूर खोबरेल तेल घालावे. यम्मी!

आहाहा.. खरच तोंपासू..
आता देशात गेले की भाकरी, खर्डा आणि पालेभाज्यांवर जगावं म्हणते थोडे दिवस.. Happy

कुणीतरी मागे माबोवर गवार, मिरच्यांचा ठेचा दिलेला.. तो पण मस्त लागतो..

खुडा नावाचा एक प्रकार असतो..
हिरव्या मिरच्या, भरपूर कोथिंबीर आणि मीठ तेलावर परतायचं..
तेलावर परततानाच मिरच्या कोथिंबीरीमधे वाटत जायच्या..
तेल खूप पितो हा प्रकार - पण अप्रतिम लागतो.. एकदम झणका!
(किती दिवसात खाल्ला नाही)

तेलावर परततानाच मिरच्या कोथिंबीरीमधे वाटत जायच्या..<<<
म्हणजे काय?? चुरडायच्या का परतता परतता?
>> होय.. शब्दच सुचत नव्हता

माझ्या आजीची रेसीपी
हिरव्या मिरच्या थोड्या तेलावर शॅलो फ्राय करून घ्यायच्या. नंतर त्या कुस्करून त्या परत तव्यावर टाकायच्या आणी मग त्यात किसलेलं सुकं खोबरं, मीठ, दाण्याचं कूट घालून परतायचे.

Happy तोपासू

हिरव्या मिरच्यांना उभी चीर द्यायची.
त्यात मीठ, हिंग भरायच. ( हव तर थोडा लिंबाचा रस.)
थोड्या तेलावर त्या मिरच्या परतून घ्यायच्या.

दही भाताबरोबर चुरून खायच्या.

आहाहा! कसल्या एकसे एक रेसिप्या आल्या.
स्वाती, आत्ताच केला तो मिरची, तिळ प्रकार. सही मजा आली. आता रोज एक एक प्रकार करेन. Wink

prady, अग तिथली एक पोस्टच कॉपी केली त्यातच तिनही रेसिप्या होत्या म्हणुन चुकुन तुझा अनुल्लेख झाला. Happy

Pages