Submitted by नानबा on 19 May, 2010 - 21:41
पुण्यात ढेकणांवर इफेक्टीव ट्रीटमेंट करणारं कुणी माहित आहे का?अर्जंट माहिती हवी होती..
--------------------
अवांतरः
नवरा भारतात गेल्यानं, ह्या महिन्यात एका मुलीबरोबर शिफ्ट झाले .. आणि आज कळलं की त्या मुलीच्या घरात बेडबग्ज आहेत. म्हणजे माझ्या सामानाबरोबर भारतात येतील
(कुतबो मधेच टाकणार होते खरतर.. त्या मुलीला ढेकूण आहेत माहित असूनही तिनं घरातलं फर्निचर दोन चार जणांना विकलं..त्यातली एक बाई तर प्रेग्नंट आहे! )
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला वाटतं सकाळमध्ये
मला वाटतं सकाळमध्ये जाहिरातींच्या विभागात सापडतील.
का त्या बिचार्या ढेकणांच्या
का त्या बिचार्या ढेकणांच्या मागे हात धुवुन लागलीस.
एकदा कॅरम खेळताना माझा एक इंग्लिश मिडियमचा मित्र जोरात ओरडला " बेड बग ! बेड बग ! " आम्ही त्याच्यावरच वैतागलो , म्हंणालो "काय येडपट आहेस ! त्या बेड्ला काय सोनं लागलयं ?" बेड बघ ! म्हणतोय.
झुरळांचे शिव्या शाप घेतले की
झुरळांचे शिव्या शाप घेतले की असच होतं
खटमल..... बायर का बेगॉन!
खटमल..... बायर का बेगॉन!
नाही हो बुवा.. झुरळांची गोष्ट
नाही हो बुवा.. झुरळांची गोष्ट कालची झाली..
ह्यांच्याघरात गेले ८ महिने ढेकूण आहेत म्हणे
जोकस अपार्ट, I just dread even the thought of these formidable creatures...
and here I am.. in middle of those blood sucking fellas..
झुरळांनाही घाबरत नाही, पालींचीही किळस वाटत नाही.. एवढी घाण/किळस/भिती मला ह्या प्राण्याची वाटते..
श्री आणि बुवा.. नुसता टीपी करू नका.. माहिती सांगा..
मदत करा रे कुणीतरी..
नानबा तू फरच एक्साईट झालीयेस.
नानबा तू फरच एक्साईट झालीयेस. त्यामुळे आपण काय लिहितो आहे ते तुला कळत नाही. तु अत्यन्त भयंकर लिहिले आहे. एकदम वाचले की कै च्या कै अर्थ निघतात्.उदा:-
नवरा भारतात गेल्यानं, ह्या महिन्यात एका मुलीबरोबर शिफ्ट झाले
हे वाक्य काळजीपूर्वक वाचावे लागले.
त्या मुलीला ढेकूण आहेत
????
तिनं घरातलं फर्निचर दोन चार जणांना विकलं..त्यातली एक बाई तर प्रेग्नंट आहे
बाइ फर्निचरचा भाग आहे का?
एनीवे सकाळ मध्ये रोज छोट्या जाहिराती प्रसिद्ध होतात (लोक ताज्या बातम्याप्रमाणे वाचतात!)
ह्या जाहिराती आता इ-सकाळच्या अंकात इ-पेपर या लिंकवर , टुडे नेटवरही वाचता येतात. पानेच स्कॅन केलेली असतात.. त्यात पेस्ट कंट्रोल ची जाहिरात रोजच असते. त्यात त्यांचे फोन नम्बर असतात त्या वर फोनकेल्यास पुणेरी उत्तरे येतात. नन्तर ओर्डर दिल्यावर तेही येतात. त्यात ढेकणांचा नायनाट करण्याची ग्वाही आहे.
ते पहा शेवटच्या कॉलमात तुला हवे ते मिळेल...
http://72.78.249.107/Sakal/20May2010/Normal/PuneCity/PuneToday/page8.htm
जाहिरातील प्रोप्रायटरांची आडनावे वाचली तरी फोनवर कोणत्या प्रकारची 'इन्टरअॅक्शन' होईल याची कल्पना यावी.
मला अर्धवट आठवत आहे, पण
मला अर्धवट आठवत आहे, पण पूर्वी महापालिकेत कोणत्यातरी विभागात जाउन सांगितले की त्यांचा एक माणूस येत असे औषध मारायला. आमच्याकडे एकदा औषध मारून गेल्यावर पुन्हा कधीही त्रास झाला नव्हता. एक पूर्ण दिवस घरात काही करता येत नाही पण
पुण्यात ढेकणं अजिबातच नाही
पुण्यात ढेकणं अजिबातच नाही असे नाही. तुमची ईच्छा असो/ नसो, तुमच्या स्वागताला पुण्यात ते हजर रहाणार आहेतच.
होस्टेल वर रहातांना बर्याच वेळा यांचा त्रास व्हायचा, अगदी सुळसुळाट. रुम मधे फर्निचर नावालाच. मी वर्तमान पत्राची पेटती मशाल करुन त्यात लोखंडी पलंगाला भाजुन काढायचो. त्या रात्री (व नंतर काही दिवस) शांत पणे झोप लागायची.
घरात एक छोट्या कपात रॉकेल घ्यायचे, ढेकुण दिसला की आरामात त्यात सोडायचा.
टोणग्या, तुझे किती किती आभार
टोणग्या, तुझे किती किती आभार मानू!
नानबा तू फरच एक्साईट झालीयेस. त्यामुळे आपण काय लिहितो आहे ते तुला कळत नाही. तु अत्यन्त भयंकर लिहिले आहे. एकदम वाचले की कै च्या कै अर्थ निघतात्
>> काहीही अर्थ काढ.. तू दिलेल्या लिंकमुळे मी तुझी शत शत आभारी आहे.. आणि कसलेही अर्थ काढले असशील तरी मी माईंड करणार नाही
एक्साईट हा फार छोटा शब्द आहे.. नवर्याला त्याच्या पहाटे ४:३० ला फोन करून रडारड केली मी..:P
एक पूर्ण दिवस घरात काही करता
एक पूर्ण दिवस घरात काही करता येत नाही पण
>> म्हणजे स्वैपाक वगैरे का?
तसही, पेस्ट कंट्रोल झाल्यावर मी दोन दिवस घरात रहाणार नाहीये..
(तसही, पुण्यातल्या भयाण गरमी मधे (वर्णनावरून) ढेकूण जिवंत रहातील का हा प्रश्न पडतोय मला..(त्यांना एक्स्ट्रीम तापमान (उष्णता/थंडी) सहन होत नाहीत).... पण चान्सेस घ्यायचे नाहीत म्हणून ढेकणांचा पेस्ट कंट्रोल..)
पुण्यातल्या चाळीत (मोठी
पुण्यातल्या चाळीत (मोठी कॉन्क्रिटची बिल्डिन्ग होती ती) रहात असताना मी चक्क पाच लिटर रॉकेल एका खोलीतील प्रयेक भेगेत, कपाटात, फर्निचर मध्ये सतत दोन दिवस थाम्बुन थाम्बुन ओतत होतो, त्यानन्तर तिथला ढेकणान्चा त्रास सम्पला
त्यातुनही,
नानबा, फुलेमन्डई (जुनी) तिथ जा, डावीकडे हारीने हळदकुन्कवाचि दुकाने आहेत, तर उजवीकडे एका काठीवर बोर्ड लावुन काही लोक उन्दिर घुशी ढेकुण वगैरे मारण्याचे द्रव्य विकत उभे असतात त्यान्च्याकडून विषारि पावडर मिळते ती घे, हाय काय अन नाय काय!
शेवटी स्वालम्बनच श्रेष्ठ उगाच कशाला एजन्सीवगैरेवर पैसे उधळतेस?
काही वर्षांपूर्वी गावाहून
काही वर्षांपूर्वी गावाहून आमच्याकडे पाहुणे आले होते पुण्यात एका लग्नासाठी . सोबत ट्रॅव्हल्समधले ढेकणंही भरपूर घेउन आले सामानात. ह्यावर आम्ही एकच उपाय केला तो म्हणजे दिसला ढेकूण की थिनरच्या कपात टाक ! बेडच्या कोपच्यात भरपूर प्रजा असायची , त्यावर थिनर ओतायचे. आम्ही असेच दर रविवारी सकाळी एक तास करायचो. महीन्याभरात गेले सगळे ढेकणं.
नानबा, त्या पेस्ट कंट्रोल
नानबा, त्या पेस्ट कंट्रोल वाल्यांच्या ट्रीटमेंटने बर्याचदा फायदा होत नाही. माझा तर उलटा तोटाच झाला होता. आधी फक्त एकाच खोलीत झाले होते ढेकूण. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर सगळ्या खोल्यात पसरले.
त्यांना एक्स्ट्रीम तापमान (उष्णता/थंडी) सहन होत नाहीत >> तपमान ८०+ असावे लागते. त्यामुळे ते पण अशक्यच आहे.
मी पण अगदी कंटाळून गेलो होतो. शेवटी माबोवरच्या ढेकणांच्या लेखावरची तुझीच प्रतिक्रीया उपयोगी आली - गॅमेक्झीन पावडरची. बसल्या / झोपल्या जाणार्या आणि कपडे ठेवलेल्या सगळ्या फर्निचरच्या सगळ्या संधी-कोपर्यात ती जादूची पावडर लावली. सोफा, पलंग ह्यांना तर चोपडूनच ठेवली आणि त्या खालच्या जमिनीवर पण पसरून ठेवली. हे दर आठवड्याला एकदा असे तीन वेळा केले. आणि चार महिन्यांपासून सुरु असलेला ढेकणांचा त्रास संपला.
थोडी दगदग झाली पण पेस्ट कंट्रोल करताना पण बरीच दगदग होतेच की. ह्यात कसला वास नाही आम्हाला तब्येतीचा त्रासही झाला नाही. एक दिवस (५ तास तरी) घराबाहेर रहायची शिक्षा पण नाही.
त्या छोट्या जाहिरातीमधील एका
त्या छोट्या जाहिरातीमधील एका एजन्सीची वेबसाईट पण आहे. त्यांचा जोडधंदा म्हणजे काय तर ऑनलाईन ट्रेडींग http://www.myavishkar.com/
असो ..तुमची ह्या संकटातुन लवकर मुक्तता होवो, हि सदिच्छा
मला आधी वाटलं काहीच्या काही
मला आधी वाटलं काहीच्या काही कविताच आहे
मंदार
मंदार
नानबा, पुण्यात असताना माझ्या
नानबा, पुण्यात असताना माझ्या घरी १ हर्बल (:)) पेस्ट कंट्रोल केले होते. हर्बल मुळे घरातुन बाहेर वगैरे जायची गरज नाहीये. साधारण अर्ध्यातासात होते ते. आणि स्वयंपाक वगैरे पण करता येतो. १ वर्षाची गॅरेंटी (:)) दिली होती त्यांनी. २-३ वर्ष मी तिथे होते पण परत झुरळे झाली नव्हती.
माझ्या घरी ते झुरळांसाठी केले होते. मी सासर्यांना विचारुन त्या माणसाचा नंबर देते उद्या. ढेकणांसाठी पण असेल त्याच्याकडे.
मंद्या इथे काही सोडू नकोस
मंद्या इथे काही सोडू नकोस बा.. झुरळ, ढेकूण .. नाहीतर ढिश्क्यँव... कारण इथे त्यासाठीच चर्चा चालू आहे. एखाद्या युद्ध किंवा मोहिमेवर जाण्याआधी केलेली चर्चा.
उन्हाळ्यात.. लाल मुंगा खूप सतवतात त्यासाठी काय करावं लागे पेस्ट कंट्रोलचा उपाय सोडून. काही घरगुती उपाय ?
नानबा, पुण्यात बाकीच्यांच
नानबा,
पुण्यात बाकीच्यांच ढेकणांवर इफेक्टीव ट्रीटमेंट काही माहित नाही ...
पण मी मात्र 'ढेकणांना' चुन चुन के (मोजुन-मोजुन) मारु शकतो,सोबत झुरळ मारण्याचा अनुभव ही आहेच ..तर विचार करुन कळवा !
पाहुणे आले होते पुण्यात एका
पाहुणे आले होते पुण्यात एका लग्नासाठी . सोबत ट्रॅव्हल्समधले ढेकणंही भरपूर घेउन आले सामानात. ह्यावर आम्ही एकच उपाय केला तो म्हणजे दिसला ढेकूण की थिनरच्या कपात टाक !
एवढं करीपर्यन्त पाव्हण्याना आणि त्यांच्या सामानालाच थिनरमध्ये बुचकळून काढायचं ! ॥ हाकानाका?
महीन्याभरात गेले सगळे
महीन्याभरात गेले सगळे ढेकणं.>>>
नशीबवान आहेस रे..
आमच्या रुममध्ये झाले होते. त्यावेळी प्रत्येक रविवारी आमची रॉकेल घेवुन साफसफाई मोहीम असायची.
असे तीन महिने चालल. सोन दिवस बरे जायचे मग परत ये रे माझ्या मागल्या.
शेवटी रुमच बदलली..
थिनर म्हणजे काय? आम्ही
थिनर म्हणजे काय?
आम्ही रॉकेलचे बोळे हा एक परंपरागत उपाय वापरायचो.
अमेरिकेत ढेकणं असतात हे मला अलिकडेच कळले. बहिणीकडे बरेच आहेत अमेरिकेत. त्यांनी वैतागुन अपार्टमेंट बदललं.
टोणगेश्वर , नाशिकमधे असंच
टोणगेश्वर , नाशिकमधे असंच करतात का ?
थिनर ऑईलपेंट पातळ करण्यासाठी वापरतात. वास भयानक येतो त्याचा पण थोडावेळच टिकतो.
नानबा, हा घ्या नंबर :
नानबा,
हा घ्या नंबर : ९८९०६५९३७९ पवार म्हणून आहेत. हर्बल पेस्ट कंट्रोल आहे त्यांचं. ढेकणांसाठी, झुरळांसाठी, मुंग्यांसाठी आहे.
आम्ही आमच्या भाड्यानं घेतलेल्या घरांत ३/४ वर्षापूर्वी केले होते तेंव्हा ४ खोल्यांचे रु. ३५०/- घ्यायचे.
~साक्षी.
धन्यवाद दीप्स. नानबा- ते
धन्यवाद दीप्स.
नानबा- ते शब्दांचे क्रम खरंच बदल. दचकलेच
टोणगेश्वर , नाशिकमधे असंच
टोणगेश्वर , नाशिकमधे असंच करतात का ?
--- टोणग्यांच्या नाशकात विरुद्ध दिशेला प्रवास होतो... पाव्हणे आले की मेहेनतीने पाळलेल्या ढेकणांना नविन खाद्य मिळाल्याचा आनंद होतो. नंतर पाव्हण्यांच्याच सोबत ते जातात.
उदय
उदय
उदय:
उदय:
नानबा, मला आधी वाटलं कविता
नानबा, मला आधी वाटलं कविता झाली की काय परत एखादी!
तुला सध्याचं घर बदलायचा ऑप्शन असला तर तेच सर्वात उत्तम! नाहीतर मग आहेतच ढेकूण उपाय!
सुर्यकिरण : लाल मुंग्यांवर घरगुती उपाय म्हणजे हळद टाकणे. खिडक्या, भिंतींच्या, फरशीच्या कडांना हळद टाकली की मुंग्यांना अटकाव होतो असा माझा अनुभव आहे.
NYSST Pesto Pvt Ltd
NYSST Pesto Pvt Ltd 020-24497332, 9881945678
Vaishnavi Pest Control 020-32516727, 9881572421
Apex Pest Control 020-25232905, 9325804043, 9422011934
Joshi 9922070608, 9763108701
Regal Pest Control 9823886365, 9921383877
Shri Sai Pest Control 9372253472, 9765646360
Chintamani Pest Control 020-26610165, 9371046587
टाईम्स ऑफ इंडियाच्या ई-पेपरवर ही सारी नावे दिसतील. याशिवाय आणखीही बरीच दिसतील.
Pages