|| श्री ||
आठवड्यातील मधल्या वारात सलग दोन दिवस जोडून आलेली साप्ताहिक सुट्टी, २- ३ हौशी मित्रपण रिकामटेकडे आणि घरातून कुठलीही कटकट नाही, असे कालनिर्णयमध्ये न सापडणारे योग अचानक जुळून आले आणि ढाक बहिरी चा प्लान ठरला. मी, सुबोध, अजय आणि अभिजीत उर्फ काळू अशी चौकडी जमली आणि एक रात्र बहिरीच्या गुहेत काढायची कल्पना सर्वानुमते मान्य झाली. फक्त चूल पेटवायचा प्रश्न सोडला तर बाकी सामानाचा तसा काही प्रश्न नव्हता कारण चारच जण असल्याने पोटापुरत सामान घरून आणणे सहज शक्य होते. चूल पेटवायची म्हणजे आमच्यासाठी 'जेवण'-मरणाचा प्रश्न असतो. कारण आम्ही संध्याकाळच्या चहासाठी पेटवायला घेतलेली चूल, जेवणाची वेळ झाली तरी त्यातून फक्त धुराशिवाय काहीच बाहेर सोडत नाही. शेवटी मग कापूर, रॉकेल, स्टोव अशा चढत्या भाजणीने विचार करत करत गाडी clix पाशी येऊन थांबली. वस्तू खरतर आहे महाग पण लई गुणाची. विकत घेतानाच जाणवलं की हे ५ किलो आणि बाकीच सामान असं एकंदर साधारण ८-९ किलो किलो वजन घेऊन खडी चढाई करताना चांगलाच पिट्टा पडणारे. पण नको त्या वेळी हिम्मतराव बनण्याची माझी जुनी सवय उफाळून आली आणि छाती फुगवून मी घोषणा केली.... 'हे वजन मी घेईन.' सुबोध गालातल्या गालात हसला हे मी पाहिलं होत. १३ तारखेला सकाळीच clix घेऊन ब्यागा प्याक केल्या. बहिरीची गुहा पश्चिमाभिमुख असल्याने सूर्य मावळायच्या आत इष्ट स्थळी पोहचू ह्या हिशोबाने आम्ही दुपारीच कर्जतच्या दिशेने बाइक्स वरून कूच केले. सांडशी गावात ३ च्या सुमारास पोचलो आणि एका घराच्या अंगणात त्या घरच्या गृह मंत्र्यांच्या परवानगीने गाड्या ठेवून चालू लागलो.
वाट शोधायची गरज भासू लागली. पण आमच्या काळूचं एक बर आहे. तो वाट बीट शोधायच्या फंदात पडत नाही. वाट नसेल तर वाट बनवू असा त्याचा खडा हिशोब असतो. त्यामुळे एकदा त्याच्या मनासारखं आम्ही केल आणि एक चढ उतरून परत आलो. आता त्याला आवरून आम्ही मांजरसुब्याच्या डोंगराच्या दिशेची वाट पकडली. वाटेत दगडांवर खुणा केलेल्या होत्याच. त्यांचा पाठलाग करत आम्ही एका सोंडेपाशी येऊन पोचलो. दुपारच्या उन्हातून चालताना सुरवातीला असलेला उत्साह आता मावळला होता. कुणी bag घेता का bag असं ओरडून पाठीवरची bag फेकून द्यावीशी वाटत होती. पण मला हमालीची सवय लहान लहानपणीच जडलेली. 'कित्ती शक्तिमान मुलगा' असं खोटं खोटं सांगून चतुर लोक माझ्याकडून कामं करून घ्यायचे. त्यामुळे ह्या ओझ्याचं फारसं दु:ख झालं नाही. पण डोक्यावरचं उन आता चांगलंच रणरणत होत. वारा पडला होता. मान खाली घालून तापलेली वाट चेपत चाललो होतो. अधून मधून येणाऱ्या सावलीत पाठ आडवी करून रिचार्ज होत होतो.
आमच्या ब्यागाही अधून मधून EXCHANGE होत होत्या. सरणार्या वेळाच्या वेगाच्या equally proportionate वेगाने पाण्याच्या बाटल्याही संपत चालल्या होत्या. पठारावर डाव्या बाजूला कुठेतरी पाणी आहे एव्ह्ढ्या पुसटशा माहितीवर आमची वाटचाल चालू होती. जशी जरा जास्त उभी चढण लागली तसा अजय थकून थोडा मागे पडू लागला. मग सुबोध त्याच्याबरोबर थांबला आणि मग मी आणि काळू, वाट आणि पाणी शोधायला पुढे झालो. साधारण ३ तासांच्या चढाइनंतर आम्ही एका मोकळ्या पठारावर आलो. आजूबाजूला गर्द झाडी आणि पसरू लागलेला अंधार मनातली चिंता वाढवू लागला.कारण नक्की पाणी कुठे आहे याचा अंदाज येईना आणि शर्यत तर बुडणाऱ्या सूर्याशी होती. शेवटी तो नाद सोडून आम्ही गुहेच्या दिशेने चालू लागलो. कारण जर गुहेत पोहोचलो असतो तर तिथे पुष्कळ पाणी होत. डोंगरातली गुहा समोरच दिसत होती पण वाटेतल घनदाट जंगल पार करायचं होत. चालताना एक हरणटोळ दिसला. मग त्या प्रशिद्ध व्यक्तिमत्वाबरोबर एक छोटेसे फोटोसेशन केले.
अंधार व्हायला अजून थोडा अवकाश होता. घाईघाईत आम्ही त्या पठारावरच्या जंगलात घुसलो आणि डोंगर चढताना जेवढा फुटला नसेल एवढा घाम आता फुटला. कारण जी वाट पकडू त्या वाटेवर बाण रंगवले होते. योग्य वाट सापडण एव्हाना आवाक्याबाहेरच वाटू लागल होत. आता ७ वाजले होते. उरलासुरला उजेडही संपत चालला होता. पाणी तर जवळपास संपलच होत. अशावेळी आम्ही ठरवल की आता अजून गडबड करण्यापेक्षा एखाद्या मोकळ्या जागेत पथार्या टाकायच्या आणि तांबड फुटताच वाट शोधायची.
त्याप्रमाणे मोर्चा परत पठाराकडे वळवला. एक सपाट जागा बघून तिथे मुक्काम करायचा ठरवला. आधी जागा थोडी साफ सुफ करून घेतली. साप विंचू नसल्याची खात्री करून अंथरुण टाकल. एव्हाना पूर्ण काळोख झालं होता. portable कंदील काढले. फुगवायच्या उशा फुगवल्या आणि आडवे झालो.
पण तहानेने जीव तगमगत होता. जमीन देखील दिवसभर तापलेली असल्याने पाठीला चटके लागत होते. आमच्या सुदैवाने आजूबाजूला करवंदीची पुष्कळ झाडं होती. मी आणि काळू जाऊन पिशवीभर करवंद घेऊन आलो. फुकटात मिळालेली एवढी करवंद बघून शहरात २ रुपयात मिळणारी ओंजळभर करवंद आठवली. करवंदांनी तहान आणि भूक तात्पुरती भागली. रात्रभर झोप लागली नाहीच. फक्त पाव बाटली पाणी शिल्लक होत. मग आम्ही नियम केला. एकाला एका वेळी फक्त एकच बुच पाणी मिळणार. त्यामुळे घसा फारच सुकला तर बुचभर पाण्याने घसा ओला करून मिळत होता. आख्खी रात्र आम्ही एकमेकांना फ्रीजमधल्या थंड पाण्याच्या आठवणी सांगून तडपवत होतो. चांदण्या मोजता मोजता पहाटे जरा डोळा लागला. थोडसं उजाडताच आम्ही पटापट आवरून जंगलात डावीकडे जाणारी वाट पकडली. आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही ह्या वाटेवर एकदा चालून आलो होतो आणि हीच वाट असल्याची खात्रीही झाली होती. परंतु आमच सामान मागे असल्याने परत मागे फिरलो आणि भूलभुलैयात रस्ता विसरून बसलो होतो. सकाळी मात्र ही वाट लगेच सापडली.ह्या वाटेची मुख्य खूण म्हणजे खालील छाया चित्रात दिसणारा शेंदूरचर्चित दगड आणि पुरातन दगडी खांब.
तासभर चढाई केल्यानंतर आम्ही 'दिखाओ अपनी मर्दानगी' वाल्या कातळापाशी येऊन पोचलो. इथूनच खरी बिकट वाट वहिवाट सुरु होत होती. प्रत्येक पाऊल जपून आणि एकाग्रतेने टाकणे गरजेचे होते नाहीतर मग थेट देवाचिये द्वारीच पोहोचलो असतो. एकमेकांना सांभाळत, कातळात कोरलेल्या पायर्यांवरून आम्ही गुहेच्या खालच्या अंगाला येऊन पोचलो.
मी आघाडी घेतली. दोरीने तिथे दोन बांबू बांधले होते.त्यातल्या एका बांबूवर पहिलं पाऊल टाकलं आणि काडकन आवाज करून त्याने हाय खाल्ली. दोन सेकंद मला काही सुधरेना पण तसाच रेटून बाजूला असेलेल्या दोर्या धरून मी स्वताला वर खेचलं. माझ्यामागून हलका फुलका सुबोधही आला. बरोब्बर सात वाजता आम्ही गुहेत पाऊल ठेवलं.
काळू आणि अजयने मात्र जास्त रिस्क न घेता खालीच थांबण्याचा निर्णय घेतला.
सर्वात आधी काय दिसले असेल तर ते पाणी. गुहेतल्या खोदीव टाक्यात थंड निर्मळ पाणी होते.. आधी पोटभर पाणी प्यायलो आणि दोरीला एक पोत बांधून त्यातून पाण्याची बाटली खाली पोचवली. आता त्या दोघांची सोय झाल्यावर आम्ही निवांत झालो. गुहेत बसून आम्ही रात्रीच्या मुक्कामाची जागा बघत बसलो... पाण्याच्या आठवणी क्षणभर डोळ्यातून वाहून गेल्या.
गुहेच थोड निरीक्षण केल. गुहा चांगली लांब आणि रुंद आहे. कलात्मक कोरीवकाम काही नसल तरी गुहेत खांब आणि खोल्या आहेत. गुहेत वर्षभर पुरेल एवढा पाण्याचा साठा आहे. गावकर्यांनी गुहेत पुष्कळ भांडी ठेवली आहेत. ती वापरून झाल्यावर परत तिथेच ठेवावी लागतात नाहीतर देवाचा कोप होतो असे म्हणतात. खरे खोटे काहीही असेल. परंतु एक जबाबदार गिर्यारोहक या नात्याने आपल्या मागून येणाऱ्या आपल्या अनामिक आणि अज्ञात साथीदारांचा विचार करणे ही आपली जबाबदारी आहे.
एव्हाना गुरगुरणार्या पोटाने भुकेची आठवण करून दिलीचं होती. अजयकडे सटर फटर खायला होतेच. परंतु आमच्या सगळ्यांच्याच पोटात सुमारे १२-१३ तास काहीच नव्हते. clix काढल आणि झकास coffee बनवली.
एका बाटलीतून ती परत मगासच्याच पद्धतीने खाली पोचवली. काळू सामान घ्यायला येताना टारझन चा आवाज करत यायचा. त्यामुळे फुल timepass होत होता. गरम कॉफी पिऊन आत्मा थंड झाला. आम्ही पटापट maggi बनवायला घेतलं. चौघांच्या हिशोबाने करायला घेतलेलं maggi शिजून एवढ झाल की ते अजून चौघांनी खाल्लं असत तरी संपल नसत.
मग स्वतालाच मुर्खात काढून पातेलं दरीत रिकाम केल आणि खिचडी शिजवायला घेतली. अगदी रेडी टू ईट स्टाइल ने आईने बनवून दिलेली सामग्री आम्ही उकळत्या पाण्यात टाकली आणि अगदी १५ मिनटात खिचडी तयार!! आमचा clix बाळ खरोखरच लई गुणाचा ठरला.
मात्र ह्यावेळी हुशारीने अर्ध्याच सामानाची खिचडी बनवली.त्यामुळे ती योग्य तेव्हढीच झाली. चवही उत्तम आली होती. एवढ्यात खालून निरोप आला की पाणी गाळून घ्या. bacteria आहेत. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. मग प्यायचं पाणी उकळत ठेवल. गार झालेलं पाणी कापडातून गाळून घेतल. रुमाल उजेडात धरला तेव्हा त्यावर मेलेल्या किड्यांचे थर स्पष्ट दिसत होते.
एव्हाना साडेदहा झाले होते. पटापट आवरून आम्ही पूर्वीच्याच पद्धतीने खाली उतरलो. एकमेकांना सावध करत आम्ही परत वाटेला लागलो.
पण नशीब पण कस विचित्र बघा. shortcut म्हणून धरलेली वाट आम्हाला पाण्याच्या दिशेने घेऊन गेली. तिथे दोन कातकरी भेटले. त्यांनी आम्हाला त्या जागेची माहिती सांगून पठारावर कड्याच्या पोटात असेलेल पाणी दाखवल.
त्यांचे आभार मानून आम्ही वाट उतरू लागलो. उन्हाचा कडाका सॉलिड जाणवत होता. मग वाटेतच सावली बघून आम्ही दुपारच भोजन उरकून घेतल. जास्त वेळ न दवडता आम्ही परत मार्गक्रमणा चालू केली. उन्हाने आमच्या शरीराच फक्त बाष्पीभवन व्हायचंच शिल्लक राहिलं होत.
गोविंद गोपाळ करत करत शेवटी गावात पोहोचलो. आमच्याकडे आणि आमच्या सामानाकडे बघून समस्तास अचंबा जाहला. त्या मावशींनी लगेच पाणी दिल. खोलीत पंखा लाऊन दिला. आमचं वेड साहस बघून त्यांच्या चेहर्यावरच कौतिक स्पष्ट दिसत होत. त्यांच्या कडून निघताना आम्ही त्या मावशींना थोडे पैसे देऊ केले तर त्या म्हणल्या, "अरे आम्हाला काय कमी हाय? आम्हाला फक्त माणुसकी कमवायचीय."
अंतर्मुख होऊन आम्ही मुकाट गाड्या काढल्या आणि पुन्हा ठाण्याकडे मार्गस्थ झालो.
अनोळखी माणसात दिसलेली माणुसकी, प्रसंगावधान, वेळेच नियोजन, साहस आणि साहचर्य असे बरेचसे नवीन अनुभव आणि शिकवण देऊन गेला हा ट्रेक.
वाचलं नाही अजुन, पण फोटो
वाचलं नाही अजुन, पण फोटो खतरनाक आलेत.
सुघड कसलं, अवघडच आहे की, जबरी!
सही फोटो अन वर्णन !
सही फोटो अन वर्णन !
१ नंबर रे.. नादखुळा!!!
१ नंबर रे.. नादखुळा!!!
साहसी आहात. फोटो छानच...
साहसी आहात. फोटो छानच... माझी बघता बघताच दमछाक झाली.
आम्हाला काय कमी हाय? आम्हाला फक्त माणुसकी कमवायचीय.
--- आजच्या जगात माणुसकी शिल्लक असल्याचा दुर्मिळ पुरावा... मला हे वाक्य सर्वात जास्त आवडले.
सॉलीड ... आहे एकदम.
सॉलीड ... आहे एकदम.
फोटो, मांडणी, वर्णन सगळंच
फोटो, मांडणी, वर्णन सगळंच अप्रतिम...
ट्रेक आणि त्याचं वर्णन, फोटो
ट्रेक आणि त्याचं वर्णन, फोटो सगळच झकास!
जबरदस्त
जबरदस्त
छे छे!!! अवघड झाले सुघड अस
छे छे!!!
अवघड झाले सुघड अस वाचुन मोठ्या अपेक्षेने धागा उघडला.
अजुन अवघडच आहे की ढाक.
ट्रेकच वर्णन आणि फटु लयी भारी.
मस्तच, अन लिहीलय पण छान
मस्तच, अन लिहीलय पण छान
बाप रे! कसलं अवघड आहे हे गड
बाप रे! कसलं अवघड आहे हे गड सर करणं वगैरे.
एकदा मी सिंहगड चढायचा निष्फळ प्रयत्न केला, आणि वर पोचल्यावर बहिणिला
सांगितलं मी काही आता उतरणार नाही खाली, इथेच दही विकून उदरनिर्वाह करेन
भले शब्बास. पाणी भरपूर हवे रे
भले शब्बास. पाणी भरपूर हवे रे नेहमी. नाहितर जिथे मिळतील तिथे उंबरं खायची नाहीतर नाचणीची बिस्किटे. त्याने तहान लागत नाहि.
बेस्ट ...मस्त
बेस्ट ...मस्त
सही ट्रेक...
सही ट्रेक...
अप्रतिम मित्रा ति रात्र एक
अप्रतिम मित्रा ति रात्र एक अविस्मरनिय अनुभव आहे ....................................
जबरी अनुभव! फोटोजपण मस्त
जबरी अनुभव! फोटोजपण मस्त आहेत!
मस्त लिहिलय, आवडलं.
मस्त लिहिलय, आवडलं.
सही
सही
ये भावानु, वाचतानाच कापरं
ये भावानु, वाचतानाच कापरं भरतय कि!
काही आता उतरणार नाही खाली,
काही आता उतरणार नाही खाली, इथेच दही विकून उदरनिर्वाह करेन>>>>
दही विकणारी दक्षी कशी दिसेल???
कुणी bag घेता का bag >> सही
कुणी bag घेता का bag >>
सही वर्णन केलय!
मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त
कसली जबरी रिस्क घेता राव
कसली जबरी रिस्क घेता राव तुम्ही......... मी आणि मोदक २ वर्षांमागे प्रोफेशनल ट्रेकर्स सोबत गोरखगड ट्रेक ला गेलो होतो. तुमच्या या ढाक पेक्षा फारच सोपा ट्रेक होता असे आता म्हणावे लागेल. पण त्यावेळी आम्हां दोघांची दांडी गुल्ल झाली होती. एक तर ट्रेकींचा prior अनुभव नाही. finally शेवटच्या गुहेकडे गेलोच नाही.
खूप छान मकरंद पंत आता एक
खूप छान मकरंद पंत
आता एक करायचे परत एकदा ठारवा यंदा आम्ही हि येणार
मकरंद मायबोलीवर तुझे स्वागत
मकरंद मायबोलीवर तुझे स्वागत आणि तुझ्या पहिल्याच लिखाणाबद्दल अभिनंदन!!!!
छानच लिहिलं आहेस रे आणि फोटोसुद्धा झकास.
आधी फक्त फोटोच पाहिले होते आता त्यासोबत वृतांतपण क्या बात है.
पुलेशु
जबरी रे!! खतरनाक अनुभव ...
जबरी रे!! खतरनाक अनुभव ...
मस्त
मस्त
ह्यो हाय आपला र्मद मराठा
ह्यो हाय आपला र्मद मराठा !!! जबरी गड सर केलात
वर्णन पण वाचलं आत्ता, खरंच
वर्णन पण वाचलं आत्ता, खरंच धाडसी आहात
जबरी ट्रेक. वृत्तांत आणि फोटो
जबरी ट्रेक. वृत्तांत आणि फोटो झ का स !!
दक्षे
Pages