खबरदार जर......
२००५ चा डिसेंबर. ५० मुलं, प्रत्येकाबरोबर एक किंवा दोन्ही पालक, आणि त्यांचे नॄत्यशिक्षक असे सगळे ताफा घेऊन भारतात गेलो होतो. शिवाजीमंदीर, दिनानाथ पार्ले, बोरिवली अश्या ठिकाणी सात कार्यक्रम होते. पहिला वहिला कार्यक्रम अर्थातच शिवाजीमंदीर दादर.
बरोबर गेलेल्या आयांना बरीच कामं वाटून दिलेली होती. म्हणजे मुलींच्या तयार्यांपासून, त्यांचे केस, कपडे, पिना एक ना दोन. बरोबर गेलेले बाप तसे तीन चारच होते, आणि त्यांना फारसे काम सांगण्यात आलं नव्हतं. फक्त एका नाचातून मुलं (मुलगे) बाहेर आली की त्यांना तयार व्हायला काही मदत लागली तर करावी एवढीच अपेक्षा ठेवली होती. मी आणि माझी कन्या असे दोघेच गेल्यामुळे तिला मदत करायचं काम तिथल्या आयाच (इतरांच्या) करणार होत्या. मी बॅकस्टेजला कुणाची टोपी संभाळ, कुणाला हेयरस्प्रे आणून दे, असली फुटकळ कामं करायचो.
शिवाजीमंदीरला कधी नाटक, नाच काही केले असल्यास एक गोष्ट लक्षात येते की तिथे कपडे बदलायला रंगपटात फारशी जागा नाही. एका बाजूला गॅलरी आहे, तिथे समोरच्या घरांच्या गॅलर्या असल्याने कोणताही आडोसा नाही. ही जागा अर्थातच मुलांना (मुलगे) दिली गेली. तिथे मागेच एक लहान खोली ती मुलींना मिळाली. सर्वसाधारणपणे २५/२६ मुली, प्रत्येक मुलगी तीन/चार नाचात असल्याने एक नाच संपला की धावत येऊन कपडे बदलून दुसर्या नाचाचे कपडे, आणि शेवटच्या नाचात सगळेच असल्याने शेवटी सगळ्यांनाच एकत्र कपडे बदलायला लागायचे. परत पुढचा प्रयोग (दुसर्या नाटकाचा) असल्याने संपल्यावर जास्तीत जास्त १०/१५ मिनीटांमधे बॅगा भरून जागा रिकामी करायला लागायची, त्यामुळे धावपळ.
अमेरिकेहून आपली पोरं येणार आणि मराठी कार्यक्रम करणार याचं आजीआजोबांपासून काका, मामा, माम्या, आत्यांना इतकं कौतूक की या प्रयोगांची पुढची सगळी तिकिटं नातेवाईकांनीच घेऊन प्रयोग हाऊसफुल्ल करून टाकला. पुढे सगळेच प्रयोग हाऊसफुल झालेच.
पहिला प्रयोग संपला आणि बॅकस्टेजला ही गर्दी झाली. सगळे काका, मामा, आजोबा, आजी अगदी मनापासून आपापल्या मुलांचं कौतूक करायला आत आले. एवढ्याश्या त्या खोलीत २५ मुली (वय वर्षं ८ ते १८) आणि चार मोठ्या बायका कपडे बदलताहेत तरी लोक आत घुसले. कुणी फुलं आणलीत, कुणी मिठाईचे पुडे. मी आपला तसाच बाहेर उभा राहून माझ्या मुलीची वाट बघत राहिलो. एक गोष्ट तेव्हाच लक्षात आली, की आलेल्या लोकांना कौतुकाच्या नादात एका गोष्टींचे विस्मरण झालेय.
दुसर्या प्रयोगापासून मी गुरखा झालो. प्रयोग संपला की मुलींच्या खोलीचा मी रक्षक. कमीत कमी पाच मिनिटं त्यांना कपडे बदलायला दिल्याशिवाय कुणालाच आत जायला द्यायचे नाही हा निश्चय करून 'खबरदार जर...' वाल्या त्या बाल्-मावळ्यासारखा दार अडवून उभा राहिलो. भेटायला आलेल्या लोकांना हे आवडलं नाही. मग त्यांनी,
१. अहो, आम्हाला ९ ची डोंबिवली लोकल पकडायची आहे,
२. मी त्या अमक्या तमक्या मुलीची आत्या आहे.
३. फक्त एकच मिनीट भेटायला आलोय आम्ही तर तुम्ही...
४. मी आजी आहे तिची आणि हे आजोबा....
एक ना दोन. लोकं जणू काही मी आता त्यांना उभ्या आयुष्यात एकामेकाना कधीच भेटू देणार नाही असं धरून माझ्याशी वाद घालायला लागले. बर्याच लोकांना मी परोपरीने समजावलं की 'पाच मिनिटं थांबा. तुमच्या नातीला/भाचीला/पुतणीला मी बाहेर पाठवतो,' पण एक कुणी ऐकायलाच तयार नाही.
शेवटी मला चार चौघाना हा प्रश्न विचारावा लागला.....
'तुमची मुलगी कपडे बदलत असताना मी तिथेच उभा राहून तिच्याकडे पाहिलेलं तुम्हाला चालेल का?'
(समाप्त)...
(No subject)
लोक पण ना
लोक पण ना
अशक्य लोकं आहेत
अशक्य लोकं आहेत
पेशन्स, शिस्त आणि सौजन्य या
पेशन्स, शिस्त आणि सौजन्य या गोष्टींची कमीच आहे..
लोकाना हक्कावर गदा
लोकाना हक्कावर गदा आणल्यासारखे वाटले कि> एवढे लांबून कौतूक करायला आले आणि दारावर गुरखा म्हणजे काय ?
शिवाजी मधल्या मेकप रुम्स अगदीच छोट्या आहेत. कलाकाराना भेटायला गेलो, कि त्याना पण संकोचायला होते.
लोक खरच ग्रेट असतात. विनय
लोक खरच ग्रेट असतात.
विनय . तुम्ही अस विचारुन सुद्धा लोकानी उत्तर न देता , खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला असणार आहे.
नाही ग सीमा, देसाई असं
नाही ग सीमा, देसाई असं म्हंटल्यावर १० से. थांबले असतिल.
(No subject)
लोकांना कळत कसं नाही , आणि
लोकांना कळत कसं नाही , आणि वरनं स्वतःला सुसंस्कृत , सुशिक्षित म्हणवुन घेतात.
काही पण वैतागवाणं आहे हे! हे
काही पण वैतागवाणं आहे हे! हे असं सांगावं लागतं कोणाला म्हणजे किती वाईट?
विनय, तुम्ही अगदी योग्य तेच
विनय, तुम्ही अगदी योग्य तेच केलत. गुड जॉब
मला तर बॅकस्टेजला कुणी उगाच कामाशिवाय आलेल आवडायचच नाही. कार्यक्रम संपला की कलाकार बाहेर येतातच ना? तेव्हा त्यांना भेटा. बॅकस्टेजला जाऊन त्यांना त्रास का द्यावा? कलाकार त्यांच्या पर्फॉर्मन्सनंतर थकलेले असतात, जरा विसावतात, कपडे बदलतात. तेव्हा पण आपल मधे मधे घुसुन मला स्वक्षरी द्या, माझ्या बरोबर फोटो काढा थोडी तरी प्रायव्हसी हवी की त्यांना ही.
श्श्या, या लोकान्ना कधी
श्श्या, या लोकान्ना कधी अक्कला येणार?
जस कुठल्याही भटारखान्यात डोकावू नये तसच कधीही ब्याकस्टेजमधे जाऊन डोकावु नये हा सन्केत आम्हाला लहानपणीच शिकवला गेला!
लिम्बूदा, लहानपणी बॅकस्टेजला
लिम्बूदा, लहानपणी बॅकस्टेजला नक्की काय करायचात तुम्ही ? एक भा.प्र.
लिम्बूदा बॅकस्टेजला डोकावायला
लिम्बूदा बॅकस्टेजला डोकावायला जायचे बहुतेक
विनय, या सगळ्यात तुझंही कौतुक
विनय, या सगळ्यात तुझंही कौतुक असा खमका स्टँड घेतल्याबद्दल
व्वा वा... गुड जॉब परदेसाई
व्वा वा... गुड जॉब परदेसाई साहेब
हे काय टायटल ? तुमच्या भावना
हे काय टायटल ?
तुमच्या भावना समजण्या सारख्या आहेत पण एखाद्या लेखाचं टायटल म्हणून हे विचित्र (खरं तर असभ्य) नाही का वाटते ?
तुम्ही रखवालदाराची भूमिका घेऊन घुसखोर नातेवाईकांना घुसण्यापासून थांबवलत हे चांगलच केलत, पण हा प्रश्न जरा विचित्र च वाटला, थोड्या appropriate भाषेत सांगायला हवं होतं असं माझं मत!
btw, लोक हसतायेत काय असे ?
हा जोक आहे का ?
मला तुमची अॅटिट्युड पट्ली.
मला तुमची अॅटिट्युड पट्ली. मुलींना लाज वाट्ते व ते समजावून घेणारे कमीच असतात.
अरे बाबान्नो मी लहानपणी
अरे बाबान्नो मी लहानपणी नाटकात कामे केलिहेत (अनुभव अन अनुभुती याशिवाय मी एक शब्दही बोलत नाही, कळ्ळ? )
ब्याकस्टेजला आमचा मेकअप व्हायचा, पालक मण्डळी लई त्रास द्यायची! माझी आई मात्र फिरकायची देखिल नाही तिकडे, ती आपली समोर प्रेक्षकात निवान्त बसुन नाटकान्चा आस्वाद घ्यायची!
>> अरे बाबान्नो मी लहानपणी
>> अरे बाबान्नो मी लहानपणी नाटकात कामे केलिहेत >> तरिच इथे मोठाली
स्वगते टाकतोस
>>>> तरिच इथे मोठाली स्वगते
>>>> तरिच इथे मोठाली स्वगते टाकतोस
तस नाही, स्वगते अन नाटकान्चा अर्था अर्थी सम्बन्ध नाही, किम्बहुना नाटकातले सन्वाद पाठ करुन प्रत्यक्षात म्हणताना मात्र "उत्स्फुर्तपणे" सन्वादल्याचे दाखविणे महा अवघड
त्यातुन आम्हा अजागळान्ना कमित कमि सन्वाद देणे हे दिग्दर्शक्/लेखकाचे कौशल्य असायचे तेव्हा
नन्तरच्या आयुष्यात, "पुरुषाची" बोलती बन्द व्हायच्या अनेक कारणान्पैकी एक कारण म्हणजे लग्न झाले अन स्वगते कायमची गाठीला बान्धली गेली!
असो, बीबीवर विषयान्तर नको
विनय, स्तुत्य काम केलेत.
विनय, स्तुत्य काम केलेत. मॉबला अडचणी, प्रॉब्लेम्स समजत नाहीत आणि ऐकून, समजून घ्यायची इच्छाही नसते
पण शीर्षक पाहून मीही एक सेकंद दचकले!
शीर्षक ग्रेट्च ! आणी तुमच्या
शीर्षक ग्रेट्च ! आणी तुमच्या प्रसन्गवधना बद्दल कौतुक !
खरं तर तिथे एक पाटीच लावून
खरं तर तिथे एक पाटीच लावून टाकायची :- ''कलाकारांना भेटण्यासाठी ग्रीन रूममध्ये गर्दी करू नये. त्यांना किमान स्वतःचे आवरण्यासाठी प्रायव्हसी द्यावी. तसदीबद्दल क्षमस्व व आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद!!'' ~ हुकमावरून.
आमच्या पुण्यातल्या लोकांना लगेच कळली असती हो पाटी!!
ही पाटी सगळीकडे असते. आणि
ही पाटी सगळीकडे असते. आणि जनरली व्यावसायिक वा प्रायोगिक नाटकांच्या इथे पाळली जाते. लहान मुलांचे कार्यक्रम मग ते अमेरिकेतल्या असो वा देशातल्या हा सगळाच हौशीचा मामला असतो त्यामुळे हि घुसाघुस जास्त होते.
आणि आपण सगळे नियम मोडण्यात धन्यता बाळगणारेच असल्याने त्याला पर्याय नाही.
आम्ही लहान मुलांची नाटकं बसवायचो तेव्हा आयांना हाताशी धरून प्रयोगाच्या आधी एक तास कुणालाही भेटण्याची परवानगी नाही असं सगळ्या घरच्यांना सांगायला सांगायचो. सगळा पसारा बघून आयांना बरोबर कळायचं आणि योग्य तो निरोप घरी पोचायचा. काही पोरांच्या आया मात्र बरोबर असायच्या कारण त्या आमच्या मदतीला उभ्या असायच्या.
अजून एक विनोदी प्रसंग असतो तो म्हणजे लहान मुलींचे अरंगेत्रमचे शो.
हल्ली क्लासमधल्या ७-८ मुलींचे मिळून अरंगेत्रम होते. विक्रम कडे मेकप शिकल्यावर तो अश्या क्लासेसच्या प्रयोगांना आम्हाला मेकपसाठी पाठवायचा. भरतनाट्यम शिकवणार्या बहुतांश (काही सन्माननीय अपवाद वगळता) गुरूंना मेकप मधलं काहीही कळत नाही. पूर्वी मशालीच्या उजेडात प्रयोग व्हायचे तेव्हा मेकपची गरज वेगळी असायची आणि आताची गरज वेगळी परत साधनेही जास्त चांगली हे त्यांच्या गावीही नसते. त्यामुळे उत्तम डबल बेस, बेसिक शेडींग, आयलायनिंग आणि थोडेसे ब्लशॉन असं करून सुंदर केलेल्या मुलींना या सगळ्या गुरू मेकपवरून पावडर थापून, गालाला चिमटे घेतल्यासारखा लाल रंग आणि रक्ताळलेले ओठ करून या मुलींना माझ्यापुढे उभं करायच्या आणि म्हणायच्या याला मेकप म्हणतात. तिकडे एखाद्या मुलीची आई पोरीला बाजूला घेऊन गुरूने केलेला जास्तीचा हिडीस मेकप रूमालाने खसखसून पुसत असायची. मुलीच्या चेहर्यावर इकडे आड तिकडे विहीर असे भाव. सुरूवातीला या सगळ्याने वाईट चिडचिड व्हायची. पण अश्या प्रसंगांशी डील करता यावं म्हणूनच विक्रम आम्हाला तिथे पाठवत असे. असो...
परदेसाईंच्या लेखावर उगाच झब्बू पाडला.
झब्बू चान्गला हे
झब्बू चान्गला हे
दुसर्याच्या नजरेतुन विचार
दुसर्याच्या नजरेतुन विचार करतील तर ती आपली माणसं कुठली
कृपया शीर्षक
कृपया शीर्षक बदला..............
लेखाचं शिर्षक मुद्दाम ग्लॅमरस
लेखाचं शिर्षक मुद्दाम ग्लॅमरस , हल्लीच्या भाषेत कॅची का काय ते मुद्दाम ठेवलय का ?
धन्यवाद सगळ्यांना.. पाट्या
धन्यवाद सगळ्यांना..
पाट्या लाऊन फरक पडत नाही. 'थुंकू नये' या पाटीवरच थुंकून ठेवायचे असं करणारे बरेच असतात.
काही लोकांना आपण विषेश आहोत तेव्हा पाटीवरचा नियम आपल्यासाठी नाही असेच वाटते.
काही लोक पाट्या वरच्या सूचना धुडकावण्यात धन्यता मानतात.
आणि एकद्-दुसरा नियम पाळायला गेला, की आपण इथेच राहिलो आणि नियम तोडून पुढे घुसलेल्यांचे काम झाले हे लक्षात येते. मग पुढे तोही तेच करतो...
शीर्षक जरा जास्त धक्कादायक झाले का?
'शीर्षक सुचवा....' तुम्हाला योग्य वाटेल ते शीर्षक सुचवा.. आपण बदलू त्यात काय?
Pages