मातृदिन : माझ्या आईच्या पध्दतीचा आंब्याचा शिरा

Submitted by दीपांजली on 10 May, 2010 - 02:58
shira

आंब्याचा शिरा:

लागणारा वेळ:
अर्धा तास

साहित्यः
१ वाटी जाड रवा
पाऊण वाटी सजुक तूप
१ वाटी साखर
२ वाटी हापुस अंब्याचा पल्प ( फ्रेश किंवा कॅन मधला)
दीड वाटी गरम दूध
काजु, भिजवलेले साल काढलेले बदामाचे काप, बेदाणे. (प्रमाण आवडी प्रमाणे)
सजावटः
ड्राय फ्रुट्स थोडे मिक्स करायला आणि थोडे सजावटीसाठी ठेवावे.
आंब्याचा सिझन असेल तर आंब्याच्या फोडी.

क्रमवार पाककृती:

१.अर्धी वाटी तूपावर रवा मंद आचेवर खमंग भाजून घ्या.
त्यात दीड वाटी गरम दूध घालून रवा छान फुलवून घ्यायचा.
२. फुललेल्या रव्यामधे एक वाटी साखर मिक्स करून रवा नीट हलवून घ्या.
३. साखर मिक्स झाल्यावर हापुस आम्ब्याचा आमरस घाला आणि मग उरलेलं तूप त्यात घालून रवा, आमरस सगळं नीट मिक्स करायचं, गॅस बारीक करून झाकण ठेवायचं.
४. दोन तीन मिनिटांनी वाफ आली कि त्यात काजु, बदाम तुकडे आणि बेदाणे घालून मिक्स करा.
शिरा तयार.
सर्व्ह करताना:
सजावट करताना छान अकाराच्या साच्यातून तूप लावून मुदी कराव्यात आणि फोटोत दाखवल्या सारख्या किंवा आवडी प्रमाणे काजु-बदाम-बेदाण्यांचं डिझाइन बनवून सजावट करावी.

वाढणी/प्रमाण:
खाणार्‍यावर अवलंबून
अधिक टिप्सः
* आंब्याच्या शिर्‍यामधे स्वाद फक्त हापुस आंब्याचाच ठेवावा.
वेलदोडा, केशर अशा गोष्टी अजिबात घालु नये.
* यु.एस मधल्या स्टोअर्स मधे मिळणारा केसर मँगो पल्प अजिबात वापरु नये, त्या पेक्षा रत्नागिरी हापुस, देसाईंचा पल्प मिळतो तो वापरावा.
* कॅलरी कॉन्शस लोकांने पोरशन कंट्रोल करावा पण कमी तूपात अजिबात करु नये, गचगचीत शिरा होईल !
माहितीचा स्त्रोतः
आई :)

हा आईने बनवलेल्या शिर्‍याचा फोटो :
shira2.jpg

Much requested video, finally on my channel ,
माझ्या चॅनलवर नवीन व्हिडिओ +grocery vlog : आंब्याचा शिरा ( आईची रेसिपी):

आवडला तर लाइक करा आणि शेअर करा :)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पग्या, माझं नाव घेउ नकोस उगिच... मी विशिष्ठ कंपनीत कधीच नव्हते. Proud

पुन्हा शिरा कधी खायला मिळेल? असं विचारायला आलेले मी.. त्यामुळे माझी पोस्ट विनाकारण नाही ह्याची नोंद घ्यावी. Wink

मस्तच ....
फोटो पण मस्त... खास करून मातृदिनानिमित्त ९ आकड्याचे डेकोरेशन आणि साजेसी कोयरीची डिश.. Happy

दीपांजली, तुमच्या कृतीप्रमाणे हा शिरा मी करून पाहिला. खूपच सुंदर्,चविष्ट आणि तृप्त करणारा. नुसता आंबा किंवा आमरस खाऊन कंटाळा येत असेल, तर हा पर्याय खूपच छान आहे. धन्यवाद.
(मी मायक्रोवव्ह मधे करून तुपाची काटकसर केली).

अतिशय मधुर पाककृती, शिवाय आईच्या हाताची चव त्यात दिसतेय.
फोटो पाहून तोंडाला जाम पाणि सुटलं.. Happy

डीजे, जबरा हीट आयटम गं!! आज पॉटलकला करून नेला होता. मैत्रिणी वेड्या झाल्या पाSSर!
मस्त चव, योग्य प्रमाणात गोडवा अन क्लासिक कलर!! Happy
तुझ्या आईला खास धन्यवाद.

DJ, मीही करून बघितला, छान झाला .. पण माझ्याकडे 'दीप' ब्रॅंड चा होता .. पण हापूस नसावा तरी चव छान आली, मी त्यात आंब्याच्या फोडीही घातल्या होत्या .. रस मात्र एकच वाटी घातला .. हापूस चा असेल तर अजून घालायला हरकत नसावी पण ही दीप चा कॅन मधला फार चांगला नव्हता ..

पुढच्या वेळी देसाईंचा वापरून बघते ..

मी कलच देसाई चा high density pulp घालून केला शीरा. मस्त झाला. DJ, many thanks to your wonderful mom! आणि रेसिपी लिहिल्या बद्दल तुला पण धन्यवाद!

मी पण केलेला गणपतीबाप्पासाठी प्रसादाला. खुपच छान चव, रंग, आणि स्वाद आलेला. पण त्या दिवशी काही केल्या ही रेसिपी सर्च मधे येईना. मी शिरा, आंबा, पध्दतीचा, अगदी मातृदिन हा शब्द पण सर्च मधे टाकून पाहिला होता. मृण्मयीने वाचवलं त्या दिवशी वेळेवर रेसिपी देऊन. असं का झालं असावं बरं?

काल केला होता हा शिरा. इतका सुंदर झाला होता की बस्स ! अगदी मऊमोकळा. मी काजू आधी तुपात थोडे ब्राऊन करुन घेतले. खूप खूप धन्यवाद दीपांजली Happy

Mango sheera.jpg

वर डिजेनी स्पष्ट लिहिलंय की केशर आणि वेलदोडे घालू नयेत तरी पब्लिक तेच घातलेले फोटो टाकतंय Proud
अगो, शिरा छान दिसतोय. दोन चार दिवसांत करुन बघेन.

मी केशर आणि वेलदोडे दोन्ही घातलं नव्हतं. फोटोत दिसतायंत ते तळलेले काजू आणि बेदाणे आहेत. बदामाचे कापही होते Happy

वर डिजेनी स्पष्ट लिहिलंय की केशर आणि वेलदोडे घालू नयेत तरी पब्लिक तेच घातलेले फोटो टाकतंय >> सायोबाई लोक जरा स्वत:चे बदल करतात हो. लेखकाने लिहिलेलिच पाकक्रुति करावी असे कुठे लिहिलेय इथे. हा ज्याच्या त्याच्या आवडिचा प्रश्न.

डीजे, ही पाककृती इथे दिल्याबद्दल तुला आणि पाककृतीबद्दल आईला अगदी मनापासून धन्यवाद! आयुष्यात कधीही न जमलेला शिरा, ही पाकृ तंतोतंत फॉलो करून जमला आणि समस्त जनतेला खूप आवडला. काल ३ जणांना या धाग्याची लिंक दिलीय. Happy

aambyachaa-shiraa-DJchyaa-aaichi-paakru.jpg

डीजे गणपतीत प्रदाद म्हणून ही पाककृती एकदम हीट आहे. मी खूप मैत्रीणींना लिंक दिली आहे या रेसिपीची आणि सगळ्यांनी शिरा छानच झाल्याची पावती दिली आहे. तुझ्या आईला नक्की कळव.

Pages