कशाही आणि कितीही कठिण परिस्थीतीवर मात करून आयुष्यभर स्वत:च्या, स्वजनांच्या आणि सभोवतीच्या समाजाच्या शिक्षणाचा ध्यास घेणार्या आणि आज वयाची आठ दशकं ओलांडल्यावरही, त्यासाठी झटणार्या श्री. भाऊसाहेब कारखानीसांचा अल्प परिचय..
जन्म: १ जुलै १९२८
शिक्षण: मास्टर्स डिग्री, लॉ अँड अकाउंटिंग (युनिवर्सिटी ऑफ बॉंबे); इंटरनॅशनल बँकिंग, युनिवर्सिटी ऑफ लंडन.
नोकरी: मॅनेजर: बँक ऑफ इंडिया (मुंबई आणि कंपाला , युगांडा), अकाउंटींग चे प्रोफ़ेसर, मक्रेरे युनिवर्सिटी, कंपाला, युगांडा
अकाउंटींग वर शैक्षणिक पुस्तकं लिहिली.
मक्रेरे युनिवर्सिटीत बिझिनेस डिपार्टमेंटची स्थापना केली.
१९७२ मधे इदी अमीनच्या अत्यंत वाइट वागणुकीनंतर अमेरिकेला आगमन.
कुटुंबीयांच्या मदतीनं लॉस एंजेलिसला उत्त्तम रित्या २ रेस्टॉरेंटस चालवली.
१९९३ मधे स्टेट ऑफ कॅलिफोर्निआच्या डिपार्टमेंट ऑफ डेव्हलपमेंटल सर्विसेस मधून निवृत्त.
शिक्षण क्षेत्रात समाजिक कार्य: पी. डी. कारखानीस कॉलेज ऑफ आर्ट अँड कॉमर्स ची स्थापना. अंबरनाथ, मुंबई. (सध्या जवळपास २००० विद्यार्थी) (उत्तम लायब्ररी, ऑडिटोरियम आणि कंप्युटर रुम्स नी सुसज्ज).
जीथे शालेय शिक्षण झालं त्या महात्मा गांधी विद्यालयाला ऑडिटोरियम आणि कंप्युटर रुम्स चं दान.
अंबरनाथच्या विद्या वर्धिनीसहाय्यक समितीच्या शाळेत सहावी सातवीचे वर्ग चालवण्याकरता आर्थिक सहाय्य.
विद्यार्थी सहाय्यक समितीला १४० गरजु विद्यार्थ्यांकरता सर्व सोयी असलेलं वसतीगृह बांधण्यासाठी १ करोड रुपयांची देणगी.
गेल्या गुढीपाडव्याला मराठी मंडळाच्या कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. गुढ्यांची स्पर्धा, उत्तम मराठी भोजन असले सगळे कार्यक्रम आटोपले. ह्यानंतर एक महत्वाचा कार्यक्रम होणार होता, 'भाऊसाहेब कारखानीस' ह्यांच्या सत्काराचा! नेहमी सगळ्यांची प्रेमानं चौकशी करणारे, सगळ्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थीत असणारे आणि कधी कधी देवळाच्या ऑफ़िसमधे ४-४ तास काम करताना दिसणारे ते हेच भाऊसाहेब ! सत्कार समारंभात त्यांचा परिचय ऐकला आणि त्यांच्या समाजकार्याची जाणीव झाली. सर्वप्रथम मनात विचार आला,'भाऊसाहेबांची ओळख आपल्या मायबोलीकरांना करून द्यायची'. पुढल्या भेटीत भाऊसाहेबांना तसं विचारलं. कुठलेही आढेवेढे न घेता त्यांनी ते कबुल केलं. सेंट्रल फ़्लोरीडाच्या कॅसलबरी हिंदु टेंपल मधे भेटायचं नक्की झालं.
मुलाखत प्रश्णोत्तरांच्या रुपात असावी की सलग आठवणींच्या रुपात ह्यावर त्यांनी दुसरा पर्याय निवडला. बोलायला सुरुवात झाल्यावर त्यांच्या आठवणी आणि त्यातले आजही त्यांच्या लक्षात असलेले डिटेल्स बघून निव्वळ आश्चर्यानं थक्क झाले. भाऊसाहेबांच्या काही आठवणी अंगावर काटा आणणार्या तर काही अंतर्मुख करणार्या आहेत. त्या त्यांच्याच शब्दात आपल्यापुढे सादर करते…….
आम्ही मूळचे खोपोलीचे. आई-वडलांची शेती होती. शेतीमधे आई स्वत: खूप interest घ्यायची. मला एकंदर १३ भावंडं! वडलांना Tata Housing Comapny मधे कारकुनाची नोकरी होती. कष्टाचं जीवन! आईची प्रबळ इच्छा की सगळी मुलं पुढे यायला हवीत. अगदी शिक्षणातही! त्या दृष्टीनं ती आम्हाला खूप प्रोत्साहन द्यायची. लहानपणी आम्हाला देखील कष्ट खूप होते. जेवायची सोय कधी असायची कधी नाही. शेती असूनही भाजीपाला नसायचा. एक दुध दुभतं तेवढं भरपूर होतं. बाकी मेजवान्या, गोडधोड असले प्रकार कधी मिळाले नाहीत. खोपोलीतल्या 'बिहारी' गावात आमचं घर. घरात आम्ही सगळी मुलं गोधड्या टाकून झोपायचो. इतक्या सगळ्या मुलांचं अर्थातच आई एकटी करु शकायची नाही. मी सगळ्यात मोठा. त्यामुळे माझ्यावर बरंच pressure असायचं. पण सगळ्या जबाबदार्या मी उत्साहानं पार पाडायचो म्हणून आईचं माझ्यावर खूप प्रेम. प्रत्येक बाबतीत मी तिला मदत करायचो. माझं मराठी चवथीपर्यंतचं शिक्षण खोपोलीत झालं. अगदी ठळकपणे आठवणारी गोष्ट म्हणजे शाळेत जाताना वाटेत एक पूल होता. पावसाळ्यात बिहारीमधून खोपोलीला जाताना पुलावरून वाहणार्या पाण्यामुळे पंचाईत व्हायची. तेव्हा नथु गड्याच्या खांद्यावर बसून आम्ही जायचो. पण शाळा चुकवायची नाही. शाळेत बसायला तरट! शिकवणारे मास्तर अतिशय कडक होते. मी शाळेत, वर्गात पहीला असल्यामुळे मला शिक्षा होत नसे. पण इतर मुलं मात्र शिक्षा भोगायची. त्यामुळे मुलांचा अभ्यास मात्र बरोबर व्हायचा. हल्ली शिक्षा करता येत नाही. पूर्वी वातावरण फार कडक होतं.
मुलांची चवथी पार पडल्यावर काय करायचं हा आईपुढे प्रश्न पडला. कारण पुढल्या शिक्षणाची सोय तिथे नाही. आईचे एक मामा परळला होते. तिने त्यांना request केली. मला आणि माझ्या बहिणीला घरी ठेवून घ्यायला मामा आनंदानं कबूल झाले. आईनी त्यांना 'आम्ही थोडेफार पैसे देऊ शकू' असंही सांगितलं. मी त्यांच्याकडे रहायला
गेलो. परळच्या highschoolमधे माझं नाव नोंदवलं. अभ्यास चांगला असल्यामुळे मी वरच्या श्रेणीत येत गेलो. दीड दोन वर्ष तिथे राहिलो.
पुढे आईनी वडलांना wimco factoryत नोकरी घ्यायला motivate केलं. त्या निमित्तानं आम्ही खोपोलीतून अंबरनाथला आलो. आमच्या वडलांचा स्वभाव पडला दानशूर! सगळ्यांना पैसे द्यायचे. आणि स्वत: मात्र (खोपोलीत) कर्जबाजारी व्हायचे. लोक यायचे. बाहेर बसायचे. आणि वडील आईला न सांगता त्यांन पैसा पुरवायचे, अगदी सावकाराकडून कर्ज काढून!! हे असं करता करता कर्जाचा बोजा झाला. परंतु आई अतिशय कर्तबगार होती. ह्या असल्या अनुभवांमुळे शेवटी ती वडलांच्या हालचालीवर लक्ष ठेवायची. त्यांना control मधे ठेवणं हे तिचं काम! शिवाय इतक्या मुलांचं बघायचं, ही एक चिंता! हे सगळं बघता तिने अंबरनाथला जाण्याचा निर्णय पक्का केला होता.
तोवर परळहून आम्ही देखील अंबरनाथला आलो. वडलांच्या कंपनीमार्फत तिथे आम्हाला रहायला Wimcoची जागा मिळाली, दोन खोल्यांची. अंबरनाथच्या 'महात्मा गांधी विद्यालया'त आमची नावं नोंदवली, इंग्रजी तीसरी आणि चवथीला. ही शाळा फक्त चवथीपर्यंतच. पाचवीत जाणारे फक्त ४ विद्यार्थी! चवथी पास झाल्यावर भाऊसाहेब परांजप्यांनी विचारलं, "तुमची तयारी आहे का पाचवीत जायची? असेल तर चारच्या संख्येवरही वर्ग सुरू करू." आम्ही कबूल झालो. आम्हालाही दुसरा इलाज नव्हता. (गंमत अशी की आम्ही लागोपाठची भावंडं असल्यामुळे एकच पुस्तक सगळ्यांनी वापरायचं! पूर्वी पुस्तकं बदलत नसत हल्लीसारखी! बरं पहिलं पुस्तकही नवीन नाहीच. second hand पुस्तक कुठुनतरी घ्यायचं. त्यावरच अभ्यास करायचा.) माझा पहिला नंबर पाचवीतही कायम राहीला.
यानंतर ६वी आणि ७वी मॅट्रिकसाठी कल्याणच्या new highschool ला गेलो. ट्रेननी जाणं येणं असायचं. अंबरनाथला असताना ठाण्याला झालेल्या स्कॉलरशीपच्या परीक्षेत पहीला आलो. त्या पैश्यातून ६वी, ७वीच्या फीची सोय झाली. आधीच्या शाळेत फ़्रीशिप होती. (ह्याचं कारण म्हणजे भाऊसाहेब परांजपे माझ्या academic credentials वर खूष होते.)
'मॅट्रिक नंतर आता काय' असा प्रश्न पडला. वडलांचे मामा हे कीरवाडीला रहात असंत. त्यांना वडील जाऊन भेटले. बरोबर मलाही घेऊन गेले. मामांना विचारलं, 'हा मॅट्रिक झालाय. पुढे शिकायची खूप इच्छा आहे. पण रहायची सोय नाही. तेव्हडी सोय तुम्ही करु शकाल का? आम्ही जमतील तसे पैसे देऊ. हा तुमची घरातली कामं करेल.' मामांनी होकार दिला. त्यांच्या घरात आधीच ५-६ माणसं होती. पाहुणेही खूप असायचे. पण त्यांची मदत झाली. मी पोद्दार कॉलेजात admission घेतली. रोज सकाळी ७:३०ला जायचं, दुपारी १ ला परतायचं. जेवून पुन्हा कॉलेजला जायचं, कारण घरात अभ्यासालाच काय, तशीही जागा नाही. लायब्ररीत बसून अभ्यास करायचा, तो अगदी रात्री आठपर्यंत! कारण आभ्यासाला पुस्तकं नाहीत! शिवाय तिथे UOTC, University Officer's Training Course join केला. त्याचा फायदा असा की अंबरनाथपर्यंत ट्रेनचं भाडं मिळायचं.
B.Com. करताना उन्हाळ्याच्या सुट्टीत निरनिराळ्या ठिकाणी नोकर्या केल्या. Bank Of Indiaत केलेल्या नोकरीमुळे तिथे एक contact तयार झाला. न्यू ईंडिया अश्युरन्स, मोहन and सन्स, AG office, फायनॅन्स डिपार्टमेंट ऑफ़ गवर्न्मेंट ऑफ़ बॉम्बे ह्या अश्या ठिकाणी नोकर्या करत करत B.Com पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं
BCom नंतर Bank Of India तून ऑफिसर झालो. Govermment of Bombay ची परिक्षा पास होऊन Finanace Department जॉइन केलं. Political Services, Home Department अश्या विभागातून बदल्या होत गेल्या चांगला अनुभव मिळावा म्हणून. या नंतरच्या AG ऑफिसच्या नोकरीत बाहेरगावी बरंच जावं लागे. त्याच सुमारास विलीन झालेल्या राज्यांच्या financesचं को- ऑप coordinate करण्याकरता (१९५० साली) अख्खा महाराष्ट्र फिरणं झालं.
१९५० च्या डिसेंबरमधे माझं लग्न ठरलं. शिक्षणही चालूच होतं. हॉस्टेलमधे राहून M.Com करत होतो. नोकरी देखील चालू होती. हे सगळं सुरु असतानाच LLB करण्याचं ठरलं. लॉ कॉलेजला संध्याकाळाचे वर्ग असत. २-३ वर्ष अशी धकाधकीत गेली.
बँकेत सब-ऑफिसर म्हणून सिलेक्ट झालो. बँकेतून दरवर्षी ३ ऑफिसर्सना लंडनला पाठवत. Bank Of India मधे १९५१ मधे जॉइन झालो. पण १९५७ पर्यंत मला काही लंडनला जाण्याचा चान्स मिळाला नाही. ५७च्या जानेवारी-फेब्रुवारीत हे सिलेक्शन पुन्हा झालं. तेव्हा मला चान्स मिळाला. बॉसनी पासपोर्ट तयार करायला सांगितला. ऑगस्ट मधे सुझान बोटीनी जाण्याचं ठरलं. आमच्या कुटुंबातून, अंबरनाथच्या शाळेतून लंडनला जाणारा मीच पहीला म्हणून सत्कार वगैरे झाले. पूर्वी लंडनला जाणं म्हणाजे काय, big deal! त्यामुळे सत्काराखेरीज इतर समारंभ, वर्तमानपत्रात बातमी, अगदी फोटो सहीत, हे सगळं झालं!
१५ ऑगस्टला बोट निघणार होती. मुंबई बंदरावर आलो. नातेवाईक आणि well wishers मिळून जवळपास २५० ते ३०० लोक आले होते! सगळ्यांनाच कौतुक! त्यातही बोट बघण्याची विशेष उत्सुकता! (अद्याप याचे फोटो मी जपून ठेवलेत). माझा मुलगा त्यावेळी लहान होता. लंडनला जाताना दोन पर्याय होते. एक म्हणजे बायकोला आणि मुलाला घेऊन जाणे किंवा दुसरा म्हणजे धाकट्या भावाला! माझा स्टायपेंड फक्त ७५ पाऊंड होता! तेव्हड्यात सगळं भागवायचं, जाण्यायेण्याचं तिकिट काढायचं असं सगळं परवडण्यासारखं नव्हतं. धाकटा भाऊ 'शरद' याला लंडनला घेऊन जाण्याची, त्याला मदत करायची खूप इच्छा होती. आपली फॅमिली पुढे आली पाहीजे असं सारखं वाटायचं! त्या दृष्टीनं पण प्रयत्न करायचे होते. विचार केला, बायको राहून परत येणार, त्या ऐवजी ती आई-वडलांकडे राहिली तर जास्त सोयिस्कर! मुलाचं शिक्षण पण चालू राहील. भावाला न्यायचं ठरलं. पण लागलीच बरोबर नेलं नाही. त्याला पैशाची सोय करून द्यायची होती.त्यावेळी माझी दादरला माधववाडीला सिन्गल रूम होती. मी आणि भाऊ तिथे रहात असू. ती जागा विकायचं ठरलं. त्यातून त्यांचं तिकिट निघालं. 'मी पोचल्यावर तू ये' असं त्याला सांगितलं.
मी लंडनला पोचलो. अतिशय काटकसरीने राहून पैसे जमवायला सुरुवात केली. भावाला पण स्वतःबरोबर ठेवण्याचा प्लॅन होता. त्याची शिक्षणाची सोय झाली तर बरं, हा विचार होता. मी Associate Institute of Bankers (AIB), London ची परिक्षा दिली. माझं त्यामुळे International Banking चं ज्ञान वाढलं. त्याच सुमारास भाऊ आला. भावाला सांगितलं मी रहायची व्यवस्था करेन पण नोकरी तू शोध. माझ्याकडे होती नोकरी पण त्यालाही अनुभव यायला हवा! त्याने महिनाभर खटपट केली. पण त्यावेळी. लन्डन मध्ये नोकरी मिळणं कठीण होतं. खासकरुन तुमच्या वर्णामुळे. अखेरीस त्याला नोकरी मिळाली. तोवर माझंही AIB चं शिक्षण झालं. १८ महिन्यांचं training ही पार पडलं आणि जायची order आली.
पण तेवढ्यात युगांडात पोस्टिन्ग मिळालं, Accountant म्हणून. भारतात परतून पुढे बोटीने युगांडात जायचं ठरलं. भारतात येऊन नातेवाईकांना भेटलो. त्यावेळी फॅमिली सकट जायचं ठरलं. मुंबई ते मुम्बासा सात दिवसांचा प्रवास होता first class ने. सोयी छान होत्या. मुम्बासा ते कम्पाला ट्रेन जर्नी होती. प्रवास छान झाला. तिथले मॅनेजर सोनाळकर आणि त्यांच्या पत्नी घ्यायला आले होते. गार्डिनर restaurant च्या वरती अपार्टमेंट होतं. हळूहळू बस्तान बसून मोहनला (मुलाला) स्कूलमध्ये प्रवेश मिळाला.
मला बॅंकेत रोज चालत जावं लागे. गाडी नव्हती नी driving ची कल्पना नव्हती, driving शिकून घेतलं, माझी पहिली कार Morris minor. युगांडात बरेच मित्र झाले. बरीच मराठी मंडळी होती. मी महाराष्ट्र मन्डळाचा प्रेसिडेन्ट होतो. १० शिलिन्ग खर्च केले की ट्रकभर भाजी, मासळी भरपूर. मटण चांगल्यापैकी. सगळी सुबत्ता. खाण्यापिण्याची चंगळ होती. आजही युगांडा, कम्पाला विषयी आत्मियता वाटते कारण तिथलं आमचं लाईफ छान होतं.
अबोटे हा त्यावेळी युगांडाचा प्रेसिडेन्ट होता. १९५९ पासून १९६६ पर्यंत मी बॅंकेत राहिलो. १९६६ मध्य बॅंका नॅशनलाईज झाल्या. मग मी बॅंकेचा अक्टिंग मॅनेजर झालो. एक अशी घटना झाली, की अबोटेला लंडनमध्ये एका माणसाला कामाला पाठवायचं होतं. पैशाची व्यवस्था करुन हवी होती. मला मोठा प्रश्न पडला कारण अबोटेनी मोठी रक्कम advance म्हणून मागितली. 'तो मनुष्य लंडनहून परत आला की पैसे परत मिळतील, आत्ता पैसे द्या, उत्तर तबडतोब द्या!'. Bank Of India अतिशय कडक. ह्या गोष्टी मॅनेजरच्या हातात नाहीत. सगळं aaproval भारतातून हेड ऑफसमधून येतं. आणि रक्कमही मोठी होती. 'अमूक वेळी आमचा मनुष्य पैसे न्यायला येईल' असं सांगण्यात आलं. अबोटे तेव्हा अतिशय powerful होता. त्याचा शब्द न मानणं म्हणजे तुमची उचलबांगडी! अगदी बॅंकेची सुद्धा उचलबांगडी होण्याची शक्यता! मी विचार केला. रात्रभर झोप लागली नाही. पण शेवटी सांगितलं, 'घेऊन जा पैसे'. हेड ऑफिसला केबल पाठवून परिस्थितिची कल्पना दिली. पुढे approval आलं, तो माणूस जाऊन आल, बॅंकेला पैसे मिळाले. पण हे मोठ्ठं decision. माझी रिस्क!
१९६६ साली भारतात परतायची order आली. माझे आणि प्रेसिडेन्ट अबोटेचे संबंध चांगले होते. तेव्हा मकरारे विद्यापीठात बिझनेस स्कूल सुरु करायचं होतं. त्यानी english लोकांमार्फत प्रयत्न केले पण उडवाउडवीची उत्तरं मिळून टाळाटाळ होत होती. युगांडा स्वतंत्र होता पण ब्रिटिश बरंच मॅनेज करायचे. अबोटेला त्यांच्या हातात जायची इच्छा नव्हती. माझ्याशी त्याचं बोलणं झालं. त्याला कळलं की मी बॅंक सोडतोय. त्याला माझं background माहित होतं. त्यानं विचारलं तू हे करु शकशील का, कॉलेजची जबाबदारी घेशील का. मी 'हो' म्हणालो. मी एवढंच म्हणालो, बॅंकेतल्यासारख्या facilities मला द्यायला हव्यात. तो कबूल झाला. माझा रीतसर interview होऊन offer मिळाली.
Associate प्रोफेसर म्हणून काम सुरु झालं. It was a big deal to leave the job in Bank! मकरारे युनिव्हर्सिटीच्या नोकरीत घर, पगार चांगला होता. आठवड्यातून काम फक्त ८ तास, बाकीचा वेळ रिसर्च. negotiate करण्याच्या powers दिल्या होत्या. Rockefeller Foundation, Ford Foundation ना contact केलं. आमची manpower ची गरज सांगितली. ३-२-२ डिग्री डिझाईन केली. ३ वर्षात B. Com. होण्याची सोय डिझाईन केली. पहिल्या वर्षाकरता मुलं घेतली. २ र्या ३ र्या वर्षी कामाल लागणार्या माणसांची गरज दोन्ही Foundation पूर्ण करत होत्या. लोकल टॅलेन्ट तयार झाले. १,२ भारतीय, आफ्रिकन लोक होते लेक्चरर म्हणून. popular division तयार झालं. या डिग्री नंतर चांगले chances आहेत हे लोकांना कळलं. सगळ्या बाहेर पडणार्या graduates ना Government ने नोकर्या दिल्या. Program ला महत्व प्राप्त झालं.
मग Coup झाला. अमीनने सत्ता काबीज केली. त्यावेळी भारतीय आनंदानं नाचत होते. अबोटेने Africanization सुरु केलं होतं त्यामुळे आपल्या लोकांचं महत्व कमी होत होतं. अमीन शिकलेला नव्हता. आपल्या दृष्टीने हे बरं असं बर्याच लोकांना वाटलं. पण अमीनने सत्ता काबीज करताच आपला control चालू केला. सुरवातीला लोकांना कल्पना नव्हती पण नंतर बाहेर पडण्यावर restrictions आले. खासकरुन गुजराथी लोकांनी पुढे येणार्या अडचणी sense केल्या आणि गाड्या भरुन सोनंनाणं जडजवाहीर नैरोबीला घेऊन जायला सुरवात केली. त्यामुळे अमीननी बाहेर पडायला restriction आणले. चेकिंग सुरु झालं. १९७०-७२ मध्ये अमीनने एक declaration आणलं. भारतीय लोकांनी ३ महिन्यात युगांडा सोडून जायचं! भारतातून काही लोक आले negotiate करायला. पण कशाचा काही उपयोग झाला नाही. त्याने कोणाचं ऐकलं नाही.
नंतर कठीण होत गेलं, restictions वाढत गेली. बाहेर पडतानाचे सोपस्कार करण्यात आपल्या लोकांना मदत करण्यासाठी म्हणून कम्पाला शहर होतं. लोकांना लांबून यावं लागायचं कम्पालात प्रोसिजर पूर्ण करायला. एशियन लोक येताना त्यांची झडती व्हायची. मिलिटरीचे लोक अक्षरशः लुटायचे, मारहाण करायचे म्हणून मी माझ्या मकरारेच्या घरात अनेकांची रहायची सोय केली. त्यांना सांगितलं, 'इथे रहा, परत जाऊ नका. It is risky to make two trips. काही लोकांना पैसे बाहेर न्यायला मदत केली. मला स्वतःला exemption होतं. माझ्या पत्नीला मी भारतात पाठवायची सोय केली. मुलगा तेव्हा भारतातच होता, मी एकटा असल्याने घर रहायला देणं वगैरे सोपं झालं. मी एशियन्सना मदत करत होतो या चुगल्या अमीनच्या कानी पडू शकत होत्या.
हे वातावरणच प्रचंड कठीण होतं. एंटेपीपर्यंत देखील कोणाला पोहोचवता येत नव्हतं. कंपालाला एक BusStop केला होता. तिथून बसमध्ये बसून एंटेपीला जायचं. एंटेपीला Airport आहे. तिथुन India किंवा इतर Destinations ला जायचं असा प्रकार. लायनीच्या लायनी जिकडे तिकडे. आगाखाननी विमानं पाठवून सोय केली आपल्या (खोजा) लोकांची.
आमच्या College च्या विद्यार्थ्यांच्या Education चा Problem झाला. दोन दिवसांच्या मुदतीत त्यांना काढावं लागलं. विमान आलंय, बसा आणि निघा हा थाट. University चं Administration, collapse झालेलं. कुणाला कशाचा पत्ता नाही. बर्यात Professor लोकांना उडवून टाकलेलं. सगळं विस्कळीत झालेलं. मी माझ्या Office मधल्या एका African Secretary ला सांगितलं, " विद्यार्थ्यांना line मध्ये उभं करायचं.'. ते सांगतील 'मी अमूक कोर्स करतो'. त्यांचं Type करून सही करून एक प्रमाणपत्र द्यायचं." त्यावर त्या मुलांना Canada मध्ये Admission मिळाल्या. अश्या कित्येक मुलांना मी मदत केली. हे काम देखील अमीनच्या लक्षात येण्यासारखं होतं. माझ्यावर ही जबाबदारी होती, तेव्हा करायचं असं ठरवून टाकलं. असे शम्भर एक विद्यार्थी होते. काही माझे काही इतरांचे. सगळ्यांनाच मदत केली. मी मागे उरलेला. काय करायचं? मी, गद्रे, आपटे अशी मंडळी मिळून मकरारेची जागा सोडली. उद्यम हाऊस, मेहतांचे, तिथे पाच सहा जण मिळून राहीलो. रात्री भीतीदायक असायचं. कुणी, केव्हा, काय करेल काही सांगता येत नव्हतं. सगळा विस्कळीत कारभार. आपली माणसं अगदी नेमकी उरलेली. 30 September ची DeadLine उलटल्यावर बहुतेक सगळे Asians निघून गेलेले. शम्भर लोक राहिले शिल्लक. दोन लाख Asians होते. त्यामुळे उरलेले लोक जास्तच डोळ्यात येणार. दिवसभर काय करायचं? भीती सतत.
मला स्वतःला एकदा घेऊन गेले (नसबा बॅरॅक्स म्हणून आहेत, तिथे Soldiers रहात. तिथे एक मोठ्ठी भिंत आहे. त्या भींतीसमोर माणसाला उभं करतात आणि Shoot करून मारून टाकतात, हे असं. प्रेत उचलून नाईल नदीमध्ये टाकून द्यायचं.) मला तिथे घेऊन गेले. Questioning केलं. मी Questioning करणार्या Soldier ला माहिती सांगितली. 'मकरारे' कॉलेजात Professor आहे वगैरे. मकरारेत असताना मी Accounting वरती पुस्तकं लिहिली होती. त्याचा मुलगा माझा विद्यार्थी होता. नशीब बघा! Soldier नी माझं नांव पाहिलं. He was surprised! त्याने quietly मला सोडून दिलं. मी त्यामुळे वाचलो, नाहीतर त्याचवेळी खलास झालो असतो. पण पुढे काही कार्य हातून व्हायचं होतं म्हणून की काय...! नशीबाच्या गोष्टी बघा.या प्रसंगानंतर मी मात्र ठरवलं. आता काही इथे रहायचं नाही.
एका मराठी बाईंनी पन्नास वर्षं युगांडात शिक्षिकेची नोकरी केली होती. त्या Head Mistress होत्या. चांगला पगार, बोनस, Gratuity मिळालेली. पण मी रक्कम बाहेर काढता येत नव्हती. बाहेर न्यायला फक्त 50,000 शिलिंगाची Permission होती. (मी तेव्हा American, Indian, British लोकांचे Taxes बनवत असे.) British लोकांना पैसे नेण्याची परवानगी होती. साधारण एक लाख शिलिंग वगैरे. पण हे लोक ते पैसे काही न्यायचे नाहीत. सगळे पैसे खर्च करून टाकायचे. अश्या लोकांना मी सांगायचो, 'तुम्ही माझ्या करता इतके पैसे घेऊन जा'. असं करून मी भारतीयांचे पैसे बाहेर काढले. ते पैसे ब्रिटिषांनी नेऊन लंडनमधे माझ्या खात्यात जमा करायचे. आणि नंतर मी ज्याचे त्याचे पैसे प्रत्येकाला परत केले्या बाईंना अशाप्रकारे त्यांचे पैसे त्यांना मिळण्याची आठवण येते. Almost 2 लाख शिलिंग मी लॉस एंजेलीसला आल्यावर, त्यांचा पत्ता शोधून त्यांना दिले. पन्नास वर्षं नोकरी केलेली त्या बाईंनी. त्या पैशावर पुढचे दिवस काढता आले त्यांना. Initially त्यांच्याजवळ काही पैसा नव्हता. पण आज त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना सुखाचे दिवस आहेत. त्या बाई आज नव्वद वर्षांच्या आहेत. नेहेमी आठवण काढतात, 'भाऊसाहेब, तुम्ही आम्हाला मदत केलीत.' ती मदत, ते पैसे अतिशय महत्वाचे होते.
अशी लोकांना मदत केल्यामुळेदेखील, I was in a difficult situation. आता युगांडातून बाहेर जायचं कसं? आमच्या University चा Vice-chancelor माझा मित्र. त्याचेही Taxes मी बनवत असे. त्याला सांगून, माझं Resignation मी pre-dated करून पास करवून घेतलं होतं. नंतर अमीननी त्यालाही Pickup करून मारून टाकला. 'इथे रहायचं नाही' ही इच्छा प्रबळ होतीच. त्याच्याकडून मान्य करवलेलं Resignation पुढे करून मोठ्या शिताफीनी 'Personal Reasons' मुळे बाहेर जायचं आहे सांगून मी जाण्याचा Plan केला. निघणं तसं खूप कठीण. विमानातून जाताना सगळं स्वतःचं सामान बरोबर घेतलं. Fortunately सुटलो. माझ्या पुस्तकांचे पैसे यायचे होते. ते नैरोबीत येणार होते. म्हणून मी प्रथम तिथे जायचं ठरवलं. विमान युगांडाच्या Air space बाहेर जाईपर्यंत मनात धाकधूक होती. जीवात जीव नव्हता. पार पडल्यावर 'सुटलो' म्हणून निश्वास टाकला, आणि नैरोबीला पोहोचलो. तिथे डॉ. घैंकडे एक दिवस राहिलो. पैसे कलेक्ट करायचे होते. Text book Center नावाची जागा माझ्या पुस्तकांचे वितरण करीत असे. दार-ए-सलाम, नैरोबीला त्यांचा व्यवहार चालायचा. युगांडात मला पैसे पाठवू नका, असं मी त्यांना कळवलं होतं.. तर त्यांच्याकडून पुस्तकांचे 3-4 लाख शिलिंग मला मिळाले. ह्या पैशांचं करायचं काय? कारण केनिया मधूनही पैसे नेता येत नव्हते बाहेर. I was not a Kenya Resident!. एका दिवसात मी चार लाख शिलिंग खर्च केले. Expensive वस्तू घेतल्या, सोनं घेतलं. पैसे उडवून टाकायचे. आयुष्यात कधी खर्च केले नव्हते असे पैसे एका दिवसात उडवले.
तिथून मला दार-ए-सलाम University मधे Interview चा कॉल होता. युगांडात असताना त्यांचे फोन यायचे. तिकिट पाठवून Interview ला बोलावणं आलं.मी Interview ला गेलो खरां पण जवळ बर्याच महत्वाच्या वस्तू. माझ्या Briefcase मध्ये सगळं. ही बॅग बरोबर वागवत होतो. कुठे ठेवायची सोय नाही. आफ्रिकेत कुठलीच जागा सुरक्षित नाही. शेवटी एक लॉकर शोधून बॅग ठेवण्यात वेळ गेला आणि उशीर झाला. तेव्हा विमानतळातून Shortcut नी जायचं ठरलं. मी, एक ब्रिटिश माणूस, आणि एक भारतीय असे आम्ही तिथे कारने दार-ए-सलामला जायला निघालो. रस्त्यामध्ये एक लोकल कोर्ट लागलं. एका आफ्रिकन माणसाची केस चालली होती. ती विरुध्द गेली. त्या माणसाचा बाप अक्षरशः वेड्यासारखा होऊन धावत सुटला. आमच्या गाडीसमोर येऊन उडवला गेला. आमचा ड्रायव्हर न थांबता पुढे गेला (आफ्रिकेत अशा प्रसंगी थांबलात की वाट लागली), बाकीचे लोक गोळा झाले. ड्रायव्हरने गाडी Police Station ला नेली. आम्हा तिघांना Driver च्या सांगण्यावरून जमावापासून बचावासाठी कोठडीत ठेवलं. जमावाने धावत येऊन पोलीसचौकीला वेढा घातला. 'आम्हाला ते लोक मारायचेत'. पोलीसांनी 'आम्ही त्यांचा निकाल लावू, शिक्षा देऊ !They are in our hands! असं काहीसं समजावून त्यांची बोळवण केली. आम्हाला दार-ए-सलामहून पोलीसांची गाडी बोलावून त्यातून बाहेर काढलं.
मी दार-ए-सलामला Interview ला गेलो. त्यांनी 'We like all your Credentials. We would like you to join us' असं सांगितलं. पोस्ट पण बरीच चांगली होती. टांझानिया Sort of Communist Country होती. On a left Side! Cars वगैरेच्या सोई तशा उपलब्ध नव्हत्या ह्या पोस्टसाठी. त्यातही माझ्यासाठी exception केलं गेलं. offer accept करण्याची गळ घातली गेली. मी 'विचार करीन' म्हणून सांगितलं. रात्री oyester bay हॉटेलात, दारे सलाम पोर्टवर तिथल्या finance minister बरोबर dinner ठेवलं होतं. पण तो आफ्रिकन माणूस काही डोक्यातून जात नव्हता. I was worried about an african guy who had an accident . त्याला hospitalize केल्याचं कळलं. मी २-३ वेळा hospital ला फोन केला. तो serious condition मधे असल्याचं कळलं. रात्री १०-१०:३० ला communication झालं. 'he passed away' मला भयंकर वाईट वाटलं. माझं जेवणात लक्ष लागेना. पोस्ट मला 'ताबडतोब भरायची आहे' असं सांगितलं गेलं. मी म्हणालो, लागलीच सही करणार नाही. भारतात जाऊन ताबडतोब cable करतो. माझ्या बायकोला , इतरांना consult करायला पाहिजे, तेव्हा नंतर सांगतो तेवढी वाट बघा. नैरोबीला परत येऊन तिथून भारतात आलो. मंडळी म्हणाली 'हा अपशकून झालाय, ही नोकरी नको' forget about it.
मी युगांडात असताना जेव्हा अमीनची गडबड सुरू होती तेव्हा निरनिराळ्या देशांचे व्हिसा घेतले होते. माझ्याकडे american, british वगैरे मिळून ८-१० visas होते. मी कुठेही जाऊ शकत होतो. offers पण चांगल्या होत्या, नायजेरीयाच्या वगैरे. माझा एक भाऊ (शरद कारखानीस) अमेरिकेत होता. त्याने insist केलं. तो NY युनिवर्सिटीमधे professor होता. म्हणाला 'इथे ये आवडलं तर रहा नाहीतर कॅनेडियन किंवा इतर visa आहेतच'. मी भारतात महिनाभर राहिलो. त्या महिन्यात मला खूप tension होतं. गम्मत म्हणजे माझे स्वतःचे जे पैसे युगांडातून यायचे होते ते state bankच्या through पाठवले होते. मला बॅंकेच्या ४-५ खेपा मारायला लागल्या. पैसे आलेले पण दर वेळेस 'आलेले नाही' म्हणून सांगायचे. आलेला advice पेपर्सच्या थप्पीत होता. शेवटी चिडून 'माझ्या देखत एकदा बघा' म्हणून सांगितलं. तो कागद सापडला. निष्कारण दादर ते मुंबई खेपा. उगीच tension!. वेळ फुकट गेला. हे पैसे माझ्यासाठी अतिशय महत्वाचे होते. I needed that money very badly.
मी अमेरिकेत एकटाच आलो. mrs. आली नाही. मुलगा IITला शिकत होता. त्याचं education बिघडवायचं नाही म्हणून. मी स्वतः जातो. कसं काय चालतं ते बघून पुढचं ठरवू. New Yorkला पोचलो. भाऊ भेटायला आला. महिना -दीड महिना त्याच्याकडे राहीलो. मला you have to be on your own सांगितलं गेलं होतं. अमेरिकेत आल्यावर प्रत्येकाने आपापल्या पायावर उभं राहीलं पाहिजे. भाऊ म्हणाला तुला एकदा घेऊन जाईन interviewला , पण प्रत्येक वेळी नाही. त्याला त्याचं काम होतं. थंडी अफाट. सकाळी ओव्हरकोट घालून चहा घेऊन स्टेशनवर जायचं. सबवेकरता. ते त्याच्या घरापासून मैलभर लांब. रोज थंडीत चालायचं. मॅनहॅटनमधे जायचं. job शोधायचा. resume कसा करायचा वगैरे काही माहिती नाही. आपण indians काय करतो? We tend to write down everything. त्याला कुणी विचारत नाही. nobody bothers! nobody wants to know! त्यामुळे प्रत्येक ठिकाणी 'नन्ना'! काही केल्या job मिळेना. २ महिने झाले. दुपारचं काहीतरी खायचं. संध्याकाळी जेवणाचा पत्ता नसायचा. दिवस कसेतरी गेले.
अखेरीस एका ज्यू माणसाला माझी दया आली. Interviewला एके ठिकाणी गेलो असता resume दिल्यावर एका बाईने 'जा' म्हणून सांगितलं. तेवढ्यात तिथून पास होणार्या bossने मला आत बोलावलं. interview घेतला. मला म्हणाला 'I have also passed through the same situation'. मला हायर केलं सोमवारी बोलावलं. नरोरे कॉर्पोरशन ही शिपिंग कॉर्पोरशन होती. म्हणाला वर्षाचे $ १०००० मिळतील. मी join झालो. त्यानंतर त्याच्याकडून पगार आणि permanent नोकरीचं एक पत्र घेतलं. indiaला पाठवलं. Brooklyn मधे एक जागा घेतली. भावापासून वेगळीकडे राहायला लागलो. जेवण स्वतः करायला लागलो. पण एक दिवस चोरांनी apartment साफ करून टाकलं.
पुढे मुलगा आणि Mrs. भारतातून आले. लगेच green card वगैरे मिळालं. settle झालो. $१० K enough होते. we could manage. एका weekend ला असच भावच्या गाडीतून जाताना एक कार दिसली. ती for sale होती. थांबून बघतो तर किम्मत काय! १ डॉलर. I bought the first car in america for 1 dollar. ती गाडी ६ महिने चालली. जवळच्याजवळ फिरायला ठीक होती. त्यावेळी पेट्रोलचा विशेष प्रोब्लेम नव्हता. नरोरे कॉर्पोरशन मधून नंतर himoff कॉर्पोरशन मधे १० च्या ऐवजी १२ ची offer मिळाली. पण थोड्याच दिवसांत त्यानी मला lay off दिला. ही कल्पनाच नाही. बिझनेस कमी झाल्यामुली नव्या लोकांना lay off. हिला सांगितलं job गेलाय, काय करायचं?पण मी जेव्हा युगांडात होतो, तेव्हा तिथे 'राजा' नावाचा एक गृहस्थ होता. 'गुजराथी'. मी त्याला आणि त्याची बायको 'उषा राजा' ह्या दोघांना accountancy शिकवत असे. ते शिकत असतानाच अमेरिकेत आले होते. त्यावेळी त्यांना माझ्याकडून बरीच मदत झाली होती अमेरिकेला जाण्याकरता. त्याला कुठूनतरी मी अमेरिकेत आल्याचं कळलं. बरीच चौकशी करून त्यांनी माझा पत्ता काढला. मला फोन केला 'मी लॉस एन्जेलिस' ला आलोय, आमच्याकडे या.' मी त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. त्याला job गेल्याचं सांगितलं नाही , पण I want to come हे बोललो. तिकीट काढलं. ते दोघं मला घ्यायला आले. त्यांच्या घरी गेलो. oxford street वर LA ला त्यांचं घर.
सोमवारी मला कागदपत्र घेऊन चला म्हणून सांगितलं. मला घेऊन गेला 'unemployment office' मधे. लायनीत उभं राहिलो. 'फॉर्म भरून टाकु, म्हणजे पैसे यायला सुरुवात होईल. त्यावेळी ३ र्या ४ थ्या दिवशी पैसे यायला सुरुवात व्हायची. ते स्वतः सुद्धा लायनीत उभे राहीले. विचारल्यावर कळलं. ते दोघही 'unemployed'. पण गुजराथी माणसाची कमाल पहा, स्वतः 'unemployed' असूनही दुसर्या unemployed माणसाला बोलावलं आणि मदत करायची तयारी दाखवली.
रोज मी wilshire blvd ला LAला application भरायला सुरुवात केली. प्रत्येक ठिकाणी सांगायचे, 'तुमच्याकडे अनुभव असेल कामाचा, but you dont have California experience'. प्रत्येक ठिकाणी rejection!. २० दिवस असेच गेले. फुकट!. एखादे दिवशी हिला फोन करून सांगायचो, 'काही development नाहीये'. जबाबदारी जास्त. family बरोबर. भाडं, घरखर्च सगळचं होतं. २० दिवसानी राजा म्हणाला, 'कारखानीस भाई तमे बिजीनेस भणावु छु' !! businessमधे का नाही जात? मी विचार केला 'why not?'. म्हणून आम्ही ठरवलं. United business services (UBS) मधे नाव register केलं. तिथल्या बाईंनी सांगितलं. एक restaurant आहे torrenceमधे, त्याचा मालक वारला. बायकोला चालवणं जमत नाहीये. she wants to sell it. आवडलं तर deal करून टाकू. आम्ही २-३ दिवस त्या restaurant मधे जाऊन बसत गेलो. त्याचं २४ hours operation चालायचं. ८-८ तासाच्या ३ duties आणि २४ लोक कामाला होते. बफीज कॉफी शॉप हे नाव. business चांगला चालला होता. Toreenceच्न्या main business sectionमधे हे restaurant होतं. मला लोकेशन आवडलं. विकत घ्यायचं ठरलं. आम्ही $२०००० down payment करण्याची offer दिली. ते कबुल झाले. हिला कळवलं 'रेस्टॉरंट ' घेतलं.तर मी, हा गुजराथी मित्र आणि त्याचा एक मित्र असे तिघं मिळून deal साठी गेलो.
आमचा 'escrow' बंद होऊन ताब्यात 'restaurant' मिळायचं त्या रात्री १० वाजता business संपल्यावर आम्ही inventory घेतली. मी एकटा आणि तो मित्र. It was such a hastle! कारण मनुष्यबळ नाही माझ्या बाजूनी. त्या सगळ्यांना माहिती , की मला businessचं एवढं ज्ञान नाही. मी मिसेस आणि मोहन (मुलगा) यांना ताबडतोब बोलावून घेतलं. माझा एक भाचा त्यालाही बोलावलं (मोहनच्या बरोबरीचा.) मग एक जागा घेतली. रेंटल अपार्ट्मेन्ट, हॉटेलाजवळ. नंतर लॉन्ग बीचवरच्या एका माणसाला गाठून मोहन आणि भाच्याला अमेरिकन स्टाईल कुकींग शिकायला पाठवलं. स्टेक कसा करायचा. रोज संध्याकाळी सातला जायचे ते रात्री अकरालाच यायचे. असं करून आठ-पंधरा दिवस चांगल्यापैकी ट्रेनींग घेतलं. पटकन पीक अप केलं. अगदी दोघंही तयार झाले. माझ्याकडे एक वयस्क कूक होता. पक्का वल्ली! ज्या ज्या वेळी गर्दी व्हायची आमच्याकडे, त्या त्या वेळी टोपी काढून म्हणायचा, "I am not feeling well. I have to go!" काय करणार? कूक नाही म्हणजे पंचाईत. एक दिवस त्यानं असंच केलं. टोपी काढून म्हणाला, "मी जातो." मी त्याला म्हणालो, "हा चेक! बाय बाय!" मोहनला आणि भाच्याला बोलावलं. दोघंही कूकचे कपडे घालून आले. आणि ग्रीलवर कामाला लागले. लोक थक्क झाले. हळूहळू मी माझा कंट्रोल वाढवत गेलो. ऑपरेटींग खर्च कमी केले. नफा वाढला. काही दिवसांनी एक शिफ्ट बंद करून टाकली. सकाळी सहाला सुरू करायचं ते रात्री दहाला बंद. त्यामुळे पेरोलसुद्धा कमी झाला.
एका गुजराती मनुष्याचं तिथंच एक Ramada Inn होतं. दीडशे लोक राहतील अशी सोय होती. त्याला माझ्याबद्दल कळलं. त्याला त्यावेळी कामासाठी एका माणसाची जरूर होती. त्याला त्याचं कॉफी शॉप आणि Banqueting Room चालवायला कुणी हवं होतं. तो माझ्या रेस्टॉरंटमध्ये आला. बसला. सम्पूर्ण ऑपरेशन बघीतलं. माझ्याशी बोलला, "मी तुम्हाला पार्टनर म्हणून घेतो." आमचं निगोशिएशन वगैरे होऊन, कॉफी शॉप आणि banquetingचालवायचं ठरलं. नफा होईल तो माझा. मी फूड पार्ट बघायचा, असंही पक्क झालं. मी माझा कॅफे चालूच ठेवला... आणि हे नवं.
इथे रमाडा इन मध्ये देखील कॉफी शॉप चांगलं चालू झालं. Banqueting पण! बर्याच लोकांना Banqueting मध्ये फॅसिलीटीज् द्यायचं सुरू केलं. नवीन ideas काढल्या. नंतर बफिज कॅफे विकायचं ठरलं. दोन ठिकाणी काही जमायचं नाही. चांगला नफा मिळाला. रमाडा इन वर लक्ष केंद्रीत केलं. इथे इंडीयन रेस्टॉरण्ट सुरू केलं. अगदी Top of the line! सजावट वगैरे साठी भारतातून गोष्टी मागवल्या. परवडणारे दर. मेन्यू छान. आणि चांगली सर्व्हीस! शे-दीडशे माणसं बसू शकतील इतकं मोठं होतं. रात्रीचं खूप चालायचं. दिवसभर त्याचा उपयोग नसायचा. म्हणून दिवसा वापरासाठी काहीतरी करायचं ठरवलं. निरनिराळ्या संस्थांशी संपर्क साधून त्यांच्या मिटींग्ज् आमच्या ह्या फॅसिलीटीत करा म्हणून सांगितलं. आमची प्रसिद्धी वाढली.
मला राहायला Ramada Inn मध्ये वरती जागा होती. दोन बेडरूम अपार्टमेंट होतं. त्यामुळे I had no motivation to buy a house. (आम्हाला घर स्वतःचं घ्यायचं होतं. आमचा एकच मुलगा.
काही वेळा वेट्रेस, कूक्स रजेवर असल्या की, मोहन त्याMच्या जागी असायचा. He knew everything! त्याचं त्यामुळे जरा नुकसानही व्हायचं.) शेवटी विचार केला कशाला एवढा व्याप करून घ्यायचा? म्हणून मग ठरवलं सगळ्यातून हळूहळू मोकळं व्हायचं.
मग आम्ही टॉरेन्स मध्ये घर घेतलं स्वतःचं... आणि हॉटेल business मधून पाय काढला. Ken crane मध्ये accountant म्हणून रुजू झालो. दोन वर्षं तिथे काम केलं. नंतर हॉस्पिटलमध्ये कंट्रोलरची जागा मला मिळाली. टॉरेन्स मध्ये हे घरापासून पाच मिनिटांवर! फार सोयीचं होतं. दोन वर्षं इथे काम करून त्या हॉस्पिटलच्या अनुभवाच्या भरोशावर मला चिल्ड्रन्स हॉस्पिटलला LA हॉलीवुड मध्ये संधी मिळाली.
या माझ्या नोकर्या सुरू असतानाच मी रीअल इस्टेट मध्ये लक्ष घातलं. LA मध्येच निरनिराळ्या ठिकाणी सात-आठ प्रॉपर्टीज् घेऊन त्या स्वतः मी मॅनेज करत असे. शिवाय माझा एक पार्ट-टाईम जॉब होता.
लँबॉर्गिनीच्या डीलरकडे देखील आर्थिक सल्लागार म्हणून काम केलं. मी शनीवारी-रविवारी दोन-तीन तास जाऊन हे काम करायचो. मालक बुध्दीमान असला तरी बिझीनेसमन नव्हता. माझा सल्ला न ऐकता चुकीचे डील्स करायचा. मी विचार केला, आर्थिक सल्लागार म्हणून मला ठेवूनही मी दिलेला सल्ला जर पाळत नसेल तर काय उपयोग? शेवटी मी स्वतःहून ती नोकरी सोडली. माझी इन्कम टॅक्सची प्रॅक्टीस होती. H & R ब्लॉक जॉईन करून टॅक्स विभागात मी टॅक्सेसही करत असे.
१९९३ साली मी स्टेट ऑफ कॅलिफॉर्नियाच्या डिपार्टमेन्ट ऑफ डेव्हलपमेंटल सर्व्हीसेस मधून निवृत्त झालो. तिथे माझी सर्व्हीस बारा-चौदा वर्षे झाली.
मग आम्ही मुलाच्या जवळ यावं या दृष्टीने ऑर्लँन्डोला चकरा मारल्या. दरवेळी येणं-जाणं तर व्हायचंच. पण कायमस्वरूपी यायचं ठरवलं. घराची व्यवस्था केली. १९९४ ला शेवटी मूव्ह झालो ऑर्लँन्डोला.
आता स्वतः मी काही नोकरी करत नाहीये. पण जे काम करता येण्यासारखं असेल ते करतो. विशेषतः, ब्रिज वेळ घालवण्याकरता खेळतो. आठवड्यातून चार वेळा ब्रिज असतो. दहा ते चार! सिनीअर सेंटर्सला जाऊन खेळतो. एक दिवस फ्लोरीडा हॉस्पिटलला काम करतो. चार तास लोकांना मदत करतो. असे पाचही दिवस माझे busy असतात. शनिवार-रविवार इथे २-४ तास देवळात काम करतो. स्वतःला busy ठेवतो. जवळच्या जवळ driving करतो. माझं वय आता ८० आहे. I wish to be on my own!
इथे आल्यानंतर पहिल्यापासून माझ्या मनात एकच होतं. आपण भारतात आपल्या लोकांसाठी काहितरी करायचं. मी अतिशय कष्टांत दिवस काढलेत. निरनिराळ्या परिस्थितींना तोंड दिलंय. म्हणून अंबरनाथला ज्या ठिकाणी आम्ही वाढलो त्या ठिकाणी पी. डी. कारखानीस College of Arts and Commerce हे establish केलं, ६ वर्षांपूर्वी. त्यात सध्या २००० विद्यार्थी आहेत. Arts, commerce हे दोन्ही विषय तिथे शिकवले जातात. माझ्या mrs च्या नवाने एक उत्तम लायब्ररी तयार केलीय. एक हॉल/auditorium आईच्या नावाने केलेला आहे. वडलांच्या नावानी computer rooms केल्या आहेत. ३० विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी computers set up केलेत. कॉलेज भव्य oraganized आणि उंच टेकडीवर आहे. तिथे आणखी extension होण्याची शक्यता आहे.
ज्या शाळेत मी शिकलो, महात्मा गांधी विद्यालय, त्या विद्यालयात सध्या साडेतीन हजार विद्यार्थी शिकतात. ज्या वेळी मी शाळा सोडली त्या वेळी फ़क्त ४ विद्यार्थी होतो आम्ही. त्या शाळेत इतर facilities आहेत पण मुलांना recreation किंवा programs वगैरे करता काही hall नव्हता. ती अडचण ओळखून मी offer केली, मी hall बांधून देतो. Architectural plan काढला. अतिशय अद्यावत असं auditorium बांधलं. त्याचं उद्घाटन दोन वर्षांपूर्वी झालं. त्याच्या mezzanine floor वर मुलांना (१५० विद्यार्थ्यांना) computer classes करता येतील अशी सोय आहे.
अंबरनाथमध्येच १ शाळा आहे, विद्यावर्धिनी सहाय्यक समितीची! त्या समितीमार्फत रणदिवे बाई शाळा चालवतात. त्या शाळेत (शाळा ५वी पर्यंतच आहे) पुढच्या इयत्ता काढण्याकरता जागा लागतेय म्हणून त्यांना आर्थिक सहाय्य केलंय. आता ६वी/७वी चे classes सुरू झालेत.
मी गेल्या वर्षी India ला गेलो होतो. I was looking forward to meeting people to find out good projects. त्यावेळी अनायसे विद्यार्थी सहाय्यक समितीच्या लोकांशी संबंध आला. त्यांच्याकडला एक मुलगा मला मदतीला हवा होता. त्या दृष्टीनी आम्ही त्यांना भेटायला गेलो. अनील हळबेंबरोबर गेलो. एकंदर त्यांची व्यवस्था organization बघितल्यानंतर I was impressed. नंतर मी त्यांना त्यांच्या आणखी काही projects बद्दल विचारलं. नंतर त्यांच्याशी negotiations वगैरे होऊन आम्ही त्यांना १ कोटी रुपये द्यायचं कबूल केलं. पुण्याला १४० गरीब विद्यार्थ्यांची रहायची सोय होईल अशी नवीन इमारत उभी करायची (सध्याच्या इमारतीवर ३ मजले) असं ठरवलं. त्याचे president आहेत प्रतापराव पवार (शरद पवारांचे सगळ्यात मोठे भाऊ), आणि निर्मलाबाई पुरंदरे (बाबासाहेब पुरदर्यांच्या पत्नी). त्या executive committee member आहेत. त्यांनी हे काम हातात घेऊन पूर्ण करायचं ठरवलंय. काम जोरात सुरू आहे. recent photo बघितले. Dec '07 पर्यंत rooms complete होतील. अद्यावत furniture, comps, इतर facilities मी करून देणार आहे. जानेवारी ०८ मधे उद््घाटन आहे. त्याला बरीच मंडळी येणार आहेत.
यापुढे माझी अशी इच्छा आहे की हे विद्यार्थी, कॉलेज, शाळांतले, ह्यांना पुढे मदत मिळावी, scholarship मिळावी. (त्यांच्या ability प्रमाणे त्यांच्या कर्तबगारीनुसार मिळावी), career च्या दृष्टीनी महत्वाची ठरावी. त्या दृष्टीनी तशी योजना करतो आहे. Scholarship fund उभारतो आहे. २००८ मध्ये मी भारतात जाईन तेव्हा बोलणी करणार आहोत असा plan.
(ह्या अनुभव कथनानंतर मी अगदी दोन-तीन प्रश्ण न राहवून विचारलेच)
मी: तुमचा focus (समाजकार्याचा), शिक्षणावर आहे, या मागे खास कारण?
भाऊसाहेब: माझं motivation: मी Chinaत गेलो होतो १९९४ मध्ये. त्या वेळी बर्याच ठिकाणी फ़िरलो. अनेक लोकांशी बोलणी झाली. एकंदर तिथली education system बघितली. त्यावेळी मला जाणवलं, इथे अमेरिकेत येणारे chinese आपल्या देशाकरता पैसे पाठवून, education upliftment कसं होईल हे बघतात आणि त्या दृष्टीनी प्रयत्न करतात. China हे नम्बर-2 राष्ट्र होतंय जगात. असेच प्रयत्न ह्या दृष्टीनी आपणही करायला पाहिजे असं वाटलं.
इतर NRI लोकांनी असं कार्य करावं अशी इच्छा आहे. प्रत्येकानी थोडी थोडी मदत केली तर भारत पुढे यायला वेळ लागणार नाही. भारतात अतिशय potential आहे. लोक अतिशय हुषार आहेत. विद्यार्थी तर खरच हुषार आहेत. फ़क्त वाव पाहिजे. आपण पुढे यायला वेळ लागणार नाही.
Already लोकांना जाणीव होत चाललीय, India is the force to recognize! त्या दृष्टीनी लोक विचार करताहेत. आता Indiaला जगातही जास्त मान मिळायला लागला आहे. तो वाढेल. आणि तो असा वाढवण्याच्या दृष्टीनी आपण शिक्षणावर भर देणं सगळ्यांत महत्वाचं आहे. शिक्षणात आपण पुढे आलो तर लक्षात घ्या, कुठल्या कुठे जाऊ.
कालच वाचलं इथे Geography Bee ही competition झाली. अमेरिकेचे सगळे मागे राहिले. Mexicans पुढे आलेत. हे विशेष कौतुक करण्यासारखं आहे. Indians पण यायला हवेत. त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आमच्यासारख्या senior लोकांनी करायला हवंय. NRI लोकांनी आपल्या उत्पन्नातून थोडीतरी मदत करायला हवी. बराच फायदा होईल. पैशाची गरज तर आहेच.
मी: 'एक मुलगा शिकला, एक व्यक्ती शिकली. एक मुलगी शिकली की एक कुटुम्ब शिकलं'. मुलींच्या शिक्षणावर भर देण्याबाबत काय वाटतं? अजून हवा तितका भर दिला जात नाही, असं वाटतं का? मुली पुढे येतात पण विशिष्ट वर्ग. तळागाळात स्थिती आजही वाईट आहे त्यासाठी काही वेगळा project असावा असं वाटतं का?
भाऊसाहेब: अगदी जरूर. मुलींमध्ये capacity जास्त आहे. Compete नक्कीच करू शकतात. Determination, concentration जास्त आहे, ज्यांना वाव देणं अतिशय महत्वाचं आहे. मला opportunity मिळाली की मुलींच्या hostel extension ची मदत मी करू शकेन. इच्छा आहे. Indiaतल्या मुली हुषार आहेत.
मी: maayboli साठी, मराठी माणसासाठी काय सांगाल? तुमचा इतका अनुभव आहे प्रचंड. सगळ्या प्रकारचे लोक तुम्ही बघितलेत.
भाऊसाहेब: मराठी माणसानी मराठी माणसासाठी तरी मदतीला पुढे आलं पाहिजे. aloof रहायचा प्रयत्न करतात. आपण कुणीतरी निराळे आहोत असं काहीसं असतं. घरात मुलं English बोलली तर त्याचं कौतुक करतात. हे बरोबर नाही. प्रत्येक देशातल्या माणसाला मातृभाशेचा अभिमान असतो. Chinese बघा घरात chinese च बोलतात. मल्याळी, तेलुगु बघा, मातृभाषा विसरत नाहीत. मराठी माणूस तसा नाही. मी स्वतः ५० वर्ष भारताबाहेर आहे. आतापर्यंतच्या बोलण्यात चुका झाल्याही असतील, त्याबद्दल क्षमा करा, पण माझा मराठीशी संबंध कायम आहे. मी मराठी वाचतो, मराठी TV बघतो. भारतात हल्ली लोक मराठी कमी बोलतात. पुण्यात मुलंमुली (वैशालीत गेलात तर बघा), इंग्रजीत सगळं! एक fashion झालीय. इंग्रजी बोलता यायला हवं. आपल्या लोकांनी तसं चांगलं pick-up केलंय. Call center ला बघा मराठी भरपूर आहेत.
आता बोलणं आवरतं घेतो. ह्या opportunity बद्दल thanks!
मी देखील भाऊसाहेबांचे मनापासून आभार मानून निरोप घेतला.
****************************************************************
मुलाखत जवळ पास सव्वादोन तास चालली. त्याच्या ट्रान्स्क्रिप्शनचं देवनागरीकरण करणं हे काम माझ्या एकटीच्यानी कधीच पूर्ण झालं नसतं. ह्या कामात मला खूप मदत झाली ती काही मायबोलीकरांची! सशल, विनय देसाई, गजानन देसाई आणि सुप्रिया (supriyaj), सगळी बिझी मंडळी! तरीही त्यांनी वेळात वेळ काढून केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार!
महान! किती
महान! किती वैविध्यपूर्ण जीवन असु शकतं! कमाल आहे! आणि मला देखिल प्रश्नोत्तरांपेक्षा हा सलग आठवणींचा फॉर्म जास्त आवडला...
छानच.
धन्यवाद मृण्मयी!
सुरेख झाली आहे मुलाखत. सलग वाचताना मजा आली. मलाही आवडला हा नवीन प्रयोग. एका वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. आफ्रिकेतले अनुभव अगदी वाचनीय.
-लालू
प्रेरणादायी मुलाखत
मृण, छानच झाली आहे मुलाखत.
खरंच, अश्या माणसांपुढे 'प्रतिकूल परिस्थिती'वगैरे शब्द हास्यास्पद वाटायला लागतात, नाही?
प्रेरनादायी.
एकदम सिंदबाद सारखे जिवन जगले भाउसाहेब.
त्याचा मराठी चा उपदेश निदान मायबोलीवरील लोकांनी अमंलात आनला (घरी मराठीच बोलने, भारतात मदत म्हणुन पैसे पाठवने इ) तरी बरीच प्रगती होइल.
धन्यवाद मॄण्मयी.
प्रेरणादायी !!
केवळ अप्रतिम !! खूपच प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे , मुलाखत छानच झाली आहे.
सहजसुंदर...
खरोखर भारावून टाकणारे आयुष्य!!!
मुलाखतीच्या नेहमीच्या औपचारीक पद्धतीपेक्षा अतिशय सहज आणि सुंदरपणे साधलेला हा संवाद फारच भावला
आजच्या जगात केवळ दिखाव्यासाठी,प्रसिद्धीसाठी समाजसेवा करणारे अनेक असतात पण खर्या तळमळीने दुसर्यांसाठी झटणारे विरळाच...
त्यामुळे केवळ वयाने नव्हे तर कॄतीनेही ज्येष्ठ असलेल्या भाऊसाहेबांना माझा नमस्कार आणि मायबोलीकरांना ह्या व्यक्तीमत्वाचा परिचय करून दिल्याबद्दल मृ,तुझे मनापासून आभार
mesmerizing
फारच सुंदर संवाद! त्यांचई चिकाटी आणि जिद्द पाहुन थक्क झाले.
त्यांची ओळख करुन दिल्याबद्दल आभार!
सुरेख
एका अतिशय हरहुन्नरी व्यक्तीमत्वाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद!
त्यांच्याकडुन शिकण्यासारखे खुप आहे.
~मिनोती.
एक चांगली मुलाखत..
मृण्मयी एका चांगल्या मराठी माणसाची ओळख झाली ही मुलाखत वाचून. आभार...
खूपच छान..
खूपच छान.. एकदम प्रेरणादायी आणि अनुभवसंपन्न अशी एका कारकीर्द असलेल्या भाऊसाहेबांचा
जिवनपट त्यांच्याच शब्दात मायबोलीकरांसमोर उलगडुन दाखवल्याबद्दल तुझे आभार मृण्मयी.... आणि प्रश्नोत्तरांऐवजी
असलेला हा सलग फॉर्म चांगला वाटला.. त्यामुळे हा संवाद अतिशय ओघवता वाटला...
वंदन
कीती अर्थपूर्ण आयुष्य ! जगावं तर असं !
एखादी सुरस
एखादी सुरस आणि चमत्कारीक कथा वाचल्यासारख वाटल.किती धडपड आणि कष्ट. खुप आवडली मुलाखत.ग्रेट जॉब मृ.
सिम्पली ग्रेट
एकेक क्षणाला मी त्या त्या परिस्थिती मधे जावुन विचार करत होतो की हे कसे केले असेल? मला जमले असते का? मिळालेल्या प्रत्येक सन्धीवर झडप घालुन तिचे सोने करणे येवढे सोपे नाही!
हे करतानाच, आपले मूळ न विसरता, त्याला घट्ट धरुन रहाणेही सोपे नाही!
आजच एक इलिन्ग्लिश वाक्य वाचनात आल
"There are only two lasting bequests we can give our children... one is roots, the other wings"
पन्ख मिळाल्यावर दूर उडुन जाणारे असन्ख्य असतात, पण यशाची अनेकानेक शिखरे कर्तुत्वाच्या भरार्या घेत घेत पादाक्रान्त करुनही, आपले मूळ न विसरणार्या या ज्येष्ठ आणि कर्तुत्वाने श्रेष्ठ माणसास माझे सादर प्रणाम!
अशा व्यक्तिमत्वाची रसरसती कहाणी आमच्या पर्यन्त पोचविल्याबद्दल लेखिकेचे (व मायबोलीचे) आभार
फारच छान!!
अतिशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करत जीवन (खर्या अर्थाने) जगणार्या भाऊसाहेबांना मानाचा सलाम.. अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख आम्हाला करुन दिल्याबद्दल मृण्मयी आणी बाकी सर्वांचे मनःपुर्वक आभार!!