Submitted by suryakiran on 9 May, 2010 - 03:29
अरे देवा ऐक ना रे,
माझ्या चिमूकलीचे गार्हाणे,
बाबा पुरवतो रे सगळे लाड
पण मला आईसुद्धा हवी रे..
जन्माला आले मी जेव्हा
तेव्हा मोठ्याने मी रडलेरे,
रूसूनी माझ्यावर तिने
मला दर्शन देणेच सोडले रे..
रोज पाहते मी वाट तीची,
अन चांदण्यांवर जळते रे,
माझी आई असून ती त्यांनाच
कुशीत घेवून जवळ करते रे..
पाऊसही येतो भेटून तिला,
अन मला खोटं खोटं सांगतो,
निरोप दिलाय मी तुझा तीला,
अन मला बरोबर गंडवतो...
बाबांना विचारले काही तर,
एवढा माणूस सुद्धा मुळूमूळू रडतो,
"अगं आई ऐकतेयंस ना" तुझ्यासाठी,
बाबा सुद्धा माझ्यासारखाचं वागतो ...
अरे देवा आता तरी तू तिला
पाठवून दे रे आमच्याकडे,
नाहीतर मला अन बाबलाच,
का घेवून जात नाही रे तिच्याकडे.. ??
-- सुर्यकिरण.
गुलमोहर:
शेअर करा
फ. मु. शिंदेंच्या "आई"
फ. मु. शिंदेंच्या "आई" कवितेची आठवण झाली.
"आई असते एक धागा
दिव्याला उजेड दावणारी जागा"............
छानच.........
ह्रुदय-स्पर्शि कविता.....
ह्रुदय-स्पर्शि कविता.....
(No subject)
किरणा...
किरणा...
रडत रडतच कविता वाचली.
रडत रडतच कविता वाचली. आयुष्यात बर्याचदा आपाल्याला पाहिजे तस होत नसतं .
निशब्द...
निशब्द...
नको नको....असे वाचायलासुद्धा
नको नको....असे वाचायलासुद्धा नको वाटते!
अप्रतिम......
अप्रतिम......