अरे देवा ... ( मातृदिन विशेष - ९ मे २०१०)

Submitted by suryakiran on 9 May, 2010 - 03:29

अरे देवा ऐक ना रे,
माझ्या चिमूकलीचे गार्‍हाणे,
बाबा पुरवतो रे सगळे लाड
पण मला आईसुद्धा हवी रे..

जन्माला आले मी जेव्हा
तेव्हा मोठ्याने मी रडलेरे,
रूसूनी माझ्यावर तिने
मला दर्शन देणेच सोडले रे..

रोज पाहते मी वाट तीची,
अन चांदण्यांवर जळते रे,
माझी आई असून ती त्यांनाच
कुशीत घेवून जवळ करते रे..

पाऊसही येतो भेटून तिला,
अन मला खोटं खोटं सांगतो,
निरोप दिलाय मी तुझा तीला,
अन मला बरोबर गंडवतो...

बाबांना विचारले काही तर,
एवढा माणूस सुद्धा मुळूमूळू रडतो,
"अगं आई ऐकतेयंस ना" तुझ्यासाठी,
बाबा सुद्धा माझ्यासारखाचं वागतो ...

अरे देवा आता तरी तू तिला
पाठवून दे रे आमच्याकडे,
नाहीतर मला अन बाबलाच,
का घेवून जात नाही रे तिच्याकडे.. ??

-- सुर्यकिरण.

गुलमोहर: 

फ. मु. शिंदेंच्या "आई" कवितेची आठवण झाली.
"आई असते एक धागा
दिव्याला उजेड दावणारी जागा"............
छानच.........