गझल कार्यशाळा - निमंत्रण

Submitted by वैभव_जोशी on 13 September, 2008 - 03:11

मित्रांनो ,

मायबोली मराठी गज़ल कार्यशाळा -२, दि. १६/०९/२००८ पासून आरंभ होत आहे. ही कार्यशाळा कशी चालेल यासंदर्भात काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे

१) ह्या कार्यशाळेत मायबोलीचा कुठलाही सदस्य भाग घेऊ शकतो.
२) ह्या कार्यशाळेसाठी लिहीलेल्या गज़ल kaaryashaalaa08@maayboli.com
ह्या पत्त्यावर पाठवाव्यात .
३) ह्या गज़ल ४ गज़लकार व एक संगीतकार यांनी मिळून बनलेल्या समितीतर्फे तपासल्या जातील.
४) निर्दोष गज़ल सदस्याच्या नावाशिवाय प्रकाशित होतील.
५) प्रकाशित गज़लवर वाचकांचा कौल घेण्यात येईल.
६) वाचकांच्या मताला ५०% महत्त्व असेल व उर्वरित ५० % समितीकडे आरक्षित असतील.
७) ह्या कार्यशाळेतील काही निवडक गज़लांचा मायबोली प्रातिनिधिक गज़ल संग्रहात समावेश करण्यात येईल . हा संग्रह पीडीएफ स्वरुपात मायबोलीवर दिवाळी अंकासोबत उपलब्ध करून देण्यात येईल .
८) ह्या कार्यशाळेतील विजेता , उपविजेता व एक् उत्तेजनार्थ अशा तीन गज़लकारांना मायबोली स्मरणचिन्ह देण्यात येईल.
९) ह्या कार्यशाळेतील विजेत्याची मुलाखत मायबोलीच्या मुखपृष्ठावर प्रकाशित करण्यात येईल.
१०) ह्या कार्यशाळेसाठी नावनोंदणी वर दिलेल्या ई-पत्त्यावर दि. १८/०९/२००८ पर्यंत सुरू असेल.

मित्रांनो

पहिल्या गज़ल कार्यशाळेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने प्रेरित होऊन आपण हा उपक्रम हाती घेतला आहे. ही कार्यशाळा पहिल्या कार्यशाळेपेक्षा थोडीशी वेगळी व आणखीन मनोरंजक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकरच कार्यशाळेचा तपशील जाहीर करत आहोत. तरी सर्व सदस्यमित्रांनी लवकरात लवकर नाव नोंदविण्यास सुरुवात करावी जेणेकरून कार्यशाळेच्या रचनेला अंतिम स्वरूप देण्यास आम्हाला मदत होईल.

आपले स्नेहांकित

स्वाती आंबोळे , मिलिंद छत्रे , नचिकेत आठवले व वैभव जोशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे पहिल्या कार्यशाळेची लिंकही देता येईल का?

वैभव मला आपला मोबाईल नंबर द्याल का?

मस्त... चला घंटा वाजवा शाळेची...

खूपच छान.. मी माझे नाव नोंदवण्यासाठी इ मेल केली आहे. कृपया कन्फर्म करावे.

सही. मे आय कम इन सर / म्याडम? Happy

मी पण.. मी पण.

गुरुजी शिकवणार तर मी परत बिगरीपासून शिकणार!!!
Happy

--------------
नंदिनी
--------------

ए मला पण भाग घ्यायचाय. मी वरच्या पत्त्यावर मेल पाठवलीये पण ती परत आली.......का झालं असेल असं?

मित्रांनो,

काही तांत्रिक बिघाडामुळे वरील पत्त्यावर मेल केल्यास, पाठवणार्‍याला "Posting Error" असा reply messege जात आहे. आम्ही तो दुरुस्त करायचा प्रयत्न करतोच आहोत, पण तुमचे मेल आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. तेंव्हा सद्ध्या ह्याच पत्त्यावर नाव-नोंदणी करावी ही विनंती.

तुमच्या मेल ची पोच-पावती शक्य तितक्या लवकर देण्याचाही प्रयत्न आहे. ती न मिळाल्यास इथे सांगावे.

धन्यवाद,
संयोजन समिती

ता. क. मेल मध्ये आपला मायबोली ID नमूद करावा.

मित्रांनो ...

मायबोलीच्या प्रातिनिधिक गझल संग्रहात आपली गझल असावी असे आतापर्यंत ज्यांना वाटले त्यांची नावे खालीलप्रमाणे

१) आफताब
२) मीनू
३) संघमित्रा
४) गणेश कुलकर्णी
५) श्यामली
६) देवदत्त
७) दाद
८)अभिजीत दाते
९) नंदिनी_२९११
१०)सत्यजित
११) प्रसाद मोकाशी
१२) प्रसाद शिरगांवकर
१३) सारंग
१४) झाड
१५)जयावी
१६)गिरीराज
१७)अनिलभाई
१८)संदीप चित्रे
१९) चिन्नू

धन्यवाद

संयोजक समिती

शैलजा, संदीप आणि चिन्नू, तुमची मेल मिळाली आहे.

नवीन सदस्य :

जेलो,
आयटीगर्ल,
अश्विनी,
सुधीर जोशी,
सतीश देशपांडे,
कौतुक शिरोडकर

मी मेल पाठवली आहे आणि मला पण एरर संदेश आला...
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

हिमांशु, पुलस्ति, तुमची मेल मिळाली आहे.

मायबोलीच्या प्रातिनिधिक गझल संग्रहात आपली गझल असावी असे आतापर्यंत ज्यांना वाटले त्यांची नावे खालीलप्रमाणे :

१) आफताब
२) मीनू
३) संघमित्रा
४) गणेश कुलकर्णी
५) श्यामली
६) देवदत्त
७) दाद
८)अभिजीत दाते
९) नंदिनी_२९११
१०)सत्यजित
११) प्रसाद मोकाशी
१२) प्रसाद शिरगांवकर
१३) सारंग
१४) झाड
१५)जयावी
१६)गिरीराज
१७)अनिलभाई
१८)संदीप चित्रे
१९) चिन्नू
२०) जेलो,
२१) आयटीगर्ल
२२) अश्विनी
२३) सुधीर जोशी
२४) सतीश देशपांडे
२५) कौतुक शिरोडकर
२६) हिमांशु
२७) पुलस्ति
२८) परागकण
२९) अविकुमार
३०) मयुरेश
३१) नलिनी
३२) पल्ली
३३) उपास
३४) अश्विनी करमरकर
३५) अज्ञात
३६) अलका
३७) गिरीश

मित्रांनो,

नवीन लिहीणार्‍यांना माहिती आणि माहिती असणार्‍यांना उजळणी म्हणून वृत्तलयीची तसंच गझलच्या व्याकरणाची चर्चा आपण खाली दिलेल्या दुव्यांवर करतो आहोत :

http://www.maayboli.com/node/3607
http://www.maayboli.com/node/3623
http://www.maayboli.com/node/3625

आता लवकरच आपल्या या कार्यशाळेचे नियम जाहीर करू. Happy

मी मेल पाठवली आहे आणि मला पण एरर संदेश आला...!

परागकण, अविकुमार, तुमची नावे नोंदवून घेण्यात आली आहेत. तुम्हाला तशी मेल केली आहे.

कार्यशाळा समितीच्या जुन्या ई-पत्त्यावरून काही तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला अजूनही एरर मेसेज येतो आहे.
त्यामुळे तो ई-पत्ता यापुढे आपण वापरणार नाही आहोत.

यापुढचा सर्व पत्रव्यवहार kaaryashaalaa08@maayboli.com या पत्त्यावर करावा.

कार्यशाळेचे नियम इथे जाहीर केले आहेत.

मयुरेश, नलिनी, पल्ली, तुमची नावे नोंदवून घेण्यात आली आहेत. तुम्हाला तशी मेल केली आहे.

नमस्कार, मी मेल टाकलेय नावनोंदणीसाठी धन्यवाद!

उपास, तुमचे नाव नोंदवून घेण्यात आले आहे. तुम्हाला तशी मेल केली आहे.

नमस्कार, मी मेल टाकलेय नावनोंदणीसाठी.
धन्यवाद.

अश्विनी तुमचे नाव नोंदवलेले आहे.. तशी ईमेल पाठवली आहे तुम्हाला

==
भावनांचा मांडला बाजार नाही
शब्द माझा एवढा लाचार नाही
shama1_0.jpg

अश्विनी, गिरीश, अलका,अज्ञात आणि मीनाताई,
तुमची नावे नोंदवून घेण्यात आली आहेत. तुम्हाला तशी मेल केली आहे.

==
भावनांचा मांडला बाजार नाही
शब्द माझा एवढा लाचार नाही
shama1_0.jpg

मायबोलीच्या प्रातिनिधिक गझल संग्रहात आपली गझल असावी असे आतापर्यंत ज्यांना वाटले त्यांची नावे खालीलप्रमाणे :

१) आफताब
२) मीनू
३) संघमित्रा
४) गणेश कुलकर्णी
५) श्यामली
६) देवदत्त
७) दाद
८)अभिजीत दाते
९) नंदिनी_२९११
१०)सत्यजित
११) प्रसाद मोकाशी
१२) प्रसाद शिरगांवकर
१३) सारंग
१४) झाड
१५)जयावी
१६)गिरीराज
१७)अनिलभाई
१८)संदीप चित्रे
१९) चिन्नू
२०) जेलो,
२१) आयटीगर्ल
२२) अश्विनी
२३) सुधीर जोशी
२४) सतीश देशपांडे
२५) कौतुक शिरोडकर
२६) हिमांशु
२७) पुलस्ति
२८) परागकण
२९) अविकुमार
३०) मयुरेश
३१) नलिनी
३२) पल्ली
३३) उपास
३४) अश्विनी करमरकर
३५) अज्ञात
३६) अलका
३७) गिरीश
३८) चेतना
३९) मीनाताई

==
भावनांचा मांडला बाजार नाही
शब्द माझा एवढा लाचार नाही
shama1_0.jpg

चाळिशी!! Happy

सांगायला अत्यंत आनंद वाटतो की कार्यशाळेत आत्तापर्यंत सहभागी झालेल्यांची संख्या आता ४० च्या वर झाली आहे.
आज पूर्व अमेरिकन वेळेनुसार रात्री बारापर्यंत नाव नोंदणी सुरू राहील.

आत्तापर्यंतची यादी अशी :

१) आफताब
२) मीनू
३) संघमित्रा
४) गणेश कुलकर्णी
५) श्यामली
६) देवदत्त
७) दाद
८)अभिजीत दाते
९) नंदिनी_२९११
१०)सत्यजित
११) प्रसाद मोकाशी
१२) प्रसाद शिरगांवकर
१३) सारंग
१४) झाड
१५)जयावी
१६)गिरीराज
१७)अनिलभाई
१८)संदीप चित्रे
१९) चिन्नू
२०) जेलो,
२१) आयटीगर्ल
२२) अश्विनी
२३) सुधीर जोशी
२४) सतीश देशपांडे
२५) कौतुक शिरोडकर
२६) हिमांशु
२७) पुलस्ति
२८) परागकण
२९) अविकुमार
३०) मयुरेश
३१) नलिनी
३२) पल्ली
३३) उपास
३४) अश्विनी करमरकर
३५) अज्ञात
३६) अलका
३७) गिरीश
३८) चेतना
३९) मीनाताई
४०) हेमांगी (hems)
४१) सूपरमॉम
४२) bo-vish
४३) adm

==
भावनांचा मांडला बाजार नाही
शब्द माझा एवढा लाचार नाही
shama1_0.jpg

मी सहभागी होऊ शकलेय की नाही? प्लीज कळवा.

******************************************
आई नावाची वाटे देवालाही नवलाई
विठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई.

मधुरा, तुमचं नाव नोंदवून घेतलं आहे. Happy

==
छप्पराला दोष मी द्यावा कशाला?
भिंत आहे, पण तिचा आधार नाही
shama1_0.jpg

Pages