आंब्याचा शिरा:
लागणारा वेळ:
अर्धा तास
साहित्यः
१ वाटी जाड रवा
पाऊण वाटी सजुक तूप
१ वाटी साखर
२ वाटी हापुस अंब्याचा पल्प ( फ्रेश किंवा कॅन मधला)
दीड वाटी गरम दूध
काजु, भिजवलेले साल काढलेले बदामाचे काप, बेदाणे. (प्रमाण आवडी प्रमाणे)
सजावटः
ड्राय फ्रुट्स थोडे मिक्स करायला आणि थोडे सजावटीसाठी ठेवावे.
आंब्याचा सिझन असेल तर आंब्याच्या फोडी.
क्रमवार पाककृती:
१.अर्धी वाटी तूपावर रवा मंद आचेवर खमंग भाजून घ्या.
त्यात दीड वाटी गरम दूध घालून रवा छान फुलवून घ्यायचा.
२. फुललेल्या रव्यामधे एक वाटी साखर मिक्स करून रवा नीट हलवून घ्या.
३. साखर मिक्स झाल्यावर हापुस आम्ब्याचा आमरस घाला आणि मग उरलेलं तूप त्यात घालून रवा, आमरस सगळं नीट मिक्स करायचं, गॅस बारीक करून झाकण ठेवायचं.
४. दोन तीन मिनिटांनी वाफ आली कि त्यात काजु, बदाम तुकडे आणि बेदाणे घालून मिक्स करा.
शिरा तयार.
सर्व्ह करताना:
सजावट करताना छान अकाराच्या साच्यातून तूप लावून मुदी कराव्यात आणि फोटोत दाखवल्या सारख्या किंवा आवडी प्रमाणे काजु-बदाम-बेदाण्यांचं डिझाइन बनवून सजावट करावी.
वाढणी/प्रमाण:
खाणार्यावर अवलंबून
अधिक टिप्सः
* आंब्याच्या शिर्यामधे स्वाद फक्त हापुस आंब्याचाच ठेवावा.
वेलदोडा, केशर अशा गोष्टी अजिबात घालु नये.
* यु.एस मधल्या स्टोअर्स मधे मिळणारा केसर मँगो पल्प अजिबात वापरु नये, त्या पेक्षा रत्नागिरी हापुस, देसाईंचा पल्प मिळतो तो वापरावा.
* कॅलरी कॉन्शस लोकांने पोरशन कंट्रोल करावा पण कमी तूपात अजिबात करु नये, गचगचीत शिरा होईल !
माहितीचा स्त्रोतः
आई :)
हा आईने बनवलेल्या शिर्याचा फोटो :
Much requested video, finally on my channel ,
माझ्या चॅनलवर नवीन व्हिडिओ +grocery vlog : आंब्याचा शिरा ( आईची रेसिपी):
आवडला तर लाइक करा आणि शेअर करा :)
छानं! ती कोयरीच्या आकाराची
छानं! ती कोयरीच्या आकाराची प्लेट पण मस्त आहे.
थँक्स बी, पूर्वी आईकडे
थँक्स बी,
पूर्वी आईकडे कोयरीच्या आकाराची मूद होती, ते फार छान दिसायच् !
फोटो अगदी मस्त आलाय.. आंबा
फोटो अगदी मस्त आलाय.. आंबा किंवा कुठलंही फळ घालून शिरा करायचा असेल तर अगदी भारी पेशन्स ठेवून मंद गॅसवर रवा भाजावा लागतो. हात दुखून येतात अगदी पण क्या करें, सब्र का फल मीठा होता है
डिजे, वर साहित्यात 'एक वाटी जाड रवा' असं लिही.. 'एक जाड वाटी रवा' असं झालंय.
मस्त!
मस्त!
अरे वा. हा करुन पाहीन.
अरे वा. हा करुन पाहीन. धन्यवाद डीजे.
डिजे. फोटू मस्त आहे. यम्मी.
डिजे. फोटू मस्त आहे. यम्मी.
अहाहा, मधुर मधुर पा.कृ.!
अहाहा, मधुर मधुर पा.कृ.! फोटू झकास!
हम्म्म, इंटरेस्टींग. फोटो
हम्म्म, इंटरेस्टींग. फोटो झकास.
सजावट मस्त आहे एकदम. हाच "तो"
सजावट मस्त आहे एकदम. हाच "तो" शिरा का ?
हीच ती फेमस रेसिपी! कधीही
हीच ती फेमस रेसिपी! कधीही कोणत्याही पार्टीत सगळ्यांना आवडतेच कायम. गंमत म्हणजे इतक्या वेळा आईच्या हातचा हादडून कित्येक वर्षे मी कधी केली नव्हती ही रेसिपी. नंतर करावासा वाटला तेव्हा सुरुवातीला मुळीच जमला नव्हता.
शिरा करताना तूप अन साखर चमच्याच्या हिशोबाने न घालता वाटीने (!) घालायचे असते हे कळले तेव्हापासून मस्त जमायला लागला मला हा शिरा!
थँक्स सगळ्यांना. सिंडे, नाही
थँक्स सगळ्यांना.
सिंडे,
नाही गं, 'तो' हा नाही , असा शिरा फक्त आईच्याच हातचा होतो
मस्त डीजे, ती प्लेट पण मस्तय,
मस्त डीजे, ती प्लेट पण मस्तय, खूप छान दिसतय.
डीजे ! जलन बर का...! चल,
डीजे ! जलन बर का...! चल, माझा मस्त जमला होता बारा गटग ला.
**तू पण तूप साखर सढळ हाताने घालून बघ, जमेल तुला सुद्धा
जबरा दिसतोय!
जबरा दिसतोय!
डीजे मस्त कृती. मांडणीही एकदम
डीजे मस्त कृती. मांडणीही एकदम मस्त.
मैत्रेयीने बारा गटगला केल्यावर लगेच तिच्याकडून ही कृती घेतली. ह्या पद्धतीने आतापर्यंत ७-८ वेळा तरी शिरा केलाय. जबरदस्त हा एकच शब्द आहे या शिर्याच्या चवीसाठी. खूपच सही लागतो. दर वेळी एकदम हिट होतो. मी माझ्या घरी, मैत्रीणींना आणि जमेल तेवढ्या सगळ्यांना ही कृती सांगीतली आहे (मैत्रेयीच्या नावासकट).
एक शंका! पल्प टाकल्यावर
एक शंका! पल्प टाकल्यावर मिश्रण पातळ नाही होत का?
फोटो फारच छान!..]
छान आहे शिरा आणि फोटो पण.
छान आहे शिरा आणि फोटो पण. महत्वाचा घटक, तो आईचा हात, नाही का ?
छान रेसेपी. करुन पाहीली
छान रेसेपी. करुन पाहीली पाहीजे लवकरच.
अहा!!!
अहा!!!
माझा मस्त जमला होता बारा गटग
माझा मस्त जमला होता बारा गटग ला. >>>> हो हो.. I agree. लोकांचा **** पणा विसरायला लावणारी चव होती त्य शिर्याची...
>> मैत्रेयीने बारा गटगला
>> मैत्रेयीने बारा गटगला केल्यावर लगेच तिच्याकडून ही कृती घेतली.
कधी? कुठे??
मला नाही मिळाला तो?! निषेध!!
रेसिपी मस्त.
झक्कींच्या घरी जे गटग झाले
झक्कींच्या घरी जे गटग झाले होते मागच्या उन्हाळ्यात तेव्हा केला होता मैत्रेयीने हा शिरा. स्वाती तू बहुदा भारतात गेली होतीस तेव्हा.
मस्त, छान फोटो!!
मस्त, छान फोटो!!
मला नाही मिळाला तो?! निषेध!!
मला नाही मिळाला तो?! निषेध!! >>> सगळा पग्यानेच लाटला. म्हणून तर आजकाल **ला अनुमोदनं देत असतो
**ला अनुमोदनं देत असतो >>>>
**ला अनुमोदनं देत असतो >>>> कुठे ??? कधी ???? !!!
मी विशिष्ठ कंपनीत नसल्यामुळे
मी विशिष्ठ कंपनीत नसल्यामुळे स्क्रीनशॉट्स घेतलेले नाहीत
विषयाला धरुन बोला ~हुक्मावर्नं
(No subject)
सायो, पन्ना आणि अमृता कोणत्या
सायो, पन्ना आणि अमृता कोणत्या कंपनीत आहेत ????
हुकूम मोडल्याबद्दल स्वारी..
अनुमोदन जाउ दे, स्टार स्टार
अनुमोदन जाउ दे, स्टार स्टार स्टार वापरण्या इतका सौम्य पणा मात्र अगदीच हवा गेल्या सारखा झालाय .. शो .ना !!
मै उगीच गांधीगिरी करून मायबोली सौम्य करते
सही रेस्पी आहे शिर्याची. एक
सही रेस्पी आहे शिर्याची. एक टीन आंबरस दिसला. त्या पल्पाचा करून बघते.
स्वाती हेव्याने हिरवी की **यांच्या बडबडीने ** झाल्यामुळे?
Pages