Submitted by भुंगा on 1 May, 2010 - 03:45
घन कृष्णमेघ यावे , पाउस ओझरावा
थेंबातल्या जीवाने मातीस प्राण द्यावा
मातीत कृष्ण्बीज ईवले रुजुनी यावे
पिउनी दवास त्याने हलकेच स्मित द्यावे
हृदयी अनंत स्वप्ने, काहुर भावनांचे
लेवुनी मुग्ध बाल्य नभपटल रोज वाचे
आपुल्याच शैशवाचे अंकुर पाहताना
पाऊल एक छोटे मातीत दृढ करावे
प्राशुन पंचतत्वे तारुण्यरुप घेई
कलिका फुलुनी येता बहरुन रुप येई
वार्यासवे सुगंध हा धुंद आसमंत
प्राजक्त फुल एक मातीत ओघळावे
ऋतूचक्र फिरत राही ते कृष्णबीज पाही
त्यातून पारिजात हे वृक्षरूप घेई
करुनी सडा फुलांचा मातीवरी निजावे
मातीस पारिजात पुजतो अनन्यभावे............
मातीस पारिजात पुजतो अनन्यभावे............!!!
गुलमोहर:
शेअर करा
व्वा! पिउनी दवास त्यने हलकेच
व्वा!
मातीस पारिजात पुजतो हेही आवडले.
पिउनी दवास त्यने हलकेच स्मित द्यावे
एक इवलेसे happy रोप नजरेस आले
धन्यवाद चिन्नु
धन्यवाद चिन्नु
मिलिंद, अगदी पहील्याच ईनिंगला
मिलिंद, अगदी पहील्याच ईनिंगला सेंचुरी मारलीस.
एकदम झकास कविता.
खूप आवडली. आवडत्या दहात गेली.
पुन्हा पुन्हा वाचावी अशी!
पुन्हा पुन्हा वाचावी अशी! किती सुंदर!
आता खरच मेघ येऊन बरसुन जावेत अस वाटायला लागलयं!!
सुंदर
सुंदर
मस्तच!!! पण टायपो सुधारा.
मस्तच!!! पण टायपो सुधारा.
श्रीकान्त, सहेली, पुनर्नवा,
श्रीकान्त, सहेली, पुनर्नवा, अमित मनापासुन धन्यवाद.......
अमित, ते टायपोचे नक्कि सुधारु.......
हळुवार!!! करुनी सडा फुलान्चा
हळुवार!!!
करुनी सडा फुलान्चा मातीवरी निजावे
मातीस पारिजात पुजतो अनन्यभावे
हे खूप आवडले.
(No subject)
भुंग्या, अचानक तुझी ही कविता
भुंग्या,
अचानक तुझी ही कविता सापडली.
छानच लिहिलेयस की ! .... आवडली.
तिसरं आणि चौथं कडवं अधिक आवडलं.
आणि शेवटची ओळ
"मातीस पारिजात पुजतो अनन्यभावे" >>>
..... मस्तच.
आहा ! आली बाई ही वर एकदाची
आहा !

आली बाई ही वर एकदाची
मस्त मस्त मस्त
भुंग्या आता नव्याने कविता वर आलीच आहे तर टायपो सुधारुन टाक की तेवढा
चांगली आहे कविता...
चांगली आहे कविता... आवडली.
शेवटच्या दोन ओळी जास्त आवडल्या.
क्या बात...क्या बात...क्या
क्या बात...क्या बात...क्या बात
जियो भुंगेश...
वा वा वा अप्रतिम कविता - खूपच
वा वा वा अप्रतिम कविता - खूपच आवडली.
मस्त्.......सुंदर
मस्त्.......सुंदर कविता........
धन्यवाद सर्वांचे. प्रिया,
धन्यवाद सर्वांचे.
प्रिया, उकाका आभार्स...... टायपो सुधारलेत
मातीस पारिजात पुजतो अनन्यभावे
मातीस पारिजात पुजतो अनन्यभावे >>>
क्लासच कल्पना.
हृदयी अनंत स्वप्ने, काहुर भावनांचे
लेवुनी मुग्ध बाल्य नभपटल रोज वाचे
>>>
फक्त या ओळींचा संदर्भ नाही लागला
भुंग्या, खूप सुंदर कविता.
भुंग्या, खूप सुंदर कविता.