बिलंदर : भाग ४

Submitted by विशाल कुलकर्णी on 21 April, 2010 - 05:58

भाग १ ,
भाग २,
भाग ३ ....

आता पुढे.....

"गावडे, हा इरफान ...! जर मी चुकत नसेन तर त्या सतीश देशमुखने वर्णन केलेला इरफान हाच असावा. खरेतर माझ्याकडे कसलाच पुरावा नाहीये. अगदी त्या रोहीतला सांगितल्याप्रमाणे त्याचे कार्ड वगैरे काही इरफानजवळ मिळालेले नाहीये. मागे सतीशने हे कार्ड मला दिले होते, त्यानंतर सतीश लंडनला गेला आणि मग त्याच्याशी असलेला संपर्कच तुटला.....

सद्ध्यातरी मी हवेतच तीर मारलाय. बघूया काही हातात येते का ते?

सतीशचं काय झालं असावं? तो लंडनमध्येच आहे की.....? तो जिवंत असेल ना...?

इन्स्पे. रावराण्यांच्या डोक्यात शेकडो प्रश्न भिरभिरायला लागले होते.

"परमेश्वरा त्या सतीशला जप रे. चांगला पोरगा आहे तो. त्याला जर काही झालं तर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल, कायदा कंबरेला बांधून एकेकाला जित्ता जाळीन भर बाजारात.....!"

"साहेब, तुमचा खुप जिव आहे ना त्या पोरावर."

"हो रे, छान दोस्ती झालीय त्याच्याबरोबर. किती साधा सरळ आणि प्रामाणिक मुलगा आहे. आजच्या जगात जिथे तरूण एझी मनीच्या मागे लागलेले असतात तिथे हा पोरगा तत्त्व, आदर्शवाद यावर ठाम विश्वास ठेवून स्वतःचा जीव धोक्यात घालायला निघालाय. असो तो रोहीत भारद्वाज येइल इथे लवकरच. तो इथे पोचायच्या आधी मला त्याचे सगळे इन - आऊटस हवेत. हेड ऑफीसला फोन करुन बघ काही माहिती मिळाते का? आणि काल इरफान दिवसभरात कुणा कुणाला भेटला होता, कुठे कुठे गेला होता, शेवटी कुणाला भेटला होता याबद्दल सविस्तर रिपोर्ट हवाय मला."

"साहेब मी आधीच संपर्क साधलाय त्यांचाशी. सुर्वेसाहेब तासाभरात डिटेल्स पाठवतो म्हणालेत. बाकी माहिती पण मी गोळा केलीय माझ्या खबर्‍यांकडून. हा इरफान धारावीत राहतो, म्हणजे राहायचा. जुना हिस्ट्रीशिटर आहे. मुळचा आझमगडचा, पैसा कमवायला म्हणून मुंबईत आला. सुरूवातीला लोकलमध्ये छोट्या मोठ्या चोर्‍या करायचा. पुढे कधीतरी मोमीनभाईच्या नजरेत भरला आणि मग त्याचे भाग्य पालटले. कालच्या त्याच्या सगळ्या अ‍ॅक्टिवीटीजची माहिती या फाईलमध्ये आहे." गावडेने उत्साहाने एक फाईल रावराणेंच्या हातात दिली.

"आता चांगलाच तयार झाला आहेस हा गावडे तू. मला काय लागेल हे तुला आधीच माहीत असते. रावराणेंनी कौतुकाने गावडेच्या पाठीवर थाप मारली.

"साहेब, तुमच्याबरोबर इतके दिवस राहून सवय झालीय आता." गावडे विनयाने उदगारला.

"बाय द वे मोमीनवर नजर असेलच तुझी."

"साहेब तेच तर सांगायचे होते. काल रात्रीच सद्याचा फोन आला होता. रात्री कुणीतरी अज्ञात माणसाने मोमीनभाईला सॉलीड धुतलाय. ते सुद्धा खुद्द धारावीत, मोमीनच्या अड्ड्यावर शिरून. मोमीनची तीन माणसं हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमिट आहेत. स्वतः मोमीनच्या डोक्यावर एवढे मोठे बँडेज आहे. तो कोण होता हे नाही कळले, पण मोमीनची माणसे त्याला पिसाळलेल्या कुत्र्यांसारखी सगळ्या मुंबईत शोधताहेत."

"काय सांगतोस? मोमीनला त्याच्या अड्ड्यावर जावून धुतला? आयला हा कोण डेअर डेव्हिल उपजला बाबा आता? गावडे... ट्रेस घे. का कोण जाणे पण माझं मन सांगतय या सगळ्याचा, सतीशच्या त्या केसशी नक्कीच काहीतरी संबंध आहे. वाटल्यास सरळ मोमीनला उचला. पण मला तो कोण होता ते कळायलाच हवे. आधी इरफानचा खुन होतो नंतर मोमीनला मारहाण. काहीतरी लिंक नक्कीच आहे गावडे."

इन्स्पे. रावराणे उत्साहाने उठले.

*******************************************************************************************

"शिर्‍या, मग त्या इरफानबरोबरच्या झटापटीत तुला या जखमा झाल्या का?" अवधूतने शिर्‍याच्या चेहर्‍याकडे पाहात विचारले.

"नाही रे, ते टिनपाट , माझ्या हातात गन बघितल्यावरच गळाठलं. जखमा त्या मोमीनच्या अड्ड्यावर झाल्या. चार पाच जण होते हत्यारांसकट. पण सोडला नाय एकेकाला. त्या मोमीनला तर बुकलून काढलाय. त्याने डायरी काढून दिली तेव्हाच सोडला. मला वाटले होते त्या पेक्षा केस थोडी कठीण झालीय. मला वाटत होते इरफान मेन प्लेयर्सपैकी आहे, पण तो साला फक्त बाहुलं निघाला. गेमप्लानचा मास्टर प्लेयर रोहीत आहे आणि मोमीन त्याचा पार्टनर.... पडद्याआडचा ! सगळ्या मुंबईत शोधत असतील मला आता."

"तु काय करायचं ठरवलं आहेस शिर्‍या?" अवधुतला काळजी वाटायला लागली होती.

"औध्या, पहीलं काम म्हणजे मी ही जागा सोडणार आहे. तू माझ्याबरोबर दिसणं किंवा असणं धोक्याचं आहे. तेव्हा मी दुसरीकडे राहायला जाईन म्हणतो."

तसा औध्या संतापला.

"बस्स हेच ओळखलंस का? आपलं काय ठरलय?"

"चिडू नको बे येडपटा, तुला बाहेर ठेवत नाहीये मी. पण आपल्या दोघांचं एकत्र राहणं धोकादायक आहे. मी काल बराच हंगामा केलाय, त्यामुळे त्यांच्या नजरेत भरलोय. तु अजुनही बाहेर आहेस. त्यामुळे कुणीतरी एकजण मोकळा असणं आवश्यक आहे. इन केस मला काही झालंच, तर जमा केलेली सर्व माहिती पोलीसांपर्यंत किंवा शक्य झाल्यास प्रसारमाध्यमांपर्यंत पोचवण्यासाठी तु त्यांच्या नजरेबाहेर असणं आवश्यक आहे. आणि आपण संपर्कात राहूच. मला तुझी गरज लागणार आहेच."

"आता तुझा पुढचा टार्गेट कोण असेल?"

"हम्म्म्म..." शिर्‍याने एक थंड निश्वास सोडला.

"बळी म्हणायचय का तुला? ....' कामिनी' सत्याची तथाकथीत मैत्रीण, जिने त्याला धोका देवून मृत्युच्या दारात नेले."

"म्हणजे तिला पण मारणार तू?"

"अर्थात, पण तिला असा मृत्यू येइल की मरताना प्रत्येक क्षण ती मृत्यूची भिक मागेल... आणि मृत्यू अगदी सावकाश तिला खेळवत खेळवत येइल. मांजर जसं मारण्यापुर्वी उंदराला खेळवतं ना तसं."

शिर्‍याच्या आवाजातील थंड कृरपणा जाणवला तसा अवधूत शहारला.

"तू नक्की काय करणार आहेस शिर्‍या? आणि या डायरीचं काय करणार?"

"कळेल लवकरच? डायरी हे आपलं ट्रंप कार्ड आहे, ते इतक्यातच वापरायचं नाहीये."

"ठिक आहे नको सांगु गुप्त ठेवायचं असेल तर. पण मग तू राहायला कुठे जाणार आहेस?"

तसा शिर्‍याच्या चेहर्‍यावर एखाद्या लब्बाड बोक्यासारखा मिस्कीलपणा आला.

"त्या रोहीतची आणि मोमीनची माणसे मला सगळ्या मुंबईत शोधत असतील. आणि मी मात्र त्यांच्याच घरात बिनधास्त असेन... औध्या, अरे लपून कारवाया करायला 'धारावी' सारखं दुसरं आदर्श ठिकाण कुठे मिळेल?
मी कालच एक खोली ठरवून आलोय भाड्याने......

"तु म्हणजे खरेच धन्य आहेस शिर्‍या!" औध्याने त्याच्याकडे पाहत नाटकीपणे हात जोडले. "आणि पैशाचं काय, तो कुठून आणणार?"

शिर्‍याचा आवाज थोडासा कातर झाला. " सत्याचे पैसे उपयोगी पडताहेत आता."

**********************************************************************************************

"या मिस्टर रोहीत भारद्वाज.....! तुमचीच वाट पाहात होतो."

रावराणेंनी हसून रोहीत भारद्वाजचं स्वागत केलं तसा तो बुचकळ्यात पडला ,

"फोनवरचा माणुस नक्की हाच होता?"

रावराणेंनी त्याला सर्व गोष्टी क्लिअर करून सांगितल्या..अर्थात जेवढं त्याला कळायला हवं तेवढंच. प्रेताचे फोटो दाखवले.

"मला एक सांगा मिस्टर भारद्वाज, इरफान शेवटचा तुम्हाला कधी भेटला होता?"

"इरफान...," रोहीत अलगद जाळ्यात अडकलाच होता, पण लगेच त्याने सावरून घेतले...

"इरफान, कौन इरफान? इस आदमी को पहली बार देख रहा हू!"

"याला तुझ्या ऑफीसच्या चकरा मारताना पाहिल्याचं सांगणारे बरेच जण आहेत माझ्याकडे." रावराणे

"देखो साब, मै एक इव्हेंट ओर्गनायझर हू, मेरे पास हजारो लोग आते है, काम के लिये! हो सकता है ये बंदा भी कोइ सप्लायर हो और उसी सिलसिलेमें आता हो मेरे ऑफीस. लेकीन मै इससे कभी नही मिला. किसी ज्युनीयर लेवल ऒफ़ीसर या ंएनेजर से मिलता होगा! " रोहीत...

"मग त्याच्या खिशात तुझं कार्ड कसं काय आलं?"

"सर बिझिनेस मॅन हू मै. धंदे के लिये कार्ड बांटने पडते है! उसके बगैर लोगोको पता कैसे चलेगा की कोइ रोहीतभी है इस बिझनेसमें."

रोहीत आता नॉर्मल झाला होता. समोरच्या माणसाकडे आपल्याविरुद्ध फारसे काही नाही हे बहुदा त्याच्या लक्षात आले होते.

"त्याचं मोबाईलचं रेकॉर्ड चेक केलं आम्ही... गेल्या आठवड्यात त्याने तुला चार वेळा फोन केलाय. याबद्दल काही स्पष्टीकरण आहे तुझ्याकडे."

तसा गावडे रावराणेंकडे बघायला लागला. त्याने दिलेल्या फाईलमध्ये याबद्दल काहीच नव्हते. त्याच्या लक्षात आले की बहुदा ही साहेबांची नवी चाल. पण रोहीत फसला नाही. काही तरी थातुर मातूर उत्तर देवून त्याने उडवून लावलं.

"देखो साब, जब आपके पास कुछ सबुत आ जाये तो बुला लेना मुझे. हाजीर हो जाऊंगा. अब अगर इजाजत हो तो मै चलू? बहोत काम पडा है!"

रावराणेंनी हात उडवले..

"ठिक आहे जा तू. पण मला गरज लागली की तुला परत यावे लागेल. मी एकदा का एखाद्याचा पिच्छा पुरवला की त्याला मरेपर्यंत सोडत नाही. आज ना उद्या तु ही येशीलच. निघ आता...!"

तसा रोहीत उठला आणि दाराकडे निघाला....., तो दारापर्यंत पोहोचला आणि रावराणेंनी हाक मारली...

"बाय द वे मिस्टर भारद्वाज्.....सतीश देशमुखांचं काय केलंत तूम्ही?

तसे रोहीतचे डोळे चमकले...त्याच्या मनात पहिला विचार आला...

"इसका मतलब ये बंदा है, वो पोलीसवाला जिसके टचमें था सतीश!"

आणि त्याच्या मनातलं वाचता येत असल्यासारखे रावराणेंनी पुढचा बाँब टाकला.

"अब तेरे को पता चल ही गया है तो आगे की बात भी सुन ले! वो दोस्त है मेरा... याद रखना.... उससे अगर इन ३-४ दिनोमे काँटॅक्ट नही हो पाया तो मै तेरी गर्दन पकडने पहूंच जावूंगा!"

"म्हणजे पोलीसांना अजुन कसलाच सुगावा लागलेला नाहीये तर." रोहीत मनोमन सुखावला.

"आप उसको कैसे जानते है साहब. वो तो आजकल लंडनमें है, आनेवाले एक इव्हेंटकी तैय्यारी कर रहा है! आपको चाहीये तो मै उसका वहा का नंबर भेज देता हू आपको!" साळसुदासारखे त्याने उत्तर दिले.

"भेजनेकी बात क्युं? अभी नही दे सकते?"

"साब मेरे मोबाईलपें नही है, लेकीन ऑफीस पहुंचते ही पहला काम वही करुंगा, मै चलता हूं !" रोहीत चौकीच्या बाहेर पडला.

"गावडे, बघितलंस ना? सतीशचं नाव काढलं की कसा चमकला ते. काहीतरी लोचा आहे. याच्यामागे आपला माणुस लाव."

"कदम ऑलरेडी त्याला चिकटलाय साहेब.. काळजी करू नका.

********************************************************************************************************
दोन दिवसानंतर ....

मघाशी आम्ही मोमीनच्या एका माणसाला उचललाय.... भेटणार?"

रावराणेंचे डोळे चमकले....., दोन्ही हात एकमेकांवर जोराने चोळतच ते उठले.

"त्या येड्याची काय खैर नाही आता." गावडेंनी आकाशाकडे बघत हात जोडले आणि ते ही साहेबांच्या मागे टॉर्चर रुममध्ये शिरले.

***********************************************************************************************

"अरे कहा हो जानेमन तूम? कितने दिनोसे ट्राय कर रहा हू... तुम्हारा फोनही नही लग रहा है! दुबईवरून आलीस की नाही अजुन, का तिथेच आहेस?"

"देखीये आपको शायद कुछ गलतफहमी हो रही है, मै पिछले दो सालसे इंडीयामेंही हूं, बहुतेक तुम्ही राँग नंबर लावलाय. तुम्हाला कुणाशी बोलायचय....."

समोरच्या माणसाने तिचे बोलणे मध्येच कापले....

"बस्स क्या जान, अब हमसे क्या छुपाना? यार मै अजीज बोल रहा हूं! तुम्हारा पैसेका ब्रिफकेस मेरे पास पडा है, पुरा खोका है, पैसा ले लो और माल पहुंचा दो! कलानगर के पिछे उसी जगह पें मिलुंगा मै! आज शाम साढे छह बजे! आ जाना, माल की बेहद जरुरत है मुझे! समझी?"

तसे तीचे डोळे चमकायला लागले.. चुकून कोणीतरी तिला कुणी दुसरीच स्त्री समजुन बोलत होते. त्याच्याकडे किमान एक कोटी रुपये होते ज्याच्या बदल्यात त्या स्त्रीने त्याला काहीतरी माल सप्लाय करण्याचे प्रॉमीस केले होते.

"पहले पैसा तो कब्जेमें कर लेते है, बादमें सोचेंगे उसका क्या करना है!"

तिने फोन उचलला...

"भाई बकरा है! दोन माणसं पाठवून दे, कला नगरच्या कॉर्नरला मी उभी असेन... त्यांनी फक्त मला फॉलो करायचेय. माझ्या हातात बॅग आली की मी इशारा करेन, लगेच त्या माणसाला उचलायचं. पुढे काय करायचं ते नंतर सांगेन. संध्याकाळी साडे सहा वाजता...कलानगर ! आणि हे आपल्यातच राहू दे. नेहमीप्रमाणे तुझा हिस्सा ३०%, डन?"

"डन बेबी!"

***********************************************************************************************

इन्स्पे. सतीश रावराणे डोक्याला हात लावून बसले होते.

त्यांच्या कानात नुकतेच झोडलेल्या त्या गुन्हेगाराचे, मोमीनच्या माणसाचे शब्द घुमत होते.

"साहेब..... तो कोण होता माहीत नाय. २६-२७ चा लडकाच होता, पण लै डेंजरस हुता. बेकार मारला त्यानं आमाला. मोमीनभाईकडून कायतरी हवं होतं त्याला. काय ते नाय कळलं. फकस्त जाता जाता येक बोलला ते ऐकलं म्या.... त्यो म्हणत हुता... माज्या सत्याला मारलात तुम्ही, शोधून शोधून मारीन एकेकाला, एकालाही सोडणार नाही."

म्हणजे सतीश? सगळे दुवे जुळत होते... अखेर त्याचा बळी गेला होता.

"गावडे , माझा संशय खरा ठरलाय. त्यांनी सतीशला मारलंच गावडे. तो निष्पाप पोरगा शहीद ठरला. मी तोकडा पडलो गावडे....!" रावराणेंचे डोळे भरून आले होते.

"सोडणार नाही... एकेकाला पकडुन मारेन...! " संतापलेले रावराणे त्वेशाने उठले.

"साहेब...." गावडे थरारला..., तसे रावराणेंनी त्याच्याकडे वळुन पाहीले. ती थंड नजर...

"एक पोलीस जेव्हा कायद्यातल्या पळवाटा शोधतो ाणि वापरतो तेव्हा तो काय करू शकतो हे त्यांना कळेल आता. पण आधी सगळी माहिती काढली पाहीजे. कदमला काँटॅक्ट कर. तो भडवा भारद्वाज कुठे आहे ते विचार, तो जर नजरेआड झाला तर मी तुझी सालटी काढेन म्हणाव."

"साहेब ते करतोच, पण हा नवीन पोरगा कोण आलाय ते शोधायला पाहीजे. तो नक्कीच सतीशचा कोणीतरी जवळचा नातेवाईक आहे. मी आजच सतीशच्या रुम पार्टनरला, त्या अवधुतला गाठतो ."

"लांबुनच गावडे, तो जो कोणी आहे तो आपलंच काम करतोय. आणि जरा जपुन, तो पोरगा खतरनाक आहे. त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न कर. आणि हो अवधुतला कसलाही संशय येता कामा नये. पोलीस म्हणुन नकोस भेटू त्याला"

रावराणेंना माहीत नव्हते की त्यांच्यावर काही करायची वेळच येणार नव्हती.

**************************************************************************************************

संध्याकाळचे सव्वा सहा वाजले होते. ती कलानगरच्या कॉर्नरवर भाईच्या माणसांची वाट पाहात होती. साडे सहाच्या दरम्यान अन्वर आणि गणपत तिथे पोहोचणार होते. ते आले की ती ठरल्या ठिकाणी त्या माणसाला भेटणार होती. त्याची रकमेची बॅग हातात आली की तिची माणसे त्याला उचलणार होती. बरोब्बर साडे सहा वाजता एक मारुती ओम्नी कलानगरच्या कॉर्नरपासुन थोडी पुढे जावून थांबली. गणपतने चालत्या गाडीतून तिला इशारा केला होताच. तशी ती पुढे निघाली....

एक कोटी रुपये ! भाईचे ३०% गेले तरी ७० लाख हातात उरत होते. तिच्या मनात हजार कल्पना चमकुन गेल्या... पैसे खर्चण्याच्या!

ती ठरलेल्या ठिकाणाकडे निघाली, तेवढ्यात तिचा फोन वाजला...

"जान, कोइ तुम्हारे पिछे है! उनसे पिछा छुडाओ पहले! वो लोग ओम्नीमें है!"

"च्यामारी, भलताच चालु दिसतोय." तीने मनातल्या मनात त्याला चार शिव्या हासडल्या.

"कलानगर के सामनेवाली गली से थोडा आगे आ जावो, फिर लेफ्ट टर्न ले लेना, एक बडा सा सरकारी बिल्डिंग है, उसमें घुस जाना, मै तुमको ढुंढ लुंगा! फोन चालु रखना !"

तीने मनातल्या मनात कचकचीत शिव्या हासडल्या , फोन चालु ठेवल्याने तिला आपल्या माणसांना सुचनाही देता येत नव्हती आणि पुढे जावून त्या बिल्डिंगमध्ये शिरली.

"अब बेसमेंट की पास वाली सिढियोंके पिछे एक लेडीज टॉयलेट है, वहा पर आ जाओ!"

"टॉयलेट?" तिने नाक आक्रसले..., पण प्रश्न कोटीचा होता, गत्यंतरच नव्हते. अन्वर आणि गणपत आपल्यावर नजर राखून असतील आणि इथेही पोचतील अशी मनोमन आशा बाळगत ती त्या टॉयलेटकडे वळली.

सर्वच सरकारी इमारतीमध्ये आढळणार्‍या गलिच्छ टॉयलेट्सप्रमाणे हे टॉयलेट देखील गलिच्छ, घाणेरडे होते. सगळीकदे अमोनियाचा वास पसरलेला होता. ती नाकाला रुमाल लावतच आत शिरली. आत एका बाजुला एक लॅव्हेटरी (जी बंद होती) , समोर एक गंजलेला फुटका आरसा आणि पाण्याची जेमतेम धार असलेले वॉश बेसीन होते. सवयीने तिने तसेच आरशात आपला चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला. गंजलेल्या आरश्यात काहीच दिसत नव्हते... तेवढ्यात तिला आपल्या मागे काहीतरी हालचाल जाणवली... तशी तीने भरकन मागे वळण्याचा प्रयत्न केला.. पण उशीर झाला होता. तिच्या नाकावर काहीतरी दाबले गेल....क्लोरोफ़ॊर्मचा वास .....

शुद्ध हरपण्यापुर्वी तिला एवढेच कळाले की कुणीतरी आपल्याला खांद्यावर टाकून कुठेतरी चालवले आहे.....

क्रमशः

गुलमोहर: 

भारी रे भौ एकदम...
हो संपवयची घाई करू नकोस, मला तर वाटतय ही मध्यंतराची सुरुवात आहे... अजून ३-४ भाग आरामात रंगू शकतील..

पु.भा[गास्].शु.

Pages