दिवाळी अंक २००८ पूर्वतयारी

Submitted by Admin-team on 26 August, 2008 - 01:56

नमस्कार मायबोलीकर

यंदा मायबोली दिवाळी अंकाचे ९वे वर्ष. गेली ८ वर्षे आपल्या सहकार्यामुळेच दरवर्षी उत्तमोत्तम अंक प्रकाशित होत आहे. तेव्हा यंदा संपादक मंडळात ज्यांना काम करायची इच्छा आहे त्यांनी तसेच ज्याना layout,illustrations, देवनागरीकरण, शुद्धलेखन तपासणी करायची इच्छा आहे त्यांनी इथे लिहावे.

तसेच आपल्या काही सूचना असल्यास इथे लिहाव्यात.

आधीचे अंक इथे वाचायला मिळतील.

नमस्कार. देवनागरीकरण, तपासणी इ. कामांत सहभागी होण्याची इच्छा आहे.

    ***
    Skating away on the thin ice of the new day...

    मला पण दिवाळी अंकासाठी काम करायला आवडेल..
    ==================
    श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
    क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

    नमस्कार. संपादक मंडळात सहभागी व्हायला आवडेल.

    देवनागरीकरण, शुद्धलेखन मदत करायला आवडेल.

    संपादक मंडळातही काम करायला आवडेल.

    देवनागरीकरणात मदत करायला आवडेल

    मलाही काम करायची इच्छा आहे. मी करू शकण्याजोगे काही काम असेल, तर जरूर सांगावे.
    --
    हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
    सुंदर साजिरा, श्रावण आला..!

    मला काम करायला आवडेल. कळवावे.

    मला पण संपादकांना मदत करायला आवडेल. शुद्धलेखन तपासण्याच्या कामात मदत करायला जमणार नाही. बाकी काहीही.

    कोणतीही मदत करायची इच्छा आहे. देवनागरीकरण, शुद्धीकरणही जमेल.

    मलाही मदत करायची इच्छा आहे. पण काय करता येइल त्याबाबत काही माहीती नाही.
    अनघा

    मीही. पण काय करता येईल? देवनागरीकरण एकवेळ. पण शुद्धीकरण? माहीत नाही... माझ्याच चुका माझ्या उशीरा लक्षात येतात...
    पण माझ्यायोग्य काही असल्यास जरूर.

    मलाही सहभागी होण्याची इच्छा आहे.
    देवनागरीकरण, "शुद"लेखन तपासणी करायला आवडेल.
    इतरही काही काम असल्यास चालेल.

    >>माझ्यायोग्य काही असल्यास जरूर
    >>इतरही काही काम असल्यास चालेल.
    लिहा काहीतरी अंकासाठी. Happy

    दिवाळी अंका करता लेख कुठे पाठवायचा? लिहुन तयार आहे.

    दिवाळी अंकाची सध्या पूर्वतयारी चालु आहे. संपादन मंडळ तयार झालं की ते पुढील सूचना देतील.

    पूर्वतयारी म्हणजे काय काय करावे लागते ह्याची कल्पना/यादी देता येईल का ? शुद्धलेखनात मलाच एरवी सुधारणा येतात. ते तर बाद. दुसरे काही माझ्यायोग्य काही असल्यास जरूर सांगा.

    मलाही दिवाळी अन्कासाठी मदत करायला आवडेल पण कशी ? माझ्याकडे स्वतहाचे कोम्प्युटर नाही.

    मलाही दिवाळी अन्कासाठी मदत करायला आवडेल पण कशी ? माझ्याकडे स्वतहाचे कोम्प्युटर नाही.

    दिवाळी अंकासाठी ललित लेख पाठवायचा आहे....... तो केव्हा.... कुठे..... पाठवू...?

    सांगायला आनंद होत आहे की मायबोली २००८ दिवाळी अंकाच्या मुख्य संपादकपदाची जबाबदारी "शोनू"ने घेतली आहे. सध्या संपादक मंडळ बनत आहे. लवकरच संपादक मंडळ इथे पुढील घोषणा करतील.

    शोनू, अभिनंदन.. Happy
    पुढील कामासाठी मनापासून शुभेच्छा.
    सर्वांच्या अगदी मनाप्रमाणे निघू देत हा अंक. पुन्हा हार्दिक शुभेच्छा.. Happy

    शोनू, अभिनंदन !!!

    शोनू -- हार्दिक अभिनंदन !
    काही मदत हवी असल्यास जरूर कळव Happy
    'मुद्रित शोधन' करू शकेन !!!
    (सरळ सांग ना लेका 'शुद्धलेखन' तपासशील म्हणून !!!)

    -----------------
    >> दिवाळी अंका करता लेख कुठे पाठवायचा? लिहुन तयार आहे.
    दॅट मेक्स अस टू Happy

    धन्यवाद मंडळी.
    लवकरच संपादक मंडळ व इतर माहिती जाहीर करू.
    अंकाबद्दल काही कल्पना असतील तर इथे लिहा लवकर.

    शोनू अभिनंदन. शक्य असेल तर यावेळच्या दिवाळी अंकात एक वेगळा (मोठा) दृक-श्राव्य विभाग करता येईल का? ज्यात काही लोक स्वतःच्या किंवा दुसर्‍या कोणाच्या साहित्याचे काव्यवाचन, कथाकथन, गायन, अभिवाचन असे सगळे प्रकार करतील,

    शोनू, अभिनंदन. काही मदत हवी असल्यास सांग.

    मलापण मदत करायला आवडेल. शुद्धलेखन तपासणे थोडे अवघड वाटते पण बाकी काही असल्यास जरुर कळवा.

    शोनू - हार्दिक अभिनंदन.

    माझासाठी काही काम असेल तर नक्की सांगा. मला कुठल्याही प्रकारची मदत करायला आवडेल.

    - स्वाती.

    Pages